तो तरुण व्यावसायिक होता

तो तरुण व्यावसायिक होता..स्मार्ट आत्मविश्वासाने भरलेला.
व्यवसाय मस्त चालला होता..
त्या निमित्ताने ब्यांकेत ये जा असायची..
त्याचे खाते पहाणारा त्याचा मित्रच होता..
ब्यांकेत ति पण नवीनच आलेली होती..
सुंदर म्हणता येणार नाही पण आकर्षक व्यक्तिमत्त्व..अती साधी राहणी..
चेहे~यावर गूढ गंभीर भाव..स्वतःचाच विचारात व विश्वात बुडून गेलेली..थोडी उदास..काही तरी शोधतेय ति..
त्याला ति आवडली..मित्रास विचारले अन तो म्हणाला..ति होय कावेरी जोशी.फारशी कुणात मिसळत नाही खूप अबोल व फटकून वागणारी आहे...
तो विचार करायचा..काय नेमके हरवले असेल तिचे? वा निसटले असेल?.इतकी छान दिसते पण अशी काकू बाई सारखी का राहते? वाटले आपण हिच्या जीवनात जावे अन तिला आमूलाग्र बदलावे..चेहे~यावर आनंद आणावा ..तिच्या जीवनात प्राजक्ताची फुले फुलवावीत..सहजीवनाच्या माध्यमातून..
पण तो व्यक्त झाला नाही कधी...
.
तो ब्यांकेत आला सवयी प्रमाणे पाहिले ति दिसली नाही..त्याने व्याकुळतेने विचारले.."अरे ति महिन्याची रजा टाकून गेली आहे..कुठे ते माहीत नाही.."
त्याला ब्यांकेत जावेसे वाटेना..आपल्या असिस्टंटला कामासाठी तो ब्यांकेत पाठवू लागला..मात्र अधून मधून चक्कर मारत असे ति आली असेल या आशेने..
.
ति ब्यांकेत येणार असे त्याला वाटत होते..व त्या अंदाजाने तो ब्यांकेत गेला ..
पाहिले ति आली होती...अन तिच्या कडे पाहिल्यावर तो चकित झाला.
ति पूर्णं बललेली त्याला दिसली..तिने खांद्यापर्यंत केस कापलेले होते..छानसा फुला फुलाचा ड्रेस तिने घातलेला होता तो तिला शोभून दिसत होता..चेहे~यावर आनंद व आत्मविश्वास होता..सहका-याशी ति गप्पा मारत होती..खळखळून हसली ..किती छान दिसत होती...
.
काम झाल्यावर बाजुच्या कोचावर तो बसला. अन विचार करू लागला...तिचा.
त्याने ओळखले तिला जे हरवले निसटले ते गवसले होते..तिचा लुप्त झालेला आनंद आत्मविश्वास तिला मिळाला होता..जीवनात फुले फुलली होती..देहबोली त्याची साक्ष होती..
त्याला तिचे ते रुप आवडले नाही..आपली तिच्या जीवनात हळुवार पणे आनंद फुलवण्या ची संधी कुणी तरी हिरावली असे त्याला वाटू लागले व तो थोडासा उदास झाला ...मला तू अशी नको आहेस गं... तो म्हणाला.मला तुझे जुने रूप हवे आहे..साधे स्वतःत बुडून गेलेलं काहीतरी शोधणार..थोडंसं उदास...
.
मग तो शांत झाला अन त्याला आपल्याच विचाराचे हसू आले..तिला अधिकार नाही आनंद शोधण्याचा? बाह्य व्यक्तीवर तिचा आनंद का अवलंबून असावा ..अधिकार आहे तिला हरवलेले शोधण्याचा..... असे विचार येताच तो स्वतःशीच हसला..
व त्याला वाटले मग माझे तिच्या जीवनात जाण्याचे प्रयोजन तरी काय?
त्याला तिची नवी प्रतिमा नामंजुर होती त्याला..ति त्याला नको होती..
तो जुनी कावेरी आठवू लागला..अंधुकशी प्रतिमा मना समोर आली क्षणभर... पण ति हळूहळू विरून गेली...
.
समोर उभी होती ति अनोळखी कावेरी ...मात्र तिला तिचा आनंद गवसला ह्याचा त्याला आनंद झाला ..
तो उठला व बाहेर आला कार मध्ये बसला व निघून गेला
.
एक प्रेम कहाणी सुरू होण्या आधीच संपली होती

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)