<b>आता संभवा की युगे युगे !</b>

एखाद्या बारक्या पोराने स्वतःच लावलेल्या फटाक्यांच्या मोठ्ठ्या
माळेच्या आवाजांना घाबरून माजघरात जाऊन लपावं तसा
अब्राहमी लोकांचा देव शेपूट गांxत घालून
कुठे जाऊन लपला आहे देव जाणे!
(जिहोव्वा तू परत ये ,
तुला कोणी रागावणार नाही,
सगळे तुझ्या चिंतेत आहेत
आईने जेवण सोडले आहे !
)
थांबा थांबा: कोणत्या कत्तलीसाठी सध्या अश्रू गाळतो आहोत
याची गल्लत करू नका . (प्रत्येक जागच्या किंकाळ्या
वेगळ्या आहेत!) आपलं काय ठरलंय ?
१ ते २: ओर्लांडो
२ ते ३: सॅन बर्नार्डिनो
३ ते ४: पॅरिस
४ ते ५: ब्रसेल्स
६ ते ७: इस्तंबूल
७ ते ८: नीस
(आणि दहा पेक्षा कमी मेले असतील ते धरू सुद्धा नका ,
वेळ नाहीये ! मुडद्यामागे एक मिनिट देणे अधिक न्यायाचे होईल का
यावर विचार चालू आहे. )
नोआखली मध्ये, कोलकोत्या मधे पांढऱ्या पंचातला एक म्हातारा
काठी टेकत टेकत फिरू लागला
की सुरे, बंदुका, तलवारी हळूहळू म्यान होत,
आगी आपोआप विझत म्हणे
ख्रिस्त, बुद्ध, गांधी हे असले पंटर नेमक्या वेळेला कुठे गायब झाले रे?
संभवा मी युगे युगे वगैरे विसरलेले दिसतात !
बोंबला !
: मिलिंद पदकी

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

ख्रिस्त, बुद्ध, गांधी हे असले पंटर

पंटर शब्द किती दिवसांनी वाचला तो ही कवितेत तो ही थेट ख्रिस्त गांधी ला उद्देशुन

"आणि दहा पेक्षा कमी मेले असतील ते धरू सुद्धा नका , वेळ नाहीये ! मुडद्यामागे एक मिनिट देणे अधिक न्यायाचे होईल का यावर विचार चालू आहे. )"

हा तर काळ्या उपहासाचा कळसच झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच.
कविता खूपच आवडली.
पण, युग लोटू द्या की. त्या आधीच 'संभवा' म्हणून फर्मान कसे काय काढता?
आणि काय आहे, गेल्या साठ्सत्तर वर्षांत एखाद्या महायुद्धात एकदम पाच पन्नास लाख लोक मरणे बंद झालेय. त्याची भरपाई आहे ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mankind has not learned anything from WWII:
Rwanda 10 lakhs dead
Darfur 4.25 lakhs dead
Congo: dead unknown, but 2 lakh women raped
Syria 5 lakhs dead
Iraq 6 lakhs dead
All post WW II.
I will not depress you further!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

हे आकडे मोठे आहेत, आणि ते शून्य असावेत हे मान्यच आहे. पण दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धात मरण पावणारांची संख्या शेकडो पटीने घटलेली आहे.
war deaths

अर्थात कवितेतली भावना समजून घ्यायची असते, सत्याशी तिचा काही संबंध असलाच पाहिजे असं नाही हेही मान्य आहेच म्हणा. पण सध्याच्या मनुष्यजातीला 'काहीच शिकली नाही' असं म्हणण्याआधी सत्य काय आहे हे तपासून पाहाणं गरजेचं ठरतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला असे सुचित करायचे आहे का, की परिस्थिति सुधारत आहे ? मा. श्रि. हिट्लर यानि bar खुपच उन्च नेवुन ठेवला आहे , त्याच्याजवळ जाणे जरि शक्य नसले तरिहि आकडे पुरेसे वाइट आहेत. त्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे आकडे अनेक पटीने जरी कमी झालेले असले तरीही हे पुरेसे भयानक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर दाखवलेली आकडेवारी ही दुसऱ्या महायुद्धानंतरची आहे. पहिलं आणि दुसरं महायुद्धं जर ग्राफवर घेतलं तर आजचे आकडे रजिस्टरच होत नाहीत.

war deaths

या ग्राफमध्ये स्केल ३५० पर्यंत जाते. आधी दिलेल्या ग्राफमध्ये ती २५ पर्यंत आहे. त्यातही गेल्या साठ वर्षांत युद्धमृत्यू प्रचंड प्रमाणावर घटलेले दिसतात. १०० पट सुधारणा १९५० च्या दशकाच्या तुलनेत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत ती सुमारे १००० पट आहे.

सध्या परिस्थिती वाईट असणं आणि पूर्वीपेक्षा ती सुधारलेली असणं या परस्परविरोधी गोष्टी नाहीत. अजूनही सुधारणा झाली तर हवीच आहे. मात्र 'मानवजात काही शिकलीच नाही' असं म्हटलं तर तो सत्याचा विपर्यास होतो. 'आत्तापर्यंत झाली ती सुधारणा नाहीच' असं म्हटलं तर सुधारणेसाठी कुठच्या गोष्टी यशस्वी ठरल्या याचा अभ्यासच करता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगातला सर्वात कत्तलखोर मनुष्यप्राणी म्हंणजे युरोपीय गोरा पुरुष. त्यांनी अमेरिकेत स्थानिकांची कत्तल आणि आफ्रिकेतून गुलामांची प्रचंड आयात, युरोपात ज्यूंचे शिरकाण आणि त्याआधी हजारो बायकांचे "चेटकीण" म्हणून जाहीर दहन केले . असा हा प्राणिमात्र, अणुबॉम्बच्या निर्मितीमुळे "एकमेकांचा निश्चित सर्वनाश" अशा परिस्थितीत पोचला आहे . त्यामुळे पुढील मोठ्या कत्तली थांबल्या आहेत. भारत-पाकिस्तान मोठे युद्धही याच कारणासाठी आजपर्यंत टळलेले दिसते . अशा या सशस्त्र संधीमुळे घडून आलेल्या "शांती"ला मानव खरंच काही शिकला आहे असे म्हणणे गैर ठरेल.
महासत्तानी अणुबॉम्ब नंतर तिसऱ्या जगात सतत "प्रॉक्सी" युद्धे घडवून आणली . एकमेकांना थेट आव्हान देण्याची त्यांची हिम्मत आणि परिस्थिती नव्हती इतकेच. नाहीतर एव्हाना खनिज तेलावरून तिसरे महायुद्ध केंव्हाच झाले असते.
एका "निर्वाणीच्या " युध्दाने सर्व काही ठीक करता येईल असा जगातल्या बहुतेक सर्व पुरुषांचा नितांत विश्वास असतो, आजही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साहेब , " या ग्राफमध्ये स्केल ३५० पर्यंत जाते. आधी दिलेल्या ग्राफमध्ये ती २५ पर्यंत आहे." , "दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत ती घट सुमारे १००० पट आहे." मला वाटते की हे फक्त अति तांत्रिक होते आहे . आणि हिटलरनि केलेल्या नरसंहारा पुढे , पुढच्या काळातले कुठलेही कृत्य हे कमी हीन आणि सुधारणा झालेली दर्शवणारे ठरू शकते ( फक्त statistically विचार करायचा झाला तर ) ... आपण मारलेल्या /मेलेल्या माणसांविषयी बोलतोय !! आणि अजून एक हिटलर च्या दर्जाचा माणूस तयार झाला नाही हा योगायोग मानायचा का सुधारणा ? शिवाय अगदी statistically च विचार करायचा झाला तर पहिले आणि दुसरे महायुध्ध हे दोन peaks होते , उरलेल्या दशकांमध्ये , आधी ,नंतर आणि मध्ये सुध्दा सध्या ज्या consistently , may be at a much lower numbers , but consistently माणसे मारणे /मरणे चालू आहे , त्या कंसिस्टन्टली झाले होते का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच त्यांनी आधीचा चार्ट दुसर्‍या महायुद्धानंतरचा दिलाय ना? दुसर्‍या महायुद्धातील आकडे वगळे तर सुधारणा दिसत आहे असा त्यांचा दावा त्यांनी विद्यासहीत दिलेला आहे. विद्यात संख्या दिलेली असेल तर लोकसंख्या वाढीचा परिणामही लक्षात घेतला पाहिजे.

उरलेल्या दशकांमध्ये , आधी ,नंतर आणि मध्ये सुध्दा सध्या ज्या consistently , may be at a much lower numbers , but consistently माणसे मारणे /मरणे चालू आहे , त्या कंसिस्टन्टली झाले होते का ?

?? कन्सिस्टंटची व्याख्या काय? मारण्याची कन्सिस्टंसी म्हणजे किती लोक मारले जाताहेत हे नाही का? जर संख्या कमी झाली असेल तर त्याला कन्सिस्टंटली म्हणता येणार नाही.

संभाव्य आक्षेप असे असू शकतात;

दुसर्‍या महायुद्धानंतरची ६०-७० वर्षे हा कालावधी अपुरा आहे. १७-१८व्या शतकापासूनचा विदा काय म्हणतो? असा वेळी पहिले-दुसरे महायुद्ध वगळून नक्की ट्रेंड काय आहे यावर भाष्य करता येऊ शकते. १७-१८ व्या शतकानंतर याचं एक कारण म्हणजे बंदुका वगैरे आल्याने मारण्याची इफिशियंसी वाढली.

युद्धाशिवायचा डेटा आहे का? दोन देशांतली वगैरे युद्धे सोडली तर वेगळा डेटा काय म्हणतो? यादवी युद्धं, वंशहत्या, गुन्हे वगैरेंचा फक्त डेटा घेतला तर ट्रेंड तोच आहे का? वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

उरलेल्या दशकांमध्ये , आधी ,नंतर आणि मध्ये सुध्दा सध्या ज्या consistently , may be at a much lower numbers , but consistently माणसे मारणे /मरणे चालू आहे , त्या कंसिस्टन्टली झाले होते का ?

थोडक्यात उत्तर हो असं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या युद्धांची व यादवींची ही यादी. २००० सालनंतर युद्धांची कन्सिस्टन्सी प्रचंड कमी झालेली दिसते. आणि प्रत्येक युद्धात मरणारांची संख्याही कमी झालेली दिसते.

1946-49: Chinese civil war (1.2 million)
1946-49: Greek civil war (50,000)
1946-54: France-Vietnam war (600,000)
1947: Partition of India and Pakistan (1 million)
1947: Taiwan's uprising against the Kuomintang (30,000)
1948-1958: Colombian civil war (250,000)
1948-1973: Arab-Israeli wars (70,000)
1949-: Indian Muslims vs Hindus (20,000)
1949-50: Mainland China vs Tibet (1,200,000)
1950-53: Korean war (3 million)
1952-59: Kenya's Mau Mau insurrection (20,000)
1954-62: French-Algerian war (368,000)
1958-61: Mao's "Great Leap Forward" (38 million)
1960-90: South Africa vs Africa National Congress (?)
1960-96: Guatemala's civil war (200,000)
1961-98: Indonesia vs West Papua/Irian (100,000)
1961-2003: Kurds vs Iraq (180,000)
1962-75: Mozambique Frelimo vs Portugal (10,000)
1962-75: Angolan FNLA & MPLA vs Portugal (50,000)
1964-73: USA-Vietnam war (3 million)
1965: second India-Pakistan war over Kashmir
1965-66: Indonesian civil war (250,000)
1966-69: Mao's "Cultural Revolution" (11 million)
1966-: Colombia's civil war (31,000)
1967-70: Nigeria-Biafra civil war (800,000)
1968-80: Rhodesia's civil war (?)
1969-: Philippines vs the communist Bagong Hukbong Bayan/ New People's Army (40,000)
1969-79: Idi Amin, Uganda (300,000)
1969-02: IRA - Norther Ireland's civil war (3,000)
1969-79: Francisco Macias Nguema, Equatorial Guinea (50,000)
1971: Pakistan-Bangladesh civil war (500,000)
1972-2014: Philippines vs Muslim separatists (Moro Islamic Liberation Front, etc) (150,000)
1972: Burundi's civil war (300,000)
1972-79: Rhodesia/Zimbabwe's civil war (30,000)
1974-91: Ethiopian civil war (1,000,000)
1975-78: Menghitsu, Ethiopia (1.5 million)
1975-79: Khmer Rouge, Cambodia (1.7 million)
1975-89: Boat people, Vietnam (250,000)
1975-87: civil war in Lebanon (130,000)
1975-87: Laos' civil war (184,000)
1975-2002: Angolan civil war (500,000)
1976-83: Argentina's military regime (20,000)
1976-93: Mozambique's civil war (900,000)
1976-98: Indonesia-East Timor civil war (600,000)
1976-2005: Indonesia-Aceh (GAM) civil war (12,000)
1977-92: El Salvador's civil war (75,000)
1979: Vietnam-China war (30,000)
1979-88: the Soviet Union invades Afghanistan (1.3 million)
1980-88: Iraq-Iran war (435,000)
1980-92: Sendero Luminoso - Peru's civil war (69,000)
1984-: Kurds vs Turkey (35,000)
1981-90: Nicaragua vs Contras (60,000)
1982-90: Hissene Habre, Chad (40,000)
1983-: Sri Lanka's civil war (70,000)
1983-2002: Sudanese civil war (2 million)
1986-: Indian Kashmir's civil war (60,000)
1987-: Palestinian Intifada (4,500)
1988-2001: Afghanistan civil war (400,000)
1988-2004: Somalia's civil war (550,000)
1989-: Liberian civil war (220,000)
1989-: Uganda vs Lord's Resistance Army (30,000)
1991: Gulf War - large coalition against Iraq to liberate Kuwait (85,000)
1991-97: Congo's civil war (800,000)
1991-2000: Sierra Leone's civil war (200,000)
1991-2009: Russia-Chechnya civil war (200,000)
1991-94: Armenia-Azerbaijan war (35,000)
1992-96: Tajikstan's civil war war (50,000)
1992-96: Yugoslavian wars (260,000)
1992-99: Algerian civil war (150,000)
1993-97: Congo Brazzaville's civil war (100,000)
1993-2005: Burundi's civil war (200,000)
1994: Rwanda's civil war (900,000)
1995-: Pakistani Sunnis vs Shiites (1,300)
1995-: Maoist rebellion in Nepal (12,000)
1998-: Congo/Zaire's war - Rwanda and Uganda vs Zimbabwe, Angola and Namibia (3.8 million)
1998-2000: Ethiopia-Eritrea war (75,000)
1999: Kosovo's liberation war - NATO vs Serbia (2,000)
2001-: Afghanistan's liberation war - USA & UK vs Taliban (40,000)
2001-: Nigeria vs Boko Haram (20,000)
2002-: Cote d'Ivoire's civil war (1,000)
2003-11: Second Iraq-USA war - USA, UK and Australia vs Saddam Hussein's regime and Shiite squads and Sunni extremists (160,000)
2003-09: Sudan vs JEM/Darfur (300,000)
2004-: Sudan vs SPLM & Eritrea (?)
2004-: Yemen vs Houthis (?)
2004-: Thailand vs Muslim separatists (3,700)
2007-: Pakistan vs PAkistani Taliban (38,000)
2011-: Iraq's civil war after the withdrawal of the USA (150,000)
2012-: Syria's civil war (320,000)
2013-: ISIS in Syria, Iraq, Libya (?)
2013-15: South Sudan vs rebels (10,000)
2014-15: Ukraine's civil war (6,000)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सखोल स्टॅटिस्टिकस दिल्याबद्दल धन्यवाद ( मला यातील निम्याही गोष्टी माहित नव्हत्या , आता शोध घेणे आले ) . मूळ मुद्दा : मला आता असे वाटू लागले आहे कि आपण दोघेही दोन वेगळ्या विषयांवर वाद घालत आहोत ... मला जे वारंवार घडणारे आकडे भयानक वाटत आहेत ते आपणास ( दुसऱ्या महायुध्दा च्या तुलनेत ) ग्राफ च्या scale मधेही न बसण्या इतके कमी ( महत्वाचे ) वाटत आहेत. तेही बरोबरच आहे . या गोष्टी सापेक्ष आहेत असे मानून माझ्याकडून पूर्णविराम ( श्री . Nile यांच्या कालच्या पोस्टीलाही हेच उत्तर )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मला आता असे वाटू लागले आहे कि आपण दोघेही दोन वेगळ्या विषयांवर वाद घालत आहोत

मला हेच म्हणायचं होतं. 'सद्यपरिस्थिती वाईट आहे' हा तुमचा मुद्दा मान्यच आहे. मात्र 'सद्यपरिस्थिती पूर्वीपेक्षा किंवा पूर्वीइतकीच वाईट आहे' हे वेगळं विधान आहे. अनेकवेळा लोक नकळत ही दुसरं विधान पहिल्या अर्थाने वापरतात. ते योग्य नाही एवढंच दाखवायचं होतं.

'दुसऱ्या महायुद्धाच्या तुलनेत नगण्य, म्हणजे शून्य किंवा आदर्श' असं मला म्हणायचं नाहीच. फक्त प्रचंड सुधारणा झालेली आहे एवढंच. अजून सुधारणा करायची गरज आहे याबाबत मतभेद नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यापुढचा प्रश्न म्हणजे ही घट कोणत्या कारणांमुळे झाली, आणि ती कारणे अधिक पुढे रेटता येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या प्रश्नाचं अत्यंत अभ्यासपूर्ण उत्तर स्टीव्हन पिंकरने त्याच्या बेटर एंजेल्स ऑफ अवर नेचर या पुस्तकात दिलेलं आहे. त्याचा साधारण थिसिस असा आहे की युद्धंच काय, एकंदरीतच हत्या, क्रौर्य आणि हिंसा गेली काही शतकं घटत चाललेली आहे. मनुष्यजातीची माणसाच्या जिवाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. याची मुख्य कारणं तो देतो ती म्हणजे सर्वसाधारण सुशिक्षितता, छोट्या छोट्या राज्यांऐवजी मोठी फेडरल स्टेट्स, विज्ञान तंत्रज्ञानामुळे जग जवळ येणं, लोकशाहीचा प्रसार आणि राष्ट्राराष्ट्रांत व्यापार वाढणं. आठशे पानांच्या पुस्तकाचं सार तीनचार ओळींत सांगणं शक्य नाही. ते मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मग सध्याचे दिवस हे साधारण 1939 चे , दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या थोडेसेच आधीचे , आणि अतिशय डेंजरस असे का दिसत आहेत ? आयसिस ? तालिबान? पुतीन ? हामास ? नेतन्याहू ? युक्रेन ? इतकी ज्वालाग्राही परिस्थिती अनेक दशके नव्हती .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण मग सध्याचे दिवस हे साधारण 1939 चे , दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या थोडेसेच आधीचे , आणि अतिशय डेंजरस असे का दिसत आहेत ? आयसिस ? तालिबान? पुतीन ? हामास ? नेतन्याहू ? युक्रेन ? इतकी ज्वालाग्राही परिस्थिती अनेक दशके नव्हती .

म्हणजे गेली काही दशके परिस्थिती सुधारलेली आहे असेच ना? तेच तर घासू गुर्जी म्हणून राह्यलेत. सद्ध्याची परिस्थिती काय आहे हा वेगळा मुद्दा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

दुसरं महायुद्ध होण्यासाठी मुख्य कारण होतं ते म्हणजे वसाहतवाद. आपापल्या वसाहती लष्करी बळावर बनवायच्या, साम्राज्यं मोठी करायची आणि त्यातून हक्काच्या बाजारपेठा निर्माण करायच्या हा शक्तिशाली राष्ट्रांचा अमाप पैसे मिळवण्याचा धंदा होता. त्या धंद्यातली स्पर्धा म्हणजे एकमेकांच्या वसाहती आपल्या ताब्यात घेणं. ही स्पर्धा केवळ लष्करी बळावरच होऊ शकत होती. सध्या वसाहतवाद जवळपास नष्ट झालेला आहे.

दोन्ही महायुद्धांच्या आधी जगातल्या महासत्तांमध्ये प्रचंड मोठी शस्त्रस्पर्धा चालू होती. त्यावेळी युरोपीय राष्ट्रं आपल्या जीडीपीच्या दहा ते वीस टक्के खर्च यासाठी करत होती. याउलट गेली काही दशकं अमेरिका व इतर देशही आपल्या उत्पन्नाचा कमी कमी टक्का लष्कराला देत आहेत.

अमेरिकेचा लष्करी खर्च

म्हणजे दारूगोळा साठतोय, केवळ ठिणगी पडण्याचा अवकाश आहे, अशी परिस्थिती आज नाही. याउलट जनमानसात युद्धाविषयीचा तिटकारा वाढलेला आहे. लोकशाही जगात पसरलेली आहे. सुशिक्षितता आणि इंटरनेट यामुळे जग जवळ आलेलं आहे. परदेशी लोकांचा घाऊक तिटकाराही कमी झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सद्यपरिस्थिती काळजी करण्यालायक असली तरीही ती महायुद्धाआधीची असावी इतकी काळजी करण्यालायक नाही. काय होतं ते काळच ठरवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- १९४० साली प्रमाण १.४०%च होतं, पण महायुद्ध तर १९३९ सालीच चालू झालं. म्हणजे पब्लिकला उशिरा जाग आली, बाकी काय नाय.

- टक्का कमी व्हायचं कारण न्यूमरेटर कमी असण्याइतकंच डिनॉमिनेटर वाढता असणं हेही असू शकतं.

- तसंच, शस्त्रांमध्ये सुधारणा होणं (म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त माणसं कमीत कमी वेळात मारली जातील अशी शस्त्रं निर्माण होणं) हेही या ढासळत्या प्रमाणाचं कारण असावं.

मग कोणता इंडिकेटर वापरावा?
माझ्या मते : "संपूर्ण मानवजात नष्ट करायला लागणारा वेळ" हा इंडिकेटर वापरला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>पण महायुद्ध तर १९३९ सालीच चालू झालं. म्हणजे पब्लिकला उशिरा जाग आली, बाकी काय नाय. <<

डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, नेदरलंड, ल्यूक्झेंबूर्ग, फ्रान्सवर हल्ला - १९४०
रशियावर हल्ला - १९४१
अमेरिकेवर हल्ला - १९४१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमेरिकेत त्यावेळी युद्धाला विरोध होता. कोणाचीच बाजू घ्यायची नाही असा ठराव अमेरिकेत काँग्रेसमध्ये (बहुतेक) पास झाला होता. इतकंच काय तर कोणत्याही देशाला युद्धसामग्री पुरवायची नाही असं बिलही अमेरिकेत तेव्हा पास झालेलं होतं. एकंदरीतच पहील्या महायुद्धानंतर अमेरिकेत युरोपच्या भानगडीत आपण कशाला पडा अशी परिस्थिती होती. पुढे जेव्हा इंग्लडला मदत करण्याची वेळ आली तेव्हा यासगळ्यातून वाट काढताना एफडीआरच्या नाकी नऊ आले होते.

तात्पर्यः अमेरीकेचं बजेट तेव्हा खुप कमी असेल तर त्यात आश्चर्य नाही. अमेरीकेने नंतर ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे युद्धसामग्री बनवली ते अविश्वसनीय आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अमेरिकेची आकडेवारी दिली ती दुसऱ्या महायुद्धानंतर सातत्याने टक्का घटलेला आहे हे दाखवण्यासाठी. युरोपातले देश - जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स वगैरे - महायुद्धाआधीही प्रचंड खर्च करत होते. (माझ्याकडे आत्ता आकडेवारी नाही) महायुद्धादरम्यान ते प्रमाण प्रचंड वाढलं.
डिनॉमिनेटर वाढली आहे हे निश्चितच, पण मुद्दा असा की शस्त्रास्त्रांवर जो खर्च व्हायचा तो आता बहुतेक देश शिक्षण आणि विकासासाठी खर्च करत आहेत.
तिसरा मुद्दा - अधिक जहाल शस्त्रं स्वस्त झालेली आहेत - आता आपण पुन्हा बॉटमलाइनकडे येतो. किती माणसं मारली गेली? तर मारली जाणारी माणसं शेकडो पटीने कमी झालेली आहेत. मग शस्त्रं किती का जहाल असेनात? किंबहुना शस्त्रं जहाल झाली म्हणून युद्धं टळत आहेत असंही म्हणण्याला वाव आहे.

"संपूर्ण मानवजात नष्ट करायला लागणारा वेळ" हा इंडिकेटर वापरला पाहिजे.

नुसतं तंत्रज्ञान असून चालत नाही. त्या इंडिकेटरला "संपूर्ण मनुष्यजात नष्ट करण्याची इच्छाशक्ती" या इंडिकेटरने गुणावं लागतं. ती इच्छाशक्ती असली तर नुसत्या तलवारींनीही तुत्सींचा सर्वनाश अगदी थोड्या काळात करता येतो. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉंब टाकले म्हणून लोक भेदरले. पण त्याआधी टोकयोवर फायरबॉंबिंग करून एका रात्रीत तेवढेच लोक मारलेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर---

टोकयोवर फायरबॉंबिंग

एक अवांतर आठवलं. हिरोशिमा - नागासकी मधले अणु हल्ले हा अचाट अफाट अभूतपूर्व व छाती दडपून टाकणारा प्रकार होताच. पण त्या अणु बॉम्बनी जितकी हानी केली; त्याच्याशी कम्पॅरेबल म्हणता यावी इतपत हानी इतरही काही ठिकाणी झाली; पण त्यांची तितकीशी चर्चा होत नाही विविध कारणांमुळे.
टोकियोवरच बॉम्बिंग तुफान होतं; तसच जर्मनीतलं आख्खं ड्रेस्डेन शहर उध्वस्त, बेचिराख करणंही भयावह होतं.
स्टॅलिन ग्राड, लेनिन ग्राड, मॉस्को , बॅटल् ऑफ बर्लिन इथल्या लढाया प्रचंड फेमस. त्यांच्याभोवती शौर्य, क्रौर्य, राजकारण...सगळ्यांचं वलय.
पण बॅटल् ऑफ ब्युडापेस्टही एकूण जीवित हानीमध्ये त्यांच्याशी स्पर्धा करेल इतकं रक्तपात करुन गेलं म्हणतात. पण त्याचीही तितकीशी चर्चा नाही.
अणुबॉम्बच्या शोधाला वेळ लागला असता; तरी निकाल ऑल्मोस्ट निश्चित होता आणि जीवित-वित्तहानी तशीही तेवढ्याच स्केलवर होण्याची शक्यता वाटते.
(इन फ्याक्ट अणु बॉम्बनं युद्ध अधिक लवकर संपवून पुढची संख्यात्मक हानी टाळली असं वाटतं. आख्खा जपान नैतर ओकिनावा स्टाइल 'कामिकाझे' करायला उद्युक्त होत होता. )
बाकी, मूळ विषयाबद्दल -- युद्ध, हानी, काळागणिक कमी- जास्त होते किंवा नाही; ह्याबद्दल काहीही मत्/अभ्यास नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अणुबॉम्बच्या शोधाला वेळ लागला असता;

हा ही विचार करा की अणूबॉम्बचा शोध अमेरीकेला लागला. जपान ला लागला असता तर ते २ बॉम्ब टाकुन थांबले नसते, अमेरीकेवर शेकडो बॉम्ब टाकले असते. इव्हन हिटलर ला लागला असता तरी काय झाले असते ह्याचा विचारच करता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी निकाल ऑल्मोस्ट निश्चित होता आणि जीवित-वित्तहानी तशीही तेवढ्याच स्केलवर होण्याची शक्यता वाटते.

म्हणजे नक्की काय? वरच्या प्रतिसादावारून, अन एकंदरीचत भारतीयांच्या अनुभवावरून, पॅसिफिक मध्ये झालेली भीषण लढाई तुम्हाला नीटशी माहित नसावी असे दिसते. आख्खा पॅसिफीक एकेक छोटाली बेटं करत करत अमेरिकेला जिंकावा लागला होता. तिथे जपानी लोकांनी अत्यंत क्रूरपणे लढा दिला. (युरोपात जसे जर्मन सैनिक शरण आले तसे जपानी अजिबात शरण येत नव्हते. हजारो नागरिकांना भिती घालून त्यांनी लढायला भाग पाडले. इतकंच नव्हे, तर जेव्हा बेट हातातून गेल्याची वेळ आली तेव्हा या नागरिकांना त्यांनी कड्यावरून उड्या मारून आत्महत्या करावयास भाग पाडले. (याचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.)

हीटलरच्या क्रूरतेसमोर जपानचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. पण ते युद्धही अत्यंत क्रूर होतं. पहिल्या अणुबाँबनंतरही जपान सरेंडर करायला तयार नव्हतं यावरून अंदाज यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

शम्भर तक्के सहमत !! फक्त एक addition टिम बुचर लिखित " ब्ल्ड रिवर " हे पुस्तक वाचा .कोन्गो मधिल विदारक परिस्थितिचा अन्दाज येइल . ( तुम्हि WW II नन्तर मानव जात काहि शिकेल , सुधारेल अशि अपेक्शा का , कशाच्या आधाराव्र्र ठेवली आहेत हे कळेल का ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धर्म युद्धात मारणारे/ मारणारे सर्व लोक स्वर्गात जातात म्हणतात. शिवाय मानवांचा ओझा हि भूमीवर काही जास्तास झाला आहे. हा कमी करण्यातही क्रिस्त/ गांधी नव्हे तर सुदर्शन चक्र चालविणार्या कृष्णाची गरज आहे. बहुतेक लवकरच एखाद्या कुरुक्षेत्रावर भयंकर जनसंहार होईल आणि पृथ्वीला मानवांच्या ओझ्यापासून काही अर्थी मुक्ती मिळेल. तो पर्यंत आपण जिवंत राहू कि नाही काही सांगता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात १.६ अब्ज मुस्लिम आहेत त्यातले ६२% आशिया- प्रशांत क्षेत्रात ( भारत, पाकिस्तान, इराण, बांग्लादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया ) या देशात राहतात. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुरुक्षेत्र कुठे असेल तेपण सांगाना जरा. कोण कृष्णावतारी कोणतं आणि कसं सुदर्शनचक्र चालवणार आहे ते ही कळून घ्यायची इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कोण कृष्णावतारी कोणतं आणि कसं सुदर्शनचक्र चालवणार आहे ते ही कळून घ्यायची इच्छा आहे.

"मोह न मजला कीर्तीचा, मी नाथ अनाथांचा(सेपरेशन ऑफ रिलिजन आणि स्टेट माननार्‍या),
भोगी म्हणुनि उपहासा, मी आयचा घो शरियाच्या!!!"
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या परिचयातल्या भारतमातेच्या अनेक सुपुत्रांची अशी श्रध्दा आहे की तो योगेश्वर कृष्ण already अवतारलाय !!!! ( सध्या बहुधा सुदर्शन चक्राला धार लावणे चालू असावे )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून २ वर्ष फक्त धार लावेल मग निवडणूक आली की ते चक्रगिक्र थोडंफार फिरवून परत पाच वर्ष बेगमी करून घेईल मग परत पेटीत ठेवून देईल ते चक्र. भलता चलाख आहे किसना. Wink सुपुत्रांची कीव येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

चांगली चांगली शस्त्रात्रे यांना कोण विकतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शस्रास्रांचा प्रचंड आंतर-राष्ट्रीय "काळा" बाजार आहे . पैसे असले तर रातोरात तुम्ही एक सैन्य उभे करू शकता . पैसा मुख्यतः ड्रग्स, खनिज तेलाचा काळा बाजार आणि श्रीमंत सौदिंच्या देणग्या यातून येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

या येxx'चीच मुले बनवून विकत असतील ना यांना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवि बगदाद हल्ला विसरले वाटतं त्यात २०० लोक गेल्ते. २५ लहान मुलं होती त्यात. दोन अश्रू त्यांच्यासाठी पण ढाळा की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

खरे आहे! इराक-सीरियामधले बाजारातले, मशिदीतले स्फोट / मृत्यू लक्षात घेतले तर त्यांची एक वेगळी, प्रचंड यादी होईल! लिबिया आणखी वेगळे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगातला सर्वात कत्तलखोर मनुष्यप्राणी म्हंणजे युरोपीय गोरा पुरुष. त्यांनी अमेरिकेत स्थानिकांची कत्तल आणि आफ्रिकेतून गुलामांची प्रचंड आयात, युरोपात ज्यूंचे शिरकाण आणि त्याआधी हजारो बायकांचे "चेटकीण" म्हणून जाहीर दहन केले . असा हा प्राणिमात्र, अणुबॉम्बच्या निर्मितीमुळे "एकमेकांचा निश्चित सर्वनाश" अशा परिस्थितीत पोचला आहे . त्यामुळे पुढील मोठ्या कत्तली थांबल्या आहेत. भारत-पाकिस्तान मोठे युद्धही याच कारणासाठी आजपर्यंत टळलेले दिसते . अशा या सशस्त्र संधीमुळे घडून आलेल्या "शांती"ला मानव खरंच काही शिकला आहे असे म्हणणे गैर ठरेल.
महासत्तानी अणुबॉम्ब नंतर तिसऱ्या जगात सतत "प्रॉक्सी" युद्धे घडवून आणली . एकमेकांना थेट आव्हान देण्याची त्यांची हिम्मत आणि परिस्थिती नव्हती इतकेच. नाहीतर एव्हाना खनिज तेलावरून तिसरे महायुद्ध केंव्हाच झाले असते.
एका "निर्वाणीच्या " युध्दाने सर्व काही ठीक करता येईल असा जगातल्या बहुतेक सर्व पुरुषांचा नितांत विश्वास असतो, आजही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे पुढील मोठ्या कत्तली थांबल्या आहेत.

यालाच शिकणं म्हणता येणार नाही का?

एका "निर्वाणीच्या " युध्दाने सर्व काही ठीक करता येईल असा जगातल्या बहुतेक सर्व पुरुषांचा नितांत विश्वास असतो, आजही आहे.

हे उत्तर म्हणजे 'बलात्कार कमी झालेले असले म्हणून काय झालं, बलात्कारी मानसिकता तर संपलेली नाही ना. याचा अर्थ काहीच सुधारलेलं नाही.' असं म्हणण्यासारखं आहे.

मला प्रश्न असा विचारावासा वाटतो की नक्की काय विदा दिला तर युद्धाच्या बाबतीत जग सुधारलेलं आहे असं तुम्हाला पटेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला प्रश्न असा विचारावासा वाटतो की नक्की काय विदा दिला तर युद्धाच्या बाबतीत जग सुधारलेलं आहे असं तुम्हाला पटेल?

घासकडवी एकच क्रिकेट म्याच अनेकदा खेळतात. विरुद्ध पार्टी बदलत रहाते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाहीहो. आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न सगळेच करतात. काही लोक 'मी म्हणतो/ते म्हणून हे बरोबरच आहे' अशी ठाम भूमिका घेतात. काही लोक 'मी नक्की काय म्हटलं तर तुम्हाला माझं म्हणणं पटेल?' असा समंजस प्रश्न विचारतात. तो स्वभावाचा भाग आहे, बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय झालेय, की गेल्या सातशेआठशे वर्षांतले गोर्‍या माणसांचे क्रौर्य ठळकपणे जगासमोर आलेय. म्हणजे त्यांच्यातल्यांनीच ते आणलेय. पण याच काळातल्या काळ्या, पिवळ्या, सावळ्या, (मध्य पूर्वेचा रंग कोणता?)आणि इतर रंगांच्या माणसांचे क्रौर्य त्यांच्यातल्या लोकांकडून फारसे उजेडात आणले गेलेले नाही. स्वकीयांनी स्वकीयांवरच केलेल्या अत्याचारांची गणना कोण करणार? लाखो मुलींना जन्मतःच दुधात बुडवून मारले गेले असेल तर त्यांची संख्या किंवा लाखो विधवांनी आड जवळ केले असतील तर त्यांची संख्या कोण मोजणार? गैरमुस्लिम चेन्गीझखानाने केलेली एक ते दीड कोटी इराण्यांची कत्तल कोण लक्ष्यात घेणार? अगदी अलीकडे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातल्या आणि एकविसाव्या शतकातल्याही मध्य आशियातल्या, युरोपमधल्या, (बॉस्निया, हर्झेगोविना, बैरुट, लेबॅनॉन) पाकिस्तान, अफ्घानिस्तान मधल्या आपापसातल्या कत्तलींची कोण मोजदाद ठेवणार?...... क्रौर्याला लाल रंगाशिवाय दुसरा रंग नसतो. 'नरेंचि केला हीन किती नर' हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवरच वाचलेल्या एका अभ्यासपूर्ण लेखाप्रमाणे हजारो वर्षापूर्वी हजारो लोकांना मारणार्‍या एका माणसाला तर देव बनवुन टाकलय भारतवर्षात.
आणि वैयक्तीक रीत्या हजारो माणसे मारणार्‍या माणसाला
ऋषि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्या माया वगैरे जमातींचा कळवळा दाखवला जातो त्या जमातीत प्रचंड क्रौर्य चालायचे. बळीच्या डोक्यानी फुटबॉल खेळायचे म्हणे.
मागच्या आठवड्यात माबोवर वाचलेल्या माहीतीप्रमाणे हवाई वर पूर्वी कै च्या कै कायदे होते. म्हणजे राजावर सावली पडता कामा नये, नजरेला नजर भिडता कामा नये. असे काही झाले की लगेच मॄत्युदंड!!

-------------
अमेरीकेतेल्या काही लोकांनी गुलामगिरी संपवण्यासाठी काळ्या लोकांसाठी लायबेरीया हा देश तयार करुन दिला. गम्मत म्हणजे अमेरीकेतुन एक गुलाम लायबेरीयात आला. त्यानी लगेच आफ्रीकेतल्या दुसर्‍या काळ्यांना पकडुन त्यांची गुलाम म्हणुन अमेरीकेत विक्री चालु केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अमेरीकेतेल्या काही लोकांनी गुलामगिरी संपवण्यासाठी काळ्या लोकांसाठी लायबेरीया हा देश तयार करुन दिला."
ताई , हे फारच विनोदी विधान आहे , कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेम्स monroe ( ज्यांनी या अर्थाचे जाहीर विधान केले होते ) आणि अमेरिकेतील तत्कालीन आतून उजवे आणि वरून लिबरल * मंडळींना 'अमेरिकेतील गुलामगिरीतून मुक्त झालेले आफ्रिकन्स , रस्त्यावरून मोकळे हिंडणे हे civilization करिता धोका वाटत असल्यामुळे त्यांनी वर वर उदात्त हेतू दाखवत त्या लोकांना ज्यांचा पश्चिम आफ्रिकेशी कुठलाही सांस्कृतिक किंवा कुठलीही नाळ नसताना या मुक्त झालेल्या गुलामांना उचलून एका देशावर लादले !!!

जास्त माहितीकरिता "चेसिंग द डेव्हिल " हे टीम बुचर लिखित पुस्तक वाचावे

*The American Colonization Society (ACS) in full, The Society for the Colonization of Free People of Color of America, established in 1816 by Robert Finley of New Jersey, was founded by groups otherwise opposed to each other on the issue of slavery.[5] The ACS intended to support the colonization of free African Americans because their presence served as "a perpetual excitement" to the enslaved blacks and threatened the slave societies of the South. All of the early organizers of the Society were slaveholders; according to annual reports of the Society, they hoped in this effort to strengthen the institution of slavery in the United States. It helped to found the colony of Liberia in 1821–22 on the coast of West Africa as a place for free-born American blacks. Among its supporters were Charles Fenton Mercer, Henry Clay, John Randolph, Richard Bland Lee and Bushrod Washington.[1][2][3][4][6]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A People's History of the United States : Howard Zinn हे पुस्तकपण अतिशय वाचनीय आहे जर आधीच वाचले नसेल तर कृपया वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

कुठे मिळेल वाचायला ? का अमेझॉन वरून घेऊच म्हणता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर तुम्हाला नाही हो अनुताईंना होता प्रतिसाद. पण तुम्हीही वाचलं नसेल तर वाचाच हे पुस्तक. खूपच माहितीपूर्ण आणि संदर्भपूर्ण आणि अमेरिकेच्या इतिहासाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला भाग पाडणारे पुस्तक आहे. हॉवर्ड झीन हे थोर इतिहासकार होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

हो , पण वाचायला कुठे मिळेल , लायब्ररी वगैरे काही सांगू शकता का ? का विकतच घ्यावे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने