अमेरीकेतील सायकल शर्यत- भारतीय सायकलपटू!

अमेरीकेत होणार्‍या रेस अक्रॉस अमेरीका या ३००० (होय, हजार) मैल सायकल शर्यतीत सुमित पाटील नावाच्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे. भारतात असाल तर याबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल. शर्यतीदरम्यान होणार्‍या खर्चाकरीता सुमितला आर्थिक मदतीची गरज आहे. या धाग्याचा उद्देश केवळ त्यांची मदतीची हाक अनेकापर्यंत पोहोचवण्याचा आहे. मदत करण्याकरता किंवा आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या दुव्यावरती संपर्क करावा.

https://www.indiegogo.com/projects/india-at-race-across-america-2014

सुमित यांच्या सहकार्‍यांना मराठी संस्थळांवर माहिती पसरवण्याची सुचना मी केली आहे. त्यांना केव्हा वेळ मिळेल ते सांगता येत नाही. (बहुतेक त्यांनी अनेक संस्थळांवर खाती उघडलेली आहेत.) पण संस्थळावर येऊन त्यांना चर्चेत सहभागी होता येईल का नाही याबद्दल मला शंका आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुमित पाटील नावाच्या भारतीय खेळाडूची निवड झालेली आहे

निवड झाली आहे यातून नक्की काय अर्थबोध घ्यायचा आहे ते कळले नाही. रेस अक्रॉस अमेरिका संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन अशी लिंक आहे. माझीही 'निवड' होऊ शकते असे दिसते. (चू.भू.द्या.घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी माहिती ऐकिव आहे, पण क्वालिफायर्स मधूनच प्रवेश मिळतो असे दिसते.

एक संदर्भ. http://www.outlookindia.com/article.aspx?287323

"What was the qualifier like?

I qualified by completing UltraBOB, a RAAM qualifying event in Bangalore. I finished the 601-km Bangalore-Ooty-Bangalore via Kalahatti climb in 32 hr 30 min to qualify."

अधिकृत संस्थळावरून; http://www.raceacrossamerica.org/raam/raam2.php?N_webcat_id=229

"All solo racers must “qualify” to race RAAM. Following are the ways in which a solo racer may qualify for RAAM: "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile