जिकडे तिकडे उगवलेले पॉप कवि

https://qz.com/quartzy/1192915/in-defense-of-rupi-kaur-and-instagrams-po...
वरील लेख वाचताना माझ्या मनात आलेले विचार खाली नोंदवलेले आहेत.
सर्व इमेजेस जालावरुन.

पावसाळ्यात फोफावणाऱ्या कवकांसारखे सध्या पॉप कवि फोफावलेले आहेत. इन्स्टाग्रॅमवरच्या वरवर दिसायला शॉर्ट न स्वीट अशा ४ ओळी असा यांच्या कवितांचा साधारण साचा असतो. पुस्तकांच्या कोणत्याही दुकानात जा व या कविंची पुस्तके चाळता येतात. पैकी रुपी कौरचे मिल्क & हनी , अमान्डा लव्हलेसचे 'द विच डझंट बर्न इन धिस वन' वगैरे पुस्तके वाचलेली आहेत. हेतूपुरस्सर व ओढून ताणून, ' आम्ही विरुद्ध ते' असा काहीसा ॲप्रोच (पठडी) या पुस्तकांची असतो.अमांडाची हीच कविता -

https://assets.rebelmouse.io/eyJhbGciOiJIUzI1NiIsInR5cCI6IkpXVCJ9.eyJpbWFnZSI6Imh0dHBzOi8vYXNzZXRzLnJibC5tcy8xMTQ4MDAyMS9vcmlnaW4uanBnIiwiZXhwaXJlc19hdCI6MTYzNTczMDI1MX0.Dwf3XSz9cLEbV2eI4gfwXcmIKzxlgJ6jKsAx8E1ib_E/img.jpg?width=980&height=1304

कवितांचे कोणतेही पुस्तक खरे तर कोणत्याही पानावरती सुरु करता येते. डांटेचे 'इन्फर्नो' व तत्सम अतिदीर्घ कविता सोडल्या तर अन्य बहुतेक कविता लहानच असतात. पण रुपी कौर सारख्या या 'इन्स्टाग्राम' जमान्यातील कविंच्या कविता म्हणजे आत्ता सुरु होते न होते संपते. रुपी कौर पोएम्स अशी सर्च द्या आणि गुगलवर इमेजेस मध्ये खालीलप्रमाणे बऱ्याच कविता सापडतील.

https://wp.stanforddaily.com/wp-content/uploads/2017/01/6358946712935403202031547669_kaur.jpg

या कवितांचे प्रमुख बलस्थान गणले जाते ते म्हणजे 'सोप्या व सहजसाध्य' पण यालाच उथळ असा शब्द नाही का? रुपी कौरच्या मिल्क & हनी' ने २०१६-२०१७ मध्ये रेकॉर्ड केले. विक्रीचा उच्चांक वगैरे गाठला त्यात माझाही तीळभर हातभार होताच. पण या कवितांनी माझ्या मेंदूला ना खाद्य पुरवलं ना त्यांच्यातील सौंदर्यदृष्टिने मी मंत्रमुग्ध झाले. कवि हे शब्दाचे, भाषेचे ठेकेदार असतात् असा सूर मला लावायचा नाही. किंबहुना जरी कवि हे काही प्रमाणात तरी भाषाप्रभू असावेत अशी अलिखित अपेक्षा असली तरी ती एक वेळ सोडा. निदानपक्षी काही चमकदार उपमा, कल्पना कवितेत याव्यात ही अपेक्षा अगदीच गैर नाही. त्या तुलनेत पॉप कविता फारच तोकड्या पडलेल्या जाणवल्या. 'आय रोट इट फॉर ' हे पुस्तकदेखील विकत घेउन, वाचलेले आहे.

https://i.pinimg.com/originals/82/8f/77/828f7794998cbdd5f6b3953051268716.jpg

यात अतिशय लहान लहान कवितांबरोबरच सुंदर फोटोग्राफी आहे. पण एकंदर साचा तोच. अतिशय वैयक्तिक अनुभवांपुरता सीमीत कविता. कॉफी- बेगल कविता म्हणेन मी. कुठेही सुरु करा. तुम्ही स्वत:ला त्या कवितात जरुर पाहू शकता पण अमूर्त असे काहीच हाती लागत नाही. ना मेंदूस विचार करण्याची प्रेरणा मिळते ना आत्म्यास शीतलता ना कोणती अस्वस्थता. मग केलेचा 'हेतू' काय? कलेकरता कला? कविता 'संदिग्ध' = ambiguous असलीच पाहीजे असे नाही पण कवितेने अंतर्मुख करावे, एक मेडिटेटिव्ह (ध्यान+एकाग्रता) अनुभव द्यावा अशी अपेक्षा चूकीची नसावी.
एकंदर या पॉप कविता, म्हणजे '२ मिनीटस मॅगी' प्रकार म्हणता येइल.
याउलट अनेक कंऱ्टेपररी कवि - कॅरॉलिन फोर्शे, मेरी हॉवे, जे हर्श्फिल्ड, माझ्या अजुन ३-४ भयंकर आवडत्या कवि आहेत, आत्ता सर्व नावे आठवत नाहीत पण - मेइमेइ बर्सेन्ब्रुग, नेटिव्ह अमेरिकन कवि जॉय हारजो, शॅरन ओल्ड, मेरी ऑलिव्हर (https://www.newyorker.com/books/page-turner/mary-oliver-helped-us-stay-a...) यांनी अत्यंत आनंद दिला, प्रग्ल्भ केले, फक्त वाचनसाक्षरतेच्या बाबतीतच नाही तर आत्मिक प्रतलावर, अमूर्त मनात त्यांच्या कविता रुजल्या. कधी त्यातील निसर्गसौंदर्य आवडले तर कधी शब्दांच्याही पलिकडले काही आकळल्याने आवडुन गेल्या. एक कविता शोधते आहे. मेरी ऑलिव्हर यांची फार आवडती कविता आहे. मिळाल्यास इथे टाकेन.
असो. हा जो नवा उथळ कवितांचा कल्ट जो की इन्स्टाग्रॅम अन ट्विटरने फोफावलेला आहे तो ट्रान्झिअन्ट असावा अशी इच्छा, परत कवितेला डिग्नीटी व तिचे मूळ सौंदर्य मिळावी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आणि अमच्यासारखे पॉप लेखक. Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असू देत असंही साहित्य! काहींच्या 'पॉर्न'चीही त्यातून सोय होते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.