करोना, झोप, स्वास्थ्य आणि संकीर्ण.

करोना (कोरोना?) पसरला त्याला तीन महिने होत आले. आरोग्य आणि नोकरी यांची अनिश्चितता यांनी आपल्यापैकी अनेकांना या काळात केव्हा न केव्हा पछाडलं असणारेय. तसंच सलग इतके दिवस घरी अडकून पडल्याचे दुष्परिणाम वेगळेच. त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी.

अनियमित झोप ही या काळात अधिक बिकट झालेली समस्या. आपल्याला कारणही माहीत आहे - increased screen time for various reasons. तो जितका कमी करता येईल तितका करायला हवा. मी सहसा रात्री १०ला वायफाय बंद करते, मोबाइल दूर ठेवते. सहसा म्हटलंय, रोज जमतंच असं नाही. उदा. आता ११ वाजून गेले आहेत खूप मोह होतो झोपताना एकदा फोन/वत्साप/फेसबुक पाहायचा. तो टाळता आला तर उत्तम, नाही तर तास दीड तास गेलाच समजा. फोन बंद करून करायचं काय? वाचन, आवराआवर, किंवा फोनवर गप्पा. संगीत हाही उत्तम मार्ग, स्वत: गा किंवा ऐका. तसंच साधारण ८.३०ला किंवा शक्य झाल्यास आधीच जेवणं अतिशय आवश्यक आहे.

मला गेल्या वर्षी मार्च महिन्यात अचानक नोकरी सोडावी लागल्याने मी अस्वस्थ होते, त्यातून तब्येतीच्या कुरबुरी सुरू झाल्या. आणि झोपेचं चक्र बिघडलं. मला एरवी किमान आठ तास झोप लागते. पूर्वी ती सलग लागायची, आता रोज वेगळी परिस्थिती. मग एका योग प्रशिक्षक बहिणीचा सल्ला घेतला. त्यानुसार पुढील काही गोष्टी बऱ्यापैकी नियमितपणे करते. झोप पुष्कळ सुधारली आहे. (मी दुपारीही एखादी डुलकी काढते पण त्याने माझ्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होत नाही.)

झोपण्यापूर्वी ४-६ सूर्यनमस्कार घालावे आणि शवासन करावे. ॐ कार लावावा. भ्रामरी करावी. झोपण्याचे कपडे वेगळे असावे. शक्य असल्यास आंघोळ करावी अगदी झोपण्यापूर्वी. आंघोळ, सूर्यनमस्कार, शवासन, भ्रामरी, ॐकार, झोप असा क्रम.

संध्याकाळी ४-७ या वेळेत व्यायाम केल्याचाही फायदा होतो. मी शक्यतो चालतेच रोज.

झोपताना एकुणातच सर्व गोष्टींसाठी आणि काही विशिष्ट गोष्टींसाठी आभार मानावे. Expression of gratitude on a regular basis helps in getting peace of mind to a large extent. Be specific while you are saying thank you. That makes us think of small things over the day for which we are/should be grateful.
मी सकाळी उठल्यावर आधी प्राणायाम, थोडी योगासने करते. सृष्टीचे आभार मानते. मग चहा घेऊन कामाला लागते.

I have two networks of girlfriends, one from college days, since 1986; and the other of neighbors from around 15 years. We all are in touch every day and that helps me staying sane. Be it exchanging food, just chatting, talking an evening walk together, getting supplies (in these times, we do help each other much more than in normal days); we are a solid team. I know everyone may not be as lucky, and I am grateful for that.

(हे सगळं first world problems या गटात मोडू शकतो, याची जाणीव आहे.)

विशेष सूचना :
हे सगळं सर्वसामान्य माणसाला लागू पडतं, तात्कालिक नैराश्य, थकवा, यांत सुधारणा होते. गंभीर आजार असणाऱ्यांनी अर्थात व्यावसायिक मदत घ्यावी.

The breathing exercises that I follow are from here-
https://youtu.be/vIZjs0OYvec

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. सकारात्मक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद, तोच प्रयत्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

>>हे सगळं first world problems या गटात मोडू शकतो, याची जाणीव आहे.

ही असली अपराधगंडसदृश भावना तरी कशाला बाळगायची मी म्हणतो.... जसे आपण स्वत: जगातल्या सगळ्या दु:खाला आणि हाल-अपेष्टांना जबाबदार नाही तसेच जगात दु:ख असताना आपण तुलनेने सुस्थितीत कसे हा विचार तरी कशाला करावा? जमेल तशी आणि जमेल त्याला मदत करत रहावी, दान-धर्म वगैरे करावा, अडलेल्या नडलेल्याला उपेगी पडावं झालं.... उगाच 'चिंता करितो विष्वाची' असला रामदासी बाणा कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोवर आपण बेरड झालेलो नाहीत, तोवर ह्याची फार चिंता करू नये. तो बेरडपणा नसल्यामुळेच कदाचित असा विचार होत असेल.

जमेल तशी आणि जमेल त्याला मदत करत रहावी, दान-धर्म वगैरे करावा, अडलेल्या नडलेल्याला उपेगी पडावं झालं....

लोकांना मदत करण्यासाठी आपण धडधाकट, कर्तबगार, वगैरे, वगैरे असणं आवश्यक असतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>>लोकांना मदत करण्यासाठी आपण धडधाकट, कर्तबगार, वगैरे, वगैरे असणं आवश्यक असतं.>>>>>>>> + १००००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>लोकांना मदत करण्यासाठी आपण धडधाकट, कर्तबगार, वगैरे, वगैरे असणं आवश्यक असतं.

तत्वत: जरी बरोबर असलं तरी तसं प्रत्येक वेळी एखाद्याने खूप धडधाकट, कर्तबगार वगैरे असलंच पाहिजे असं नाही. आपल्या मदतीने अगदी 'समाजाला' वगैरे नाही पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जरी फरक पडला तरी खूप झालं असं मला वाटतं. आणि अशी मदत करणं खूप सोप्पं आहे. इमारतीतल्या वयस्कर लोकांना लॉकडाऊनच्या काळात त्यांची औषधं, किराणा, भाजीपाला आणून देणे वगैरे - इतकं सोपं. यात कशाला हवी कर्तबगारी? आता ऐसीवरच कोणीतरी कोणत्यातरी आजींचा लॉकडाऊन त्यांना खर्रा मिळवून देऊन सुसह्य केल्याची किंवा अडकलेल्या मजुरांना लिफ्ट देऊन नाशिकला पोहोचवण्याची उदाहरणं आहेत. तीही इतर कोणत्याही 'सामाजिक' वगैरे उपक्रमांइतकीच महत्वपूर्ण आहेत. प्रत्येक वेळेला मदतीची स्केल किंवा रीच महत्वाची नसते एवढंच म्हणणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटतंय.
सहज आचरणात आणता येण्याजोगं
I-m so happy

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इमारतीतल्या वयस्कर लोकांना लॉकडाऊनच्या काळात त्यांची औषधं, किराणा, भाजीपाला आणून देणे वगैरे - इतकं सोपं. यात कशाला हवी कर्तबगारी?

म्हणजे घरचं थोडंच किंवा सहजशक्य असल्यामुळे जावयाच्या घोड्याचीही काळजी घेता आली पाहिजे, बरोबर? आपलं आपल्याला जमलं नाही तर लोकांना कुठली मदत करणार? ह्यात काहीच कर्तबगारी नाही वाटत असेल तर तुम्ही पुरेशी डिसफंक्शनल घरं बघितलेली नाहीत.

प्रत्येक वेळेला मदतीची स्केल किंवा रीच महत्वाची नसते एवढंच म्हणणं आहे.

अगदी. बाकी काही जमलं नाही तरी समोर राहणाऱ्या म्हाताऱ्या जोडप्याची, ब्रिग आणि कर्करोगग्रस्त नेलियाची, चौकशी करणं आणि माझ्या बागेतली फुलं त्यांच्या दाराशी ठेवणं एवढं तरी मी करते. त्यासाठी मी हातीपायी धड असणं, त्यांची काळजी वाटणं, फुलं फुलवणं किंवा विकत आणणं, वगैरे गोष्टी जमवाव्या लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काश! हमारे पडोसमें भी अदिती जैसी शेजारीण होती!
आम्ही दोघंच म्हातारा-म्हातारी! जे काही लागतं ते आम्हालाच आणावं लागतंय !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती पुण्यात होती तेव्हा तुम्हाला तिची किंमत कळली नाही......... वगैरे !!! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाळेबंदी मुळे माझे ही झोपेचे चक्र बिघडले. रोज वेगवेगळ्या विचाराने उशिरा परियंत झोप लागत नसे , योग केल्याने चांगला उपयोग झाला , रोज १ तास चालणे, तसेच भामरी , अनुलोप विलोम ओंकार,बसारिका ,कपालभाती आदी मुळे बराच फरक अनुभवत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0