अवसानघाताचे प्रकार

पुलं देशपांडे यांनी "काही नवे ग्रहप्रयोग" नावाचे एके अफलातून प्रकरण लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी जीवनात घडणार्‍या मजेशीर गोष्टींची सांगड ग्रहांशी, ज्योतिषाशी घातली आहे. हे प्रकरण आठवण्याचे कारण - "सर्वसाक्षी" यांनी "हेलिकॉप्टर" या लेखात नमूद केलेले एक विनोदी वाक्य ते म्हणजे - विशेषतः आपल्याला घाई असतानाच पोराची चड्डी ओली झालेली असते आणि ती बदलत बसावे लागते. हे वाक्य वाचून मी खूप हसले. परिस्थितीजन्य विनोदाचे उत्तम उदाहरण आहे हे.
अशी काही उदाहरणे आपल्याला आठवतात का पहा. म्हणजे अवसानघाताची, फजितीची, मार्मीक, विनोदी वगैरे वगैरे.
सुरुवात मी करते. अवसानघात, मुस्कटदाबी किती प्रकारे होऊ शकतो -
(१) मगासचेच उदाहरण आपल्याला घाईघाईत बाहेर जायचे आहे आणि पोराची चड्डी ओली होणे. म्हणजे परत ती बदलत बसा.
(२)ऑफीसात नेट ब्राऊझ करायला आपण सुरुवात केली रे केली की इतका वेळ शांत असलेला आपल्या खुर्चीमागचा ट्राफीक कसा काय चालू होतो देवाला ठाऊक. आपण चोरट्यासारखे कधी विंडो मोठी कर कधी छोटी कर - मोठी कर कधी छोटी कर.
(३) नणंद तिच्या नवर्‍याचे दोष आपले कान किटेपर्यंत सांगते. आपल्याला मात्र तिच्याच भावाचे दोष सांगण्याची चोरी. हे एकतर्फी शेअरींग भयंकर कंटाळवाणे होते.
(४)शेंगदाणे खात असताना नेमका शेवटचा शेंगदाणा खवट निघतो. ती कडू चव जाता जात नाही.
(५)आपण नुकतच बार्बी कल्चरविरुद्ध एक "इंटुक" लेख वाचलेला असतो. त्याच "ईंटुक" पातळीवरून आपण आपल्या मुलीला समजावत असतो की "बार्बी कल्चर घरात नको". सोफ्यावर तंगड्या पसरून बसलेला नवरा खो खो हसत , अतिSSSशय खवचटपणे म्हणतो - "आपल्या घरी बार्बी कल्चर नाहीच आहे ग Wink खी: खी:" (फोडच करून सांगायची तर - You are far cry from being a perfect dolllike woman. ). बरं आत्ताच "ईंटुक" लेख वाचला असल्याने आपल्याला नवर्‍याचं हे वाक्य बोचायला नको पण ते जिव्हारी लागतं आणि आपली बार्बीबाबत नक्की काय भूमिका आहे हाच प्रश्न सामोरा आल्याने भंजाळल्यासारखे होते. I hope I make sense. म्हणजे घरात "बार्बी कल्चर" तर नको पण नवर्‍याला तर बार्बी वाटलो पाहीजे ...... something of that sort
तर असा हा ५ वा भंजाळलेला अवसानघाताचा प्रकार.

सध्या तरी एवढेच आठवताहेत. वाचकांनी भर घालावी ही विनंती.

field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

मस्त.. प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. टोल नाक्यावर, ट्रॅफिक जॅम मध्ये, बिल कौंटरवर, आपण जी रांग सोडतो, नेमकी तिच लवकर संपते.
२. आपण घाईत असतो, लिफ्ट कॉल करतो, लिफ्ट पटकन येत नाही, आपण जिन्यात शिरतो आणि लिफ्टचा बिप एकू येतो.
३. खूप मेहनत करुन आपण मराठीत प्रतिसाद टंकतो आणि पेज रिफ्रेश होते/मशिन बंद पडते, आणि नेमका हाच प्रतिसाद आपण कॉपी करून ठेवलेला नसतो.
४. सुट्टीच्या शनिवारी सुदैवाने एक सरकारी काम आठवते आणि नेमका तो दुसरा किंवा चौथा शनिवार असतो.

तुर्तास एवढेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईशप्पत मस्त!!! ३ र्‍या चा अनुभव आहे. कधी नव्हे ते आप्ल्या लेखणीत सरस्वती नृत्य करते आणि नेहेमीचे यशस्वी मुखदुर्बळ आपण मस्त मोठ्ठा प्रतिसाद टंकतो ...... प्रिव्ह्यू च्या वेळेलाच आप्ला कॉम्प्युटर बसतो किंवा मी तर चुकून हायपरलिंकच दाबते की नंतर बॅक दाबले तर कोरं पानच येतं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखादा चटपटीत , खुसखुशीत नावाचा लेख दिसावा..
त्या वर क्लीक करून वाचायला जावे ..
तर आत एखाद्या निरस विषयाचे निरूपण, विवेचन असावे ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

(३) नणंद तिच्या नवर्‍याचे दोष आपले कान किटेपर्यंत सांगते. आपल्याला मात्र तिच्याच भावाचे दोष सांगण्याची चोरी. हे एकतर्फी शेअरींग भयंकर कंटाळवाणे होते.

वाचून खूप हसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००६ सालची गोष्ट. मी आमच्या कुलसम्मेलनाला दापोलीला गेलो होतो. निघायच्या आधी, एक एसेलआर व एक कोडॅक क्रोमा अशा क्यामेरात रोल भरुन घेतले. दापोली/दाभोळ बन्दर येथे मनसोक्त फोटो एसेलआर ने काढले, कोडॅक क्रोमा पोराकडे दिलेला. बन्दरावर उभ्या नौकान्चा इत्का मस्त फोटो काढला म्हणून सान्गू तुम्हाला! एकसे एक फोटो, एकसे एक दृष्ये, एकसे एक पोझेस..... वा वा वा
परत घरी आलो. शेवटचा फोटो राहिलाय म्हणून पोराला सान्गितले की घराचाच काढ अन रोल सम्पव.
त्याचे दोन तिन वेळा फ्लॅश पडले तेव्हा मी चटपटून उठुन गेलो बघायला की क्यामेरा बिघडला की काय.
मी पण दोनतिन फ्लॅश मारले, शन्का आली, रिवाईन्डीन्ग करु लागलो. किती वेळ झाला तरी रोल सम्पल्याचा कट्टकिनी आवाज होईना, शेवटी घरात अन्धारात जाऊन मागले झाकण उघडले. अन कपाळाला हात लावला. कारण आत रोल नव्हताच!
घाईघाईत रोल भरताना केवळ कोडॅक क्रोमात रोल भरला गेला होता, या क्यामेरात रोलच नव्हता, अन आख्खा प्रवास भर मी बिन रोलच्या क्यामेराने समोरच्याकडुन पोझेस घेत घेत फोटॉ काढत होतो.
आख्ख्या ट्रीपचा खर्च "बरबाद" झाल्याची विषण्ण करणारी भावना मनात दाटली. पुन्हा त्या त्या व्यक्ती, ते ते प्रसन्ग घडवुन थोडीच आणता येणारेत? एकही फोटो नाही त्या ट्रीपचा! येवढी भयाण भीषण फजिती आजवर कधी झाली नव्हती.
बर तर बर, हे माझ्यापुरत राहिल नाही पोराटोरापासून लिम्बीपर्यन्त सगळ्यान्ना समजल की मी रोल न टाकताच फोटो काढत बसलो होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो,
ते मुद्दाम केलंत असं सांगून वेळ मारुन न्यायची ना..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हाहा. आई ग!!! बिच्चारे Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको रे बाबा.
मी काय बोयां नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0