तेव्हा मला तू फार फार आवडतेस...!

तिचं म्हणणं..
मी तुम्हाला मुळीच आवडत नाही..
अन माझा मुद्दा..
तु मला कधी आवडत नाहीस ते सांग..!

बोलताना असे बोलुन गेलो..
तु जशी घरात आवडतेस.. तशी तू प्रवासातही आवडतेस..!

ती मग अडुनच बसली... घरातले नंतर पाहु..
प्रवासात कशी आवडते हे सांगा..!

-------------------------------------------------------------------------------
प्रवास १ :
विमानप्रवासात कधी
मी मध्यमवर्गीय संकोचाने
एखादी टंच हवाईसुंदरी
दुर्लक्ष केल्यागत
न्याहाळीत असतो....
तु अचानक तिला
आपल्याकडे बोलावतेस..
मुद्दामुन तिला गॉसिपिंग केल्यासारखे
कानात काही सांगायला..
खाली वाकवतेस..
उन्न्त तिचे उरोज पाहुन
माझा मध्यमवर्गीय संकोच अजुनच संकोचतो..
अन तिरक्या केलेल्या डोळ्यातुन डोकावतो...
आणि माझ्या मग कानावर येते..
"अ‍ॅक्चुअली माय हजबंड इज अ प्रीडायबेटीक.
वुड यु प्लीज ऑफर ओन्ली ग्रीन सालाड टू हिम इफ अवेलेबल!"
क्षणात त्या हवाई सुंदरीची तू दवाई सुंदरी करतेस.. (आभार पु.ल)
ती ही तिथुन "अ‍ॅट सो यंग एज.." म्हणत
माझ्याकडे एक सहानुभुतीपूर्ण कटाक्ष टाकुन
चुचकारत निघुन जाते..
(ती हसल्याचा मला उगाचच भास होतो.)
अन हे झाल्यावर तु सहजपणे
माझ्याकडे वळून पाहत म्हणतेस
काय टंच मुलगी होती ना.!
फिगर पाहीली का तिची?
मला आवडली...
तुम्हाला?
हवेत माझी फिरकी घेणारी तू...
मला तेव्हा तिथे खरोखरच...
आभाळाच्या उंचीइतकी जाम आवडतेस....

- कानडाऊ योगेशु

(टू बी कंटीन्युड....)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

छान.पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा! झकास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेश आणि जंगलीजवानी(मार डाला! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.
(पण खाली वाकूनही उन्नत उरोज असणारी हवाईसुंदरी साधी हवाईसुंदरी नसून हेलियमसुंदरी असणार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आकाशात , विमानात गुरुत्वाकर्षण बल कमी असते ननि Wink त्यामुळे उन्नत राहीले असतील काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लौल! भारी आहे कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"विमानातील फिरकी" आवडली. अजुन येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेरा सीना देख के जी चाहता है ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या कोंबडीस उद्देशून म्हणावयास वाक्य छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा एक लहानसा अनुभव आठवला.
http://www.aisiakshare.com/node/4804#comment-120373

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0