करोनाचा बड्डे

२० मार्च २०२० रोजी फेसबुकवर लिहिलेली ही पोस्ट. मेमरीत वर आली. नेमकी आताही अशीच परिस्थिती येतेय की काय अशी वेळ आहे. लाॅकडाउन नाही होणार अर्थात मागच्यासारखा पण रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा भीती वाटायला लागली आहेच.
हे स्टेटस मी काल वाचलं तेव्हा मी किती निरागस होते असं वाटून गेलं Blum 3
"वायफाय, वीज, पाणी, टीव्ही सुरू आहे त्यामुळे हे दिवस सुसह्य होतायत हे निश्चित. नाही तर नक्की वेड लागलं असतं अनेकांना, किंवा भांडणं/मारामाऱ्या झाल्या असत्या. जीवनावश्यक वस्तू मिळतायत, तोही प्रश्न नाही.
पण प्रत्येकासमोर वेगवेगळ्या समस्या उभ्या आहेत, मित्रमैत्रिणी, परिचितांकडून जे कानावर पडतंय, ते असं.
एका नवीन सुरू झालेल्या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपनीने WFH ची सुविधा दिली पण काही कर्मचाऱ्यांकडे laptop/pc नव्हते, ते नवीन खरेदी करावे लागले.
पर्यटनविषयक कंपनीतल्या एका मित्राला पगार निम्माच मिळणार आहे, असं मेल आलंय.
छोटी हाॅटेल, पोळी भाजी केंद्र, वगैरे कसं मॅनेज करतील, असा विचार मनात येतोच.
एक मित्र त्याची उत्पादनं online सुद्धा विकतो. लोक घरबसल्या धडाधड order करतायत, त्याला त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकांना कामावर बोलवावं लागतंय. आता तो काही काळासाठी online सुविधा बंद ठेवणार आहे.
मुलांना परीक्षा होणार का, कधी हे माहीत नाही. या अनिश्चिततेचा मोठा ताण आहे.
सगळे जण घरी असल्याने स्वयंपाकाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीवरही मोठा ताण आहे, खासकरून ती गृहिणी असेल तर, कारण तिचं रोजचं वेळापत्रक पूर्ण कोलमडलं आहे.
अनेकांना घरातले ताण विसरण्यासाठी, त्यापासून काही काळ दूर राहण्यासाठी आॅफिस हा सोपा उपाय असतो. घरात काहीही समस्या असू शकतात, आणि त्यापासून दूर जावंसं वाटण्यात काहीच वावगं नाही. अशांवर घरी बसण्याचा ताण आहे.
दुसरीकडे, असा निवांत वेळ कधीच घालवायला मिळत नाही म्हणून त्याचा छान उपयोगही खूप जण करून घेतायत. स्वयंपाकघरात प्रयोग करतायत, चित्र काढतायत, पुस्तकं वाचतायत, सिनेमे पाहातायत, विणकाम भरतकाम करतायत, लिहितायत. मुलांना या सगळ्यात सहभागी करून घेतायत.
तुम्ही काय करताय?
All I want to say is, Let these be some of the best days of your life. Make the most of the home quarantine. Keep calm. Keep in touch with people on phone. We are all together in this.
❤️
#corona"

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तेव्हा मी म्हणाले होते, सध्या हवा बरी आहे त्यामुळे घरून काम करणं पथ्यावरच पडतंय.

मी आता म्हणत्ये, ह्या वर्षात लसही मिळण्याची लक्षणं आहेत. पण वश्या आला की बागेत चिकार कामं करता येतात. तेव्हा घरूनच काम करावं. येत्या आठवड्यात दोन दिवस संध्याकाळी दोनेक तास सुट्टी घेणारे. बागेतली कामं करायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.