कुंडली पहावी का?

खालील लेख हा एक तर ज्योतिषावरील आहे. मी ज्योतिषशास्त्र असेही म्हणणार नाही कारण हे शास्त्र नाही हे सर्वसंमतच आहे. पण हा लेख प्रचारकी नाही. तो तसा वाटल्यास वाचकाची मर्यादा एवढच मी म्हणेन. तेव्हा जरा कोणाचे असे दावे असतील की या लेखामुळे अंधश्रद्धेला खतपाणी वगैरे मिळते तर त्याचा दोष लेखिकेकडे जात नाही तर अनुभव न घेता, अभ्यास न करता जे लोक डोळे मिटून विश्वास ठेवतील त्यांजकडेच जाईल.
.
त्याचा शुक्र सिंहेचा - तिचा वृश्चिकेचा.म्हणजे त्याचा अग्नी राशीचा तर तिचा जलराशीचा . त्यात दोन्हीमध्ये 90 अंशाचे अंतर म्हणजे सर्वात अवघड आस्पेक्ट. याचा अर्थच हा की दोघांच्या राशींचे दोष आणि मर्यादा या नात्याच्या अगदी पृष्ठभागी तरंगणार्‍या तर उत्तम गुण हे, हातात भलामोठा फ्लडलाईट घेऊन धुंडाळूननाही क्वचित सापडणारे. त्याचा फायरी स्वभाव, मी-मी वृत्ती, चटकन काहीतरी अप्रिय पण परखड, स्पष्ट बोलून जाणारा, एक्स्ट्रोव्हर्ट स्वभाव कुठे आणि कुठे तिचा जलराशीचा त्यातही वृश्चिक जलराशीचा काळ्या डोहासारखा स्वभाव. इंटर्नलाइझ्ड , आता आत खूप बुडी घेणारा, समोरच्यांच्याही मनाचा तळ धुंडाळणारा. याचे जमावे तर कसे जमावे.
दोघेही स्थिर म्हणजे फिक्स्ड राशीचे अर्थात आपापल्या मुद्द्यावरती अविचल, अच्युत राहणारे, आग्रही, हट्टी.
शुक्र हा व्यक्तीचा कल, आवड दाखवितो. त्या व्यक्तीला सहजपणे, कोणत्याही प्रयासाविण, चटकन काय अपील होते ते शुक्राची रास दर्शविते. अन्य अस्पेकट, ग्रह प्रभाव अर्थातच टाकतात. सिंह राशीच्या व्यक्तीस तिचा जोडीदार अतिशय अतिशय आकर्षक, "Neighbor's envy, owner's pride" असा लागतो. याउलट वृश्चिक रास लेझर दृष्टीने आरपार वेध घेणारी तिला सुपरफिशिअ‍ॅलिटी कशी रुचावी. होय owner च.सिंहेची व्यक्ती ही मालकी गाजविणारी, स्वामित्व गाजवणारी, खरं तर खूप करकचून हावी होणारीच असते. कदाचित एखादी गोड, फ्लर्ट , " Iron feast in velvet glove" तुळेच्या स्त्रीने या सिंहाला एकदम Purring कॅट बनवून टाकलाही असतं. पण वृश्चिकेची स्त्री आणि तूळ राशीत जमीन अस्मानाचा फरक तेव्हा ते वृश्चिक स्त्रीस कसे जमावे?
.
सिंह हा राजा असतो आणि त्याला हवे तेव्हा तो फ्लर्ट करणारच. त्या फ्लरटींगमध्ये लैंगिक आकर्षणापेक्षा जास्त भाग हा स्वतः:कडे लक्ष वेधून घेणे असतो पण हे तिने कसे जाणावे. तिचा विंचवांचा स्वभाव हा अति अति पराकोटीचा मत्सरी आणि योग्य वेळ येताच डंख मारणारा. तो अगदी पूर्ण बेसावध असताना डंख मारणारा. त्याच्या ध्यानीमनी नसताना आभाळ डोक्यावर पडावे हा अनुभव कायमचाच.
सर्वच अग्नी राशीमध्ये (मेष, सिंह, धनु), पुरुष राशीमध्ये एक ऑप्टिमिस्टिक (आशावादी) आऊटलुक चमचम करतो. याउलट स्त्री राशी त्यातही जल राशी (कर्क, वृश्चिक, मीन) या निराशावादी, थोड्या गंभीर व नकारात्मक प्रकृतीच्या असतात. विषम आकड्याच्या राशी पुरुष राशी याना ज्योतिषात दिवस काळ दिलेला आहे तर स्त्री म्हणजे सम राशीना रात्रीचा. त्याचा मित्रपरिवार मोठा, थोड्याच मित्रांशी दाट पण लाईटहार्टेड मैत्री याउलट तिला अगदी मोजक्या मैत्रिणी खरं तर एखादीच अगदी जिवलग पण अशी जीव लावणारी की त्या मैत्रिणीला हिची सर्व सिक्रेटस ठाऊक. आणि होय - वृश्चिक राशी कडे सिक्रेटस नाहीत असे शक्यच नाहीत मग ती अगदी सिनफुलच असली पाहिजेत असेही काही नाही, फुटकळ सिक्रेटस का असेनात पण जेलसली गार्डेड सिक्रेटस. आणि ते त्याला कुठेतरी जाणवायचे की तिचा काही पास्ट आहे., काहीतरी सिक्रेटस आहेत पण ती तिच्याकडून काढून घेणे या सिंहाला जमणे शक्यच नव्हते आणि हे जाणून त्याची अजूनच चिडचिड होई. आणि त्याने खोदल्यामुळे(prying ओपन) ती त्याना अधिकच चिकटे. हा तो 90 अंशाचा अवघड अस्पेकट. एकमेकांबद्दलच्या विश्वासार्हतेबद्दल कारणाशिवाय शंका उपस्थित करणारा.
.
जगात अनंत जोडपी "Round peg in square hole" त्यातलेच हेदेखील एक जोडपे. पराकोटीची तडजोड करणारे , लग्न टिकवण्याचा, आटोकाट प्रयत्न करणारे एक सामान्य जोडपे. खरे तर एखादे कोमल व अतिशय गोंडस फुल वाळवंटात उमलून, कोणाच्याही दृष्टीस ना पडता, सुकून जावे तसे आपापले उत्तमोत्तम गुण, passion एका अंतहीन संघर्षात विरून गेलेले.
.
लग्न ही तडजोडच असते, जगी विशेषतः: संसारी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधोनी पाहे. वगैरे ओव्या अशा दु:खी जीवांना दिलासा देण्याकरताच निर्माण झाल्या असाव्यात. बोलायला काय जातं हो "देव मुद्दाम एकमेकांना compensate करायलाच परस्परविरोधी जोडपीच एकत्र आणतो." पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. पुढचा जन्म कोणी पाहिलाय. या जन्मी काय ते उपभोगायचे- आनंद किंवा दु:ख, बक्षीस किंवा शिक्षा. जल आणि अग्नी ही विरुद्ध म्हणजे एकमेकांना मारक तत्वे आहेत. त्यांच्यात तडजोड नाही. याउलट हवा-पाणी म्हणजे वायुराशी (मिथुन-तूळ -कुंभ)आणि जलराशी (कर्क-वृश्चिक-मीना) ही एकमेकांकरता उदासीन तत्वे आहेत. म्हणजे एकमेकांना ना मारक ना पूरक. न्यूट्रल. आणि जल व पृथ्वी (वृषभ-कन्या-मकर) ही मित्रतत्त्वे आहेत. जसे जल हे पृथ्वीस सिंचते जसे, पृथवीमधून सुगंधाचे वाफारे उसासवणे केवळ जळच करू जाणते तसेच चंचल पाण्याला बांध घालून पाण्याचे मूल्य वाढविणे त्याचा सकारात्मक उपयोग हा पृथ्वीचं करू जाणे.
.
कुंडली पाहून विवाह केला नाही म्हणून तो फार यशस्वी झाला असे नसते. तर परस्परातील राशीमेत्री, ग्रहमैत्री उत्तम असल्याने तो टिकाऊ व मुख्य म्हणजे आनंददायक असतो असा लेखिकेचा अनुभव आणि निराक्षणाअंती विश्वास बसलेला आहे. तो तसा सर्वांचा असावाच/नसावाच असेही नाही. आता 12 राशी, 9 ग्रहात जगातील सर्व लोक कसे फिट होतात याचे लेखिकेकडे उत्तर नाही. पण तिच्या मर्यादित निरीक्षणात लोक हे आपापल्या कुंडलीशी faithful असतात असाच अनुभव आहे.

field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (3 votes)

प्रतिक्रिया

ठोकळा कुंडलीवरुन निरिक्षणे मांडली जातात त्यात अंशात्मक योगाचा विचार करत नाहीत. प्राचीन ग्रंथात सांगितलेली ग्रहयोगाची फलिते आजच्या काळात अनुभवास येत नाहीत अशी अनेक ज्योतिषांचे म्हणणे आहे. निरयन सायन मधील २४ अंशाचा फरक हा राशीचे गुणधर्मच बदलून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

निरयन-सायन माहीत नसल्यामुळे कळले नाही. कृपया उलगडा करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे. निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते.हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते.
चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. सध्या ते
२४ अंश ५ कला आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचार करण्यासारखी स्थिती आहे.सायन तर सायनच पाहावं मग निरयनचे भाकित बाजूलाच ठेवावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'च्रटजी हे निरयब-सायन काय असते? माझ्या वाचनात अजुनी तरी आलेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाचा.
http://www.misalpav.com/node/5590

त्यातला हा प्रतिसाद.
http://www.misalpav.com/comment/83116#comment-83116

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे खूप छान सविस्तर वाटते आहे. धन्यवाद वाचते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख अदितिचाच आहे.खुप चांगले माहितीपर प्रतिसादही आहेत. तो लिहिला तेव्हा आम्ही बाळ होतो (नेट -आबाळ).

१)skywatch - National Book Trust publication,
२ )नक्षत्रविचार - पुरुषोत्तम कुलकर्णी
( ज्योतिष नसलेली पुस्तकं, आकिशनिरिक्षणाची आहेत)
३)हा तारा कोणता- जोगळेकर, साहित्य संस्कृति प्रकाशन.
हे एक उत्तम पुस्तक आता मिळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वैवाहिक जीवन ही एक साडेसातींची मालिकाच असते. हवेत उडणार्‍या जीवाला पाय जमिनीवर ठेवायला भाग पाडणारी. प्रत्येक पावलाला तडजोड करायला लावणारी आणि फक्त स्वतःच्या प्रारब्धातले भोगायच्या ऐवजी दोघांचाही प्रारब्धाला सामोरे जायला लावणारी! यांत मनस्तापही असतो, प्रगतीही होते, दु:खही होते आणि आनंदही. म्हणूनच बॅचलर लोकांना म्हणावेसे वाटते, हाय कंबख्त, तूने पी ही नही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंद? खरच असतो का? आय वंडर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते रवि ग्रह पाहायला हवा. शुक्र वगैरे प्रेमाचा कारक ठीक आहे पण जोडप्यात बेबनाव होण्याला कारण रविच असतो.लेखातल्या उदाहरणांत शुक्र काही उजेड पाडणार नाही॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटते रवि हा ओव्हरॉल आयुष्याची दिशा दाखवत असेल पण शुक्र-मंगळ हे आकर्षण-प्रेम व कामसौख्याचे कारक आहेत जर आत्माच पूर्ण पोळलेला असेल तर कितीका दिशा फार समान घ्या...
गुरुवरुन वैवाहीक जीवनाची स्थिरता पहातात, पण गुरु आनंदाचे, समाधानाचे वचन देत नाही. गुरुदॄष्टी उत्तम याचा अर्थ एवढाच की हर्क्युलिअन झगडा-समेट, अतोनात तडजोडीनंतरही गोघे एकत्र रहात असतात.
बाकी चंद्र मानसिक कंपॅटिबिलिटीकरता महत्त्वाचा मानला जावा.
_____
दोघांच्या चंद्रांमध्येही ९० अंशाचा = इनहार्मोनिअस फारक, शुक्रांचीही तीच कथा, मंगळांचे षडाष्टक. फक्त गुरु अत्युत्तम कर्केचा उच्चीचा ज्याची विवाहस्थानावर दृष्टी याचा अर्थ हा असतो की कणभरही पटत तर नाहीच बेबनाव असूनही विवाह अतोनात भरभक्कम पायावरती असतो. तो पाया म्हणजे गुरुची कृपा.
_____________
मध्यंतरी मी "वृश्चिकेचा शुक्र" हा फेसबुकवरील गट जॉईन केलेला होता. यामध्ये लोकांच्या अनुभवात अतोनात साम्य आढळले विशेषतः प्रेमाच्या अभिव्यक्तीत. इतका समान धागा होता - इन्टेन्सिटी, भावनांची तीव्रता, जेलसी, अररेक्विटेड लव्ह, प्रेमपात्रास दिलेले सिन्गल माइंडेड अटेन्शन. पण वर म्हटल्याप्रमाणे याचाही उहापोह होता की "हवे तसे प्रेम न मिळणे, प्रेमास रिस्पॉन्स न मिळणे" ही सर्व अनुभवांची समानता वाचून मला एकदम अवाक व्हायला झालेले. पण मी तो ग्रुप सोडला कारण मला ते "सिलेक्टिव्ह रीडींग" वाटू लागले. आय वुड रादर ऑब्झर्व्ह पीपल & इन्फर. कारण त्या ग्रुपमधील लोकांचे ज्योतिषावरील वाचन अफाट होते व ते आधीच बायस्ड होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते रवि ग्रह पाहायला हवा. शुक्र वगैरे प्रेमाचा कारक ठीक आहे पण जोडप्यात बेबनाव होण्याला कारण रविच असतो.लेखातल्या उदाहरणांत शुक्र काही उजेड पाडणार नाही॥ सर्व ग्रहांत निष्ठा दाखवणारा ग्रह शुक्र आहे.रवि दास्यत्वाचा कारक आणि दास्यत्वाची अपेक्षा करणारा आहे. ते झालं नाही की पिसाळतो.तो दांपत्यजीवनात घुसला की जाळतो शुक्रबिक्र सर्वांना.यासाठी दोघांची कुंडली कशाला पाहायची. त्या व्यक्तिचीच बस आहे पुढे काय होणार {कोणाशीही}हे दुय्यम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषयाला धरून आहे ना? चूक बरोबर हे वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय विषयाला धरुन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी एक विषयाला धरून >>आय वुड रादर ऑब्झर्व्ह पीपल & इन्फर>>माझा आहे वृ शुक्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला व्यनि करेन अचरटजी. मी नोट केलेली व लोकांकडुन ऐकलेली नीरीक्षणे. सावकाश करेन.
____
इथेच लिहीते - वृश्चिकेचा शुक्र डेट्रीमेंटल असल्याने सहसा या लोकांना प्रेमात फार झगडावं लागतं, अनरेक्विटेड प्रेमच वाट्याला येतं असा एक मतप्रवाह ब्लॉगवरती दिसला. ज्याच्याशी मी सहमत आहे, तसेच बरेच लोक होते. पण वृश्चिक शुक्राचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "प्रेम pursue करण्यातील single mindedness, intensity (उत्कटता) जी की काही लोकांना चक्क भीतीदायक वाटू शकते. It is not for fainthearted असा एक विचार परत परत ब्लॉगवर मांडला गेला होता. मी सहमत आहे.
मत्सर हा तर या शुक्राचा स्थायीभाव आहे पण एकनिष्ठा हा सुद्धा. याशीदेखील मी सहमत आहे.
एकंदर या राशीतील शुक्र फार तीव्रतेने, सखोल, उन्मळून प्रेम करणारा आहे.
____
माझा एक बालमित्र आहे (नक्षत्र - अनुराधा) चंद्र. I haven't hated anyone(=worth my energy) so intensely.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कमीतकमी ज्योतिषी व्यक्तिने या शास्त्रावर (!)विश्वास ठेवायचा म्हटलं तर विवाहासाठी दोन कुंडल्या पाहाणे निरर्थक आहे. जातकाच्या कुंडलीतच विवाहात न्यून हे भाकित असेल तर कोणशीही विवाह केल्यास ते खरं होणारच ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुंडलीत छत्तीस गुण जुळत असलेल्या कित्येक जोडप्यांचा प्रत्यक्षात छत्तीसचा आकडा असलेला याची डोळा पाहिला असल्याने....पास !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायन निरयन थोडक्यात सांगायचे तर ग्रह कोणत्या राशीत आहेत हे ठरवण्याची पद्धत.
निरयन:- भारतीय पद्धतीत शके ४४५/ अथवा ४९५ ला जी राशीविभागणी केली होती दूरच्या तारकासमुहांच्या संदर्भात तीच कायम ठेवायची आणि तिथे ग्रह ( त्या पार्श्वभूमीवर ) ग्रह दिसू लागले की ग्रह त्या राशीत आहे म्हणायचे. मृग नक्षत्राचे (Orion) तारे, रोहिणी(Aldeberon) वृषभेत आहेत. चंद्र वृषभेत म्हणू तेंव्हा तो तिथेच दिसेल आकाशात.

सायन : यांचा शून्य बिंदूच मागे सरकतो. तिथून मेष वगैरे राशी मोजायच्या आणि त्या ३०,६०,९० अंशाप्रमाणे ग्रह कुठे असेल त्या राशीत आहे म्हणायचे. प्रत्येक दोन हजार वर्षांनी सायन-निररन मध्ये एकेक राशीचा फरक पडत २६हजार वर्षांनी पुन्हा दोन्ही सम येतील. सायन ग्रह आकाशात पाहू गेल्यास ठरिविक ताय्रांमध्रे चार हजार वर्षांनी दिसणार नाहीत.

त्यामुळे ज्या ठोकताळ्यांवर ( assumptions) ज्योतिष सांगणार आहोत त्यात भेळ मिसळ करणे बरोबर नाही.

टिळकांनी सायन पद्धती अधिक अचूक ( ऋतू, उत्तरायण,दक्षिणायन,ग्रहणे याबाबतीत ) म्हणून त्याचा पुरस्कार करून पंचांग केले. ज्योतिषी लोकांनी ते अव्हेरले मग त्यांनी निरयन ग्रहही देण्यास सुरुवात केली.

भाकितं चुकतात म्हणून कधी सायन कधी निरयन कधी केपी अशी धरसोड करण्यापेक्षा राशीजन्य भविष्याऐवजी स्थितीजन्य ग्रह पाहिले ( लग्नात/चतुर्थात/व्ययात इत्यादी) पाहिजेत असं माझं मत झालंय.

लग्नी रवी विरुद्ध लग्नी शनि अशा दोन व्यक्तिंची विचारांची पद्धत इतकी विरुद्ध असते की कुंडलीतले मिनेचा शुक्र कर्केचा गुरु काही चमत्कार करणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिळकांनी लिहिलेला ओरायन ग्रंथ वाचण्यासारखा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व.दा.भटांचं "वृश्चिक लग्न" पुस्तक वाचलंय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही वाचलेलं अचरटजी. पुस्तक मस्त वाटतय. I am a sucker for anything about वृश्चिक.
___
वृश्चिकेतही विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रांपैकी माझे लाडके नक्षत्र - अनुराधा.
माझी एक कन्नडीगा मैत्रिण होती तूळ लग्न्/वृश्चिक चंद्र (अनुराधा नक्षत्र)/कन्या सूर्य/ मेष मंगळ. ओह माय गॉड!!! मला ती इतकी आवडायची. अनुराधा नक्षत्र जातक स्त्रिया अतिशय सुंदर असतात असे वाचलेले आहे. माझ्यावर सर्वाधिक गारुड घालणारी तीच मैत्रिण. आय आय टी (एम एस सी मॅथ्स) + आय आय एम (एम बी ए), आता सिलिकॉन व्हॅलीत खूप उच्च पदावरती आहे. ती मॅरॅथॉनमध्येही असते.
इतकी सुंदर होती, हुषार होती. आय कॅनॉट फर्गेट. शी वॉज मॅग्नेटिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात फलज्योतिष हे घटनात्मक भाकिते स्वरुपात पहातात. परदेशात मात्र ते स्वभाव वैशिष्ट्ये, कल अशा दृष्टिने पहातात. त्यामुळे तिथे मानसशास्त्र व ज्योतिषी एकत्र येउन प्रयोग करु शकतात. इथे तसे होत नाही. करमणूक म्हणून ज्योतिष उपयुक्त आहे. करमणूक हे मनस्वास्थ्य टिकवायला मदत करते.
अवांतर- आपल्या टंकबोली वरुन देखील आपले भाकीत काही ऐसीकरांनी वर्तवले असेलच. फक्त ते इथे सांगत नाहीत. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

उलट घटना Boolean स्वरूपात मांडता येत असल्याने ते तपासणं जास्त सोपं असायला हवं ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणुनच फलज्योतिष चाचणी करायला ज्योतिशी तयार होत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वृ शुक्र लग्नी गुरुच्या दृष्टीत भाग्यातून आहे.त्यामुळे फळे सौम्य झाली असतील.गुरुच्या वजनाने(पृथ्वीच्या तेरापट ) भाग्याचा आणि धार्मीक वृत्तीचा पार चेंदामेंदा झालेला आहे.
तुमची निरिक्षणं पाहता ( नक्षत्र वगैरेची )निरयन ग्रह,कुंडलीच पाहावी.यामध्ये मोक्ष,सुख,साडेसाती यांचा विचार होतो.
फक्त ऐहिक गोष्टी,compatibility यासाठी वेस्टर्न रवि-रास पद्धत बरी.

# बाकी सर्वच स्त्रिया देवगणी नक्षत्रावर असल्या तर पोलिस,नर्स ,हॅाटेल स्टाफ कोण होणार? मनुष्य,राक्षसगणी शिवाय दारूण नक्षत्रंही आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा तुमचाही गुरु नवव्यात कर्केचा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो। फक्त मेषेचा रवि,(१महिना),कर्के गुरु(११),तूळेचा शनि(३०)एवढ्यावरून सर्वांना डोक्यामागे प्रभावळ,बसायला सिंहासन मिळत असते तर त्या काळात होलसेल ओर्डरी आल्या असत्या.प्रत्यक्षात टोप्या अन खुर्चा विकल्या जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळलं मला. पण तुम्ही हे नोट केलय का मी प्रेडिक्ट कधीच करत नाही. माझी रुचि स्वभावाचा कल शोधण्याकडे असते. जे की वरती घाटपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे वेस्टर्न ज्योतिषात होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला. भरपूर प्रश्न आहेत जगापुढे, वेळ वाया घालवू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

थोडी करमणूक करून घेतोय ,निळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ निळे जगाचे प्रश्न सोडवायला खंदे मिथुन-वृश्चिक असताना आम्ही फुसक्या लोकांनी त्यात काय म्हणुन लक्ष घालावे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरपूर प्रश्न आहेत जगापुढे, वेळ वाया घालवू नका.

फाजील उपदेश करण्यात गेलेल्या वेळाबद्दल १ मिनिटाची श्रद्धांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुंडली, ज्योतिष्य, इ. पाहून कुठलेच साध्य साधले जात नाही. फक्तं वेळ आणि पैशाचा निर्र्थक अपव्यय होतो. आणि त्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या भावनांशी खेळ केला जातो.

कराग्रे वसते लक्ष्मी |
करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविंदम् |
प्रभाते करदर्शनम् ||

या स्त्रोताचा रोज, दिवसाच्या सुरूवातीला जप करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

**कुंडली, ज्योतिष्य, इ. पाहून कुठलेच साध्य साधले जात नाही. फक्तं वेळ आणि पैशाचा निर्र्थक अपव्यय होतो.**
-
खरय हो.
विद्यार्थ्यांनी अजिबात पाहू नये.

नोकरी/व्यापार,
कोणता व्यापार,
इथे /परदेशात जाऊ
असे फारतर बघावे. अशा प्रश्नांत उदा व्यापार करायचा पक्का निर्णय त्याने केलेलाच असतो फक्त पर्याय तपासत असतो.

मला राजयोग आहे कुंडलीत म्हणून कोणी कॅाटवर बसून छत्र चामरे येण्याची वाट पाहात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय गूढ भाषेत संवाद चालला आहे इथे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व मेष्/कन्या/वृश्चिक व्यक्तींनी हात वर करा रे म्हणजे एकदाचं मला कळेल कोणाबरोबर माझं उत्तम जमतं ते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू गंमत म्हणून लिहीलयंस पण खरं म्हणजे हा गोषवारा आहे - "तुझं मेषवाल्या/वाली बरोबर जमेल" असं ठणकावून कोणी सांगितलं की तसं जमू लागलंय जाणवायला लागतं ! कींवा हेच बघ ना, तुझ्या लेखातलं शेवटचं वाक्य आहे;

पण तिच्या मर्यादित निरीक्षणात लोक हे आपापल्या कुंडलीशी faithful असतात असाच अनुभव आहे.

पण त्यानंतर सायन-निरयन उपस्थित केलंय की ज्यामुळे मुळातली कुंडलीमागची गृहितकंच अनिश्चित होतायत. But you are fine with it Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

माझं मेष-चंद्र अज्जिबात जमत नाही आणि मेष-सूर्य मला इन्स्टिन्क्टिव्हली आवडतात. त्यांची नाइव्ह, शिंगावर घ्यायची वृत्ती, त्यांच्यात जी निष्कपटता असते त्याची मी फॅन आहे. आणि ते पर्सनॅलिटीतही दिसते. म्हणजे मला काही सेलेब्रिटीज आवडतात आणि मग ६-७ महीन्याने विचार येतो अरे तीची/त्याची रास पाहू. ती हमखास मेष-सूर्य निघते.
ही जो पर्सनॅलिटीतील फायर आहे, निष्कपटी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी आहे ती मला अन-मिस्टेकेबल वाटते.
___
माझे बाबा वृषभ-सूर्य आणि मेष-चंद्र आहेत आणि मला नीट माहीते मला त्यांची कोणती बाजू आवडते आणि नावडते.
मला वृषभेची शांत, कंटेंट अतिशय समाधानी व संथ, रेलिशिंग इन गुड फुड & कम्फर्ट्स - ही बाजू आवडते.
पण मेष-चंद्राचा जिव्हारी लागेल असे बोलणे - अज्जि अज्जि अज्जिबात आवडत नाही.
___

सायन-निरयन उपस्थित केलंय

ते डोक्यावरुन गेलय पण एवढं माहीते की कन्व्हेन्शनली जी कुंडली काढलेली आहे ती वाचून नीरीक्षणे पडताळता येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नामांतर रद्द झाल्यामुळे हा प्रतिसाद पण रद्द समजावा.

शुचि ह. घे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणतं नामांतर? धन्यवाद Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हॅललो हॅलो मी सिंह बोलतोय."
"हळू ओरडा हो , आमचा तराजू हलतोय."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हांई ..!भारी लेख ..आवडीचा विषय..
थोड्या वेळात एक अजुन प्रतिसाद देतो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile नेकी और पूछ पूछ. जरुर द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

**पण त्यानंतर सायन-निरयन उपस्थित केलंय की ज्यामुळे मुळातली कुंडलीमागची गृहितकंच अनिश्चित होतायत. But you are fine with it**

अगदि अगदि बरोब्बर.
सरळ रेषा वाढवली तर ती सरळच असते हे गृहितकच आहे.जमिनिवर काढली तर वक्र असते.सायन-निरयन नक्की कोणती कुंडली बघता हे ठरवा बुवा.

रवि सायन आणि चंद्र निरयन असं नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनपेक्षितरित्या प्रतिसाद भराभर वाढताहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके सायन निरयन मला कळत नाहीये. बट आय अ‍ॅम कम्फर्टेबल विथ माझी जी काय तोडकी मोडकी पद्धत आहे.
परत काही आता ज्योतिषावर धागा काढणार नाही. कारण त्यातील गणित सायन्/निरयन मला कळत नाहीये. एनीवे हे धागे मौजमजा-अनुभव-ललित प्रकाराचे होते. जे लोक ऑथॉरिटी आहेत त्यांनी माझं हे आतापर्यंत मला वाटत होतं की माझं आहे ते कुरण घ्या. आय अ‍ॅम बेटर ऑफ ऑफ इट.
तसाही दिवस क्ष्क्ष्क्ष चाललेला आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या लेखावर पाश्चिमात्य astrology चा प्रभाव दिसतोय..

-क्रमश:"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स मला पौर्वात्य ज्योतिष विशेष माहीत नाही कारण गेले १५ वर्षे मी फक्त पाश्चिमात्य ज्योतिष वाचते आहे.
____
काही कारणाने रजा घेते आहे. पण जेपी तुम्ही जरुर प्रतिसाद द्या. मला उत्तर द्यायला जमणार नाही तेव्हा ... प्लीज समजुन घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

**परत काही आता ज्योतिषावर धागा काढणार नाही. कारण त्यातील गणित सायन्/निरयन मला कळत नाहीये. **

तसा निर्णय घेऊ नये.सायन्/निरयन गणित करण्याची गरज नाहिये भविष्य जाणून घेण्यासाठी. फक्त एवढंच म्हणायचंय की भारतातून आलेल्या कुंडलीत निरयन ग्रह असतात.नक्षत्रविचार चंद्राचं नक्षत्र असत.दोन्हींच्या मांडणीत पाउण रास (~24 deg)फरक पडतो.

धागाविषय कुंडली पाहावी का यात थोडे विषयांतर झालंय पण तुम्ही जो कम्पॅटिबिलटि सांगताय ते बरोबरच आहे. वेस्टर्न म्हणजे रविरास आहे.दोन्ही वेस्टर्न कुंडल्याच घेतल्यास रविच्या स्थानात दुसय्राचा शनि असू नये असं मला वाटतं.सॅाफ्टवेअर वापरून कुंडली काढता येते तिथे समजते यात कोणती कुंडली येईल.omganesh dot com वर सॅाफ्टवेअर डौनलोड न करता ओनलाइन कुंडली मिळते ती निरयन असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

astrosage.com देखील अ‍ॅक्युरेट कुंडली मिळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय.ओमगणेश छोट्या मोबाइलवरही चालते फास्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0