Skip to main content

रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे

नमस्कार मंडळी,
ऐसी अक्षरेवर पहिल्यांदाच माझी चित्रे देत आहे. कलर्ड पेन्सिल्स हे माझे अतिशय आवडते माध्यम आहे. खालील चित्रांसाठी मुख्यत्त्वे फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स वापरल्या आहेत.

कमंडलू: (faber castell colored pencils on A4 size 130 gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com)

काचेच्या गोट्या रेखाटण्याचा हा माझा पहिला प्रयत्न होता.5 &1/2" x 7" on 94 gm2 acid free paper with a pack of Faber Castle colored pencils. गोल आकार हाताने काढल्याने थोडे गडबडले आहेत.

चिमणी: २४ शेड्सचे फॅबर कॅसल पेन्सिल्सचे पॅक वापरुन रेखाटलेले हे पहिले चित्र. Ref photo courtesy: श्री. सुभाष जोशी. ठाणे.

मिसळपाव Sun, 13/04/2014 - 22:21

रेखाचित्र अप्रतिम आहेत! अतिशय छान.

".....गोल आकार हाताने काढल्याने थोडे गडबडले आहेत....."

काहि हरकत नाही आम्ही समजून घेउ! असं काहि लिहू नका हो, आमचा न्यूनगंड अजूनच वाढतो! आणि अशा काचेच्या गोट्या बरोब्बर वर्तुळाकार नसतात. खोडच काढायची तर मी म्हणेन काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं. चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते. बघत रहावीत अशी चित्रं आहेत ही. आय होप तुम्ही अजून कलाकृती सादर कराल....

(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)

वर्षा०७१४ Mon, 14/04/2014 - 12:45

In reply to by मिसळपाव

>>काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं.
हे चित्र मी पावसाळी हवा असताना त्यातल्या त्यात उजेड असलेल्या दिवशी खिडकीच्या चौकटीत गोट्या ठेवून काढलं होतं. त्यादिवशी प्रतिबिंबात साधारण इतकीच छटा दिसली होती. :)
>>चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते.
ह्म्म. शक्य आहे. चित्र पुन्हा तपासून बघीन.
>>(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)
हो.चालेल की.

मी Mon, 14/04/2014 - 13:30

चित्रे छान आहेत, चिमणीचे चित्र मनातल्या/आठवणीतल्या प्रतिमेवरुन काढले आणि मग चिमण्या बघत बघत तपशील पुर्ण केले आहेत काय?

ऋषिकेश Mon, 14/04/2014 - 13:36

In reply to by मी

तसे नसावे. त्यांनी मुळ छायाचित्र

Ref photo courtesy: श्री. सुभाष जोशी. ठाणे

यांचे असल्याचे दिले आहे. तेव्हा चित्र या छायाचित्रावरून काढले असावे.

वर्षा०७१४ Mon, 14/04/2014 - 16:08

In reply to by आदूबाळ

रंगीत पेन्सिलींचं रेखाटन खोडरबराने खोडून कागद पूर्ववत पांढरा मिळवता येत नाही. पण चित्रात रंगछटांचे इफेक्ट्स देण्याच्या दृष्टीने अगोदरच रंगवलेल्या भागातील अतिरिक्त रंग उचलण्यासाठी नीडेड इरेजर वापरता येते.

सानिया Tue, 15/04/2014 - 03:38

आवडली. अजून काही चित्रं पहायला आवडतील.

अजो१२३ Wed, 08/04/2015 - 20:37

मला चित्रकला मुळीच येत नाही पण आम्ही प्रत्यक्ष हातात कमंडलू घेऊन आलो तरी लोकांना तो इतका परफेक्ट दिसणार नाही याची खात्री आहे. जबर्‍याच!

पिवळा डांबिस Wed, 08/04/2015 - 23:46

सुरेख!!!!!
काय कला आहे तुमच्या बोटांमध्ये! आम्हाला एक रेघ काही सरळ मारता येत नाही.
अजून टाका हो तुमची चित्रं इथे!

मिसळपाव Thu, 09/04/2015 - 03:06

त्या मला वाटतं ईथे फिरकत नाहीत. पण त्यांच्या फेसबुक पेजवर डोकाउन या - अजून मस्त चित्र आहेत. मेपल लिफवरचे पाण्याचे थेंब आणि सफरचंद खास आहे अगदी.