मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतो - तस्लिमा नसरीनांचा भारतीय सेक्युलरांना ताजा आहेर

तस्लिमा नसरीन यांची आजच्या टाइम्स ऑफ इंडीयात मुलाखत आली आहे. त्यात तस्लिमा नसरीन यांनी "मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतो" असे म्हटले आहे.

माझा ऐसीवरील अनुभव एकदमच ताजा असल्यामुळे तस्लिमा नसरीनांचे वाक्य मला अधिक भावले यात शंका नाही. लोकांनी विचारांचा एकच शेड बाळगला पाहीजे तो एकतर व्हाईटच असला पाहीजे किंवा ब्लॅकच असला पाहीजे आणि आपल्या शेड पूर्णपणे मध्ये बसत नाही तो विरोधीपक्षातला हि भूमिका भारतात नित्याची आहे आश्चर्यकारक नाही. याला भारतातील ओपन मांडेडनेसचा आणि यु अ‍ॅप्टीट्यूडचा अभाव जबाबदार असावा. या दोन्ही विषयांवर मागे मी केवळ मिसळपाव संकेतस्थळावर इथल्या पेक्षा तेथे त्या विषयांची जास्त जरुर म्हणून धागा लेख तेथे टाकले होते. लेटेस्ट अनुभवानंतर पुरोगांमींच्या ऐश्या राज्यातपण तेवढीच जरुर असावी. स्वतःच्या घरातली आणि आसपसाची मंडळी समजून घेताना आयुष्य जाते इथे मात्र माहितही नसलेल्या माणसांच्या विचारांबद्दल बद्दल शिक्के मारणार्‍या निर्णयांची घाई होते. त्या बद्दल अधिक वेगवेगळ्या धाग्यातून लिहितच राहीन तुर्तास आपापली परितोषिके सरकारांना वापस करत असलेल्या तथाकथित पुरोगामी लेखकांच्या भूमिकेतील दुटप्पीपणा बद्दल तस्लिमा नसरीन काय म्हणतात ते बघु

तस्लिमा नसरीन त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की माझ्या पुस्ताकांवर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली गेली, भारतात माझ्या विरुद्ध पाच फतवे काढले गेले, महीनोंमहीने मला दिल्लीत घरगुती बंदीवासात ठेवले गेले (तेव्हा हि बहुसंख्य लेखक मंडळी नेमकी कुठे होती ?), भारत सोडण्यासाठी बाध्यकेले गेले, माझ्या लेखनावरील टिव्ही सिरीयल बॅन केल्या एवढेच नाहीतर माझ्या काही प्रसिद्ध लेखकांनी चक्क माझ्या पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी केली. मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतात. त्या पुढे म्हणतात बहुतांश (भारतीय) सेक्युलर प्रो-मुस्लीम आणि अँटी-हिंदू वागतात, ते हिंदू फंडॅमेंटलीझमचा निषेधकरतात आणि मुस्लीम फंडॅमेंटलीझमला डिफेंड करतात.

त्या म्हणतात त्यांच्या मतानुसार भारतात वस्तुतः सर्वच धर्मीयांना छळाचा सामना करावा लागू शकतो जसे की पश्चिम बंगालात एक हिंदू खेडे २०१३ मध्ये जाळले गेले त्याच प्रमाणे मुस्लीमांनाही टॉर्चरला सामोरे जाण्याचे प्रसंग येतात नाही असे नाही (पण याची एकतर्फी अवास्तव प्रसिद्धी आणि चर्चा होते) मुस्लीमांवर टॉर्चरचे एवढेच जास्त जर प्रमाण असते तर फाळणीच्या काळानंतर पाकीस्तान अथवा बांग्लादेशातून जसे हिंदू टॉर्चर मुळे बाहेरपडले तसे मुस्लीमही बाहेर पडले असते पण प्रत्यक्षात भारतातील राजकारण सर्वसाधारण पणे मुस्लीमांना फेवर करणारे आहेत, भारतीय राजकारणी मतांसाठी मुस्लीम लांगुल चालनात व्यस्त असतात.

संदर्भःIndian writers guilty of double standards when it comes to dissent: Taslima Nasrin TNN | Oct 17, 2015, 01.00 AM IST टाइम्स ऑफ ईंडीया वृत्त जसे १७ ऑटोबर २०१५ तारखेस भाप्रवे १५ वाजून ३० मिनीटांने वाचले)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

इथे एकच कायदा असावा यासाठी नसरीन यांनी पाठपुरावा केला तरी खूप झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुस्लीम फंडॅमेंटलीझमला डिफेंड करतात.

हे त्यांच्या वैयक्तीक अनुभवापुरते मर्यादित विधान आहे का अजूनही काही उदा. आहेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर..

पण याची एकतर्फी अवास्तव प्रसिद्धी आणि चर्चा होते

पुरूषांच्या हक्कासाठी जे लढत असतात त्यांची फेमिनीझम बद्द्ल हीच तक्रार असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाई म्हणतात त्यात तथ्य आहे. पण त्यांना भारतात ठेचून मारले असते तर कदाचित, नाईलाजाने का होईना, काहीतरी प्रतिक्रिया उमटली असती बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तस्लिमा नसरीन यांची आजच्या टाइम्स ऑफ इंडीयात मुलाखत आली आहे. त्यात तस्लिमा नसरीन यांनी "मतभिन्नता येते तेव्हा भारतीय लेखक दुटप्पी भूमिका बाळगतो" असे म्हटले आहे.

+१

तस्लिमा नसरीन यांच्या हैद्राबादमधील पुस्तक प्रकाशनातील सोहळ्यात दोन वेळा (२००७ व २०१३ मध्ये) एमआयएम च्या आमदार व कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. आज जे लेखक आरडाओरडा करीत आहेत, त्यातल्या फार कमी जणांना त्यावेळी विचारस्वातंत्र्य धोक्यात आले आहे, लेखकांवर हल्ले होत आहेत इ. इ. वाटले होते. माध्यमातून सुद्धा या हल्ल्यांची फारशी चर्चा झाली नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुरुजींशी सहमत. तिला जेव्हा भारतात रहायचे होते तेव्हा मात्र व्हिसा देताना काकूं केली ... तिथे सहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सगळे गुंडाळून ठेवून द्विखंडितो वर बंदी घालण्यात आली. एमायएम च्या लोकांनी तिच्यावर २००७ मधे हल्ला केला तो आपल्या सिव्हिलायझेशनल व्हॅल्युज ना मारक नव्हता वाटतं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.

http://www.dnaindia.com/india/report-muslim-leaders-condemn-attack-on-ta...

http://www.outlookindia.com/news/article/moderate-muslims-condemn-attack...

या निषेधात हिंदू नेते आणि साहित्यिक दिसत नाहीत हे खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शहाबानो प्रकरण वा रश्दींच्या पुस्तकांवर बंदी आणली तेव्हाच कडक निषेध व गदारोळ न करुन सर्वांनीच चूक केली आहे. पण एका वेड्याला वेडा म्हटले नाही म्हणून आता आम्हाला शहाणपणा कळत असूनही वेड्यासारखंच वागणार असं कोणी म्हणत असेल तर त्याला बालिश म्हणावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन या दोन साहित्यिकांबाबत भारत सरकारने बरेचदा बोटचेपी भूमिका घेतलेली आहे. रश्दी लंडनमध्ये राहतात म्हणून जरा कमी त्रास होत असेल एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तस्लीमाबाईंच्या थाटात त्यांना ही हे विचारता येईल की त्यांना हा दुटप्पीपणा एवढ्या वर्षांनी आताच का खुपायला लागला? भारतसरकार आपली तीन तीन ब्लॉगर्सची हत्या जिथे झालीय त्या मायदेशात पाठवणी करु शकते याची जाणिव असल्यामुळे का? आणि अर्थातच तेव्हाही लेखक समुदाय काही करु शकणार नाही हे माहित असल्याने का?
एका सामान्य माणसाची केवळ संशयाने (ते ही धार्मिक. रेपचा संशय,कोणा व्यक्तीच्या खूनाचा संशय वैगेरे कळू शकतं, समर्थनीय नसलं तरी.) हत्या होणे आणि त्या बद्द्ल सरकारच्या आ॑तील वर्तुळातील मंडळींनी या झुंडशाहीला वाचाळ पाठिंबा देणे यात कोणालाच काही चुकीचं वाटत नाही याचा खेद वाटतो. याची बरोबरी दंगलींशी कशी होउ शकते?
गेल्या दोनचार वर्षात वाढत्या प्रसार माध्यमांमुळे सगळ्यालाच विशेषतः माध्यमांच्या आवडीच्या विषयांना अवास्तव प्रसिद्धी मिळायला लागलीय. शीखांचं शीरकाण किंवा तस्लीमांचं भारतात आश्रय घेणं या घटना एवढ्या पसरल्या होत्या का?

तो एकतर व्हाईटच असला पाहीजे किंवा ब्लॅकच असला पाहीजे आणि आपल्या शेड पूर्णपणे मध्ये बसत नाही तो विरोधीपक्षातला हि भूमिका भारतात नित्याची आहे आश्चर्यकारक नाही.

यात तुम्हीही बसता असं वाटतं कारण तस्लिमांचा विषय लिहीताना निम्मा लेख स्वतःवर खर्च केलाय. लागण्याइतक्या तेवढ्या तीव्र प्रतिक्रिया तुमच्या लिखाणाच्या विषयावर आलेल्या दिसत तर नाहीत. आल्यात त्या लिखाणपद्धतीवर आल्यात पण त्याही तुम्हाला सोसवल्या नाहीत असं दिसतय. हां नंतर विषय विनाकारण वाढवला गेल्याने तीव्र प्रतिक्रिया आल्यात. पण विषय भरकटवण्यात तुम्हीही सहभागी होता. मनीषा यांची अत्यंत नेमकी प्रतिक्रिया आहे त्याला उत्तर नाही.
खरे दु:ख कायदा झुंडीने हातात घेण्याचे आहे. धर्म आणि धार्मिक भावनांवर स्वार झालेली झुंडशाही माण्साच्या जीवापेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठ्या होउ नये येवढ्ंच काहींना वाटतं हे स्युडो-धार्मिक लोकं लक्षात का घेत नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्दाशब्दाशी सहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

यात तुम्हीही बसता असं वाटतं

टिका मनमोकळेपणाने स्विकारण्यावर माझा विश्वास आहे. ते मी पुन्हा एकदा निश्चित तपासून पाहीन.

मनीषा यांची अत्यंत नेमकी प्रतिक्रिया आहे त्याला उत्तर नाही.

या मनीषा कोण -म्हणजे युजर नेम- काय आहेत, मला युजरनेम्सची व्यक्तीगत नावे माहित नाहीत आणि मनिषा नावाने प्रतिसाद आढळला नाही.

मेघना यांनी तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सांगा म्हणजे प्रतिवाद करता येईल असा प्रतिसाद दिला होता, यात त्यांचा रोख मी काहीही उत्तर लिहिले तरीही त्या प्रतिवाद करणारच असा होता --(म्हणजे मी मेघना खुप चांगल्या आहेत असे लिहिले असते तरीही त्यांनी प्रतिवाद केला असता का माहीत नाही Smile ) -- आणि तरीही मी मेघना यांना उत्तर दिले. माझ्या धागा लेखातून मी उपस्थित केलेल्या प्रश्नांचीही उत्तरे अद्याप आलेली नाहीत.

खरे दु:ख कायदा झुंडीने हातात घेण्याचे आहे. धर्म आणि धार्मिक भावनांवर स्वार झालेली झुंडशाही माण्साच्या जीवापेक्षा आणि कायद्यापेक्षा मोठ्या होउ नये येवढ्ंच काहींना वाटतं हे स्युडो-धार्मिक लोकं लक्षात का घेत नाहीत?

प्रथमतः स्युडो-धार्मिक हा टोला माझ्यासाठी नसावा हे धरुन चालतो, स्युडो-धार्मिकांवर आणि झुंडशाहीवर मीही वेळोवेळी सुस्पष्ट टिका आणि आणि अशा फोरमवर जिथे स्युडो-धार्मिक बहुतांशाने आहेत तिथे जाऊन केली आहे, पण तेही करताना पुर्ण निष्पक्षता बाळगण्याचा प्रयत्न केला आहे. स्युडो-धार्मिक मग कोणत्याही धर्माचे असोत ते उघड उघड पक्षपाती असतात त्यांच्या पक्षपातामुळे त्यांच्या स्वतःच्या ध्येयाला धोका पोहोचण्याची सुतराम शक्यता नसते.

सेल्युलरांचा पक्षपात त्यांच्या आपल्याच सेक्युलॅरीझमच्या ध्येयाचा बळी घेतो धर्मिस्टांना निष्पक्षता दाखवून द्यावी लागत नाही. सेक्युलर लोकांना सर्वबाजूच्या लोकांना आपली निष्पक्षता सातत्याने दाखवून द्यावी लागणे सहाजिक असते नाहीतर दुटप्पीपणाचे आरोप स्विकारले जाऊन सर्वसामान्य लोक या पेक्षा (स्युडो)धर्मिस्ट परवडले असे म्हणू शकतात. त्यामुळे खरा प्युअर सेक्युलॅरीझम -मग तो सर्वधर्म समभाव असो अथवा पूर्ण निधर्मीता असो- अस्तीत्वात यावयाचा असेल तर आपले वर्तन पक्षपाती राहीलेले नाहीना त्यात उणीवा राहीलेल्या नाहीत ना आणि उणीवा असतील तर त्यांच्या आत्मपरी़क्षणाची आणि समंजसपणे उणीवा दूर करण्याची सेक्युलरांची जबाबदारी अधिक बनते किंवा कसे.

स्वातंत्र्य हे खरेच जन्मसिद्ध असते का ? स्वातंत्र्य हे बहुधा संस्कृतीसिद्ध असावे (इति नरहर कुरुंदकर). व्यक्तीस्वातंत्र्य हे समकालीन संस्कृतीच्या पुढे किती धावू शकेल याला मर्यादा असते. (पुरोगामींच्या ऐशा सुरक्षीत मनोराज्यात रमलेले राहणे आणि दूर नको स्वतःच्या घरात आणि शेजारी मतपरिवर्तन होईल हे पहाणे यात किती अंतर आहे ते अनुभव प्रत्येक पुरोगामी व्यक्ती घेतच असणार फक्त आठवण रहाणे कठीण समविचारींसोबत आल्यावर आपल्या घराचा आणि शेजारचा विसर पडत असण्याची शक्यता आहे का ?) व्यक्तीस्वातंत्र्याची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न करण्यास काहीच हरकत नसावी, पण तुमचे ज्या प्रयत्नांनी समकालीन संस्कृतीच्या परिघात हस्तक्षेप होणार आहे ती एका मोठ्या समुहाची संस्कृती असून सुद्धा तुम्ही त्या संस्कृतीचे अस्तीत्वच नाकारता अथवा तसे अस्तीत्व नाकारण्यासाठी कायदा हातात घेण्याची भलावण करता आहात का ? असे प्रयत्न तुम्हाला अभिप्रेत स्वातंत्र्याच्या छटेची उपलब्धता कदाचित करुन देऊ शकतील पण समकालीन संस्कृतीशी विपर्यस्त प्रयत्न संघर्षास कारणीभूत होऊ शकतात हे बहुधा वास्तव असावे. खासकरुन तुमच्या प्रयत्नात निष्पक्षता सिद्ध होत नसेलतर अशा प्रयत्नांसमोर केवळ प्रतिपक्षाकडूनच नव्हे तर समविचारींकडून सुद्धा प्रश्नचिन्हे उपस्थीत केली जाऊ शकतात नव्हे समविचारींनी प्रश्नचिन्हे उपस्थित करणे खरेतर साहाय्यकारी असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

स्वातंत्र्य हे खरेच जन्मसिद्ध असते का ? स्वातंत्र्य हे बहुधा संस्कृतीसिद्ध असावे (इति नरहर कुरुंदकर).

वा वा वा. तुम्हाला वाईन ची बॉटल माझ्यातर्फे. शॉल्लेट. मार्मिक प्रश्न.

स्वातंत्र्य हा इतका कन्फ्युज्ड विषय आहे की पूछो मत. अधिकार व स्वातंत्र्य यात गल्लत सर्रास चालू असते. (ही चूक/गल्लत मी माझ्या वरच्या प्रतिसादात केलेली आहे).

स्वातंत्र्य व अधिकार हे मुख्यत्वे एन्फोर्समेंट मेकॅनिझम च्या क्रेडिबिलीटी वर अवलंबून असतात असा माझा दावा आहे.

( तुम्ही कुरुंदकरांचे अभयारण्य नावाचे पुस्तक वाचलेय का ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे ज्या प्रयत्नांनी समकालीन संस्कृतीच्या परिघात हस्तक्षेप होणार आहे ती एका मोठ्या समुहाची संस्कृती असून सुद्धा तुम्ही त्या संस्कृतीचे अस्तीत्वच नाकारता अथवा तसे अस्तीत्व नाकारण्यासाठी कायदा हातात घेण्याची भलावण करता आहात का ?

कोणती संस्कृती? दर काही पिढ्यांनी ती बदलत असते. गायीचं मांस खाल्लं जात होतं असाही काळ संस्कृतीत होताच. आणि तुमची संस्कृती तुमच्या शेजारयाच्या संस्कृतीला छेद देणारी असेल तर आपापली संस्कृती आपापल्या घरात पाळावी एवढंच. जी संस्कृती प्रतिकांसाठी एखाद्याचा जीव घेत असेल तर तिची जागा कोणती?
कायदा हातात घेण्याची भलावण मी कुठे केली? एखाद्याने बीफ हा शब्दही उच्चारु नये किंवा त्याची पाककृती लिहू/वाचू नये असा कायदा आहे का? उलट कायदा हातात घेउन एखाद्याला मारणे हे बरोबर नाही हे मी म्हणत आहे.
गायीला मारताना विरोध करणं आणि एखाद्याच्या घरात गाईचं मांस आहे म्हणून त्याला जमावाने मारणं हे दोन्ही फार वेगळं आहे. दुसरं फार गंभीर आहे. एखादा मरतो याच्या दु:ख्खापेक्षा झुंडशाहीच्या हातात एक नवीन हत्यार येउ बघतय याचं दु:ख्ख जास्त आहे.
एखाद्या घटनेने भावना दुखावण्याचं व्यक्तीस्वातंत्र्य आहे पण ते व्यक्तीगत. त्या दुखावलेल्या भावना दुसर्या व्यक्तीचं जगण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेत असतील तर त्यांच्या दुखण्याचं समर्थन नाही होउ शकत.
यात मुस्लीमांची बाजू घेण्याचा प्रश्नच नाही.
(१)मी स्वतः बीफ खात नाही कदाचित खाउ शकणार नाही पण कोणी खात असेल अगदी माझ्या समोरही तर मला वाईट वाटत नाही; मग मी हिंदू नाही
(२) मी एखाध्या धार्मिक गोष्टीवर अमुक तमुक प्रकाराने रिअ‍ॅक्ट होत नाही; मग मी हिंदू नाही
(३) मी अमुक देव तमुक धर्मस्थळ यांना मानत नाही तर; मी हिंदू नाही
(४) मी अमुक प्रकारे वेशभुषा करत नाही; मग मी हिंदू नाही.
(५) मी वर्णभेद मानत नाही; मग मी हिंदू नाही
इत्यादी प्रकाराने मला माझ्या धर्मापासून दूर केलं जात असेल तर त्याला माझा विरोध आहे. ४ आणि ५ कलमं कुठुन आली असं विचाराल तर या वेगाने ती कलमं येण्याचा दिवसही कधीतरी माझ्या ना माझ्या पुढच्या पीढीच्या आयुष्यात उगवणे दूर नाही.
हिंदू हा एकमेव धर्म जीवनपद्धतीतून घडत आलेला धर्म आहे. आणि जीवनपद्धती बदलतात असा तो बदलण्याएवढा लवचिक आहे याचा मला अभिमान आहे. त्याला कोणी धार्मिक भावनांच्या दावणीला बांधत असेल तर त्याला माझा विरोध आहे.तुमच्या लिखाणातून जो अर्थ मला कळला त्यावरुन ही प्रतिक्रिया लिहीली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्या लिखाणातून जो अर्थ मला कळला त्यावरुन ही प्रतिक्रिया लिहीली आहे.

पहिली गोष्ट अर्थ काढण्याची शिक्के मारण्याची घाई. मेघनाताईं भुस्कुट्यांचे एक आवडले त्यांनी किमान 'तुम्हाला असे म्हणावयाचे आहे का ? तुमचा प्रतिसाद द्या मग मी प्रतिवाद करते म्हणाल्या" नंतर प्रतिवादासाठी प्रतिवाद केला तरी ठिक पण किमान पक्षी गृहीत धरण्यापेक्षा विचारले हे नक्कीच महत्वाचे.

हिंदू हा एकमेव धर्म जीवनपद्धतीतून घडत आलेला धर्म आहे. आणि जीवनपद्धती बदलतात असा तो बदलण्याएवढा लवचिक आहे याचा मला अभिमान आहे. त्याला कोणी धार्मिक भावनांच्या दावणीला बांधत असेल तर त्याला माझा विरोध आहे

या बाबत आपण समविचारी आहोत, मी आपल्या हिंदूत्वाची व्याख्या करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही तसा उद्देशही नाही. "त्याला माझा विरोध आहे" ही सुद्धा एक व्यक्त झालेली भावना आहे. तुम्ही गोमांस खाल्लेल नाही मी परदेशात असताना मी सहजतेने खाल्लेल आहे, आणि मी तस ते खाताना एका देशात असताना एका (मराठीच) मुस्लीम मित्राने मला मी गोमांस खाऊ नये असा आग्रह धरला, तो म्हणाला की मी शेतकर्‍याच्या घरातून आलो आहे माझ्या गावातल्या घरातल्या गाईवर माझ अतोनात प्रेम आहे मी स्वतः गोमांस खात नाही हिंदू असो वा मुसलमान भारतीय माणूस गोमांस खाऊ लागला की असह्य होत, ओमान हा तसा कट्टर मुस्लीम देश मस्कत मध्ये त्यांचा सरकारी पाहुणा म्हणून गेलो असताना तेथील अरब माझी तशी कोणतीही मागणी नसताना गोमांस नसलेला टेबल वेगळा लावत होता आणि सोबतचा अजून एक मराठी मुस्लिम कलीग माझ्यामुळे नव्हे स्वतःच्या श्रद्धेखातर गोमांसवाल्या टेबलकडे चुकूनही फिरकला नाही. (ज्यांना आक्षेपच घ्यायचा ते कोबंडी असल्यामुळे गोमांस खाल्ल नसेल म्हणू शकतातच) अटल बिहारी आणि अडवाणी माझ्या माहितीनुसार मांसाहार करत (चुभूदेघे) आणि त्याच वेळी एपिजे अब्दुल कलाम शाकाहारी होते. हि भारतात जोपासली जाणारी आजची समकालीन संस्कृती (किमान ग्रामीण क्षेत्रात शिल्लक) असावी हे जाणवते (कोणते दबावगट जिंकतात याचे उत्तर भविष्यात मिळेलच). आणि ऐसिवरील वैचारीक प्रभाव माझ्या प्रमाणेच गाय हा प्राणी वापरात न राहील्यामुळे वैचारीक बदल अनुभवतो आहे आणि ग्रामीण क्षेत्रास त्यांची संस्कृती अजून टिकवून ठेवायची आहे असे असू शकते.

ऐसीवरील महिलाही दारू लवचिक झाल्याची शक्यता काही प्रतिसादांवरून दिसतेच आहे त्याच वेळी जनमताच्यास रेट्यामुळे दारुबंदी लादण्या बद्दल स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य महाराष्ट्रात ग्रामपंचायतींना बहाल झाले आहे. आणि महिलांच्या भावना हाताबाहेर जाऊन कायदा हातात घेऊन प्रसंगी दारु दुकानांवर महीला हल्लेही करतात, दोन्हीकडे महिलाच आहेत ऐसीवरील महिला दोन ऑक्टोबरचीही बंदी उठवावी म्हणते आणि ग्रामीण अथवा झोपडपट्टीतील महिला दारुबद्दलचे व्यक्तीसावंत्र्य नाकारुन त्यांना योग्य वाटणारी सामाजिक संस्कृती लादू शकते, त्यांच्या या संपूर्ण वस्तीवर दारुबंदीची सक्ती लादण्यास काहीच लॉजीक नसते का ? पोलीसांनी दारुभट्टीवर कारवाईकरण्यात हलगर्जीपणा केला अथवा वारंवार वस्तीतील लोक सांगूनही ऐकत नसतील तर त्या कायदा हातात घेतात, याही कायदा हातात घेण्याचे समर्थन होऊ शकते का तर टेक्नीकली होऊ शकत नाही.

व्यक्तीचे जिवन महत्वाच का देशांचे सिमा विवाद महत्वाचे ? अर्थात व्यक्ती जिवनास अधिक महत्व असावे हा आदर्शवाद झाला तर राष्ट्रवादाचे अस्तीत्व हे वास्तव असते, सामाजिक आणि वैचारीक विश्वास आणि श्रद्धांवर अवलंबून भावना अनावर होणे हा मनुष्य स्वभाव आहे जसे देश एक मोठा समुह असतो तसेच गाव हाही एक छोटा समुह असतो, ज्यावर उर्वरीत राज्याच्या अथवा राष्ट्राच्या श्रद्धा लादलेल्या असू शकतात त्यांच्या नैसर्गीक सामुहीक श्रद्धा तुम्हाला आम्हाला उर्वरीत देशवासीयांना हव्या त्यापेक्षा वेगळ्या असू शकतात,

इथे सुशिक्षीतांच्या मध्ये ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आदर असणे अभिप्रेत आहे त्यांना मी दोन छायाचित्रे टाकली इतरांच्या मतांवर प्रश्न चिन्ह उभेकेले तर तथाकथीत सुशिक्षीतांच्या भावना आहत होतात, मी, ऋषिकेश आणि आणखी दोनचार प्युअर अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी माणसे ऐसीवर निघतील ज्यांना शेजारून एखादा पुरुष अथवा स्त्री नग्न चालत गेल्यास देणे घेणे नसावे, एखाद्या गावातील एखाद्या मंदीरात त्या गावातील स्त्रीया त्यांच्या श्रद्धेखातर नग्न जाऊन पुजा करु इच्छितात त्यात बाकी देशास काय देणे घेणे असावे ? तिथे त्या स्त्रीयांना व्यक्ती स्वातंत्र्य नको काय पण उर्वरीत देशातील पुरोगामी जाऊन त्यांची जी काही परंपरा असेल त्यात व्यत्यय आणतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशी लेव्हल अगदी ऐसिवरील किती उर्वरीत तथाकथीत व्यक्तीस्वातंत्र्यवादी झेलू शकतील ? अजून एक प्रश्न त्यांच्या रोजच्या जगण्यात त्यांच्या घरात ऑफिस मध्ये कुठेच त्यांनी घरातल्यांखातर शेजार्‍यांखातर ऑफीसमधील नियमांखातर व्यक्ती स्वातंत्र्याशी तडजोड केलेली नसते, स्पष्टच विचारावयाचे झाले तर इथले किती व्यक्ती स्वातंत्र्यवादी उर्वरीत घरादाराची ऑफीसच्या नियमांची पर्वा न करता नग्न फिरुन आले आहेत ? फार दुर नाही अगदी दक्षिण आशियातल्याच एका छोट्या भारताच्या शेजारी देशात आजही पुरुष लिंगाचे प्रतिक शुभशकुन समजून घरात, सार्वजनिक ठिकाणी लावले जातेच स्त्रीयांना आशिर्वादही त्याच लिंग प्रतिकृतीने दिला जातो म्हणे (चुभूदेघे, तो देश कोणता ते आंतरजालावरुन शोधून घ्यावे) हे वाचूनही ऐसिवरील अभिव्यक्ती सातंत्र्यवादी काही स्त्रीयांचे धाबे दणाणू शकते एकुण सांगण्याचा उद्देश समाज विश्वास बदलते असतात. एका समुहास योग्य वाटणारी गोष्ट दुसर्‍या समुहास भावना अनावर होण्या एवढी अयोग्य वाटत असु शक्ते

हे भारतातले झाले लिबरल समजल्या जाणार्‍या आमेरीकेत अगदी विमानात बाळाला दुधपाजणार्‍या स्त्रीची स्तनाग्रे चुकून दिसली की आम्ही दुखावलो म्हणून तक्रार करतात हेही व्यक्तीगत स्वातंत्र्यात सामाजिक हस्तक्षेपाचे उदाहरण नाही का ? सर्वच आमेरीकेतील श्रद्धाही एकसारख्या नाहीत कालपरत्वे बदलतात, लोकांना गुलाम म्हणून वापरावे की नाही यावरून मोठी यादवी युद्धेही होतात.

ज्यां ग्रामीण व्यक्ती आणि समुहांकरता अगदी रस्त्यावरची गाय हीसुद्धा माते समान असेल (आणि ह्याचे आजच्या शहरी समाजास विस्मरण होऊ लागले असावे) तेव्हा एखाद्या देशासाठी व्यक्तीपेक्षा देशाच्या प्रतिष्ठेला महत्व दिले जाते तसे एखाद्या गावच्या बाबतीत गाईविरुद्ध त्यांच्या आई विरुद्धीची हिंसा आणि व्यक्ती विरुद्धची हिंसा यात त्यांना गाई विरुद्धची हिंसा अधिक चुकीची असून प्राणी हिंसा न करणारी गावाची प्रतिष्ठा अधिक मोठी वाटत असू शकते असे होणे तुम्हाला आणि आम्हाला आवडले नाही तरीही हे वास्तव असू शकते. इथे उद्देश माणसाच्या विरुद्धच्या हिसेंच्या समर्थनाचा नाही. जशा इथल्या एका अर्धवट व्यक्तीस्वातंत्र्याने प्रभावित झालेल्या भावना असोत, डुक्कराच्या मांसावरून एखाद्या मुस्लीम व्यक्तीच्या भावना असोत की एका गोमाता सश्रद्ध ग्रामीणाच्या भावना असोत त्यांचा कुठे विरोधही करावयाच्या आधी त्यांना समजून घ्यायचे की त्यांनी हातात काठी घेतली म्हणून आपणही हातात लाठी म्हणजे डुक्कर अथवा गोमांस छायाचित्रे दाखवून त्यांना खिजवण्यावर भर द्यायचा ठिक आहे माझ्यासहीत ऐसिवरील बहुतेक जण उदारमतवादी आहेत पण अ‍ॅटीट्यूड महत्वाचा असतो की नाही ? तुमच्या जशा भावना अनावर होऊ शकतात तशा इतरांच्याही भावना अनावर होऊ शकतात, जी गोष्ट -दोन्ही बाजूंनी- प्रबोधनाने साधावयाची की एकमेकांना खिजवून साधावयाची.

हा प्रतिसाद आवरता घेताना आपण अब्राहमची यहुदी सांगतात ती एक गोष्ट वाचली आहे का ? की ज्यात अब्राहम व्यक्तीश्रद्धा दुखावणारे मुर्ती भंजनकरतो अब्राहमला समुह असह्य यातना देऊन मारतो; आता यात अब्राहमला असह्य यातना देऊन मारले गेले हे चुकच पण मुर्तीपुजेचे विरोधक अब्राहमीक तेवढ्याच भागाचे वर्णन करतील, मुर्तींबद्दल श्रद्धा असणार्‍यांचे स्वत:चे काही व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या हननाबद्दल तेवढाच दोष अब्राहमकदेही जावयास हवा की नाही पण ज्याला जास्त यातना दिल्या जातात त्याला अधिक सहानुभूती मिळते, अशा संघर्षात चुक खरेतर दोन्ही बाजूंची असते आणि चुक दोन्ही बाजूंची आहे हे निश्पक्षपणे ठणकावून म्हणण्यास अधिक धारीष्ट्य लागते. भावना समजून घेणारी पण भावनेच्या आहारी न जाणारी तर्क बुद्धीही लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कुणाच्याही श्रद्धेनुसार कुणीही मातेफितेसमान असलं नि मूर्तीबद्दल कि-ती-ही तीव्र भावना असल्या, तरी त्यांच्याहून माणसाच्या जिवाची किंमत जास्त आहे हे सत्य बदलत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कुणाच्याही श्रद्धेनुसार कुणीही मातेफितेसमान असलं नि मूर्तीबद्दल कि-ती-ही तीव्र भावना असल्या, तरी त्यांच्याहून माणसाच्या जिवाची किंमत जास्त आहे हे सत्य बदलत नाही.

हे तुमचे माझे आजचे सामाजिक विश्वास झाले इतरांचे सामाजिक विश्वास वेगळे असू शकतात हे ही वास्तव नसते तर अशा चर्चेचा प्रसंगही उध्बवला असता काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुमचापण आहे का?! मग चर्चा कशाला?

बाकी ज्यांचा हा विश्वास नाही, त्यांच्यासाठी ठामपणे हे सांगत राहिले पाहिजे की तुमच्या श्रद्धा तुमच्या खिशात ठेवा. त्यांसाठी इतरांच्या जिवाशी खेळायचा हक्क तुम्हांला नाही. को ण त्या ही सबबीवर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

त्यांच्यासाठी ठामपणे हे सांगत राहिले पाहिजे की....त्यांसाठी इतरांच्या जिवाशी खेळायचा हक्क तुम्हांला नाही. को ण त्या ही सबबीवर.

या गोष्टीत तुमच्या आणि माझ्यात मतांतर नसावे. माझ्या आणि ऐसिवरील इतरांच्या मतातील मतांतर मी हे प्रबोधनाने साधावे म्हणतो विरुद्धपक्षाला (तो इथे ऐसिवर दिसत नसला तरीही) गाईच्या हिंसेचा प्रतिरोध जर करावयाचाच असेल तर प्रबोधनाने करा असे म्हणतो. माझा भर प्रबोधनाच्या महत्वावर आहे. माझ्या शिवाय उर्वरीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादींंचा
भर प्रतिपक्षास उचकवणारी कृती आम्ही कशी करुन दाखवतो यावर आहे. म्हणजे प्रतिपक्ष गरम डोक्याचा असेल तर उचकेलच मग या स्ट्रॅटेजीत प्रतिपक्षास का उचकलास म्हणून पुन्हा हाणता येतेच नाही असे नाही प्रतिपक्षास आवश्यकता नसताना उचकवण्याचे हिंसेला हिंसेने उत्तर-प्रत्युत्तर चालू ठेवण्याचे पाप (मग काही वेळा ती हिंसा कायद्याच्या साहाय्याने का साधली जाईना) पाप दोन्ही प्रतिद्वंद्वी पक्षाकडे समसमान जाते एवढेच.

त्यांसाठी इतरांच्या जिवाशी खेळायचा हक्क तुम्हांला नाही.

तुमच्या माझ्या शिवायचे इतर समुह "गाईंच्या जिवाशी खेळायचा हक्क तुम्हांला नाही. को ण त्या ही सबबीवर." हे त्यांच्या कृतीतून तुम्हाला आणि मला पटले नाहीतरीही दाखवून देत आहेत. तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुमच्या खिशात तुमच्यापेक्ष अधिक यशस्वीपणे त्यांच्या कृतीतून ठेवतच आहेत.

वर म्हटल्या प्रमाणे दोन्ही बाजूंनी गोष्टी परस्पर द्वंद्वाने साधावयाच्या का प्रबोधनाने सोडवावयाच्या हा प्रश्न शिल्लक उरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्ही म्हणता आहात ते प्रबोधन बीफच्या पाककृती न लिहिण्यातून साध्य होत असेल, तर ते मला ठार निरुपयोगी आणि वर भडकाऊही वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जर रेसीपी लिहीणं हे प्रबोधन नसून उचकावणारी कृती आहे तर तुमच्या लेखी निषेधार्ह असलेलं हे हत्यार तुम्ही का वापरलत? का नाही लिहीणार्ञांचं प्रबोधन केलत?

दोन्ही बाजूंनी गोष्टी परस्पर द्वंद्वाने साधावयाच्या का प्रबोधनाने सोडवावयाच्या हा प्रश्न शिल्लक उरतो.

तुम्हाला चर्चा नाही प्रबोधन म्हणायचंय म्हणजे तुम्ही बरोबरह्च आहात फक्त ते समोरच्या बाजूने पटवून घेण्यासाठी तुम्ही त्याची शाळा घेतली पाहीजे नाहीतर द्वंद्व केलं पाहीजेल. चांगलय. आमचा विरोध यालाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मातृभाषेवर होणाऱ्या या अत्याचारांचा मी निषेध करते. वाईट अभिनयाला हॅम म्हणतात तसं भाषेच्या कत्तलीला गोमांस/बीफ म्हणावं अशी एक सूचनावजा विनंती.

उदाहरणार्थ मूळ परिच्छेद -

या गोष्टीत तुमच्या आणि माझ्यात मतांतर नसावे. माझ्या आणि ऐसिवरील इतरांच्या मतातील मतांतर मी हे प्रबोधनाने साधावे म्हणतो विरुद्धपक्षाला (तो इथे ऐसिवर दिसत नसला तरीही) गाईच्या हिंसेचा प्रतिरोध जर करावयाचाच असेल तर प्रबोधनाने करा असे म्हणतो. माझा भर प्रबोधनाच्या महत्वावर आहे. माझ्या शिवाय उर्वरीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादींंचा
भर प्रतिपक्षास उचकवणारी कृती आम्ही कशी करुन दाखवतो यावर आहे. म्हणजे प्रतिपक्ष गरम डोक्याचा असेल तर उचकेलच मग या स्ट्रॅटेजीत प्रतिपक्षास का उचकलास म्हणून पुन्हा हाणता येतेच नाही असे नाही प्रतिपक्षास आवश्यकता नसताना उचकवण्याचे हिंसेला हिंसेने उत्तर-प्रत्युत्तर चालू ठेवण्याचे पाप (मग काही वेळा ती हिंसा कायद्याच्या साहाय्याने का साधली जाईना) पाप दोन्ही प्रतिद्वंद्वी पक्षाकडे समसमान जाते एवढेच.

सुधारित परिच्छेद -

या बाबतीत तुमच्या आणि माझ्यात मतांतर नसावे. माझ्या आणि ऐसीवरील इतरांच्या मतातील मतांतर मी हे प्रबोधनाने साधावे म्हणतो. (पूर्णविराम वाढवला.) विरुद्धपक्षाला (तो इथे ऐसीवर दिसत नसला तरीही) गायीवर होणाऱ्या हिंसेचा विरोध जर करावयाचाच असेल तर प्रबोधनाने करा असे म्हणतो. माझा भर प्रबोधनाच्या महत्वावर आहे. माझ्याशिवाय उर्वरिअभिव्यक्तीस्वातंत्र्यवाद्यांचा भर प्रतिपक्षास उचकवणारी कृती आम्ही कशी करून दाखवतो यावर आहे. म्हणजे प्रतिपक्ष गरम डोक्याचा असेल तर उचकेलच. (पूर्णविराम वाढवला.) मग या स्ट्रॅटेजीत प्रतिपक्षास का उचकलास म्हणून पुन्हा हाणता येतेच; (अल्पविराम वाढवला.) नाही असे नाही. (पूर्णविराम वाढवला.) प्रतिपक्षास आवश्यकता नसताना उचकवण्याचे, (स्वल्पविराम वाढवला.) हिंसेला हिंसेने उत्तर-प्रत्युत्तर चालू ठेवण्याचे पाप (मग काही वेळा ती हिंसा कायद्याच्या साहाय्याने का साधली जाईना) (पाप शब्द दोनदा आला आहे.) दोन्ही प्रतिद्वंद्वी पक्षाकडे समसमान जाते एवढेच.

ही मतं मला पटली आहेत असं अजिबातच नाही. पण मातृभाषेचा होणारा खून आता बघवत नाही. म्हणून थोडा प्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा म्हटलं. तरीही ही वाक्यं मला फार स्वातंत्र्य घेतल्याशिवाय प्रमाण मराठीत लिहिता येणार नाहीत.

रुची राहते त्या देशात गोमांस खाणं कायदेशीर आहे. ऐसीचा सर्व्हर अमेरिकन आहे. तेव्हा कोणी कोणाला कसं उचकवलं, कोणी कायदा मोडला, जो मोडला तो कायदा मुळातच मान्य करता येण्यासारखा आहे (का कलम ३७७ सारखा विरोध करण्यालायक आहे) वगैरे प्रश्न सध्या ऑप्शनलाा टाकले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्पष्टच विचारावयाचे झाले तर इथले किती व्यक्ती स्वातंत्र्यवादी उर्वरीत घरादाराची ऑफीसच्या नियमांची पर्वा न करता नग्न फिरुन आले आहेत ?

मी
हत्ती, उंट बदक वगेरे इथले प्राणी
झालच तर अंदमान निकोबार वरचे कोण कोण
बर्मग ठिवू का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तुमचा मुद्दा काहीसा 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादा' आणि 'लोकभावनेचा आदर' हा आहे.

सेक्युलर राजकारण म्हणजे बहुसंख्यांच्या 'हिताचं' राजकारण.(संदर्भ जागर, पुन्हा एकदा कुरुंदकरच) बहुसंख्यांच्या भावनेचा (लोकभावनेचा) आदर करावा यात शंका नाही. पण 'हिताचं' हा शब्ध खूप महत्वाचा आहे कारण बहुसंख्यांचं हित बहुसंख्यांच्या भावनेशी निगडीत असेलच असे नाही. याचे चांगले उदाहरण मला य. दि. फडक्यांच्या 'समान नागरी कायदा' या पुस्तकात मिळाले. जेव्हा हिंदू कोड बील बनविले जात होते, तेव्हा स्त्रियांच्या (आणि इतरांच्याही) हक्कांचा प्रश्न आला. (लग्नाचे वय, काडीमोड घेण्याचा हक्क इ.) संसदेत त्यावेळीही खडाजंगी झाली. श्यामप्रसाद मुखर्जी यांनी त्याला कडाडून विरोध केला. हा फक्त हिंदूवरच अन्याय आहे. हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध हा कायदा आहे. असे त्यांचे म्हणणे होते. स्त्रियांना बरोबरीचे हक्क देण्याची 'बहुसंख्यांची' मानसिकता तेव्हा आपल्या समाजात होती काय? आज इतिहासात पाठी वळून पाहताना, या गोष्टींच अवलोकन करताना, स्त्रियांच्या हक्कांसाठी संसदेत लढणार्‍या हंसा मेहता, दुर्गाबाई देशमुख, जयश्री रायजी यांचं कौतुकच वाटतं. बहुसंख्यांच्या भावनेचा आदर करत बसलो असतो, तर इथवरचा प्रवास झाला असता काय? बहुसंख्यांच्या भावनेच्या विरोधातले पण बहुसंख्यांच्याच हिताचे असे हे सेक्युलर राजकारण नव्हते काय? पण त्याचबरोबरीने हा आक्षेपही मान्य करण्यास हरकत नाही की, या पुरोगाम्यांनी 'सेक्युलर राजकारण' फक्त हिंदू स्त्रियांच्याच हिताचे केले. नाहीतर पुढे शहाबानो प्रकरण उद्भवलेच नसते. त्यामुळे हिंदू पुरोगामी केवळ हिंदू विरोधी असतात हा आरोप काहीसा मलाही मान्य आहे. पण यामुळे भविष्यात फायदा तर हिंदू स्त्रियांचाच झाला ना? समाजानेही मग हळूहळू स्त्रियांचे अधिकार मान्य केले. (या निमित्ताने इंदर मल्होत्राचा२००९ मधला रिफॉर्म आणि विरोध यातला संबध सांगणारा Of reform and resistance हा एक चांगला लेख सापडला.)

गोहत्या प्रतिबंध कायद्याच्या (आणि अशा अनेक प्रतिबंध कायद्याच्या) निमित्ताने आपण पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत. तशीही 'गाय मारणं' यापूर्वीही कायद्याने गुन्हा होता. आजही आहे (कारण, लोकभावनेचा आदर). मुभा होती ती फक्त कत्तल करण्यास योग्य असं प्रमाणपत्र मिळालेल्या गोवंशाची. तरीही इतक्या वर्षांनी आजकाल हा प्रश्न इतका गंभीर का बनवला जात आहे ते कळायला सोय नाही. हरीयाणा सरकारने हा कायदा इतका कडक बनवला आहे, (आणि इथे विरोधी पक्षानेही -काँग्रेसने- साथ केली आहे) की बीफ असलेलं पॅकेज फुड बाळगणार्‍या परदेशी माणसाच्या अटकेची बातमी दूर नसावी. सरकारच्या एफडीआयच्या यशाचं कौतुक नक्की आहे. पण त्या एफडीआय मार्फत, व्यापारासाठी काही काळ आपल्या देशात वास्तव्य करायला येणार्‍या परदेशी पाहुण्यांच्या खाण्यावर बंधन आणणारा एवढा 'कडक' कायदा बहुसंख्यांच्या खरंच हिताचा आहे काय? या प्रश्नांचं प्रामाणिक उत्तर आपण सर्वांनीच शोधणं गरजेचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा मुद्दा काहीसा 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादा' आणि 'लोकभावनेचा आदर' हा आहे.

आपला पहिला परिच्छेद आवडला बहुतांशी सहमत आहे, भावनेपेक्षा हित मह्त्वाचे याच्याशीही सहमत आहे, माझा विरोध भावना बाजूस ठेऊन हिताची काळजी घेण्यासही नाही. ऐसिवरील विवाद लोकभावनेच अस्तीत्वच नाकारणार्‍या विधानामुळे सुरु झाला,-एखादा समाजगट ऐसिवर अथवा आंतरजालावर प्रतिनिधीत्व करत नसेल म्हणून त्याचे अस्तीत्वच नसते असे नसावे- लोकशाहीत लोकभावना एका मर्यादेच्या बाहेर दाबता येत नाहीत, एका ठिकाणी दाबलेतर वाफ अनपेक्षीत ठिकाणाहून निघण्याचा धोका असू शकतो.

प्राण्यांप्रती अहींसेच्या तत्वज्ञानाची आणि शेती अर्थकारणामुळे गाय-बैल या प्राण्यांचे उदात्तीकरण अधिक झाले असेल पण हि तत्त्वज्ञाने अगदीच तकलादू नाहीत आणि भारतीय भूमीतच सुरु झाली असल्यामुळे काही काळ प्रभाव कमी झाल्यासारखे वाटले तरीही फिरुन फिरुन वापस येण्याची शक्यता बरीच असू शकते. उदाहरणार्थ मुंबईत २१व्या शतकातही आहारावरून घरे नाकारण्याचे प्रकार, योग्य आहेत अथवा नाहीत हा वेगळा मुद्दा पण ज्या भावना परत परत फिरुन येऊ शकतात त्या दोन्ही परस्पर विरोधी गटांनी परस्परांच्या भावना न दुखवता शक्यतो प्रबोधनाचा मार्ग निवडावा हे अधिक श्रेयस्कर असावे. उचकवण्याचेही अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहेच पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जबाबदारीने वापरले तर अधिक चांगले.

सरकारच्या एफडीआयच्या यशाचं कौतुक नक्की आहे. पण त्या एफडीआय मार्फत, व्यापारासाठी काही काळ आपल्या देशात वास्तव्य करायला येणार्‍या परदेशी पाहुण्यांच्या खाण्यावर बंधन आणणारा एवढा 'कडक' कायदा बहुसंख्यांच्या खरंच हिताचा आहे काय? या प्रश्नांचं प्रामाणिक उत्तर आपण सर्वांनीच शोधणं गरजेचं आहे.

आपला हा मुद्दा वस्तुस्थिती आणि तर्कावर कितपत टिकेल या बाबत साशंकता आहे. सौदी अरेबीयात डुक्कर खाऊ देत नाहीत म्हणून सौदी अरेबियाशी बाकीचे देश व्यापारासाठी जात नाहीत अथवा इनव्हेस्टमेंट करत नाहीत असे काही नाही. व्यापार्‍यांना प्रॉफीट्सशी देणे घेणे असते. भारतात सर्वच नॉनव्हेज प्रकारावर बंदी आहे असे नाही, गोमांस हा मांसाहारातला सर्वोत्कृष्ट प्रकार नाही त्याची किंमत कमी असणे परदेशी नागरीकांच्या दृष्टीने इतर मांसाहार प्रकार उपलब्ध असल्या नंतर गैर लागू ठरतो. म्हैस मांसाचा प्रकार जवळपास गोमांसाच्याच दरात पडतो तेव्हा गोमांसच केवळ स्वस्त असते हा मुद्दाही खरेतर कितपत टिकतो या बद्दल तार्कीक दृष्ट्या साशंक आहे.

धार्मीक विश्वास बाजूला ठेवा, गाई-बैलांचे भारतीय शेतीसाठीचे अर्थशास्त्रीय उपयूक्तता मुल्य प्रबोधन करुन सर्वोदयी मार्गाने पटवले आणि ठसवले जाण्यातही गैरनाही. एक एकर शेती ट्रॅक्टरने नांगरण्यासाठी खर्च होणार्‍या पेट्रोलीयमसाठी विदेशी गंगाजळी खर्च करण्या एवजी जेवढे बैलांकरवी झाले तेवढीच परकीय गंगाजळीची पैसा दोन पैसे बचतच होतील याचे खंडन कसे केले जाउ शकेल हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे. (अर्थात मांसाच्या एक्सपोर्ट मधून डॉलर्स मिळवून टृअ‍ॅक्टरसाठीच्या पेट्रोलीयमवर खर्च करावेत हा युक्तीवाद करणे शक्य आहेच; अर्थात पेट्रोलीयम पदार्थ मोनोपोली असलेले म्हणुन महाग आणि कापावयाचे गोमांस जगभरातून कुठूनही मिळू शकते म्हणून त्याचा परतावा कमी असेल.

बैलाच्या मागे शेतात उभा टाकणारा माणूस काढून घेऊन त्याला खाटीक खान्यात रोजगारही मिळतो आणि उन्हात उभे टाकण्याचे कष्टही कमी होतात हाही तर्क एक असाच चांगलाच तर्क आहे ) अंधश्रद्ध लोकांचा विरोध करण्यासाठी मी डिफायन्स दाखवून एक गाय आणि एक बैल प्रत्येकाने मारलाच पाहीजे हे समाज मनावर बिंबवून भारताची परकीय चलनाची गंगाजळी खाली करण्याने देशाचे अथवा पुरोगामीत्वाचे काय भले होणार आहे हे गोमांस स्वतः खाण्यास तयार असूनही अद्यापतरी न समजलेला समजून घेण्यास उत्सुक असलेला माहितगार.

मनमोकळ्या चर्चे बद्दल आभारी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

धार्मीक विश्वास बाजूला ठेवा, गाई-बैलांचे भारतीय शेतीसाठीचे अर्थशास्त्रीय उपयूक्तता मुल्य प्रबोधन करुन सर्वोदयी मार्गाने पटवले आणि ठसवले जाण्यातही गैरनाही. एक एकर शेती ट्रॅक्टरने नांगरण्यासाठी खर्च होणार्‍या पेट्रोलीयमसाठी विदेशी गंगाजळी खर्च करण्या एवजी जेवढे बैलांकरवी झाले तेवढीच परकीय गंगाजळीची पैसा दोन पैसे बचतच होतील याचे खंडन कसे केले जाउ शकेल हे समजून घेण्यास मी उत्सुक आहे. (अर्थात मांसाच्या एक्सपोर्ट मधून डॉलर्स मिळवून टृअ‍ॅक्टरसाठीच्या पेट्रोलीयमवर खर्च करावेत हा युक्तीवाद करणे शक्य आहेच; अर्थात पेट्रोलीयम पदार्थ मोनोपोली असलेले म्हणुन महाग आणि कापावयाचे गोमांस जगभरातून कुठूनही मिळू शकते म्हणून त्याचा परतावा कमी असेल.

बैलाच्या मागे शेतात उभा टाकणारा माणूस काढून घेऊन त्याला खाटीक खान्यात रोजगारही मिळतो आणि उन्हात उभे टाकण्याचे कष्टही कमी होतात हाही तर्क एक असाच चांगलाच तर्क आहे ) अंधश्रद्ध लोकांचा विरोध करण्यासाठी मी डिफायन्स दाखवून एक गाय आणि एक बैल प्रत्येकाने मारलाच पाहीजे हे समाज मनावर बिंबवून भारताची परकीय चलनाची गंगाजळी खाली करण्याने देशाचे अथवा पुरोगामीत्वाचे काय भले होणार आहे हे गोमांस स्वतः खाण्यास तयार असूनही अद्यापतरी न समजलेला समजून घेण्यास उत्सुक असलेला माहितगार.

मला काहीही समजले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते म्हणतायत
(१) ट्रॅक्टरला गॅस लागतो पण बैल वापरल्याने त्या गॅसची बचत होते
(२) आता कोणीतरी म्हणेल ते बचतीचे पैसे गाईचे मांस विकून ऊभे करा
(३) पण त्यावर त्यांचे म्हणणे आहे पेट्रोल जास्त महाग आहे, गोमांस स्वस्त..... म्हणून पेट्रोल्=बैल वाचविणेच बरे
(४) आता तुम्ही म्हणाल बैलामागे जो शेतकरी असतो त्याला खाटीकखान्यात नोकरी द्या की.... हां हा तर्क बरा आहे. पण .... माझे म्हणणे जास्त बरोबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात पेट्रोलीयम पदार्थ मोनोपोली असलेले म्हणुन महाग

पेट्रोल ची मोनोपोली ? पेट्रोल किमान दहा देशातून आयात करता येते किंवा काही माफक माफक प्रमाणावर देशांतर्गत रिफायनर्‍यांतून मिळवता येते. त्यातल्या काही (बहुतेक) सरकारी व उरलेल्या खाजगी आहेत. मोनोपोली कशी काय ? भारतात पेट्रोल महाग आहे त्याचे मुख्य कारण त्याच्यावर भरमसाट टॅक्स लावलेले आहेत असा माझा समज आहे. दुसरे कारण हे की निमसरकारी (IOL, BPCL, HPCL, MRL, ONGC) असल्यामुळे इफिशियन्सी कडे लक्ष द्यायला वेळच नाही कोणाला.

(अर्थात या सगळ्याचा सेक्युलरिझम व तस्लीमा नसरीन शी काहीही संबंध नाही. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी मार्मिक श्रेणी द्यायचं काम केलेलं आहे, बाकी तुम्ही आणि माम पाहून घ्या WinkROFL
___
मार्मिक कारण मला ते स्पष्टीकरण मार्मिकच वाटलं Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तस्लिमा नसरीन यांना ट्विटरवर फॉलो करणार्‍यांना माहित आहेच की त्यांनी आज जी मते व्यक्त केली आहेत, ती त्या प्रथमपासूनच व्यक्त करत आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्यांमागे देशात टिकून राहाणे किंवा अन्य काही छुपे संदर्भ असतील असे वाटत नाही. त्यामुळे, 'हा दुटप्पीपणा एवढ्या वर्षांनी आताच का खुपायला लागला?' हे गैरलागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

खिक्
देशात टिकायला कशी सत्ताधार्जिणी वक्तव्ये करावी लागतात हे बघून मौज वाटली नी कीवही आली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असे ताजे ताजे आहेर येतच राहाणार आहेत. लेखकांच्या 'पेन इन्टरनॅशनल' या जागतिक संघटनेने भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेचा निषेध करणार्‍या भारतीय साहित्यिकांना पाठिंबा जाहीर केला आहे. (१८-१०-२०१५)
हा स्यूडो-धार्मिकांना ताजा आहेर समजावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूपच गमतीशीर आहे सगळं.

>> तस्लिमा नसरीन त्यांच्या मुलाखतीत म्हणतात की माझ्या पुस्ताकांवर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली गेली, भारतात माझ्या विरुद्ध पाच फतवे काढले गेले, महीनोंमहीने मला दिल्लीत घरगुती बंदीवासात ठेवले गेले (तेव्हा हि बहुसंख्य लेखक मंडळी नेमकी कुठे होती ?)

ही २००३ची बातमी पाहा -
Literati rise late to Taslima defence

ही २००४ची बातमी पाहा -
West Bengal Government assailed for banning Taslima's book

The Left Front Government of West Bengal came in for criticism for banning the Bangladeshi author, Taslima Nasreen's autobiographical work, Dwikhandita, by the author herself and a host of authors here today.

दिल्लीतल्या प्रतिष्ठित जागतिक पुस्तक मेळ्यात आपल्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी बाई आल्या होत्या असंही त्यात पुढे म्हटलं आहे -

Though the National Book Trust, organisers of the fair, had denied Vani Prakashan the space to host the "meet-the-author" programme featuring her for "unavoidable reasons," no attempt was made today to prevent her from being the showstopper of the day.

आणि ह्यात तर तथाकथित सिक्युलरांची अख्खी यादीच आहे -

Intellectuals Demand Indian Citizenship To Taslima Nasreen

२००५मध्ये पुस्तकावरची बंदी उठवली गेली आहे. आता जरा दुसरी बाजू पाहूयात. आत्मचरित्राबद्दल प. बंगालमधल्या काही लेखकांच्या मनात अढी होती ती कशामुळे ते ह्यातून स्पष्ट होतं -
A shocker from Taslima

THE controversial Bangladeshi writer Taslima Nasreen, who had in the 1990s angered Islamic fundamentalists with what they considered was blasphemous writings, has caused a fresh furore, this time earning the wrath of progressive writers of both her native land and West Bengal, India, who had supported her freedom of expression.

बातमी पुढे वाचलीत तर लक्षात येईल की बाईंनी आत्मचरित्राच्या नावाखाली काही लेखकांच्या लैंगिक जीवनाचे चमचमीत तपशील दिले होते. त्यामुळे पुस्तकावर अब्रूनुकसानीचे दावे केले गेले. म्हणजे निदान काही लेखकांना पुस्तकाविषयी जे आक्षेप होते त्यांचा नसरीनबाईंच्या इस्लामविरोधातल्या बंडाशी संबंध नव्हता. आणि तरीही,

Sunil Gangopadhayay, the widely read Bengali novelist, said in Kolkata that Dwikhondito "is not literature. It may be good to read if you are interested in scandals about some writers. But it is not literature".

थोडक्यात, हा काही नसरीनबाईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा हल्ला वगैरे खचितच नाही, तर लेखनाच्या दर्जाविषयीची टिप्पणी आहे.

(आता, ज्यांना सुनील गंगोपाध्याय कोण हे माहीत नाहीत आणि गूगलवर शोधायचंही नाही पण शेरेबाजी करायला मात्र जे उत्सुक असतात अशांसाठी एक टीप : त्यांना साहित्य अकादमी आणि सरस्वती सन्मान मिळालेले आहेत. ते आपले पुरस्कार परत करू शकणार नाहीत, कारण ते २०१२मध्येच कालवश झाले. सत्यजित राय ह्यांनी सुनील गंगोपाध्यायांच्या लिखाणावर आधारित दोन चित्रपट केले : 'प्रतिद्वंदी' आणि 'अरण्येर दिन रात्री'. माझ्या मते हे राय ह्यांचे काहीसे दुर्लक्षित, अपू त्रिधारेपुढे झाकोळलेले पण अत्यंत महत्त्वाचे चित्रपट आहेत.)

ह्याउलट, नसरीनबाई मात्र ह्याच सुनील गंगोपाध्यायांविषयी टाइम्समधल्या मुलाखतीत आरोप करतात. दुर्दैवानं त्या आरोपांचं खंडन करायला गंगोपाध्याय आता हयात नाहीत, पण ह्या बाबतीत त्यांची मतं त्यांनी वेळोवेळी स्पष्टपणे मांडली होती.

आणि आता अखेरची बातमी (२०१४)
Support pours in for Taslima Nasreen after Modi govt cancels resident permit

Nasreen has had a rather unfortunate stint with state governments and the Centre for a while. After she had to leave Kolkata in 2007, following a violent bout of protests over his work Dwikhandito, she had found support in Bengal's primary opposition back then, Mamata Banerjee. However, after Banerjee came to power in 2011, her government didn't do much to reinstate Nasreen in Kolkata.

In fact, during a chapter of a the Kolkata Book Fair in 2012, a Muslim body took to raucous protests to prevent a book penned by Nasreen from being launched in the fair. Intellectuals severely criticised the government's inaction and later the book was released after the protest blew over.

थोडक्यात काय, तर ममताबाईंनी नसरीनबाईंचा पद्धतशीर राजकीय वापर कदाचित करून घेतला असावा, पण लेखकांनी आणि इतर बुद्धिवादी वर्गानं मात्र नसरीनबाईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला पाठिंबा दिला आहे. आता कदाचित नसरीनबाईंच्या खांद्यावर बंदूक ठेवून इतर कुणी तरी त्यांचा राजकीय वापर करून घेत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, पण म्हणून त्यांचे लेखकांविषयीचे आक्षेप आणि आरोप लगेच ग्राह्य धरावेत अशी काही परिस्थिती नाही.

असो. काय बोलायचं हा अखेर नसरीनबाईंचा प्रश्न आहे. तो जरा बाजूला ठेवूयात. वास्तवाला जे विविध कंगोरे असतात ते विचारात घेऊन मत मांडावं अशी अपेक्षा विकीपिडियालेखकांकरून करावी का करू नये, हा प्रश्नदेखील ह्या निमित्तानं उपस्थित होतो. कारण तसं होत नसेल, तर अशा लेखकांमुळे विकीपीडियाची निष्पक्षता आणि त्यामुळे विश्वासार्हताच धोक्यात येऊ शकते.

तरीही, इथले वाचक सुज्ञ आहेत ही जमेची बाजू आहेच; त्यामुळे कुणाच्या कोणत्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं ते ठरवायला ते समर्थ आहेत. बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

...उडविल्या राईराईएव्हढ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी अपेक्षा विकीपिडियालेखकांकरून करावी का करू नये

मी इथे दुटप्पीपणा बद्दल विषय टाइम्सचा व्यवस्थीत संदर्भ देऊन केला आहे आणि त्याचे खंडन तुम्हीही संदर्भ देऊन केले आहे. माध्यमांचा प्रभावच असा असतो सर्व कंगोरे माहित होई पर्यंत पुलाखालून बरेच पाणी जाऊ शकते. तुमच्या सर्व खंडनांसहीतही सेक्युलरांच्या दुटप्पीपणा बद्दलची साशंकता एवढ्यात संपण्यासारखी खरेच खात्री आहे का ? अशी प्रगती झाली असेल तर तुमच्या तोंडात खरेच घि शक्कर Smile बाकी नसरीनांच्या मतांबद्दल नसरीनच उत्तर देऊ शकतील खरे म्हणजे टाइम्स मध्ये आपण या विषयावर लेखन करण्यास मुळीच हरकत नाही, मी म्हणे तसे करावेच कदाचित नसरीनांना त्यांची अजूनही काही बाजू मांडायची असेल तर त्याही तसे करु शकतील.

माझ्या व्यक्तीगत मते नसरीनांचे व्यक्तीगत कारण काही का असेना त्यांनी स्वतःच्या समाजावर सुद्धा निष्पक्षपणे मोकळेपणाने टिका केली आहे. बांग्लादेशात अथवा पाकीस्तानात हिंदूंना जी वागणूक मिळते ती लक्षात घेतली तर तौलनिक दृष्ट्या पेक्षा भारतातील मुस्लिमांना भारतीय राजकारणी काही कारणाने का असेना सांभाळून घेतात हे त्यांनी मोकळेपणाने स्विकारण्याचे धाडस दाखवले आहे. नसरीनांचा दुसरा फायदा असा कि स्वतःच्या समाजाचे विश्लेषण करणारे मुस्लिम नसतातच ह्या सर्वसाधारणीकरण झालेल्या मुस्लिम विषयक प्रतिमेस त्यांचे लेखन आणि मुलाखती तडा देण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनही नसरीनांची दखल घेणे योग्य ठरावे

सर्व कंगोरेच लक्षात घेण्यात कमी पडलो असेन तर माझ्यावर अगदी व्यक्तीशः कठोर टिकेचेही मी स्वागत करतो. इथे मी व्यक्तीगत मतांच मांडणी करत असताना विकिपीडियाचा काय संबंध विनोदी नाही का ? (मी नसरीनांची भूमिका विकिपीडियावरही मांडलेली नाही, जी काही बातमी वाचली ती येथे चर्चेला टाकली ऐसिवरील चर्चा मंथनातून जे काही अमृत वीष निघेल ते स्विकारण्यास काही हरकत आहे का?) विकिपीडिया आणि ऐसि हे दोन्ही प्लॅटफॉर्म वेगळे आहेत. विकिपीडिया काय माझ्या घरच्या मालकीचा आहे ?, विकिपीडीयाची माझ्यावर मालकी आहे, की विकिपीडियावर संदर्भासहीत वेगवेगळे कंगोरे मांडण्यापासून मि कुणाचा हात धरला आहे ? (मी विकिपीडिया बाहेर सुद्धा निष्पक्षता बाळगण्याचा प्रयत्न करतो नसतील काही संदर्भ माहिती म्हणूनच चर्चा पानांचे इतरांना म्हणणे मांडण्याची या व्यासपिठांवर व्यवस्था आहे ना !)

मी दुसर्‍या धाग्यांवरही या विकिपीडियाच नाव काढण्याबद्दल काहीच प्रतिक्रीया नोंदवली नाही. त्या कविता लिहिणार्‍या पिडांनी माझी मिपावरची स्त्रीवादी आणि सेक्युलर लेखनाची वाचने का केलेली नाहीत ? शीर्षक (अपवादी) स्त्रीवाद्याची वेडसर वळने अथवा (अपवादी) सेक्युलराची वेडसर वळने असे काही का दिले नाही ? किंवा मी इतर कुणा अबकड पाणपोई लावणार्‍या संस्थेचा प्रचार करत असतो आणि तरीही माझ्या व्यक्तीगत मतांबद्दल अबकड संस्थेची वेडसर वळणे असे शीर्षक मारणार ? ऐसिवर मी विकिपीडियाबद्दल प्रचारही करतो पण म्हणुन मी तेवढ्यापुरते मला बांधून घेतले असे जाहीर कुठे केले होते का ? ऐसीकरांचे हे काहीही हं ... Smile !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>> माझा ऐसीवरील अनुभव एकदमच ताजा असल्यामुळे तस्लिमा नसरीनांचे वाक्य मला अधिक भावले यात शंका नाही. लोकांनी विचारांचा एकच शेड बाळगला पाहीजे तो एकतर व्हाईटच असला पाहीजे किंवा ब्लॅकच असला पाहीजे आणि आपल्या शेड पूर्णपणे मध्ये बसत नाही तो विरोधीपक्षातला हि भूमिका भारतात नित्याची आहे आश्चर्यकारक नाही. याला भारतातील ओपन मांडेडनेसचा आणि यु अ‍ॅप्टीट्यूडचा अभाव जबाबदार असावा. या दोन्ही विषयांवर मागे मी केवळ मिसळपाव संकेतस्थळावर इथल्या पेक्षा तेथे त्या विषयांची जास्त जरुर म्हणून धागा लेख तेथे टाकले होते. लेटेस्ट अनुभवानंतर पुरोगांमींच्या ऐश्या राज्यातपण तेवढीच जरुर असावी. स्वतःच्या घरातली आणि आसपसाची मंडळी समजून घेताना आयुष्य जाते इथे मात्र माहितही नसलेल्या माणसांच्या विचारांबद्दल बद्दल शिक्के मारणार्‍या निर्णयांची घाई होते.

>> विकिपीडिया आणि ऐसि हे दोन्ही प्लॅटफॉर्म वेगळे आहेत. विकिपीडिया काय माझ्या घरच्या मालकीचा आहे ?, विकिपीडीयाची माझ्यावर मालकी आहे, की विकिपीडियावर संदर्भासहीत वेगवेगळे कंगोरे मांडण्यापासून मि कुणाचा हात धरला आहे ?

>> ऐसिवर मी विकिपीडियाबद्दल प्रचारही करतो पण म्हणुन मी तेवढ्यापुरते मला बांधून घेतले असे जाहीर कुठे केले होते का ? ऐसीकरांचे हे काहीही हं ... (स्माईल) !!!

तुम्ही तर चक्क ऐसीवरच्या तुमच्या अनुभवाशी नसरीनबाईंचे वक्तव्य लावून पाहिलेत, किंवा तुम्हाला मिळालेल्या कथित वर्तणुकीवरून परस्पर समस्त भारतीयांमधल्या ओपन माईन्डेडनेस आणि आणखी कसल्या तरी गोष्टीवर घसरलात. मी केवळ एवढंच म्हणतो आहे की एखाद्या गोष्टीच्या सत्यासत्यतेला पडताळून पाहणं आणि त्यासाठी काही पुरावे शोधणं हे तर तुमच्यासारख्या विकीपीडियालेखकाच्या दैनंदिन रियाजाचा भाग असायला हवा. त्याचा इतका त्रास का होतो आहे बरं? की ह्या त्रासामागे काही आणखी कंगोरे असतील? असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विकीपीडियालेखकाच्या दैनंदिन रियाजाचा भाग असायला हवा. त्याचा इतका त्रास का होतो आहे बरं? की ह्या त्रासामागे काही आणखी कंगोरे असतील? असो.

एक मी माझ्या विकिलेखनात समतोलाची आणि संशोधनाची जेवढी मेहनत करतो तिथे लेख लिहिण्यापुर्वी (सध्याचे माझे ऐसिवरील लेख विकिच्या दृष्टीने लिहिलेलेही नाहीत विकि संबधाने लिहिलेल्या माझ्या लेखात सहसा खाली कॉपीराइटमुक्तते संदर्भाने/निमीत्ताने सुस्पष्ट टिपण्णी असते) करणारी व्यक्ती मराठी विकिपीडियावर तरी अजून उगवणे शिल्लक असावे. जे लेख विकिवर लिहित असतो त्या संदर्भाने पुरेशी माहिती नसल्यास मी मिपा अथवा ऐसिवर प्रताधिकार मुक्ततेच्या सुचना लावून चर्चेसही टाकतो.

तिन मी सध्या आपण चर्चा केलेले धागे विकिपीडिया संदर्भाने विशीष्टपणे नमुद केलेले नाहीत तेव्हा माझा स्वभाव जरी पुरेसे संशोधन करून लिहिण्याचा असला तरीही ऐसि अक्षरेवर तर बंधन नाहीच त्या शिवाय विकिपीडिया प्लॅटफॉर्मवरही असे विशीष्ट कोणतेही बंधन नाही. तुम्ही माझ्या संदर्भांना विरुद्ध संदर्भ घेऊन आलात तर त्यावेळी विकिपीडिया तटस्थ असावा लागतो अथवा इतर दोघांचे आपापसात विचार जुळत नसतील तर प्रचालक या नात्याने जमेल तेवढी तटस्थता विकिपीडियावर बाळगावयाची असते ती माझ्याकडून बाळगण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या एवढा तटस्थ आणि पुरोगामी प्रचालकही मराठी विकिपीडियावर अजूनतरी उगवणे बाकी आहे.

विकिचा काही संबंध नसताना आपणच नाही इतरही प्रतिसादकर्ते विनोदी संबंध लावत आहेत याची आपणास कल्पना नसल्यास इतर धागे अभ्यासून घ्यावेत. कदाचित आपण अधिक विचारी असल्यामुळे मी आपल्या प्रतिसादात उल्लेख केला एवढेच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>> तेव्हा माझा स्वभाव जरी पुरेसे संशोधन करून लिहिण्याचा असला तरीही ऐसि अक्षरेवर तर बंधन नाहीच त्या शिवाय विकिपीडिया प्लॅटफॉर्मवरही असे विशीष्ट कोणतेही बंधन नाही.

ह्या स्पष्टीकरणाबद्दल आभार. तुमच्या ऐसीवरच्या लिखाणाविषयीच्या अनेक गोष्टी त्यामुळे अधिक स्पष्ट होतात. तुमचं इथलं लिखाण किती गांभीर्यानं घ्यावं ह्याविषयी निर्णय घेण्यासाठी ऐसीकर वाचकांना ते उपयुक्त आहे. बाकी, 'मी असा आहे' किंवा 'मी तसा नाही' ह्यांसारखी विधानं इतकी व्यक्तिसापेक्ष असतात आणि पुष्कळशा लोकांच्या मनातली स्व-प्रतिमा वास्तवाहून इतकी विपर्यस्त असते, की मी ती विधानं फार गांभीर्यानं घेत नाही. तोच न्याय तुमच्या स्वतःविषयीच्या आणि स्वतःच्या क्षमतेविषयीच्या विधानांनाही लावलेला आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्या स्पष्टीकरणाबद्दल आभार. तुमच्या ऐसीवरच्या लिखाणाविषयीच्या अनेक गोष्टी त्यामुळे अधिक स्पष्ट होतात. तुमचं इथलं लिखाण किती गांभीर्यानं घ्यावं ह्याविषयी निर्णय घेण्यासाठी ऐसीकर वाचकांना ते उपयुक्त आहे

कुणाच्या मनात अनाठायी कल्पना असण्यापेक्षा नसलेल्या बर्‍या, परस्पर बाजूस अपेक्षा भंग केल्याचे अथवा करवून घेतल्याचे दु:ख रहात नाही. काही चुकीच्या अपेक्षा निर्माण झालेल्या होत्या का माहित नाही, पण या निमीत्ताने त्या सुस्पष्टपणे तुटल्या असतील तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यामुळे लेखना बाबत अधिक स्वातंत्र्याची भावना होत आहे.

विकिपीडियावर उत्तरदायकत्वास नकार या शीर्षकाने डिस्क्लेमर असते आणि मराठी विकिपीडियावरून बर्‍याचदा अगदी साइट नोटीसमधूनही आपण दाखवत असतो. उत्तरदायकत्वास नकार कुणी वाचत नसेल तर ज्याची त्याची मर्जी ज्याचा त्याचा प्रश्न.

'मी असा आहे' किंवा 'मी तसा नाही' ह्यांसारखी विधानं इतकी व्यक्तिसापेक्ष असतात आणि पुष्कळशा लोकांच्या मनातली स्व-प्रतिमा वास्तवाहून इतकी विपर्यस्त असते, की मी ती विधानं फार गांभीर्यानं घेत नाही. तोच न्याय तुमच्या स्वतःविषयीच्या आणि स्वतःच्या क्षमतेविषयीच्या विधानांनाही लावलेला आहे. असो.

आपण आणि इतर काही ऐसिकर व्यक्तीच्या लेखनावरुन कायमस्वरुपी मते बनवणारे व्यक्तीपुजक अथवा व्यक्ती निंदक असाल अथवा व्यक्ती वरून माहिती आणि विचार चुक का बरोबर हे ठरवत असाल तर मी स्वतः या बाबत काय करू शकतो ? माहितगार असो अथवा विकिपीडिया असो कोणत्याही व्यक्ती अथवा शब्दपुजेची काडीचीही अपेक्षा बाळगत नाहीत.

जशी मी इतरांकडून माझ्या बद्दल व्यक्तीपुजेची अपेक्षा बाळगत नाही तसे इतरांची व्यक्तीपुजाही करत नाही अथवा व्यक्ती द्वेषही करत नाही. भाषा साध्य करण्याचे, संवादाचे, माहिती आणि कल्पना व्यक्त करण्याचे, वाचन हे एक साधन आहे. भाषा कोणतीही असू द्यात वाचकाचे पुर्वज्ञान, अनुभव, वृत्ती, आणि तो ज्या भाषिक समुहाचा घटक आहे त्या समुहाची सांस्कृतीक आणि सामाजीक वळण या प्रभावांनी घडलेला वाचक आणि तो वाचत असलेला मजकुर यांची परस्परांवर पडणारे अथवा न पडणारे प्रभाव यांची प्रक्रीया गुंतागुंतीची असते. वाचक म्हणून कोणता न्याय कोणत्या मजकुरास लावून काय व्यक्तीगत मते बनवायची याचे स्वातंत्र्य सर्वच वाचकांना असते त्यात तुमच्यात माझ्यात अथवा अजुन कुणा लेखकाच्या मजकुराबद्दल आणि त्यांच्या वाचकांशी असलेल्या नात्यात फारसा फरक नसावा, नाही का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

प्रतिसाद आवडला. नसरीन यांची ट्वीट पाहिली तेव्हाच याविषयी सविस्तर शोध घ्यावा असा विचार होता पण कार्यबाहुल्यामुळे जमले नव्हते. हे सविस्तर खंडन आवडलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile