मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
==========

लोकसत्ताचं संकेतस्थळ फार जास्त रॅम खातं. क्रोमच्या एका टॅबमध्ये बातमी उघडली तरी ती टॅब कधी कधी ७००-८०० एमबी रॅम खाते. त्यामुळे लॅपटॉप हँग, स्लो होणे वगैरे प्रकार सुरू होतात. ह्यावर काही उपाय माहीत आहे का? मी कधी कधी www.loksatta च्या ऐवजी m.loksatta असे करतो, पण सगळ्या बातम्या तसं केल्यावर दिसत नाहीत.

field_vote: 
0
No votes yet

८०० एम बी कसं कळलं??? मोझी किंवा क्रोम इतकी रॅम खाऊ शकते काय???
एका वेळेला ८०० एमबी डेटा म्हणजे पिक्चर वगैरे मावेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विंडोजमध्ये टास्क मॅनेजर किंवा उबंटूमध्ये सिस्टीम मॉनिटर उघडला की तिथे सगळ्या प्रोसेस दिसतात. क्रोमच्या प्रत्येक टॅबची, एक्सटेन्शनची वेगळी प्रोसेस दिसते. तिथे प्रत्येक प्रोसेसने वापरलेली रॅम दिसते. ७००-८०० एमबी रॅम दाखवणार्‍या क्रोमच्या प्रोसेसला एंड प्रोसेस केले की लोकसत्तावाली क्रोमची टॅब मरायची (म्हणजे पान जांभळे व्हायचे आणि He's dead, Jim! असे लिहिलेले दिसायचे. त्यावरून निष्कर्ष काढला. शिवाय त्या प्रोसेसला मारल्यावर एकुण रॅम वापर पण भस्सकन खाली यायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही वेळा, एखादे एक्स्टेन्शन + साईट हे कॉम्बो अवजड ठरू शकतं, असं वाचल्याचं आठवतं. तेव्हा क्रोममधली एक्स्टेन्शन्स काढून पाहण्याचा प्रयोग करता येईल. दुसरा पर्याय, इ-पेपर वाचण्याचा - पण अर्थात तो सवयीचा/आवडीनिवडीचा भाग झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेमरी यूज २-२५० एम्बीच्या वर जात नाही.
आय डोन्ट 'त्रस्त' गूगल Wink

फाफॉ व जावा लेटेस्ट असेल, तर खालची अमुक अडचण येणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी फायरफॉक्स (विन्डोज़) वापरतो. लोकसत्ताचे पान उघडले की हमखास फाफॉ अडकून बसतो.
एक गोष्ट केली की तो सुरळीत चालतो. फाफॉच्या 'एक्स्टेन्शन्स'मध्ये 'डिसेबल्/एनेबल जावास्क्रिप्ट' असे एक एक्स्टेन्शन मिळते. ते स्थानापन्न (इन्स्टॉल) केले की लोकसत्ता उघडायचा आणि लगेचच 'टूल्स'मध्ये जाऊन 'जस्ट डिसेबल जावास्क्रिप्ट' करायचे. ते केले की फार वेळ न लागता लोकसत्ता चाळता येतो.
मात्र त्याच खिडकीत उघडलेली इतर अनेक संस्थळे (उदा. यू ट्यूब, ऐसी वगैरे) नीट चालेनाशी होतील. त्यामुळे लोकसत्ता वाचताना मी फक्त तेच करतो. वाचून झाला की 'जस्ट एनाबल जावास्क्रिप्ट' करायचे आणि इतर संस्थळांची मुशाफिरी करायची. 'क्रोम'मध्ये तसे काही असेल तर करून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रोममध्ये हे अ‍ॅप मिळले, आत्ता तरी रॅम कमी खातंय असं दिसतंय. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"The Crowd: A Study of the Popular Mind " हे Psychologie des Foules ह्या Gustave Le Bon लिखित फ्रेंच पुस्तकाचं भाषांतर.
ह्या इंग्लिश पुस्तकाचं मराठी सारांशरुप म्हणजे "झुंडीचे मानसशास्त्र ".
त्यातला फ्रेंच पांढरपेशांबद्दलबद्दल एक परिच्छेद :-
पांढरपेशा वर्ग बौद्धिक गोंधळात सापडतो. पांढरपेशा वर्ग म्हटले तर सरकरच्या बाजूचा असतो, म्हटले तर नसतोही.हा वर्ग एकाचवेळी सरकरचे लांगूलचालन करतो आणि सरकारचा धिक्करही करतो. हा वर्ग सरकारचा उदोउदो करतो,सरकारशी लांगूलचालन करतो, कारण ह्य अवर्गाला खात्रीपूर्वक वआटते की सत्तेवर असलेले सरकार सुरक्षित आहे तोवरच आपले हक्क आणि आपली मिरास सुरक्षित आहे.पण त्याच वेळी ह्या वर्गाला असेही वाटते की, सरकारने जेवढी आपली कदर करायला हवी तेवढी अक्दर सरकार करत नाही. म्हणून सरकारवर हा पांढरपेशा वर्ग नाराजही असतो. या वर्गाला वाटते की की, आप्ल्या हिताकडे सरकार द्यावे तितके लक्ष देत नाही. आपल्या लायकीच्या प्रमाणात आपणाला सवलती व हक्क देत नाही. हा वर्ग सरकारच्या कच्छपीही असतो अन् सरकारवर दातही खातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

निसर्गाला लोक एका विशिष्ट प्रमाणाच्या बाहेर एकत्र येणं वा जुडलेलं असणं अभिप्रेत नाही. त्यातही त्यांच्यात काँप्लेक्स विषयावरचा संवाद सहज पार पडणे अभिप्रेत नाही. त्यातही एका विशिष्ट वेगापेक्षा जास्त वेगाने हा संवाद होणं अभिप्रेत नाही. मग अशा वेळी मेनिफेस्ट होणारी मानसिकता झुंडींची प्रातिनिधिक मानसिकता न म्हणता यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोकसत्ताचे २००९ पूर्वीचे अंक या ठिकाणी उपलब्ध आहेत. परंतु कुठलाही अंक उघडल्यास उदाहरणार्थ खालीलप्रमाणे दिसते.

मी सध्या फायरफॉक्स् + विन्डोज़् ७ वापरत आहे. हे नीट दिसण्यासाठी काय उपाय करावा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरनेट एक्स्प्लोरर , क्रोम सुद्धा वापरुन पाहिलं. मलाही हेच दिसतं.
मला हा लोकसत्ताने एकप्रकारे वाचकांप्रती केलेला हा द्रोह,नैतिकदृष्ट्या गुन्हा वाटतो .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एक्स्प्लोररच्या जुन्या आवृत्तीत दिसत असे. आता इतक्यात पाहिलं नाही. आठाच्या आधीची आवृत्ती असेल बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुर्वी मलाही लोकसत्ताचे पेजेस असेच दिसायचे. फायरफॉक्समध्ये कॅरॅक्टर एनकोडींग बदलून काम झालं होतं. (बहुतेक युनिकोड-८ वापरला होता.) नव्या फायरफॉक्समध्ये संपूर्ण युनिकोड रेंज नसावी, पण जर कंप्याटीबल अ‍ॅडऑन वगैरे मिळाला तर काम होऊ शकते. (चटकन शोध घेता हे सापडलं: https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=475891)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या पानावर कुठेतरी Font Problem? Click here अशी लिंक असेल. तेथून लोकसत्ताचा फॉण्ट डाउनलोडवून घ्यावा. तो C:\windows\fonts या फोल्डरमध्ये टाकावा. हा फॉण्ट युनिकोड नाही.

मग ते पान वाचता यायला हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला फायरफॉक्स आणि एक्सप्लोरर मधे दुवा नीट दिसत आहे.

मेघना म्हणते तसा ब्राउजर प्रॉब्लेम असल्यास कंपॅटिबिलिटी व्हिव्यू मधे प्रतत्न करुन बघा किंवा ब्राउजर मोड बदलून बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद देणार्‍यांचे आभार. एकेक गोष्ट करून पाहतो.
--
@ मी : फाफॉ मध्ये २००९ च्या आसपासची वृत्तपत्रे मलाही नीट दिसत आहेत. अडचण अधिक जुन्या काळातल्या प्रतींची आहे. २००१-२ च्या काळातल्या प्रती तुम्हांला नीट दिसत आहेत का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समस्या लोकसत्ताची आहे, त्या प्रती दिसण्यासाठी गरजेच्या फाइल्स लोकसत्ताच्या सर्व्हरवरुन गायब झालेल्या दिसत आहेत, खालच्या चित्रात पान नीट न दिसण्यासाठी जबाबदार एरर्स दिसत आहेत, त्यामुळे ह्या प्रती कुठेच नीट दिसतील असे वाटत नाही.

पुरवणी - जंतू आणि थत्ते म्हणतात त्याप्रमाणे शब्दांपुरती समस्या फॉन्ट इन्स्टाल करुन सुटेल, मला इथे फॉन्ट इन्स्टाल करता येत नाही, त्यामुळे त्याबद्द्ल सध्या खात्रीने सांगु शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थत्तेंना +१. फॉन्ट प्रॉब्लेम ह्या पानावर जाऊन तिथले 'लोकवेब' आणि 'मिलेनिअम वरुण' फॉन्ट्स डाउनलोड करा आणि मग इन्स्टॉल करा. हे केल्यावर मला फायरफॉक्स आणि सफारीमध्ये 'ट' अक्षर सोडता इतर मजकूर दिसू लागला. क्रोममध्ये मात्र अनेक अक्षरं नीट दिसत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दोन्ही फॉंट इन्स्टॉल केल्यानंतर २००९ मधलं एक पान उघडलं, ते नीट क्रोम फाफॉ दोन्हींमध्ये नीट दिसलं. ३ जुलै २००१ चं पान उघडलं (ज्याचा स्क्रीनशॉट मी यांनी डकवला आहे) ते फाफॉमध्ये वाचता येण्याइतपत दिसलं. प-ण- ते- का-ही-सं- अ-सं- हो-तं. क्रोममध्ये नीट दिसतंय.

गूगल सर्च नक्की कसं चालतं? सर्चमध्ये युनिकोडीत मजकूर आहे का नाही याचा काही फरक पडत नाही का? ठराविक मजकूर पानावर 'सर्च स्ट्रींग' पद्धतीने शोधला तरीही सापडतो. त्याला युनिकोडीत पान आहे का नाही यामुळे फरक पडत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्याला युनिकोडीत पान आहे का नाही यामुळे फरक पडत नाही का?

फरक पडतोच पण काही वर्षांपुर्वी (केव्हा ते आता नेमके आठवत नाही) कुणा सज्जनाने नॉन-युनिकोड फाँटाचे/ अशा संस्थळांचे मजकुरांची युनिकोड रुपांतरणाची सोय काही फाँटांकरता केली होती. ती आंतरजालावर उपलब्ध होती. तेव्हा अख्खेपान युनिकोड रुपांतरीत करून मिळत असे. त्या नंतरच्या कालावधी नंतर तशाच प्रकारात त्याच संस्थळांचे शोध गूगल मध्ये यावयास लागले कसे ते माहित नाही.

एकुण असे काम करणार्‍यांकडे मराठी लोक (आर्थीक) दुर्लक्ष करतात. उत्साहाच्या भरात सक्रीय झालेली मंडळी आर्थीक मॉडेल्स सक्रीय पणे व्यवस्थीत पणे यशस्वी करू शकत नसावीत आणि चांगले चक्र कुठेतरी गाळात रुतून बसत असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

@चिंतातुर जंतू,

हा संपादित लोकवेब उतरून घ्यावा. त्यात [ च्या जागी ट टाकले आहे.
आदिती प्रमाणे मलाही क्रोम मध्ये बरं दिसत आहे पण फाफॉ मध्ये -स-स-स- असं दिसतंय. बहुदा एनकोडिंग वगैरे बदलावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Ng या आडनावाचा उच्चार कसा करायचा? फोनवर मला "ङ" आणि "ऊंह" (उसासा देतो तसा आवाज) यादोन्हीच्या मधला आवाज ऐकू आला. तसं जरी धरलं तरी एन आणि जी चा उच्चाराशी काय संबंध?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

http://en.wikipedia.org/wiki/Ng_%28surname%29
ङ पेक्षा ङ् अधिक नेमके होईल. अथवा हे स्वतंत्र सिलॅबल म्हणून उच्चारले जाऊ शकते, परंतु विशेष लांबलचक उच्चार नाही, र्‍हस्व-लांबीचा उच्चार.
बहुतेक मराठीभाषकांना (वाक्याच्या मध्येच विचार करायला थांबताना) "म्म्म्म्" असे स्वरविरहित उच्चारता येते, तेच र्‍हस्व-लांबीचेही उच्चारता येते.
आणि जीभ दातांना घट्ट रोवून नाकात हवा सोडत "न्न्न्" असाही स्वरविरहित उच्चार कठिण नाही. (उदाहरणार्थ न्न्न्न्नाही, असे "म्हणू-की-नको-नाही" परिस्थितीत लांबलचक स्वरविरहित न्न् आपणापैकी बहुतेकांनी कधीतरी उच्चारला असेलच. तोच उच्चार आपल्याला र्‍हस्व लांबीचे उच्चारता येईल.

त्याच उच्चारांना समांतर सुटा ङ् उच्चारता यावा. फरक असा की जिभेचा मागचा भाग ताळूच्या मागच्या (मऊ) भागाला/पडजिभेच्या जवळपास घट्ट रोवायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आडनाव धारण करणार्‍या देहालाच विचारून पहा. जमल्यास पहिल्या नावाने हाक मारा. याच्या समोर आळस आला किंवा जांभई देतांना सावध रहावे लागेल ते पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे एक सद्गॄहस्थ आमचे क्लायंट आहेत. तिथे धनंजयचा तो क्लिष्ट फॉर्म्यूला टाळून (दात कुठे आहेत, जीभ कुठे आहे ते तो उच्चार वाक्यात आला असताना शोधून मग त्यांना एकमेकांत घट्ट रोवण्याचा प्रयत्न वैगेरे कठीण प्रकार आहे हो ऐनवेळी) आम्ही त्यांना सरळसरळ यूर एक्सलेंसी म्हणणेच पसंद करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझा एक सिंगापूर मधील सहकारी हे नाव धारण करी. त्याच्या बोलण्यावरून तो उच्चार यंग आणि एंग याच्या मधला काहीतरी करे (मला तसा ऐकू येई).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फाँटचा विषय चालूच आहे तर एक शंका विचारावयाची आहे. दोन दिवसापुर्वी मी टायपिंग ट्रायल साठी बराहा ट्रायल व्हर्शन डाऊनलोड केला. त्यांच्या इक्सई सोबत, न मागताच भारतातील सगळ्या भाषाचे बराहा टंक मला गरज नसतानाही येऊन लोड झाले. असे काही न लागणारे फाँट ओ एस सोबतही येत असणार इंग्रजी फंटांची मला फारशी माहिती नाही कि सर्व साधारणपणे कोणते फंट सेफली वगळता येऊ शकतात. नको असलेले टंक वगळण्याचे फायदे नुकसान काय असू शकते. कोणती काळजी घ्यावी म्हणजे कोणते फाँट कधीही वगळू नयेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

शंका.

"दो टके" की (उदा. औरत किंवा काहीही) असे एक तुच्छतादर्शक फिल्मी वाक्य पूर्वीच्या सिनेमांत दुरित व्यक्तींच्या तोंडी ऐकू यायचे. यातले दो टके म्हणजे परसेंटेजशी संबंधित काही असावे की किंमत दर्शवणारे काहीतरी चलन.. मग एकूण "टक्के" हा शब्द कसा आला असावा आणि त्याचा संबंध शंभराचा भाग या अर्थाशी कसा जोडला गेला असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टका पूर्वी भारतात वापरलं जाणारं चलन होतं. त्याचा प्रभाव पूर्व भागात जास्त असावा.
बांग्लादेशाचं चलन आजही "टका" हेच आहे; हे ठाउक असेलच.

लहान असताना मस्त लयीत एक सुभाषित म्हणत असू ते आठवले.
टका धर्मस् टका कर्मस्
टका हि परमं पदम्
यस्मिन् गृहे टका नास्ति
हा हा टकाम् टकटकायते इति ||
असं काहीतरी सुभाषित होतं.(माझ्या लिहिण्यानं संस्कृतची वाईट लागली आहे; त्याबद्दल सॉरी.)

टका- टक्केवारी ह्यासंब्म्धाबद्दल ठाउक नाही.

"दो टके की औकात" नसणे म्हणजे "दोन दमड्या/छदामही ज्यावर खर्च करणे खूप आहे असे...." म्हणजे "अत्य्म्त थिल्लर/स्वस्त/बाजारु "

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बांग्लादेशाचं चलन आजही "टका" हेच आहे;

"टका" नव्हे. "टाका".

"टाका" हा रुपयाकरिता बंगाली शब्द आहे. किंबहुना, ब्रिटिश हिंदुस्थानी आणि भारतीय (आणि, बांग्लादेश स्वतंत्र होण्याअगोदर पाकिस्तानीसुद्धा) चलनी नोटांवर रुपयाचे नाव बंगालीत अधिकृतरीत्या "टाका" असेच लिहिलेले आढळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टकाच असेल.

बंगाली अनेक अकाराने सुरू होणार्‍या शब्दांचा उच्चार आकारयुक्त करतात.

There are no cups at the vending machine. हे सांगताना "वहां काप नही है" असं सांगतात. तसा टका शब्द टाका म्हणून उच्चारत असावेत.

(अर्थात नोटेवर टाका असं लिहित असतील तर मग वरील अंदाज गैरलागू ठरेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Bangladeshi_taka

इथे बंगाली लिपीत টাকা अर्थात टाका असे लिहिले आहे. एरवीही लेखन व उच्चारांतही हाच पाठ आढळतो. शब्दाच्या सुरुवातीचा अकार हा बंगालीत आकारही होतो हे आहेच, सबब 'मूळ' शब्द टका असण्याचीही शक्यता आहे खरी. पण सध्याचे लेखन-उच्चारण 'टाका' असेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बंगालीत लेखी आणि उच्चारी दोन्ही 'टाका'च होतो.

आसामीत लेखी 'टका' होतो, असे भारतीय नोटांवरून दिसते.

(हा प्रतिसाद थत्तेचाचांना उद्देशून आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टका हे बहुतेक चलनातलं एखादं नाणं होतं. (कोल्हटकरकाका अधिकारवाणीनं सांगू शकतील.) अगदी कमी किंमतीला मिळणारी बाई (बाजारबसवी - तीही स्वस्त!) अशा अर्थाचं ते संबोधन असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मंगल पांडेतील 'टके टके' गाणे ऐकलेले दिसत नाही!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>पूर्वीच्या सिनेमांत दुरित व्यक्तींच्या तोंडी ऐकू यायचे

आम्ही झीनत अमानच्या तोंडी* ऐकलं. "तेरी दो टकियारी नौकरी में मेरा लाखोंका सावन जाये"

*लताबैंच्या तोंडून ऐकले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डींग अशी सुरुवात आहे चक्क त्या गाण्याची Wink

रच्याकने,
अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भाजी, टकाशेर खाजा. अशी म्हण आठवते.
सब घोडे बारा टक्के (के). यातही तेच कॉईन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नार्दिंडियन लोकांचे संस्कृत उच्चार असे एकदम ओढूनताणून केल्यागत, प्रचंड कृत्रिम वाटणारे का असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्वच आधुनिक प्राकृतोद्भव भाषिक लोकांचे संस्कृत उच्चार स्वतःच्या आधुनिक भाषेच्या गाळण्यातून बदलून असतात.

संस्कृतातील बहुतेक शब्द अन्ताघाती बोलले जात (ती प्रचलित भाषा होती त्या काळी). मराठीतील आद्याघाती शब्दांचे प्रमाण अधिक. शिवाय मराठीभाषक [मराठीत योग्य अशा] सवयीनुसार कधीकधी शेवटला इ/उ दीर्घ करतात, तसा हिंदीभाषक करत नाहीत. हिंदीभाषक वेगळी ओढाताण करतात. "आर्य चाणक्य" मालिकेतील प्रमुख पात्र श/ष-> स उच्चार करे. नुकताच मी एका मित्राच्या घरी कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे पूजा करायला बंगाली भटजी होता. संस्कृतातही स->श झाले सर्वत्र. संस्कृतातील ज्-ञ् जोडाक्षराचा उच्चार प्रत्येक भारतीय भाषेतील भषक काहीकाही वेगवेगळा करतात.

एकूण संस्कृत उच्चारांबाबत भरकटलेल्या प्रादेशिक बदलांबाबत "आमचे-तेच-शुद्ध"चा गमतीदार अतिरेक वैदिक शाखा-उपशाखांमध्ये दिसतो. या शाखा आपल्या आजकालच्या भाषांशी सम-समांतर नसल्यामुळे हिंदी-मराठी-कन्नड मित्र मिळून-मिळून त्याबाबत हसू शकतो : प्रत्येक वैदिक शाखेत उच्चारांच्या बाबतीत मोठेच काटेकोर नियम असतात - ते एकमेकांशी मात्र जुळत नाहीत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स-श, य-ज आणि व-ब चा अभेद हे तर बंगाली संस्कृतचे वैशिष्ट्यच आहे. ज्+ञ च्या वेगळ्या उच्चारांबद्दलही सहमत. मात्र नार्दिंडियन लोक हे 'schwa' चा उच्चार फार टाळतात- फक्त अंत्य पोझिशनलाही नाही तर मध्येही. त्यामुळे ते विचित्र वाटण्याचा संभव जास्त आहे असे म्हणता येईल काय? बंगाली संस्कृतची स्वर-ट्रीटमेंट साधारण फार वेगळी नाही, यद्यपि व्यंजनांत एकदम ऑफ द मार्क असली तरी.

बाकी, वैदिक शाखेप्रमाणे कुठले नियम कसे बदलतात ते पहायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं


====================================
साधू- रात को आ जा खाना खाने को. तुम्हारी गर्ल्फ्रेंड कोभी ले के आना. क्या नाम है उसका?
जतीन- वॅशाली.
साधू- क्या?
जतीन- [जोर से] वॅशालीss.
साधू - क्या रे तुम नॉर्थ इंडियन्स, कैसे प्रोनोन्स करते हो? वॅशाली! वै-शा-ली. बोलो, वै-शा-ली.
====================================

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वलभौ - या शिणुमात "आगाशे" उपनामधारी मनुक्ष सांबाराला स्टेपल डाएट का म्हणतो हे मला समजलेलं नाहीये अजून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आणि इंग्लिशविंग्लिश मध्ये श्रीदेवीचा मराठी नौरा (भौधा गोडबोले की कायतर आडनाव) राजमा चावल साठी मरत असतो. &&^^%%&***** साले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकतर त्याची बायको (रेवती) असते दाक्षिणात्य. एवढ्या वर्षांत बाहेर छप्पन तीर मारले तरी घरात बायकोच्या ताटाखालचं मांजरच होणार ना तो! मग सांबारच आपलं वाटणार ना, आमटी सोडून. त्यातून तो डायबेटीक असेल तर इडली, डोसा, भाताचा त्याग करावा लागत असेल. मग सांबार सोडून काय ओरपणार तो? येवडं बी शिंपल समजंना राव तुमाला!

हेच तुमचं लोकांचं चुकतं. आणि मग आमच्यासारख्या उदारमतवादी, विचारवंत मराठी लोकांना चारचौघात अचानक लाज येते हो. (तरी बरं, हे मराठीतच लिहिलं आहे. हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असतं तर आणखी मोठी लाज आली असती.)

मी ते साधू आगाशेचं काय ते स्पष्टीकरण दिलं. आता श्रीयुत शशी गोडबोलेंच्या वर्तनाचं स्पष्टीकरण हा तुमचा गृहपाठ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चुकलात तुम्ही. डाएट केलं तर काय खावं याची यादी स्टेपल करून दिलेली असते त्यात उल्लेख म्हणून स्टेपल डाएट आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकतर त्याची बायको (रेवती) असते दाक्षिणात्य.

सहमत. ती एक्दोनदा सौदिंडियन भाषेत बोलते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा सिनेमा थ्री मिस्टेकवाला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बद्दल बोलतोय. थ्री मिष्टेक नव्हं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा, मस्त शीन आहे तो. मी या शीनचा हवाला देऊन आमच्याकडच्या नार्दिंडियनांची उडवतो अधनंमधनं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सांबार खाणार्‍या आमच्या बेळगावच्या मराठी लोकांचा द्वेष करणार्‍या मिरजेकडल्या अर्धमराठी लोकांचा निषेध!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तर आठवड्यातनं किमान ५ दा सांबार खातो बे. सांबार खावा, काय म्हण्णं नाय पण ते राजमा चावल??? ब्लास्फेमी!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगल्या पद्धतीने बनवलेला आणि फार स्पायसी नसलेला राजमा आणि मऊ तरी मोकळा असलेला साधा किंवा जिरेभात हे कॉम्बो खाऊन बघा...आत्मा कसा गारगार होतो. कम्फर्ट फूड म्हणजे अजून काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आपण कधी एखाद्या हॉष्टेलवर (आणि खास करून उत्तरेतील एखाद्या हॉष्टेलवर) राहिलात किंवा नाही, याबद्दल मला कल्पना नाही, परंतु सतत भडिमार झाल्यास 'राजमा' या (एरवी चांगल्या) प्रकाराचीही तिडीक येऊ शकते, हे स्वानुभवाधारे सांगू इच्छितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिडीक येऊ शकते, हे स्वानुभवाधारे सांगू इच्छितो

अगदी अगदी.

'राजमा' या (एरवी चांगल्या)

गंदगी भोजनाच्या अनुभवानंतर ह्याबद्दल साशंक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'गंदगी भोजन' हेच राजम्याच्या बदनामीस बव्हंशी कारणीभूत असावे, असा आमचा कयास आहे. सबब,

राजम्याची बदनामी... इ. इ.

('गंदगी भोजन' म्हणजे 'मेस फूड', ही ट्यूब ती गूगल ट्रान्स्लेटरची लिंक उघडेपर्यंत पेटली नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी क्रोममध्ये एक विलक्षण अन अतिशय सोईची गोष्ट नोट केली का? नवीन प्रतिसादाकरता उजवीकडील स्क्रोल बारवर दोन पिवळ्या रेघा येताहेत. म्हणजे प्रतिसाद शोधायचे कष्ट पूर्ण वाचताहेत. Smile

* का आधीपासून ही सोय होती न मला आता कळतेय देव जाणे.
_________
नाही नाही जेव्हा कन्ट्रोल एफ १०:३३ वगैरे आपण घालतो तेव्हा त्या लायनी येतात Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शंभरेक वर्षापूर्वी लोकांची अंतर्वस्त्रं काय असावीत.
त्या काळात इलॅस्टिकचा वापर सर्रास नव्हता. नाडा वापरला जाइ असे दिसते.
पुरुष लोक पट्ट्यापट्ट्याची नाडा असलेली चड्डी घालत असावेत.
स्त्रियांच्या बाबत "साडी-चोळीचा आहेर " ह्या संबंधाने शरीरातील वरच्या भागातील अंतर्वस्त्राची कल्पना येते.
पण त्या काळात स्त्रियांचे दुसरे अंतर्वस्त्र काय असे ?
(पन्नासेक वर्षापूर्वी पाचवारी-सहावारीचा वापर किंचित वाढू लागला तेव्हा आतून नाडा असलेला परकर घालत असावेत.
पण नऊवारी वापरायची असेल तर परकर वापरता येणार नाही असे वाटते. त्यासाठी आतूनही दुटांगी वस्त्रच हवे.
)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आतून कोणतेही वस्त्र नसे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डायरेक नऊवारी???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

होय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझी आजी 'डायरेक नऊवारी' घालत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परकर- पोलक्यातल्या मुलींचे काय? की मुलांच्या लंगोटाप्रमाणे काही असे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात फॉर्मल जोडे (बूट) कुठे शिवून मिळतात कोणाला कल्पना आहे का? क्याम्पात अरोरा टॉवर्सजवळच्या गल्लीत पूर्वी मिळत असत, पण ते दुकान रस्तारुंदीकरणात गेल्याचे समजते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तो चिनी चांभार होता बहुदा, आता बसणारे बटबटीत टाके घालण्यापलिकडे काही करत नाहीत. वसंत सिनेमाशेजारी एक बोळात 'यशवंत फुटवेअर'(बहुदा) नामक दुकानात पुर्वी कस्टम जोडे मिळत होते, सध्या परिस्थिती माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोल मार्केट- एन डी ए येथे पूर्वी बूट बनवून मिळण्याची सोय होती. नळ स्टॉपजवळ आत कुठेतरी सोनावणी म्हणून एकाण्चे दुकान आहे. तिथेही पादत्राणे बनवून मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Interacting with Chinese journalists based in India, Modi said, “I would like to give a new terminology to my tomorrow’s meeting with the Chinese President. I call it ‘Inch towards Miles’. INCH is ‘India-China’, towards MILES is ‘Millennium of Exceptional Synergy’. I believe that tomorrow’s meeting will mark a happy beginning towards this goal of ‘Inch towards Miles’.”

असल्या ओळी मोदींना कोण लिहून देत असेल?

संदर्भ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असल्या ओळी मोदींना कोण लिहून देत असेल?

मास-कम्युनिकेशनची मुलं बसवली असतील कॅचफ्रेजेस बनवायला, पण आज 'Nixon goes to China' असे म्हणता यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती, पेजिनेशन (पानांची सूची) १..२..३ वगैरे एकदम खालती जसं आहे तसं वरतीही ठेवता येईल का? कारण बरेचदा माहीत असतं की प्रतिक्रिया २ र्‍या पानावर असणार आहे पण तिथवर जायला एकदम खालपर्यंत स्क्रोल करावं लागतं. अन इथे माऊस इतका मेंगळट आहे. मध्येच ढेपाळतो काय न काय न काय. जाऊ दे.
__________________
बसमध्ये एक मध्यमवयीन स्त्री मूक रडत होती. मला लाख वाटलं तिच्याशी बोलावं, तिच्या खांद्यावर थोपटावं, काहीतरी चीअर-फुल बोलावं पण जमेल तर ना Sad .... हिंमत कुठे होतेय हे सर्व एका अनोळखी व्यक्तीबरोबर करण्याची. आम्हाला बसमधून उतरताना ड्रायव्हरला खणखणीत धन्यवादही द्यायचा संकोच वाटतो. ..... तर इतकं धाडस कुठून होणार.

पण असे क्षण मिस झाले की चुटपूट लागून रहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(हिचा एक माझ्यावर भलताच विश्वास.)

जमतंय का पाहते. तोवर, कीबोर्डचं 'एंड' बटण दाबून काम होतंय का पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा नक्की Smile
_______
अगं ते "एंड" बटन दाबलं की स्क्रोल करावं लागत नाहीये. माझी समस्या सुटलीये. नको शोधत बसू. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत कॅटारिना किम्वा परवा ओरिसात आलेलं फायलिन वगैरे ही जी वादळं/hurricane/cyclone असतात त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असणार इतका उत्पात माजवतात म्हटल्यावर . ही ऊर्जा वापरुन विद्युतनिर्मिती वगैरेचे काही प्रयत्न ह्यापूर्वी झालेत का ?
वीज्ञिर्मिती करण्यामध्ये तांत्रिक अडचणी काय काय आहेत?
जिथे वादळं नेहमीचीच आहेत (अमेरिकेतील फ्लोरिडा सारखी राज्ये) तिथे काही संशोधन वगैरे सुरु आहे का ?
झालच तर ज्वालामुखीमधून सतत बाहेर येण्यार्‍या लाव्हामधूनही कितीतरी आउष्णिक ऊर्जा मिळवता येइल ना.
त्यासाठी काही पोर्टेबल यंत्रणा वगैरे बनवण्याचा प्रयत्न कुणी केलाय का ?
ह्या शिवाय गुरुत्वाकर्षण व मानवी प्रयत्न ह्यांची सांगड घालूनही कैक प्रकारे ऊर्जानिर्मिती करता येइल.
ह्यासाठी ह्यापूर्वी कुणी प्रयत्न केलेत का

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लहान असताना सह्याद्री वाहिनीवर सामाजिक वनीकरणची एक जाहिरात लागायची, मी जालावर शोधली कुठे सापडली नाही. तुमच्या पैकी कुणाला आठवते किंवा दुवा मिळेल काय?

जाहिरात :
खेडेगावातला प्रसंग
एका तरुणीला लग्नासाठी पाहुणे बघायला येतात, तरुणी आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असते. तीचा बाप तीला हाक मारतो, 'ए पोरी पाव्हणं आलं बघ..'
स्थळ ठरते, तिला तिच्या होणार्‍या नवर्‍याचे नाव घ्यायला सांगतात. ती उखाण्यातुन नाव घेते आणि उखाण्याचा शेवट, 'जळणाला लाकुड, गुरांना चारा घरच्या घरी..सामाजिक वनीकरण येता दारी' असा काहीतरी होता.

~यन्त्रमानव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय होय! आठवतेय! दुवाबिवा नाही, पण नीटच आठवली जाहरात!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पोरी ये पोरी, पाव्हणं आलं बघ....
खरंतर माह्या घरची लक्षमी व्हायची , पण मी हिला सून म्हणून आणली, ही साधी लक्षमी न्हाही , वनलक्षमी हाये वनलक्षमी !!
गुरांना चारा, जळणाला लाकूड, गाठीला पैका घरच्या घरी.. सामाजिक वनीकरण येता दारी !

फेसबुकावर सापडले. चित्रफीत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडंस चुकलय...
पोरी ये पोरी, पाव्हणं आलं बघ....
खरंतर माह्या(माह्याऐवजी इथे काहीतरी वेगळा शब्द आहे) घरची लक्षमी व्हायची ,
पन म्या हिला पसंत केली, अवो ही नुस्ती लक्षमी न्हाय, वनलक्षमी हाये वनलक्षमी !!
जळणाला लाकूड, गुरांना चारा,
गाठीला पैका घरच्या घरी.. सामाजिक वनीकरण येता दारी!

आणि ती पोर सवंगड्यासोबत नसते; झाडांपाशी काहीतरी करत असते. आणि हाक बाप नाही आई मारते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'माह्या घरची लक्ष्मी व्हायची लै पोरींची इच्छा' असं कायतरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'माह्या घरची लक्ष्मी व्हायची पैकेवाल्या पोरींची लै इच्छा' असं होतं बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां रैट! Biggrin
'खरंतर माह्या घरी यायची पैकेवाल्या पोरींची लै इच्छा, पन म्या हिला पसंद केली'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महात्मा गांधी: ज्याचे विचार, बोल नि कृती यांत हार्मनी असते तो खूप सुखी असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उदा. हिटलर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाकाहारी होता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि चित्रकार पण...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय योगायोग बघा. शाकाहारी होता म्हणे!! १९३८ पासून ते १९४५ पर्यंत व्हेज होता. म्हणजे जेव्हा ज्यूंचे हत्याकांड सुरू होते तेव्हाच! उद्बोधक योगायोग, नै?

विकी लिंकः http://en.wikipedia.org/wiki/Adolf_Hitler_and_vegetarianism

हिटलरची एक कुक अजून हयात आहे, ती म्हणते की तो बेचव शाकाहारी जेवणच जेवायचा.

http://indiatoday.intoday.in/story/hitler-never-ate-meat-always-had-blan...

हा प्राणी दारूशिग्रेटीस देखील शिवत नसे म्हणे!

शिवाय कंबोडियात २० लाख माणसे मारणारा पोल पॉट नामक हुकूमशहाही व्हेज असावा हा एक रोचक योगायोग.

http://en.wikipedia.org/wiki/Pol_Pot

आहे की नै मज्जा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विवेकानंदांना मांसाहार आवडत असे असं ऐकलेलं आहे. चू.भू.द्या.घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोहनदास करमचंद गांधी, जॉर्ज बर्नार्ड शॉ, लिओनार्दो द व्हिंची हे सोयीनं विसरलेले दिसताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे शाकाहारी भूतदयावादी असतात असा दाव है म्हणे! मनुष्य हा प्राणी आहे हे त्या भूतदयेकर्‍याला मान्य नसावे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंगळाला 'मॉम' मिळाली - नरेंद्र मोदी

मोदी यांनी आपल्या भाषणात मंगळाला आज 'मॉम' मिळाल्याचे सांगितले. मॉम कधीही कोणाला निराश करीत नाही, अशी कोटीही त्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

देशाच्या पंतप्रधानाला कोट्या करण्याचा मोह आवरत का नाही? की कोट्या करण्यानंच त्यांची लोकप्रियता वाढत राहते? (पक्षी : 'व्हॉट्सअ‍ॅप'वर फिरू शकतील अशा शाळकरी कोट्या करणारा पंतप्रधान भारतीय जनतेला आवडतोय का?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नरेंद्र मोदी हे राजकारणातले शारुक खान आहेत असं मत झालं आहे.

(पक्षी : 'व्हॉट्सअ‍ॅप'वर फिरू शकतील अशा शाळकरी कोट्या करणारा पंतप्रधान भारतीय जनतेला आवडतोय का?)

एकदम वागळे स्टाइलमधे प्रश्न विचारला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरेंद्र मोदी हे राजकारणातले शारुक खान आहेत असं मत झालं आहे.

----/\----
.
.
.
एकदम वागळे स्टाइलमधे प्रश्न विचारला आहे.

Biggrin
----/\---- ----/\---- ----/\----

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ठ्ठो ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समीक्षकाने भाषणाचा क्रक्स, अविर्भाव सोडून इतकी एकांगी समीक्षा करावी हे समीक्षाक्षेत्राचं दुर्दैव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शाळकरी कोट्या ठीक वाटत आहेत. मात्र ही अशी वाक्ये ('बुद्ध हसला' या धर्तीवर) स्मृती इराणींनी शालेय अभ्यासक्रमात लावू नयेत एवढी मात्र अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वेच्या आणि पश्चिमेच्या कॉस्मिक तत्त्वज्ञानात काय फरक आहे ते मोदींनी जाता जाता सांगीतले. ते मात्र घालायला पायजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद योग्य त्या धाग्यात हलवला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रश्न कोणालाही अगदी बेसिक आणि फालतू वाटू शकेल, पण.

क्रिकेटमधे नो बॉल आणि वाईड बॉल एकाच वेळी झाल्यास काय करतात? असा मुळात होऊ शकतो का ? (असावा असे वाटते, कारण पाय रेषेपुढे पडून बॉल टाकला की नो बोल आणि असा बोल वाईड जाऊ शकतो)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंधुक आठवण :- नो बॉल देतात.
संदर्भ :- क्रिडा ज्ञानकोश हे पुस्तक.
प्रकाशक राजहंस प्रकाशनचे खाडिलकर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असं होऊ शकतं. झालेलं पाहिलं आहे. नो-बॉल देतात बहुदा. आणि एकच रन मिळते. आणि फुडला बॉल फ्री-हीट. नो बॉल देतात कारण ओव्हरस्टेपींग आधी घडतं बॉल वाईड असण्याच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

If a ball qualifies as a no ball as well as a wide, the umpire will call it a no ball instead of a wide, and all the rules for a no ball apply.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढे निसटून बॉल सीमापार गेला तर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

generally that means 4 wides are scored...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंजे चार वाईड आन एन रन नो बॉलचा? टोटल पाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाय नाय -

४ नोबॉलचे रन मिळतील फक्त. वाईडचा रुल अप्लाय होणार नाही जर नो बॉलही असेल तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जोशीशेठ बरोबर म्हणतायत. १ नो बॉलचा अन आणि ४ बाईज/वाईड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकाच माणसाला गोळी घालून मारलं आणि त्यानंतर त्याला फाशी दिलं तर काय होईल? तसंच काहीसं. एकदा नो-बॉल झाला की त्याला वाईड म्हणण्याची त्याची औकाद रहात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही बॅत्समॅन तंतोतंत सेंटरला असले तर कोण रन ऑउट होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अं?
नै समजले. ज्या बाजुची विकेट उडवली आहे त्या क्रिझमध्ये पोचायचा प्रयत्न करणारा व पोचु न शकलेला आउट होतो.

दोघेही एकाच दिशेला धावत असताना त्याच बाजुला कोणी आउट केले तर कोण रन आउट होते? का दोघेही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोघेही एकाच दिशेला धावत असताना त्याच बाजुला कोणी आउट केले तर कोण रन आउट होते? का दोघेही?

हे थोडं गोंधळात टाकणारी घटना असते. यावरून वादही होतात. थर्ड अंपायरला सांगाव लागतं की नक्की कोणाला आऊट दिलय ते. दोघही कधीही आउट होत नाहीत. आउट एकच होतो. जो जास्तं क्लीअरली त्या दिशेला पळतोय तो आउट.

अवांतर: आऊट हा शब्द एकदाही बॅकस्पेस न देता लिहिता येतो का गमभन मध्ये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

The batsman can be judged run out when he is closest to the end where the wicket has been put down by the opposition and no other batsman is available inside the crease of the same end.

दोघे एकाच जागी असतील तर असा गाढवपणा करणार्‍यापैकी कोणत्याही गाढवाला परत पाठवल्यास काय फरक पडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

aaooT

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते 'ऑट' अस दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा निर्णय बहुधा अंपायरच्या मर्जीवर ठरतो.

म्हणून अशा प्रसंगात सहसा कमजोर बॅट्समन आपण 'त्या' क्रीजकडे धावतोय असा देखावा करून स्वत:ला बाद ठरवून घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुळातली घटना आणि मंजुलचे हे कार्टून सामान्यांची संवेदनशीलता हरवत चालल्याचे उत्तम उदाहरण ठरावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संवेदना हरवली असं म्हणावं असं मूळ घटनेत काय आहे? व्हिडिओ काढणं तेव्हाच गैर आहे जर तो व्यक्ति त्यावेळी मदतीचं दुसरं काही करू शकला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

व्हिडीओ काढण्यात नेहमीच काहीतरी असंवेदनशील किंवा विकृत असते असे नव्हे. कोणतेही अघटित समोर दिसत असले आणि ते रेकॉर्ड करुन ठेवणे शक्य असले तर सहजप्रवृत्तीने ते टिपले जाते.

दुर्घटना टिपण्याचा उद्देश काही का असेना, पण त्या फूटेजचे बरेच फायदे होतात. विमान अपघातांच्या बाबतीत तर हे अतिशय मोलाचं ठरतं. एरवी सीसीटीव्ही कॅमेरे तरी कशाला लावले जातात चौकाचौकात अन बिल्डिंगबाहेर? काहीतरी दुर्घटनासदृश घडले तर त्याची नोंद व्हावी म्हणूनच ना? बागेतल्या फुलांचे किंवा चौकातल्या पुतळ्यांचे वरचेवर व्हिडीओ बनावेत म्हणून तर नाही ना सीसीटीव्ही कॅमेरे लावत?

आत्ताच्या वाघाच्या हल्ल्याच्या फूटेजमधून शिकण्यासारखी किमान एक गोष्ट तरी आहे की अश्या प्रसंगी वाघाला दगड मारुन आणखी बिथरवू नये. दगड बसताक्षणीच वाघ खर्‍या अर्थाने निर्णायकरित्या आक्रमक झालेला दिसतो. भले दगड मारणार्‍या बघ्याचा उद्देश चांगला का असेना.

जरी सद्य घटनेतली व्यक्ती गतिमंद असल्याचे ऐकण्यात येत असले तरी सर्वसामान्यांसाठीही मुळात हा व्हिडीओ बघून एकतरी मोठ्ठा धडा मिळतोय की वाघसिंहांच्या खड्ड्याजवळ, हौद्याजवळ, कुंपणाजवळ वावरताना जपून आणि दूर रहावे. डोकावणे किंवा जवळून फोटो काढणे आदि धाडस करायला जाऊ नये. व्हिडीओ सर्वत्र पसरलाय त्यातून २५% लोक जरी इतपत शिकले तरी फायदाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यस्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

संवेदना हरवली असं म्हणावं असं मूळ घटनेत काय आहे?

एवढे लोकं, गार्ड कोणीही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असं चित्रफितीत दिसत नाही, अगदी कपडे काढून वाघाच्या तोंडावर टाकले असते किंवा बेल्ट किंवा चपला, बुट काहीही चाललं असतं, डार्ट उपलब्ध नाही हे शक्य मानलं तरी गार्डने वाघाला जेवण देण्याच्या अमिषाने दुसरीकडे बोलावलं असं होऊ शकलं असतं.

वाचवण्याचा कुठला प्रयत्न तुम्हाला चित्रफितीत दिसला?

@गविंच्या मुद्द्याशी सहमत आहे, माझा आक्षेप चित्रफित काढण्याला नाहिये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गार्डनी प्रयत्न केलेला. पण त्यांना प्रशिक्षण नव्हते. स्थानिक बातम्या तशा आहेत.
---------------
बाय द वे, हा झू आणि हा वाघ मी तीनदा पाहिला आहे. तिथे वाघाच्या समोर जाणं खरचं कठीण आहे. हा माणूस कसा गेला देव जाणो. मंजे १०-१५ फूट खोल ट्रेंचमधे उडी मारून पलिकडे गेला असणार. तो नुसता अलिकडे पोहत राहिला असता तर दोरिने बाहेर काढला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

परवाच अजोंनी एक भारी डायलॉग मारला.
मला खरोखर आवडला. ननिंनाही आवडण्याची शक्यता वाटते.
तुमची मतं कळवा.
हा तो डायलॉग :-
ज्ञान साठवण्याच्या साधनांचा शोध लागल्यापासून लै लोचा झालाय. मोठमोठ्या लोकांना सकाळसकाळी महाज्ञान सुचतं. आणि ते सालं मानवतेच्या सार्‍या पिढ्यांना नंतर झेलावं लागतं.
ज्ञान झेलावं लागणे, ही संज्ञा भारिच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>ज्ञान साठवण्याच्या साधनांचा शोध लागल्यापासून

म्हणजे भाषेचा आणि पाठांतराचा शोध लागल्यापासून? मग तर तो लोचा लै पुरातन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग तर तो लोचा लै पुरातन आहे.

इस में कोई शक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषेमुळे ज्ञान साठते हे खेचून आणलेले कोरिलेशन आहे. अभिव्यक्त नसल्या तरी संकल्पना माणसाच्या डोक्यात भाषेपूर्वी असणारच. आईला आई म्हणत नसतील पण कंसेप्ट तोच असेल.
-------------
पाठांतराचा शाप (हलके घेणे) भारतालाच होता. जगात अन्यत्र पाठांतराने डोक्याचे दही कुठेच झालेले नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars