प्रवासात चहा हवाच 

ट्रेकिंगला गेल्यावर एखादा महाभाग 'माझी चहाची वेळ झाली, इथे कुठे चहा मिळेल का?' अशी चौकशी करतो आणि टीकेला पात्र होतो. आमचा भावंडं आणि मित्रमैत्रिणी यांचा मिक्स ग्रुप होता. बहुतेक जण सतत चहा पिणारे आणि त्या दोन घोट चहासाठी जिवाची घालमेल करणारे.

आम्ही माथेरानला बरेच वेळा जात असू. तिथे एका स्पॉटजवळ एका काकूंचं खोपटं होतं. त्या स्पॉटला गेल्यावर एखादा नवीन मेंबर 'चहा मिळाला तर...' असं म्हणताच 'मिळेल मिळेल' असं  म्हणून आमचा लीडर भाऊ आम्हाला काकूंकडे घेऊन जात असे. आधीची ओळख असल्याने 'या, आलात, बसा,' असं म्हणून काकू 'तुम्हा शहरातल्या लोकांना जेवायला नाही मिळालं तरी चालेल पण नरड्यात चहा लागतो,' असं म्हणून कामाला लागायच्या. मग बहिणीशी आणि इतर मुलींशी local गप्पा. नवीन मंडळींना याची गम्मत वाटत असे. मग बहीण हळूचकन आल्याचा मोठा तुकडा आणि फरसाणचं पाकीट काकूंना देत असे. मग काकू फक्त मुलींना आत बोलवून 'जा, तिथं हंड्यात गरम पाणी आहे, हातपाय धुवा,' असा बोनस देत. मग आलं गूळ घातलेला कडवट गरम चहा पिऊन 'परत या ग मुलींनो,' असा प्रेमळ धाक. 

एकदा कर्जतला उतरून पहाटे लवकर निघायचं होतं. तेवढ्यात आमचा लीडर म्हणतो की, 'अरे, चहा प्याल्याशिवाय call कसा येणार?  चल बघू या आपल्या झिपऱ्याचा स्टॉल उघडा आहे का?' असं म्हणून मला जबरदस्तीने झिपऱ्याला शोधायला घेऊन गेला. सुदैवाने किंवा दुर्दैवाने तो झिपऱ्या गाढ झोपला होता तर याने 'अरे, उठ चल चहा पाज,' म्हणून त्याला विनवणी करत जबरदस्तीने उठवलं. तो पण 'काय काका, एवढ्या लवकर बाहेर कायबी भेटणार नाही,' म्हणून कटकट करत उठला आणि कामाला लागला. स्टॉल उघडला म्हटल्यावर आजूबाजूचे बरेच ग्रुप जमा झाले. त्यातले बरेच जण ओळखीचे निघाले आणि पहाटे पहाटे चहा पाव बिस्किटाबरोबर ओळख परेड झाली.

ताडोबा नागझिराला गेलो तेव्हा मुद्दामून आडवाटेला घर बघून चहा घेत होतो. आणि मग चहा पिता पिता अनेक अनवट लोकल स्पॉटची माहिती मिळत गेली. कोस्टल कर्नाटक गाडीने फिरताना या चहा कॉफीमुळे अनेक छुपी पण अप्रतिम काळ्या दगडातील ओरिजिनल मंदिरं बघता आली. तवांगला तर एवढी थंडी होती की दर एक तासाने भाऊ ड्रायवर काकांना चहा पाहिजे म्हणून गाडी थांबवत असे. शेवटी ड्रायवरला कळलंच की ही लोकं वेडी आहेत मग तोच आपणहून गाडी थांबवू लागला.

त्यानंतर मग आम्ही चहा बांधून घेऊ लागलो. थर्मासमध्ये चहा घेऊन वाटेत किंवा गाडीत कसरत करत प्यायचा. एकदा पंचमढीला धबधबा बघायला गेलो होतो. चहा घेतला होता बरोबर. धबधब्याजवळ एके ठिकाणी गर्दी जमली होती. एक उत्साही काका धबधब्यात भिजून गपगार पडले होते. मग काय आमचा थर्मासमधला घेतलेला चहा उपयोगी पडला. आम्ही मात्र पुढच्या वेळी दोन थर्मास लागतील असं म्हणून थंडगार पाण्यात भिजून चहा शोधार्थ बाहेर पडलो.
अशा आडवाटेवर चहा पिण्याबरोबर landscape फोटोग्राफी तसेच modelling ही मनसोक्त करता येते असा अनुभव आहे. बरोबर एखादा गायक प्रवासी असेल तर बेस्टच.
असा हा प्रवासातला चहा आणि बरंच काही.

भालचंद्र गोखले

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाही. 'पब्लिक' केला नाहीये का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

केला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

तितकाच महत्त्वाचा होता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी अडचण येते आहे, मी दोनतीन वेळा प्रयत्न केला. शेवटी काढून टाकला फोटो. महत्त्वाचा अर्थात नव्हता. 

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मला दिसला होता फोटो, नन्तर गायब झाला.
एका हिल स्टेशनात घेतलेला सेल्फि होता. पण हातात चहाचा कप नव्हता! Smile
चहा हे तंबाखू टाइप व्यसन आहे. मलाही सवय आहे म्हणून चहा पुराण आवडले.

कॉलेजात असताना आम्ही वर्गमित्र मिळून काही जमलं नाही तर मित्रमंडळ चौकात चहाचे दुकान काढायचे ठरवत होतो. तिथे दहा बारा प्रकारचे चहा आणि सुरेल गाणी ऐकायला मिळणार होते. पण झालं असं की पुढे सगळ्यांना इंजिनियर म्हणूनच काम धंदा मिळाला आणि पुणेकर एका अद्भुत अनुभवाला मुकले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. मित्रमंडळ चौक. आमच्या घरापासून वॉकिंग अंतरावर आहे. आले असते मी चा प्यायला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मित्रमंडळ चौक'मध्ये 'हाहाहा' करण्यासारखे काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे सगळ्यांना इंजिनियर म्हणूनच काम धंदा मिळाला आणि पुणेकर एका अद्भुत अनुभवाला मुकले!

एन्जिनीअर्स टाकणार होते चहाची टपरी?? म्हणुन हसले व अद्भुत अनुभव या उपमेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहाटळपणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बशी कुठेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

saucer?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बशी हवीच. 'न'बा, नवं चित्र काढाच आता, लोकाग्रहास्तव! आलं आणि गवतीचहाचा पाला आजूबाजूला दाखवला तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उलट्या खोपडीचा चहाटळपणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलटे धरल्यावर चहा पडायला लागला, पण कप (आणि बशीही) तिथेच का राहिलेत? शिवाय वर जाणाऱ्या वाफा हव्यातच!
गार चहात कधीच मजा नसते..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची लाड्की पाल पडली असेल चहात. याईईईईईक्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0