मिथुन-धनु - "लिव्ह इन रिलेशनशिप" - II

या पूर्वी अशाच प्रकारचे स्फुट लिहिलेले आहे ते - मिथुन-धनु - "लिव्ह इन रिलेशनशिप" या धाग्यावरती सापडेल.
.
खरे तर दोघाचे हॅन्ग आऊटस वेगळेच होते. ती मित्रपरिवारात जास्त रमे. वीकेण्ड आला की मैत्रिणींबरोबर लेडीज नाईट आऊट करणे, सिनेमाशी जाणे अथवा कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा मारणे हे तिचे छंद होते. अगदी कोणीच कंपनी मिळाली नाही जे की क्वचित होई, तर तिला ग्रंथालयात वेळ घालवायला आवडे. मग पुस्तक अगदी कोणत्याही विषयाचे चाले. पुस्तक वाचन हा तिचा विलक्षण आवडीचा छंद होता.
.
तो मात्र बराचसा एकांतप्रिय होता. म्हणजे एकट्याने सिनेमा पहाणारे प्राणी असतात त्यात मोडणारा तो होता.अन्य थोडेफार छंद जे होते त्यात एक म्हणजे त्याला रस्त्यांवरून मनमुराद दिशाहीन भटकणे आवडे. स्वतः:च्याच विचारात,, लोकांमध्ये असूनही एकांत मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणजे गर्दी. पण एकंदरच he liked to keep his own company .
.
मात्र दोघांची भेट झाली ती एका अशा ठिकाणी जे त्यालाही प्रिय होते व तिलाही. ते म्हणजे चित्र* प्रदर्शन.
.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c2/Walter_Crane_-_Neptune's_Horses_(1910).jpg
.
एका देखण्या चित्रापुढे ती ऊभी होती. निळे आकाश आणि फेसाळता समुद्र, समुद्रही कसा तर ना शांत ना अति रौद्र. फेसाळत्या लाटांच्या जागी वेगवान, उमदे शुभ्र अश्व. ती खिळून किती वेळ ऊभी राहिली होती कोण जाणे आणि मागून आवाज आला, "तुमची हरकत नसेल तर एका विचारू? या चित्रात तुम्हाला काय आवडले?" भानावर येत तिने मागे वळून पाहिले तर तो. खरं तर अनोळखी व्यक्तीने हा प्रश्न अन्य एखाद्या स्त्रीला विचारला असता तर ती स्त्रीने काहीतरी थातुर-मातुर उत्तर देऊन काढता पायच घेतला असता. पण मिथुन जातक स्त्री किंचित वेगळी असते. गप्पा मारण्याची एकही संधी ती सोडत नाही. त्या राशीत अशी वटवट करण्याची संधी गमावणे हे पाप समजले जाते. आणि कोणत्याही आधुनिक स्त्रीमध्ये असणारा 'कोण काय म्हणेल यापेक्षा स्वतः:ला काय बरं वाटतं ते करण्याइतका मनस्वी मोकळेपणा ' तिच्यातही नक्कीच होता. ती उत्तरली 'रंगसंगती, मोहक आहेच पण त्याहूनही, फेसाच्या जागी घोडे चितारण्याची कल्पना अतीव सुंदर आहे. हे माझे मत झाले, तुम्हाला काय वाटतं?"
"हम्म्म्म वेल नक्कीच या दोन्ही गोष्टी विलक्षण आहेत. पण मला सर्वाधिक आवडलेला या चित्रातील विशेष आहे त्यामागचा मूड. चित्र पहाताच त्या चित्राचा एक जो आत्मा जाणवतो तो मला अधिक भावला आणि तो आहे "आवेग". अश्व हे तारुण्य, जोम यांचे प्रतीक आहे आणि अशा वेगाने भरधाव उधळलेल्या अश्वांचा आवेग हा unmistakable आहे." तिला त्याचे चित्राचे विश्लेषण अत्यंत रोचक वाटले. सहसा boredom आणि लादला गेलेला एकाकीपण सोडता, मिथुन स्त्रीस रोचक ना वाटणार्या गोष्टी फार कमी असतात. तिने हसून हस्तान्दोलनासाठी हात पुढे केला व ती उत्तरली "माझं नाव कावेरी". त्याची नाव होते आशुतोष.. अर्थात इतक्यात तिची मैत्रीण आल्याने भेट त्रोटकच झाली पण त्यांनी फोन नंबर जरूर एकमेकांना देऊ केले.
.
पुढे मात्र अनेक भेटी होता राहिल्या, कारण दोघांना एकमेकांचा सहवास , वैचारिक देवाणघेवाण आवडली. तशीही धनु आणि मिथुन मैत्री चटकन होतेच. तसं काही प्रत्येक वेळी बडबड बडबड केलीच पाहिजे असा दोघांनचाही अट्टाहास नव्हता. एखाद्या दिवशी गप्पांची वेव्हलेन्थ जुळते तर एखाद्या दिवशी नाहीही जुळत. पण त्या anxiety मध्ये हातात असलेले क्षण दवडण्याइतके दोघेही अज्जीबात नवथर नव्हते. शेवटी कोवळे ऊन खात , रंगीबेरंगी छत्री खाली शांत बसून कॉफीचे घुटके घेण्यातही मजा असतेच की विशेषतः: आपल्याला आवडण्यार्या व्यक्तीच्या सहवासात.

दोघेही सडे असल्याने कोणाला म्हणजे जोडीदाराला उत्तर द्यावे लागण्याचा प्रश्न नव्हताच. नवीन मैत्री काही पटकन होता नाही. Everything worth trying takes time . पण त्याने जेव्हा तिची गाठ त्याच्या खास मित्राशी घालून दिली तेव्हा तिच्या मनात येऊन गेले की तो सिरिअस होतो आहे. कारण तिला माहीत होते पुरुष जेव्हा त्यांच्या मैत्रिणीची ओळख स्वतः:च्या मित्राशी करून देतात तेव्हा जरूर ओळखावे की तुमचा प्रवेश त्याच्या विश्वासू वर्तुळात झालेला आहे. अर्थात या माहितीचा स्रोत - बार्न्स & नोबल्स चा "सेक्स व डेटींग" विभाग.
.
पण तिने त्या विचाराकडे निरर्थक भलामण म्हणून दुर्लक्ष करायचे ठरविले. तसंही पाहिलं ना तर मिथुन काय किंवा धनु काय दोन्ही राशीना कमिटमेंट ची अज्जीबात घाई नसते. किंबहुना These zodiac signs are known for getting cold feet before commitment. आणि आजच्या काळात तर "विवाह" हे फारसे प्राधान्य तसे राहिले आहे काय? असो. पण लग्न प्राधान्य नसले तरी आकर्षण वाटायचे थांबत नाही. तिला त्याच्या विनोदबुद्धीचे प्रचंड कौतुक वाटे. "हंसी तो फंसी" हे एक तर 80% मुलीच्या बाबत खरे असते आणि मिथुन स्त्रीबद्दल तर ते डोळे झाकून सत्य आहे हे मनी धरावे. Gemini woman is even more susceptible so , to this kind of charm. त्या नियमाप्रमाणे ती हळूहळू त्याची फॅन बनली होती. त्याने तिचे खुदुखुदू ते पोट धरून हसवण्यापर्यंत नाना प्रकारे मनोरंजन केलेले होते. मात्र त्याला तिच्याबद्दल काय आवडते ते अजून गुलदस्त्यातच होते म्हणजे तिच्यासाठी. त्याला तिचा मनमोकळा स्वभाव आवडे. अनेक स्त्रिया "stuck up " असतात हे त्याचे अनुभवा अंती बनलेले लाडके मत होते. पण कावेरी त्या नियमाला अपवाद होती. तिच्यात एका प्रकारच्या feminine wiles ची नक्की कमी होती. ना ती तिच्या रूपाबद्दल conscious होती ना तिच्या काही जहाल मतांबद्दल apologetic . तिचे हे "comfortable in her own skin " असणे त्याला प्रचंड आवडे. आपल्या स्वतः:शी असलेल्या प्रामाणिकपणाला त्याच्या लेखी फार महत्व होतेच. खरे पहाता दोघेही त्यांच्या म्हणजे आपापल्या डेटींग साईटस वरती active होते व इतकेच नाही तर एकमेकांशी बरेचदा फ्लॉप डेट, त्यातल्यात्यात यशस्वी डेट याबद्दलही त्यांची चर्चा होई. एकंदर sexless आणि मस्त मैत्री होती त्यांच्यात. पण हे "काखेत कळसा अन गावाला वळसा" प्रकरण पहिल्यांदा त्याच्या लक्षात आले. व त्याने तिला "लिव्ह इन रिलेशनबद्दल" विचारायचे ठरविले.
.
खरं तर आज तो महत्वाचा दिवस आहे जेव्हा त्याला तिला विचारायचे आहे. आज १९ June म्हणजे तिचा वाढदिवसही आहे. मोकाभी है दस्तूरभी. त्याने तिच्याकरता अ‍ॅनिमल शेल्टरमधून एक मांजराचे पिलू भेट म्हणून आणले आहे. पण त्याचे लाड करण्याकरता तिने move in करावे ही त्याची विनंतीवजा अट आहे. खरं तर कावेरी ते पिलू पाहून अतिशय खूष झालेली आहे. आणि तिने त्याला मिठी मारून आभारही मानले आहेत. पण .... ह्म्म्म अटीबद्दल तिला विचार करावा लागेल कारण हे सगळं इतक्या अचानक घडतंय की ....! तो थांबायला तयार आहे. त्याची अजून एक अट एवढीच आहे जी reasonable आहे, fair आहे, ती ही की तिने जर "लिव्ह इन" करता हो म्हटले तर संपूर्ण commit व्हावे. तळ्यात-मळ्यात नको. जे काही 6 महिने, वर्षभर ते राहातील त्यात तिने १००% द्यावे.
.
कदाचित दोघे एकत्र राहातील, कदाचित वेगळे होतील पण मिथुन-धनु दोन्ही राशींचे एक नक्की सांगता येईल की दोघे जो काही निर्णय घेतील मग तो एकत्र राहायचा असेल वा विभक्त, पुढे झुरत राहाणार नाहीत तर स्वतः:च्या स्वभावातील आनंदी वृत्तीशी जरूर एकनिष्ठ रहातील. आणि 99% चान्स आहे की दोघांचे जमेल. कारण एकच कोणाचाच कीरकिरा स्वभाव नाही, जोडीदाराकडून अति आणि अव्वाच्या सव्वा अपेक्षा नसतील. दोघेही बर्यापैकी सुटवंग, मोकळे राहतील. तू भी खूष, मै भी खूष. तर अशी ही दोन आनंदी आणि lighthearted स्वभावाच्या राशीजातकांची कहाणी.
.

* हे वॉल्टर क्रेन नावाच्या चित्रकाराचे प्रसिद्ध चित्र दिसते आहे.पण कथेत त्याचा गंमत म्हणुन उपयोग केलेला आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मज्जा! ही आणि मागची ....सारची दोन्ही कथा आवडल्या. घाटपांडे यांचा अजोंना प्रतिसादही आवडला. पण आता अजो कुठे आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यु धन्यु धन्यु Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हँ ते चित्रही समर्पक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं आवडतं चित्र आहे ते. आणि धनु Centaur ला ते समर्पक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्र आणि स्फुट दोन्ही आवडले. बाकि बरेच दिवस स्वत: ची रास मिथुन समजुन भविष्य वाचत होतो कारण कुंडलित तशी चुकुन लिहलि असावि नंतर इंटरनेट वर क़ळल अरेच्चा हि तर आपली रास नाहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची कर्क आहे ना. मी कुठेतरी वाचल्याचे आठवते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायला मि तरी आजुन कुठेच लिहली नाही पण बरोबर आहे.
हॅकिंग सारखा प्रकार दिसतोय.
बरं बरिच वर्स(काहि लिहतां येत नाहि ते बरोबर) म्हंजे आयुष्याची २४ वर्स मिथुन राशिचि भविष्य वाचुन मजा लुटलिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्ही मिपावर लिहीले होते. (अनंत वर्षांपूर्वी) का मग ते वेगळे हर्ष होते काय माहीत. पण तसंही "ह" व "ड" ही आद्याअक्षरे कर्केचीच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सायन निरयन समजले का? तोपर्यंत फलज्योतिष्यावर लिहिणार नव्हता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दाम कांगावा करायची सवये मला Wink बघा अचरटजी फशी पडले की नाही कांगाव्याला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.शुची. पाहाते वाचते ते सायन आहे हे तिच्या लक्षात आलंय.ते तिच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला समर्थ आह.(ते सायन निरयन गणित करण्याचा प्रश्न उद्भवत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0