वीणा डार्लिंग ,
वीणा डार्लिंग ,
तू कैसी है मेरी जान ? अरे यार तू काय लिहिलय "मरुत दूत "? मला वाटलं कुणी गचकल कि काय . लडबडलो कि राव एकदम . काय असत हे मरुत दूत? … जाऊ दे च्यायला आपण आठवीत ३ दा फेल झालेला आणि मराठीत तर बोंब च आप्ली . काउंट पण करता नाय येणार (गणित तरी कुठ येत राव !) पण त्यानंतर आपण रट्टा मारून ४३% मिळवले हा
अरे डार्लिंग , काल आपण एक पाल मारली . तर असा मी झोपलेला बेड वर , आणि ती अशी वरती fan च्या पण वर … उलटी . तर आपल्याला भीती वाटली (हा वाटली तर वाटली च्यायला घाबरतो काय कुणाच्या बापाला ?)
तर इथं एक काठी आहे . तिच्य्ने आपण fan हलवला .(light गेलेली न… भेंडी बंद होता fan ) ती पळालि . आपण एकदम शूर झाला मग आणि अस्सा ती भिंती वरून पळताना चप्पल नि मारल तिला . लुडकलि कि राव (पण शेपटी राहिली वळवळत ) मग आपण बोलावला रूम साफ करणार्याला . त्यानं ती फेकून दिली . तू असायला हवी होती यार . केवढा brave आहे आपण तुला कळाला अस्ता .
एक कॅप घेतली काल . रेड आहे . "यो यो हनी सिंग " लिहिलय त्याच्यावर . अस्सा मस्त दिस्तो अर्रे आपण . एकदम राज बब्बर ! ( त्याची कुणीतरी lover होती म्हणे स्मिता का कुणीतरी , आपला कलिग बोल्लेला आपल्याला . पण ती खूप स्याड पिकचरात काम कर्ते ना. आपण नाय बघ्तला एकपण .)
मी आला तिकड कि आपण पिकचरला जावू . एकदम पोप्कॉर्ण वगैरे . थेटरात तू आणि आपण . कॉर्नर ची तिकीटं काढणार आपण क्क्काय !
तेरी याद आ रहेली है यार .
नवीन रींग टोन सेट केलाय " उंची है बिल्डींग लिफ्ट तेरी बंद है "
भूक लागली राव (मटन खिमा वास मारतोय जोरात mess मधून )
तुझा
प्र
प्रतिक्रिया
हा न.बा. यांचा डुआयडी आहे
हा न.बा. यांचा डुआयडी आहे बहुदा. पालीवरून वाटतय...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
!
बास काय राव! हेच ओळखलेत काय आपल्याला?
आता हेच बाकी होतं! थोर आहे!
आता हेच बाकी होतं! थोर आहे!
@अनुपः न बा नसावेत. ते पालींचा कथेतही मृत्यू घडवून आणू शकतीलसे वाटत नाही. उलट पालविरोधी गटातले कोणीतरी असेल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+
हियर हियर!
पालप्रेमींची बदनामी थांबवा!!!!!!
पालींवर इतका विचार करणारा, की
पालींवर इतका विचार करणारा, की कथेतही तिला आणाव, असा दुसरा आय्डी नाय कोण...
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अर्री काय चाल्लंय काय नबा
अर्री काय चाल्लंय काय
नबा नक्कीच नाही. बॅटमॅन की सुशेगाद??
ऑपोझिट साइडच्या गोग्गोड
ऑपोझिट साइडच्या गोग्गोड लेखनाला रफ अॅण्ड टफ उतारा....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पुन्हा वाचले. त्यात "अरे
पुन्हा वाचले. त्यात "अरे डार्लिंग!" हे वीणाला म्हटलेले समस्तांच्या नजरेस आणु इच्छितो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरे बाईला म्हणतात हो. अरे
अरे बाईला म्हणतात हो. अरे डार्लिंग तर आरामातच.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अगदी
तुझ्यावीणा ते कोणा न कळे!
आता "खरा प्र" या आयडीने अजून
आता "खरा प्र" या आयडीने अजून एक लेख येऊदे
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
असंच म्हणतो. जे काय चाललंय ते
असंच म्हणतो. जे काय चाललंय ते जबरदस्त आहे.
ही कुणी छेडिली तार...
वीणेला ही अशी 'no strings attached' ऑफर?
पवित्र गाय हे चाललंय काय..
पवित्र गाय
हे चाललंय काय..
अरे ए... आवरा. ये चल क्या
अरे ए... आवरा. ये चल क्या रहेला हय?
बादवे, प्रमाणलेखनाची मारून ज्यानी कुणी इतकं सातत्यपूर्ण अशुद्ध लिहिलंय त्याला माझ्याकडून एक मुद्रितशोधकी + लेखकू नमस्कार. _/\_
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
प्रमाणलेखनाची मारूनकोल्हटकरा
कोल्हटकरा धाव*
----------------
रामायणाशी मॅच व्हावं म्हणून. कोल्हटकर धावा असं लिहायचं होतं.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
अरे कोणे ते?ऐसीच सापडलं का
अरे कोणे ते?
ऐसीच सापडलं का रे तुम्हाला
थेरंसॉरी प्रेम-परकर्णं करायला________
अरे ती वीणा इतकी भावूक, तरल मुलगी, तूच असा रेमेडोके कसा रे?
वीणा, मुली वेळेत सावध हो.
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
_/\_
_/\_
_/\_
_/\_
_/\__
काय चाललय काय ?
काय चाललय काय ? शेवटी पुस्तकी भाषेत प्रेम करणार्या वीणा ला रस्त्यावरचा टपोरी 'प्र' च भेटला काय ? प्रेमाचा अगदी 'टाईमपास' करुन टाकलास ग पोरी !
Opposites attract माहीत नाय
Opposites attract माहीत नाय का तुमाले?
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
होय ! होय !
होय ! होय ! इतकीवर्षे मराठी, हिंदी सिनेमांनी इतके शिकवले पण आता वयोमानानुसार लक्षात राहत नाही.
ज्या पत्राचे विडंबन करण्याचा
ज्या पत्राचे विडंबन करण्याचा प्रयत्न या लेखिकेने (प्र -सदस्यकाळ ५तास ) केला आहे त्यांना पाल मारण्यासाठी पंख्याची उंची गाठायला जमले नाहीयै ते समजू शकतो परंतू लेखनाची खोली गाठता आली नाहीयै ही चिंतेची बाब आहे.
मुळात पुर्ण डिवचलेली वीणा (पी डी वीणा -सदस्यकाळ चार दिवस )ही लेखिका नसावी. तमिळ भाषा जाणकार कोणी वीणाधर पुरुष असावा (पीडी =धर तमिळमध्ये)शिवाय पत्रातील तरल भावना मांडण्याची वाक्यरचना चांगल्या लेखकाकडे अंगुलिनिर्देश करत आहे.
ही लेखिका नसावी. तमिळ भाषा
हा टोला कोणाला बरे?
असो, आमचा अंदाज असा की, हा हाती धरलेला पुरुष नसावा. ही युक्तीच्या गोष्टी सांगणारी स्त्रीच (बहुदा तमिळ न जाणणारी) असावी.
वीणा, प्र कोण असावेत याबद्दल
वीणा, प्र कोण असावेत याबद्दल चालणाऱ्या चर्चांनी अधिक करमणूक झाली का पत्रामुळे हे ठरवता येत नाहीये.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दूरच्या रेल्वेप्रवासात अभ्यास
दूरच्या रेल्वेप्रवासात अभ्यास असो वा नसो निरर्थक बोलणं महाबोअर नसतं.पत्रांचे मजकूर आणि ठणठणपाळ लेखक लेखिका दोन्हीही करमणूक करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
अवांतर -पालीचा विष्णूशी काय संबंध आहे? हा खरा छोटे छोटे प्रश्नसाठी आहे परंतू इथे विचारल्याशिवाय राहवत नाही. आणखी सिंहस्थाच्या निमित्ताने अमृतकुंभही आहेच .
बादरायण
>>पालीचा विष्णूशी काय संबंध आहे?
विष्णू क्षीरसागरात राहतो. आणि तामिळमध्ये दुधाला पाल म्हणतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पालीचा विष्णूशी काय संबंध
विष्णू "पाल"नकर्ता आहे.
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई ssssss बास करा त्या पालीची पब्लिशिटी!
उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...
प्र सोडून पालीवर बोलायला
प्र सोडून पालीवर बोलायला लागले लोकं, काय हे?
प्र रावांचा हा धागा पब्लिश
प्र रावांचा हा धागा पब्लिश होऊन जवळजवळ १२ तास झाले तरी वीणा मॅडम यांचे उत्तर नाही. वीणेचे स्वर अबोल झाले की काय ?
मेरी बीना तुझबिन रोये... हे
मेरी बीना तुझबिन रोये... हे गाणं आठवलं.
खुद्द फ्र (प्र)पत्रकार
खुद्द फ्र (प्र)पत्रकार डार्लिंगशी बोलताना पंख्यावरची पाल चपलेने मारतोय {आणि व्हॉटसापरूपी हंसातर्फे बहुधा वहिडिओही पाठवला असेल} चे डेअरिंगबाज वर्णन करतोय तर वाचक काय दुसरा विषय चघळणार? थोडं विषयांतर केलं. {वीणाधराच्या तमिळनाडुतल्या कांचिपुरम येथे विष्णूच्या देवळात सोन्याची पाल पाहण्यास तिकिट असतं}.