Inception , स्वर्ग आणि अध्यात्म

सुमारे दोन वर्षापूर्वी ख्रिस्तोफर नोलान कृत "Inception" पाहिला होता. पाहून झाल्यावर अनेक दिवस मनात घोळत राहिला . त्यातच पूर्वी भारतीय अध्यात्मावर काही पुस्तके वाचले होती . आणि अलीकडेच युट्यूब वर Spirit Science ची व्हिडिओ सिरीज पाहिली . आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -

१ . "परलोक" अथवा spirit world हे प्रत्यक्षात अस्तीत्वात असावे .

२. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या सात पातळ्या असून त्यांनाच भारतीय अध्यात्मात सप्तलोक अथवा सप्तस्वर्ग म्हणत असावेत .

३. मनुष्याच्या सुप्त मन /अंतर्मना च्या पातळीवर ज्या घडामोडी होतात ,त्यावर प्रत्यक्षात भौतिक जगात मनुष्याचे जीवन प्रभावित होत असते.

४. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे एकावर एक Dream-Levels दाखवल्या आहेत ,त्याचप्रमाणे या अंतर्मनाच्या / सप्तलोकांच्या जाणिवेच्या लेवल्स असाव्यात .

५. सिनेमात अनेक ठिकाणी मनुष्याच्या Self-Defense चा उल्लेख येतो. हा Psychic-Self -Defense मनुष्याची तीव्र इच्छाशक्ती व त्याने केलेली "पुण्य"कर्मे यावर आधारित /संबंधित असावा . म्हणजे असे की पुण्य/सत्कर्मांमुळे व्यक्तीची इच्छाशक्ती स्ट्रॉंग होते व अशा व्यक्ती भौतिक अथवा आध्यात्मिक दृष्ट्या सहजासहजी संकटांना बळी पडत नाहीत .

६. सिनेमात जरी अंतर्मनाच्या सुप्त पातळीपर्यन्त पोहोचण्यासाठी Drugs चा वापर केलेला असला तरी ध्यान /समाधी इत्यादी मार्गानी अंतर्मनाच्या सुप्त पातळीला पोहोचता येवू शकते व बिघडलेल्या गोष्टी ठीक करू शकतो . किंबहुना भौतिक जगातील अनेक समस्यांचे अथवा स्वभावदोषांचे मूळ अंतर्मनातच असल्याने त्यावर उपाय करणे शक्य होते .

७. In other words, We are co-creators of our Reality and Destiny. भारतीय अध्यात्म -तत्त्वज्ञानातील अनेक मूल्ये आणि कर्मसिद्धांत यांना सिद्ध करणारा हा चित्रपट आहे असे माझे मत बनले .

आपणास काय वाटते ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet