साद

हाक येता तुझी कानी मन धावे वेड्या वाटे
उरि जन्मते काहूर डोळा आभाळ हे दाटे ।

मन बावरे अल्लड त्याची गति अनावर
जीव आर्जवी न्याहार त्याला मायेची किनार ।

मन भरती ओहोटी त्याला चांदव्याची आस
काया डोह निळाशार तिला धरतीची कूस ।

वाटे नकोसे मीलन कुण्या विरहार्त क्षणी
प्याला विषाचा पिऊन मीरा गाते तुझी गाणी ।

तूच समजून आता थांब मला साद देणं
तुझ्या अंतरीची प्रीत माझं अलवार लेणं ।

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान. पहील्या २ पन्क्ती ओळी जास्त आवडल्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या अभिप्राय वाचायला आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0