कविता

आपले अनुभव सिमीत असतात. जाणिवेच्या कक्षा मर्यादित. त्या कूपमंडूकीय जगातून उत्तुंग भरारी घेण्याकरता आपण वाचतो. लेखक, कविंमुळे आपले क्षितीज काही प्रमाणात का होइना विस्तारते, विस्तारावे अशी अपेक्षा असते. आज अशी एक सुंदर कविता वाचायला मिळाली. कविता या प्रकाराकडेच पहाण्याची नवी दॄष्टी देउन गेली. कवितेचा अर्थ शोधत बसत, मेंदूला ताण देण्यात अर्थ नसतो. कविता ही लॉजिकल एन्टिटी नसून मूर्त/अमूर्त मनाच्या प्रकाश-छायेच्या खेळामधुन निर्माण झालेला एक अनवट जिवंत प्राणी असतो. असे ऐकले होते. टाकाउ कविता माझ्या तरी अद्याप वाचनात आलेली नाही.
.
गॅरी स्नायडर (gary snyde)हे कवी सांगतात - माझ्याकडे धावत, अडखळत, कोसळत येणार्‍या सुंदरशा काव्यमय अनुभूतीस मी तर्काच्या भगभगीत प्रकाशात जाऊन भेटूच शकत नाही कारण ती बुजरी आहे, ती अशी प्रकाशात माझ्याकडे येणार नाही. - ही कविता आणि कवीचे २ शब्द मूळ इंग्रजीतून वाचण्यातच मजा आहे.-
I go to meet that blundering, clumsy,beautiful, shy world of poetic, archetypal,wild intuition that's not going to come outinto the broad daylight of rational mind but wants to peek in. तर आज वाचलेली कविता ती खालीलप्रमाणे -

बिली कोलिन्स हेच म्हणतायत - कविता ही भुलभुलैय्या असू शकते तर कधी झिरझिरीत रेशमी वस्त्र जिच्या आरपार बघत तुम्हाला जग काही वेगळच रुप ल्यालेलं दिसून येतं. कधी कविता खेळकर असते तर कधी प्रकाश असते. आपल्याला जिच्या उजेडात अचानक ठेवा गवसून जातो. कविता हा साहीत्यप्रकार मोठ्याने वाचायचा असतो. मनाने तसेच कानाने उपभोगायचा असतो. काही लिरीकल (गेय) तर काही व्हिज्युअल कविताही असतात.

पण आपण करतो काय तर कविता घेतो, तिच्या मुसक्या बांधतो आणि तिला प्रश्न करत बसतो - तुझा अर्थ काय? तुझा अर्थ काय?
म्हणजे आपण तर्काच्या, रोजमर्रा अर्थाच्या रुक्ष चौकटीत एका अतिशय सुंदर मिथक पक्ष्याला कैद करु पहातो.

साभार - http://www.loc.gov/poetry/180/001.html

Introduction to Poetry
________________________________
I ask them to take a poem
and hold it up to the light
like a color slide

or press an ear against its hive.

I say drop a mouse into a poem
and watch him probe his way out,
or walk inside the poem's room
and feel the walls for a light switch.

I want them to waterski
across the surface of a poem
waving at the author's name on the shore.

But all they want to do
is tie the poem to a chair with rope
and torture a confession out of it.

They begin beating it with a hose
to find out what it really means.

—Billy Collins

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान लिहिले आहे.‌पण अनेकदा कविता कवीला सोडून इतरांना कळत नाही नेमकं काय आहे तीच्या मध्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

थोडे दिवस पिंजऱ्यात ठेवून पाळायची, खायला प्यायला दिले की ती आवडु लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

@च्रट हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं भाष्य दोन्ही आवडलं, पटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अनंत_यात्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0