माझा कपडे धुण्याचा छंद

संकल्पना

माझा कपडे धुण्याचा छंद

- शशिकांत सावंत

बारकाईनं अनुभव टिपत अनिल अवचट जगण्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभ्या करतात. त्यांच्या आविष्कारपद्धतीचे विडंबन, अर्थात त्यांच्याबद्दल आदर बाळगून.

एकदा मी वॉशिंग मशिन लावून बसलो होतो. मधल्या वेळात काय करायचं, म्हणून बासरी वाजवत बसलो. किती वेळ गेला कळलंच नाही. मशिनचं काहीतरी बिघडलं होतं. त्यातून पाणी येऊ लागलं. घरभर पाणी झालं. मशिन बंद. मनात विचार आला, कपडे हातानं का धुवू नयेत? नगरला असताना मोलकरणीला कपडे धुताना पाहिलेलं. कुठं युक्रांदमध्ये असताना बाहेरगावी असलो, की कपडे हातानं धुवायचो. त्यालाही अनेक वर्षं झाली. मी वाण्याकडे गेलो. म्हटलं, 'कपडे धुवायचा साबण द्या.' तोही चकित झाला. म्हणाला, 'आज हे काय?' नेहमी मला ओरिगामीसाठी घोटीव कागद घेताना त्यानं पाहिलं होतं. अनेक प्रकारचे साबण त्यानं पुढ्यात टाकले. निळा कागद असलेला, ५०१चा बार, निरमा. एरवी हे सगळं जाहिरातीतच पाहिलेलं. आज प्रत्यक्षच बघत होतो.

घरी दोन-तीन साबण आणले. निळं रॅपर काढलं, तर खाली आणखी एक पातळ ट्रेसिंग पेपरसारखा कागद. तो ओढला तर साबणाचा भाग चिकटून आला. दुसरा साबण उलगडला तेव्हा हातानं एक टोक धरलं. दुसऱ्या हातानं साबण घट्ट धरला आणि हळूहळू कागद ओढत गेलो; तसा तो न फाटता, साबण न चिकटता येऊ लागला. तो बाजूला काढून ओरिगामीच्या कागदांमध्ये ठेवला.

साबण हाताला किंचित लागला होता. दोन शर्ट आधी धुवायचे ठरवलं. एक माझ्या ठाण्याच्या मानलेल्या मुलीनं वाढदिवसाला दिलेला. न वापरता तो तसाच पडून होता. तरीही धूळ जमली होती. म्हटलं, आता धुऊन वापरावा. तिलाही बरं वाटेल. शर्ट भिजवून साबण लावू लागलो. दुसरा शर्ट वापरलेला होता. कॉलर, कमरेकडचा भाग, बाह्या इथं जास्त मळलेला असतो, असं लक्षात आलं. जिथं जास्त मळलेला असतो, तिथं जास्त साबण लावत गेलो. मग वाटलं, 'अरेच्या, जमलं की!' उत्साहानं आणखी दोन शर्ट धुवायला काढले.

थोडा वेळ शर्ट नुसताच पाण्यात ठेवला, तर धुणं सोपं जातं असं लक्षात आलं म्हणून थांबलो. परत धुवायला लागलो. आणखी शर्ट काढले. यात किती वेळ गेला कळलंच नाही. सुश्यो म्हणाली, 'बाबा, तुला आता नवं वेड लागतंय.' एरवी मला पाण्यात जास्त बसवत नाही. हात-पाय गारठतात, पण आता तासन्‌तास बसलो तरी काही वाटेना.

सगळेच शर्ट धुऊन टाकल्यानं एक दिवस कुठंच जाता आलं नाही. तारेवर वाळत टाकलेले शर्ट ऑक्टोबरच्या उन्हात छान सुकून निघाले. संध्याकाळी मी इस्त्री करायला घेतली. इस्त्री करण्यासाठी टेबल कुठं होतं? शेवटी लिहिण्याच्या टेबलावरील पुस्तकं काढून तात्पुरतं टेबल तयार केलं. बराच काळ न वापरल्यानं इस्त्रीचा काही भाग गंजू लागला होता. आता मात्र मी विचारात पडलो. शेवटी साध्या कपड्यांवरून नुसतीच इस्त्री फिरवली. हळूहळू इस्त्री फिरवताना चुरगळ्या नाहीशा होतात अन् कपडा तयार होत जातो, ते बघताना वाटलं; अरे, कॅन्व्हासवर पेंटिंग करतानाही असंच होत असणार.

आता मी उत्साहानं कुठले कपडे धुवायचे आहेत, ते बघितलं. विश्वकोश काढला. कपडे धुण्यावर काही नोंद आहे का ते पाहिलं. आजूबाजूला कपडे हातानं धुणाऱ्या माणसांची चौकशी केली. शेवटी वामनराव कुलकर्णी हातानं कपडे धुतात असं कळलं. स्कूटर काढली आणि निघालो. त्यांच्या दाराला कुलूप होतं. बराच वेळ उभा राहिलो. काही सुचेना. मग खाली आलो. तिथं एक शेंगदाणेवाला आहे. नेहमी भेटल्यानं तो ओळखीचा. त्याच्याकडून शेंगदाणे घेतले आणि एका बाकावर बसून माणसांची वर्दळ पाहत राहिलो. थोड्या वेळानं वामनराव आले. दाराचं कुलूप काढलं. मी खालीच जाजमावर बैठक मारली. थोडासा धुरळा उडाला. पण म्हटलं, 'पँट मळली तर बरंच आहे. धुवायला मजा येईल.' वामनरावांनी कपडे धुण्याबद्दल बरंच सांगितलं. वाटलं, अरे! या माणसाला इतकं माहीत आहे. आपण कपडे धुतले नसते तर हे आपल्याला कळलं नसतं.

दुसऱ्या दिवशी धुतलेल्या, इस्त्री केलेल्या कपड्यांचा ढीग रचला. उमा विरुपाक्षला बोलावलं. मुंबईहून सदाशिव (अमरापूरकर)ही बघायला आला. तेच कपडे घालून फिरायला निघालो. एरवी लोक सदाशिवकडे बघत राहतात, पण आज माझ्या कपड्यांकडे बघत होते. किमान मला असं वाटत होतं.

कपडे धुवायला धोबी घरी यायचा तेव्हा त्याला बघताना पूर्वी काही विशेष वाटत नसे. आता वाटू लागलं. आपण दोन-चार कपडे धुताना दमून जातो, मग त्याला काय होत असेल?

वेगवेगळ्या साबणांचा वापर करताना पावडरीत कपडे धुणंही करून पाहिलं. सर्फ आणि इतर पावडर वापरताना पाणी खूपच लागत असे. शेवटी एक दिवस थोडं गरम पाणी वापरून पाहिलं. तरीही तितकंच पाणी लागत होतं. या पावडरीत कपडे लवकरच स्वच्छ होतात, पण खूप पाणी वाया जातं. शिवाय त्या पावडरी महागही होत्या. त्याच सुमारास थोरोचं 'वॉल्डन' वाचत होतो. मनात विचार आला, थोरो आज असता तर त्यानं पावडर वापरली असती काय?

पुण्यात काही दुकानांत फक्त साबणाचं सामान विकत मिळतं, असं कळलं. रविवार पेठेच्या बुकिंग हाऊसजवळ असं एक दुकान होतं. सुनंदाचा एक पेशंट तिथं काम करायचा. मी येतोय म्हटल्यावर तो म्हणाला, 'साहेब, मीच तुम्हाला घेऊन जातो'. दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबरच गेलो.

रविवार पेठेत थोडं उंचावरतीच पायऱ्या चढून गेलं की हे दुकानं लागतं. बुकिंग ऑफिसशेजारीच. एक पोरगेलासा तरुण ते दुकान चालवत होता. त्याची ओळख करून घेतली. तो म्हणाला, वडील दोन महिन्यांपूर्वीच गेले, आता दुकान मीच बघतो. दुकानात सर्व फळ्या लिक्विड सोपच्या बाटल्या, पावडर, वेगवेगळ्या प्रकारचे साबण, छोटी-मोठी रंगीत द्रवांनी भरलेली प्लॅस्टिकची कॅन्स यांनी भरलेल्या होत्या. सर्वत्र साबण, सेंट, तेलं असा मिश्र वास दुकानात दाटून भरला होता. मी लगेच वेगवेगळ्या आकाराचे, रंगांचे साबण विकत घेतले. अ‍ॅसिड स्लरी नावाचं द्रावण अनेक गॅलन्समध्ये होतं. त्यांचा अल्कलीशी संयोग होऊन डिटर्जंट तयार होतो. हे मुख्य मळ काढणारं द्रव्य. सगळ्या साबणांत ते असतंच, पण वेगळ्या रूपात. आपण विकत घेतो त्या साबणात शुद्ध डिटर्जंट द्रव्य थोडं असतं. मुख्य भरणा असतो व्हॅक्ससारख्या फिलर्सचा, अशी माहिती कळत गेली. खांद्यावरच्या पिशवीत पॅड होतं. त्यात मी नोंद करीत होतो.

काही ठिकाणी पावडर, बाटली, रंग असं काय काय मिश्रण होतं. मी विचारलं, हे काय आहे? तसं तो उत्साहानं सांगू लागला, हे सगळं एकत्र केलं की लिटरभर लिक्विड सोप तयार होतं. हे सगळं सुटं घेतलं की ३६ रुपयांना पडतं. मिश्रण बनवून ठेवावं लागतं. बाजारात मिळते तशी साबण पावडर आमच्याकडे ४० रुपये किलोनं पडते. मी हिशोब केला. बाहेर लोक टीव्हीवर जाहिरात करतात, मॉडेल वापरतात आणि पावडर १६० रुपये किलो भावानं विकतात. म्हणजे जवळजवळ एका किलोवर १०० रुपये नफा. ही तर शुद्ध पिळवणूकच.

वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे हात धुण्याचे साबण होते. कुठे काजूच्या आकाराचे, तर कुठे माशाच्या आकाराचे. मी म्हटलं, हे कुठं बनतं? त्यानं दुकानाचं दुसरं दार सरकवलं. आतमध्ये तीन-चार कामगार काम करीत होते. गुळाची छोटी ढेप असते तशा आकाराची साबणाची ढेप एका मशिनखाली ठेवायची आणि पितळ दांडा फिरवायचा. कर्र आवाज करीत डाय लागलेला भाग खाली यायचा. खाली माशाच्या आकाराचा साबण. उरलेला चुरा शेजारच्या एका टबात पडत होता. मी विचारलं, हा वाया जात असणार. तो म्हणाला, नाही. हा आम्ही पॅक करून साबणचुरा म्हणून स्वस्तात विकतो. मूलत: मजूर हे याचे गिऱ्हाईक. त्यानं पिशवीकडे बोट दाखवलं. पिशवीत शेवगाठी असतात तसा तो चुरा दिसत होता. मागे गडचिरोलीला एका कार्यकर्त्यांकडे अशी पिशवी पाहिली होती, तिचं रहस्य आता कळलं.

हे सगळं घेऊन मी घरी आलो. कित्येक दिवस हे सारं पुरलं. घरात अनेक ठिकाणी साबणाची घुडकी दिसू लागली. कपडे धुवायला दोऱ्या पुरेनात. एकदा कपड्यांवर निळे डाग पडले. त्या दुकानात फोन केला. ते म्हणाले, साबण निळ्या रंगाचा होता, त्याचे डाग आहेत. साबणाचा स्वत:चा रंग असतो हे विसरलोच! मग लक्षात आलं, आपलंही तसंच होतंय की. बासरी, ओरिगामी मागे पडत चाललेली होती. शेवटी एक दिवस या छंदाला पूर्णविराम द्यायचं ठरवलं. मग साबणाचं काय करायचं? एक दिवस घरी आलो तो माझा नातू साबणातून काहीतरी आकार करीत होता. म्हटलं, अरे, हे आपल्याला कसं सुचलं नाही? लाकडाऐवजी यात शिल्पं घडवता येतील.

आणि साबणातून शिल्पकला नावाच्या नव्याच छंदाचा जन्म झाला. इतर दिवाळी अंकांत काय लिहायचं हा प्रश्नही सुटला.

---

'लोकप्रभा'मध्ये पूर्वप्रकाशित. दुवा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.8
Your rating: None Average: 4.8 (5 votes)

प्रतिक्रिया

अप्रतिम !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

हा हा हा हा, जमलंय!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुरेख जमलंय !! झकासच. त्यांच्या लेखनातल्या बारीक बारीक लकबी मस्त उतरवल्यात. आणि विडंबन नाही म्हणणार याला. कारण थट्टा, चेष्टा नाही यात, तर सहीसही अनुकरण केलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

हेतू साध्य.
तसे अनिल अवचटांचे बरेच छंद वाचलेत. तुम्हालाही जमलय साबणाच्या फुग्यात जायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जिथं जास्त मळलेला असतो, तिथं जास्त साबण लावत गेलो. मग वाटलं, 'अरेच्या, जमलं की!'

वाटलं, अरे! या माणसाला इतकं माहीत आहे. आपण कपडे धुतले नसते तर हे आपल्याला कळलं नसतं.

इ.इ. बरीच वाक्यं साक्षात अवचटांनी लिहिल्यागत आहेत. आणि फ्लोसुद्धा जमून आलाय.
खुस्पट- ( पहिलं वाक्य डिस्कलेमर का म्हणून ? वाचकांना नक्की कळेल कोणाची उडवलीये ते.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अजून अनिल अवचटांचे लेखन वाचलेले नाही.
(म्हणूनच माझ्याकरिता क्लेमर, डिस्क्लेमर नव्हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लेमर vs डिस्क्लेमर
अवचट मराठी मध्यमवर्गीय घरांत सहजोपलब्ध होते - तुम्ही बरे सुटलात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालनिर्णयच्या दिवाळी अंकात अवचट चमकून गेलेत. तसेच अभय बंग.
बरीच वर्षं झाली, तुम्ही सुटलात त्याला अवचट किंवा साळगावकर काय करणार?
बासरीचा लेख विशेष आवडला होता त्यांचा. दादरच्या सामंत डेअरीजवळच्या बासरीविक्याला कित्येक वर्षं पाहिलं होतं पण त्याचीही काही श्टोरी असेल हे माहीत नव्हतं. कोठावळे,केळकर,रमा नायक यांच्या श्टोऱ्या येतातच पण एक फुटपाथवरचा बासरीवाला~. शहरातले असे बारकावेच शहराला नाव देत असतं अन्यथा एक कॅालनी. जिथून प्रत्येकाला आपापल्या गावी जाऊन शाळेतले बाकावरचे मोगऱ्याचे वास येणारे शाइचे धब्बे शोधायचे असतात कधीतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवचटांच्या सरधोपट लिखाणातील शैलीचे बारकावे शोधलेत आणि चपखल वापरलेत. सलाम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्यक्षाहून प्रतिमा वगैरे वाटलं. कारण व्यंगचित्रांत जशी एखाद्या व्यक्तीची वैशिष्ठ्ये अधोरेखित होतात, तसं या साबणछंदात, अवचट डोकावतात, ठिकठिकाणी! मानलं तुम्हाला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

हे थोर आहे. धुलाई करावी तर अशी!

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भला आप का लेख उन के लेखसे चमकदार कैसे?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास आहे. फारच भारी.

मिमिक्री किंवा त्यासम काही करताना केष्टो मुखर्जी, उत्पल दत्त (ई ई श), शक्ती कपूर (आऊ लोलिता), शाहरुख खान (क क किरन) , अशोक कुमार दादामुनी, ओम प्रकाश वगैरे सहजच कोणीही करतं..

पण अमोल पालेकर, विक्रम गोखले, तलाश / सरफरोश किंवा तत्सम काही भूमिकांतला आमिर खान, दिलीप प्रभावळकर, यशवंत दत्त, आणि इतर काही अंडरप्ले करणाऱ्या ऍक्टर लोकांना मिमिक्रीवाटे समोर उभं करणं कठीण.

तसं इथे दिसतं. मूळ लेखकाची शैली फारच साधी असल्याने विडंबन किंवा नक्कल हे आव्हानच आहे.

म्हणून त्यातले ते शिऱ्यातल्या एम्बेडेड बेदाणे काजू प्रमाणे येणारे संगीत, पेंटिंग, ओरिगामी असे छंद आणि त्यांचं इंटररिलेशन हे छान वापरलेत. छंदात कविता राहून गेली का?

गडचिरोली कार्यकर्ता, साहेब मीच तुम्हाला घेऊन जातो, सुनंदाचा पेशंट, थोरोचं वॉल्डन, उमाविरुपाक्ष, स्कुटर काढली अन निघालो, शेंगदाणेवाला ओळखीचा, थोडी केमिकल शास्त्रीय माहिती (१०%), बाकी कला छंद ओरिगामी ६०% असं सर्व भारी जमवून आणून उत्तम लेख जमला आहे.

एक अपराधी छटा (५%) राहून गेली. तेवढी टाकली असती तर साबणवडी परिपूर्ण बनली असती. साबणउद्योगात नफेखोरी लूट पिळवणूक इथपर्यंत बरोब्बर मार्गावर पोचूनही त्यातील घातक केमिकलमध्ये काम करत, नाना किंवा अन्य औद्योगिक पेठेत नाल्याकडेला दारिद्र्यात आणि हालात राहणारं नजरेआडचं विश्व, (एक फेसळणारं जग ??) आणि तुलनेत आपल्या ऐषोरामी राहण्याबद्दल शरमच वाटणं असा भाग निसटला.

त्याचा शेवट हे भीषण वास्तव पाहिल्यानंतर ते मऊसूत दिसणारे घातक साबण आणि शांपू वापरणं आपसूक कायमचं बंद केलं जाणं आणि त्याऐवजी रिठे शिकेकाई आणि थंड पाण्याने स्नान असं नेहमीसाठी सुरू करता येऊ शकेल.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी. मस्त पकड्लंय्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अगदी हेच्च लिहायला आलेलो होतो. विशेषतः साबणाच्या छंदातून साबण बनवणाऱ्या कामगारांच्या उध्वस्त होणाऱ्या आयुष्याचं वर्णन आणि त्यातून स्वतःच्या छंदाबद्दल गिल्ट आणि त्या गिल्टीतून साबणत्यागाचा निश्चय!

पण ही अर्थातच 'ताजमहाल अजून थोडा साबणाने धुवून स्वच्छ केला तर छान दिसेल' यासारखी सूचना. मूळ लेख जबरदस्त जमला आहे यात वादच नाही.

तुमच्याकडे प्रवीण दवणे, व. पु. काळे झालंच तर गो. नी. दांडेकर वगैरेंच्या शैलीत लेखन करण्याची पेश्शल रिक्वेस्ट.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

"मागे ओतूरला" आणि "मेडीकलला असताना" हे राह्यलं.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त जमलय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मिष्किलपणा मस्त जमलाय. अवचटांचं स्वतःविषयी लिखाण कुठल्या ना कुठल्या दिवाळी अंकात दरवर्षी पेटंट असतंच. यावेळेस दिवाळी अंकांत अजुनपर्यंत त्यांचं काही वाचलं नाहीये पण मग हे वाचलं. मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साप्ताहिक सकाळ दिवाळी अंक २०१८ वाचणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जमलंय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या अत्यंत नावड्त्या लेखकाची सही सही नक्कल केल्याबद्दल अभिनंदन..

(आता नक्कल भारी जमल्ये म्हणावं की दुसरं तिरकस काही हे सुचेना झालंय)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

लिखाण आवडलं. जमलंय मस्त. गविंनीही गोष्टी बरोब्बर पकडल्या आहेत.
---
हा लेख पूर्वप्रकाशित आहे ही संपादकीय नोंद राहून गेली आहे असं दिसतंय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला लेख.
बिचारा साबण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं लिहिलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धमाल जमलेला लेख! यावेळेच्या अनुभव दिवाळी अंकात अवचट यांच्या गुणगुण करण्यावरचा लेख अाहे. त्यांना शास्त्रीय संगीत कसं अावडू-कळू लागलं यावर. त्यातही ‘मला कसं काही फार समजत नाही’ असा तंबोरा अाहे. साप्ताहिक सकाळ मध्ये बांबूबाबत होता, पण वाचला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचायला पायजे.
पूर्वी अवचट खरोखरच उत्त्सुकतेने काही गोष्टी करून त्याबद्द्ल दिवाळी अंकात(च) लिहायचे.
आत दिवाळी अंकात लिहायचं म्हणून नवीन छंद शोधत असावेत.
"छंद पाडणारा माणूस" असं एखादं नाटक अवचटांनी स्वत:वरच लिहावं- २०१९ च्या दिवाळी अंकात(आणखी कुठे?)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनिल अवचट: एक न आवडणे हा एक लेख वाचनात आला होता. त्याची जातकुळी वेगळी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

रिठ्याला स्थान कस नाहि दिल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/