अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरतानाच्या कायदेशीर जोखीमी आणि जोखीम निरसनाची कायदेशीर प्रक्रीया

भारतीय कायद्यांच्या परिपेक्षात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' वापरताना (खासकरून आंतरजालावर) कोणकोणत्या कायदेशीर जोखीमींना सामोरे जावे लागते अथवा लागू शकते ? अशी एखादी जोखीम प्रत्यक्षात आल्यास - म्हणजे जसे की कायदेशीर नोटीस मिळाल्यास अथवा खटल्या दरम्यान न्यायासनासमोर प्रतिवादी म्हणून बोलाविले गेल्यास निरसनाची/बचावाची कायदेशीर प्रक्रीया काय असते ? (जसे की वकीलाची नोटीस मिळाली किंवा न्यायालयाचे समन्स आले तर नंतरची प्रक्रीया काय असते त्यातून कसे निभावून न्यावे. (इथे या धागा चर्चेसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या कायद्या शिवायच्या दबावांचा विचार केलेला नाही. कृपया अनुषंगिक नसलेली अवांतरे टाळावीत )

उपरोक्त स्वरुपाचा प्रश्न अलिकडे विकिपीडियाच्या संदर्भात विचारला गेला, विकिपीडियन्स समोरही उपरोक्त प्रश्न उपस्थित होण्याची अगदीच शक्यता नसते असे नाही पण विकिपीडिया माहितीचा सहसा प्रथम स्रोत नसतो आणि संदर्भासहीत लेखन, उणीव यूक्त लेखन काढण्यातली सुलभता आणि शिवाय ज्ञानकोशीय संकल्पनेचे वलय इत्यादी गुणांमुळे तशी तार्कीक परिस्थीती प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता कमी असते. पण ऐसिसारखी संस्थळे जेथे तौलनिकदृष्ट्या अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहीला आहे तेव्हा येथिल लेखकांसाठी जोखीम असण्याची शक्यता अधिक असणार खासकरून भारतात अभिव्यक्ती स्वांतत्र्य काही (कायदेविषयक) मर्यादांसहीत येते आणि या मर्यादांच्या रेषा बर्‍याचदा अस्पष्टही असतात. सर्व साधारणपणे चर्चा संस्थळे अद्याप फारशी लक्ष्य झालेली नाहीत हे खरे असले तरीही कायद्यांच्या परिपेक्षातून चर्चा झालेली असणे सर्वांनाच उपयूक्त असू शकेल त्यामुळे केवळ ऐसिअक्षरे अथवा मराठी विकिपीडिया डोळ्यासमोर न ठेवता सर्वसाधारण मराठी संस्थळे ब्लॉग इत्यादी नजरे समोर ठेऊन चर्चा करावी, तुमच्या मनात येणार्‍या शंकाही विचाराव्यात, आणि जेथे माहित आहे तेथे शंका निरसनास मदत करावी. असे आवाहन आहे.

चर्चेस सुरवात म्हणून काही प्रश्न, तुम्ही तुम्हाला सुचलेल्या शंका आणि निरसनेही जोडू शकता. सर्व प्रश्नांच्या आधी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारी' असे वाचावे.

१ अ) बदनामी विषयक कायदे आणि कलमे कोणती ?
१ ब) बदनामी विषयक कायद्यांतर्गत दिवाणी कार्यवाही झाल्यास निरसनाची/बचावाची प्रक्रिया काय असू शकेल ?
१ क) बदनामी विषयक कायद्यांतर्गत फौजदारी कार्यवाही झाल्यास निरसनाची/बचावाची प्रक्रिया काय असू शकेल ?

२ अ) ऑब्सिनिटी विषयक कायदे आणि आणि कलमे कोणती ?
२ ब) ऑब्सिनिटी विषयक कायद्यांतर्गत दिवाणी कार्यवाही झाल्यास निरसनाची/बचावाची प्रक्रिया काय असू शकेल ?
२ क) ऑब्सिनिटी विषयक कायद्यांतर्गत फौजदारी कार्यवाही झाल्यास निरसनाची/बचावाची प्रक्रिया काय असू शकेल ?

३ वरील प्रमाणेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा स्पष्ट करणारे इतर कायदे विषयक शक्य कारवाई आणि तिला कसे तोंड द्यावे.

चर्चा केवळ विकिपीडियासाठी नसल्यामुळे मी विकिपानांसाठी या कॅटेगरीत घातलेली नाही तरी सुद्धा क्वचित संदर्भासाठी वापरली जाऊ शकेल म्हणून तुमचे या धागाचर्चेतील प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. चर्चा सहभागा साठी आणि अनुषंगिक नसलेली अवांतरे टाळण्यासाठी आभार.

** संपादकांसाठी या धागालेखाचा अजून बराच विस्तार करणार आहे, म्हणून धागा स्वतंत्र असणे अधिक श्रेयस्कर वाटते.
** उत्तरदायकत्वास नकार लागू: जर तुम्हाला वैद्यकीय, कायदा, आर्थिक किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. मी कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला देत नाही.

कायदे अथवा विधीतत्व मिमांसा विषयक धागा लेख, अथवा प्रतिसाद लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. राज्यघटनेतील आणि विवीध कायद्यातील तरतुदी कायदे मंडळांच्या, न्यायपालिकांच्या निर्णयांनी सातत्याने उत्क्रांत (इव्हॉल्व) होत जातात आणि त्यांचा आवाकाही बराच मोठा आणि माझ्या सारख्या हौशी लिहिणाऱ्या सदस्यांना तेवढी माहिती असेल किंवा तशी लिहिण्याची आम्हाला सवड होईलच असे नाही, त्या शिवाय येथील लेखनात विवीध कारणास्तवर त्रुटीही राहून जाऊ शकतात. म्हणून माझ्या धागालेख धागालेखास आलेले प्रतिसाद अथवा माझे इतर धागा लेखांना प्रतिसादातील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी मी घेत नाही आणि माझ्या धाग्यांवरी प्रतिसाद लेखकांवर ऐसिअक्षरेची धोरणे आणि अनिवार्य कायदेचिषयक ज्याच्या त्याच्या जबाबदार्‍यांपलिकडे उर्वरीत तशी कोणतीही जबाबदारी ठेवत नाही.

field_vote: 
0
No votes yet

** संपादकांसाठी या धागालेखाचा अजून बराच विस्तार करणार आहे, म्हणून धागा स्वतंत्र असणे अधिक श्रेयस्कर वाटते.

हो, हल्ली स्वतंत्र धागा का काढला ह्याचे जस्टीफिकेशन द्यावे लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्यावरची अवांतर चर्चा थांबवून मूळ विषयावर लक्ष केंद्रित करावं अशी विनंती मी सगळ्यांना करतो.

सर्वप्रथम अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर असणारी रास्त बंधनं कुठची हे पाहू.
१. भरलेल्या थिएटरमध्ये कारण नसतानाच 'आग, आग' ओरडण्याच्या अभिव्यक्तीवर बंदी आहे.
२. एखाद्या व्यक्तीची बदनामी करणारी, खोटी विधानं करायला बंदी आहे.
३. समाजाच्या एखाद्या विशिष्ट घटकाविरुद्ध बदनामीकारक विधानं करायला बंदी आहे (हेट स्पीच)
४. एखाद्या समुदायाला हिंसेसाठी उद्युक्त करणारं भाषण करायला बंदी आहे.

एकंदरीत जिथे जिथे व्यक्तीच्या अधिकारापेक्षा तो अधिकार बजावण्याने इतर समाजाला होणारं नुकसान प्रचंड मोठं असतं तिथे तो अधिकार लागू होत नाही. हे कायदे सर्व जगभर असतात.

काही विशिष्ट अभिव्यक्ती मर्यादित असतात - आणि त्याची रेषा वेगवेगळ्या देशांत वेगवेगळी असते.
१. राष्ट्राच्या चिन्हांचा अपमान होऊ शकेल अशी अभिव्यक्ती.
२, लैंगिक अभिव्यक्ती
३. सिगरेट, दारू यांच्या जाहिराती.

इतर अभिव्यक्तींवरची बंदी - या प्रकारच्या बंदी बऱ्यापैकी आर्बिट्ररी असतात.
१. अमुकतमुक केल्याने आमच्या भावना दुखावतात.
२. अमुकतमुक न केल्याने आमच्या भावना सुखावतात. (पर्यूषणकाळातली बीफबंदी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राकुंच्या अभिव्यक्तीवर ऐसी ने जी बंधने घातली आहेत ती वरील पैकी कुठल्या कॅटेगरीत येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३. समाजाच्या एखाद्या विशिष्ट घटकाविरुद्ध बदनामीकारक विधानं करायला बंदी आहे (हेट स्पीच)

संपादकांची बदनामी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तसं बघायला गेलं तर बंधन राकुंवर नसून प्रतिसादकांवर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0