"इटालियनांचा गोंधळ सुरू आहे ... नेहेमीप्रमाणे"

मी इंग्लंडमधल्या खेड्यात राहत होते तेव्हाची गोष्ट. आमच्या खेड्यातून मँचेस्टरला जाण्यासाठी तासाला एक गाडी असायची. एका प्रसन्न हेमंत ऋतूमध्ये, "या मार्गावरचे सिग्नल्स अद्ययावत करायचे आहेत. त्या कामामुळे दोन महिने गाड्या वेगळ्या मार्गाने वळवण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्वीच्या वेळेलाच, स्टेशनवरून बसेस सुटतील," अशी सूचना दिसली. दोन महिने कधीचे उलटून गेले, ख्रिसमसचे वेध लागले तरीही गाड्यांचे मार्ग बदललेलेच होते. कधीतरी हा विषय निघाला तेव्हा बॉसकडून गंमत समजली. कमीतकमी पैशांची निविदा काढणाऱ्या एका इटालियन कंपनीला त्यांनी सिग्नलचं कंत्राट दिलं होतं. (सत्तापालट होऊन त्याच सुमारास बर्लुस्कोनीचा सूर्य मावळत होता.) आहेत त्याच वायर्स वापरून, बाकी यंत्रणा बदलून आहेत तेच सिग्नल्स दोन्ही दिशांसाठी वापरता येतील असं काहीतरी ते काम होतं. दोन महिने संपले, त्या कामासाठी मंजूर केलेले पैसे संपले तरीही काम संपलं नाहीच. बरं, पूर्वी सुरू होतं ती व्यवस्थासुद्धा त्या लोकांना करून देता आली नाही. "Italians are in the mess... as usual," माझा बॉस म्हणाला. शेवटी भारतातून अभियंते बोलावले गेले, त्यांनी जुन्या पद्धतीचीच सिग्नल यंत्रणा उभारून दिली. आणि वसंत ऋतू सुरू होता होता गाड्यासुद्धा धावायला लागल्या.

बर्लुस्कोनी सत्तेवर होता तेव्हा इटलीमध्ये अंदाधुंद कारभार होता. त्याच्या बऱ्याच बातम्या तेव्हा बीबीसीवर दाखवत असत. ते सगळं पाहून, हे भारतापेक्षा बरंच बरं आहे, असं मला तेव्हा वाटत असे. मग इयन असं का म्हणाला, "Italians are in the mess... as usual." याचा अर्थ काय? तोपर्यंत इयन हा व्यवस्थित मनुष्य आहे याची कल्पना आल्यामुळे तो काहीच्या काही बोलतोय ही शक्यता नव्हतीच. तिथे काम केल्यामुळे ओळख झालेले काही खगोलाभ्यासक इटालियन लोक आठवले; ते सगळेही व्यवस्थितच आहेत की. इटलीमधल्या निवडणुका होत होत्या आणि बर्लुस्कोनीच्या हातातली सत्ता निसटत होती तेव्हाच्या बातम्या पाहिल्या. काही काळानंतर ब्रिटनमध्ये निवडणूका होऊन टोनी ब्लेअर आणि मजूर पक्ष पुन्हा सत्तेवर आला. इटलीमधल्या निवडणूकांच्या बातम्यांमधून दिसणारा गोंधळ, ब्रिटीश निवडणूकांपेक्षा काहीच्या काही जास्त होता. भारतातल्या, विशेषतः प्रकाश झाच्या सिनेमांमध्ये शोभाव्यात अशा निवडणूकांच्या तुलनेत मात्र इटलीच बरंच चालू होतं. "Italians are in the mess... as usual." याचा अर्थ थोडा जास्त समजला. पुढे बर्लुस्कोनीवर झालेले आरोप, त्याची पदच्युती हे प्रकारही बातम्यांमधून वाचले. आणि पुन्हा दोन वर्षांनंतर बर्लुस्कोनी सत्तेवर आला.

---

काही महिन्यांपूर्वीच एका इरानी कुटुंबाशी आमची मैत्री झाली. माझे छोटे केस पाहून ते जोडपं म्हणालं, "मला वाटलं होतं भारतीय स्त्रियांचे केस चांगले लांबसडक असतात." खरंय की. माझ्या ओळखीतल्या बहुतेक भारतीय मुली-स्त्रियांचे केस बऱ्यापैकी लांब आहेत. (माझे केस लांबसडक कधीच नसले तरी बराच काळ लांब होते.) पाश्चात्य स्त्रियांचे केस एवढे लांब सहसा दिसत नाहीत, median length भारतीय स्त्रियांपेक्षा कमीच असेल. मी सुद्धा कधीतरी त्या मैत्रिणीला म्हटलं होतं, "मला आनंदमिश्रित आश्चर्य वाटलं तू डोकं झाकत नाहीस हे पाहून." तिनेही लगेच इरानी स्त्रियांना खोमेनीपूर्व काळात ही सक्ती नव्हती, इरानचा इतिहास प्रागतिक असण्याचा आहे, वगैरे गोष्टी सांगितल्या.

---

हे सगळं आत्ता का आठवलं? हे वाचलं -

संस्कृत शिकणारे ब्राह्मणेतर तुम्ही पाहिलेच नसतील असे वाटत नाही. माझ्या शाळेत तर संस्कृतच्या तुकडीत बरेच ब्राह्मणेतर असायचे, अजूनही असावेत असे वाटते.
ब्राह्मणांबद्दलच्या टिप्पणीबद्दलही असेच. सगळे ब्राह्मण असाच विचार करतात का?
जालावरील तुमचे एकुण लेख आणि प्रतिक्रिया वाचून तुमच्या ओळखीत अगदी इतके अशा प्रकारचेच सँपल (इतके मर्यादित) असेल असे वाटत नाही. म्हणून सरसकटीकरण म्हटले होते.

---

एखाद्या विधानाची चौकट काय हे सांगितलेलं नसेल तर आपण आपली चौकटच त्या विधानांना लावतो का? का बोलण्यातल्या खाचाखोचा, व्यक्तीच्या विचारांची पद्धत यांचा अंदाज घेत अपेक्षित असणारी चौकट समजून घेण्याचा प्रयत्न करतो?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

मिरना बॅजेरो ही ऑथरस डेन वरची माझी अत्यंत आवडती कवयित्री आहे. ई. ड्ब्ल्यु रिचर्डसन हे कवि देखील आवडत पण त्यांनी आता तिथल्या कविता हलवल्या आहेत अन पुस्तक घेऊनच वाचाव्या लागतात. असो तर मिरना यांच्या कविता अजुनही मोफत वाचनास उपलब्ध आहेत.
त्यांची परसेप्शन्स नावची कविता मला आवडली होती. पण जेव्हा हे कळलं की ही कवयित्री जन्मांध आहे तेव्हा त्या परिप्रेक्ष्यात ती खरीखुरी समजली.
बरेचदा चौकट माहीत नसली तरी बोलणं इन्ट्युइटिव्हली कळतं किंवा भिडतं. अन जेव्हा चौकट समोर येते तेव्हा एकदम प्रकाश पडतो. "पर्सेप्शन्स" ही कविता त्या प्रकारचीच.
____
अवांतर - मिरना यांची मॉडेस्टी अर्थात शालिनता ही कविता मला सर्वात आवडलेली कविता.
निसर्ग हा या कवितेचा विषय आहे अन इतकी सुरेख कल्पना मांडली आहे. हिवाळ्यात अन्य सर्व झाडे वेली पर्णहीन = विवस्त्र झालेली असताना एक झाड मात्र थोड्याफार पानांसहीत कशीबशी स्वतःचे लज्जरक्षण करते. अशा प्रकारची सुंदर कल्पना रंगविली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या विधानाची चौकट काय हे सांगितलेलं नसेल तर आपण आपली चौकटच त्या विधानांना लावतो का? का बोलण्यातल्या खाचाखोचा, व्यक्तीच्या विचारांची पद्धत यांचा अंदाज घेत अपेक्षित असणारी चौकट समजून घेण्याचा प्रयत्न करतो?

उत्तरार्धातला प्रयत्न उभयपक्षी जाहला तरच काही अर्थ आहे, नाहीतर (फॉर व्हॉटेव्हर रीझन) स्वतः एखादा शब्द घेऊन त्यावरच पत्त्यांचा बंगला बांधायचा आणि इतरांकडून मात्र अशा समजूतदारपणाची अपेक्षा करायची हे रोचक (नॉट टु मेन्शन दुटप्पी) आहे.

'वामांकारूढ सीता' चा नुकताच लावलेला रोचक अर्थ, तसेच अन्यही तितक्याच रोचक कमेंटींचा विदा या निरीक्षणामागे आहे. संस्कृत वाङ्मय म्हणजे काय याचे स्वतःचे आकलन इतके हास्यास्पद असेल तर इतरांनी तरी मारे समजूतदारपणा का दाखवावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शहरातला माणूस गावातले सौंदर्य, निसर्ग, एक प्रकारचा संथपणा, आवडतो म्हणून गावी जातो. काही वर्षांनी गावाचे गावपण हरवलेले आवडत नाही -गाव आता पहिल्यासखे राहिले नाही. गावातले लोक म्हणतात आता गावात चांगली सुधारणा होतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले. संदर्भचौकट, गोष्टींचा विशिष्ट संदर्भातला अर्थ, व्यक्तींमधलं, समष्टीमधलं , तोंडी, लिखित किंवा मूक स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं संभाषण/देवाणघेवाण या सर्वांबद्दलचे विचार मनात या निमित्ताने येऊन गेले. प्रत्येक गोष्टीला सांगण्याचा, प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा एक संदर्भ आहे. सांगणार्‍याचा आशय नि ग्रहण करणार्‍याचं आकलन हे सर्व त्या संदर्भातलंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.