काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९

२४ मार्च २०१९:
आता लायसन्स रिन्यूअल साठीचं फिटनेस सर्टिफिकेट पण आर. टी. ओ. च्या आजूबाजूचे काही डॉक्टर्स शंभर दोनशे रुपये घेऊन देतात असं ऐकून होतो.

पण आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीत छोटेखानी छान आणि स्वच्छ अर्बन प्रायमरी हेल्थ सेन्टर आहे.
आपल्याला थ्रू प्रॉपर चॅनल जायचं असल्याने त्यांनाच फिटनेस सर्टिफिकेटची विचारणा केली आणि त्यांनी झटपट दिलं सुद्धा.

Medical application

खर्च: १० रुपये (केसपेपर काढण्यासाठी)

२५ मार्च २०१९:
आज आर. टी. ओ. १०:३० लाच थडकलो. आणि एन. टी. लायसन्स रिन्यूअल साठी सबमीट केलं.
लवकर गेल्यावर कामं सटासट होतात ही थिअरी परत 'य' व्यांदा प्रूव्ह झाली.

खिडकीवरचा केतन तर आता छान ओळखायला लागलाय.
त्याला विचारलं की लायसेन्सवरच्या क्लास मध्ये पुन्हा काही गडबड होणार नाही ना?

त्यानं फक्त हसून देवावर भरोसा ठेवायला सांगितलं.

आजचा खर्च: ६६६ रुपये (लायसन्स रिन्यूअल)
साइन ऑफ सैतान वगैरे Wink
सिक्स सिक्स सिक्स ... साइन ऑफ द बीस्ट...
आयर्न मेडनचं मस्त गाणं आहे माझं आवडतं Smile

१२ एप्रिल २०१९
पुण्यात असताना आईचा ऑफीसमध्ये फोन आला.
रिन्यूड लायसन्स घरी आलंय म्हणून.

लायसन्स आपल्या घरी येतं असा तोरा बरीचजणं मिरवायची त्याची आठवण आली.
गव्हर्नमेंट कॉलनीत सगळेच सरकारी नोकर असल्याने तरुणपणी काही मित्र लायसन्स आपल्या घरी येतं अशा फुशारक्या मारायचे त्याची आठवण झाली.
आपल्या भारतीयांना वशिले लावून काम करण्यात एक सुप्त आनंद मिळतोच.
पण आत्ताशा ते तसंही प्रत्येकाच्या घरीच येतं... बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच अंशी ट्रान्सपरंट झाल्यायत हे मान्य करायलाच हवं.

असो तर लगेच उत्साहाने परत बॅज ऍप्लिकेशनचं पेज उघडलं पण हाय राम अजूनही ऑप्शन नाहीच आणि आईकडनं लायसन्सचा फोटो मागवला तर ट्रान्सपोर्ट क्लासच गायब Sad

भेंचोत मला भीती वाटत होती तेच झालं.

लगेच सारथी सपोर्टला मेल केलं पण त्यांचा नेहमीप्रमाणे रिप्लाय आला आर. टी. ओ. ला जाऊन चेक करा म्हणून.

मला मोठ्ठ्यानी रडावसं वाटायला लागलं.

ठीक आहे पुनःश्च हरी ओम.

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet