१९८० नंतर जन्मलेल्या पोरांचा सॉलिड लोचा

गरवारे कॉलेज मध्ये असताना आमचा एक छान ग्रूप जमला होता .बर्याच वर्षानी आम्हि काही दिवसापुर्वि एक मस्त गेट टुगेदर केल. खाण -पिण आणि गगन भेदी गप्पा . सगळे साधारण २८ ते ३० या वयोगटातले .या गप्पांमध्ये मला आणि माझ्या एका मित्राला एक गोष्ट strike झाली की आमच्या गप्पांमध्ये खूप वेळा 'आपल्या वेळेस अस नव्हत ' हे वाक्य अनेक वेळेला repeat झाल होत ……. आईला ! भर तिशीतच आम्हाला nostalgia आला कि काय ? मला अस वाटत होत की हा निवृत्त झाल्यावर , सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून झाल्यावर पोरटोर मोठी झाल्यावर येणारी हि गोष्ट असते . कुठेतरी काहीतरी चुकत आहे खास.

म्हणजे अस पाहा . तेंडूलकर निवृत्त होत आहे. फेडरर उतरणीला ला लागला आहे . रहमान रहमानच राहिला आहे का असा प्रश्न पडला आहे . बाळासाहेब पण गेले. फेकू आणि पप्पू शी relate होता येत नाही . तिशीतच घर घेतलि. गाड्या आल्या . परवाच असाच माझा एक मित्र मला फोन वर उसासून म्हणाला ," झाल सगळ करून . आता पुढच्या आयुष्यात काय करू यार? whats next ?" मुक्त अर्थव्यवस्थेचा खंदा समर्थक असणारा मी पण जागतिकीकरण च्या या बाय प्रोडक्ट मधून आलेल्या प्रश्नाने भोवंडून गेलो . कमी अधिक फरकाने मी पण या complex चा शिकार होतोच कि .

१९९१ नंतर देशात जे वादळी बदल सुरु झाले त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ८० च्या दशकात जन्मलेली पिढी हि त्या जुन्या काळाची पण साक्षीदार आणि या भोवंडून टाकणाऱ्या काळाची पण वाटेकरी . एक उदाहरण द्यायचं झाल तर आम्ही पोस्टाने टपाल पण पाठवली आहेत आणि आता तितक्याच सहजपणे इमेल संस्कृतीचे पण वाटसरू बनलो . आई वडिलांची सरकारी नौकरी च सुरक्षित आयुष्य पण जवळून बघितलं आणि आताच्या अति असुरक्षित नौकरया तर आम्हीच करत आहोत . आम्ही शाळा सुटल्यावर मैदानावर जाऊन उन्हातान्हात खूप खेळलो आहोत आणि video games पण जाम खेळलो आहोत. स्वतःच घर -आंगण ते बंदिस्त flat संस्कृती हा प्रवास पण झरझर झाला . त्या अर्थाने आमची पिढी हि 'transition ' मधली पिढी . जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी . प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना आमची पिढी तिशीतच थकून गेली आहे . ऐन उमेदीतच आपल आता पुढे काय होणार या भीतीने कोकरासारखी दबून गेली आहे .

कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहित नाही पण social networking वर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांची status बघितलीत तर जाणवेल की ती प्रचंड nostalgic अस्तात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलोनी चे group बनवून तिथे ती लोक (आम्ही ) ते दिवस किती भारी होते आणि आता कस सगळ बोर होत चाललय असल्या चर्चा करत अस्तात. दोन पूर्णपणे वेगळी जग पाहिल्याच्या धक्क्यातून हि पिढी कधी बाहेर येईल असे वाटत नाहि.

आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच. पण स्थानिक, जागतिक बदल पचवून त्या बदलांचा भाग बनलेली पिढी हि एकमेवच . जागतिकीकरण मधून एकाकी करणाकडे चालणारा प्रवास या ८० च्या दशकात जन्मलेल्या पिढी बरोबरच संपेल बहुदा .

प्रत्येक पिढीला काही समस्यांचा सामना करावा लागतो. आम्हाला काही वेगळे करावे लागते असा दावा नाही पण lets give davil his credit . खूप पाहिलं रे तुम्ही पोरांनी लहान वयात असे कुणी मायेने तरी भरून पावल.

पण तरी तोच माझ्या मित्राने विचारलेला प्रश्न दशांगुळे व्यापून उरतोच . Whats Next ? कुठेतरी काहीतरी लोचा आहे खास.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

होताळॅप्टॉ ववा डेस्कटॉप उपलब्ध झाल्यावर अधिक टंकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली पिढी तशी शेवटची म्हणावी लागेल या बाबतीत-नेटपूर्व, ग्लोबलायझेशनपूर्व जमानाही आपण पाहिलाय आणि नव्या जमान्यात तर आहोतच. दुसर्‍या कुठल्या पिढीला हे कळणार नाय. आपल्या आधीच्या पिढीने बरेच बदल बघितले मान्य, पण आपल्याइतके फास्ट पेस्ड नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेच म्हंतो...डिट्टो.पण लोक यावर आयुष्य किती सुंदर आहे आणि ते कसे जगायला हवे याबद्दल 'ठेवणीतले ' प्रतिसाद देत आहेत ; )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

सोडा हो, तेही पिढीला साजेसेच आहे Wink

इतर पिढीवाल्यांनी जे फास्टवाले बदल पाहिले ते तिशीनंतर पाहिले. आपण मात्र विशीत व बेअरलि लीगल असतानाच पाहिले, तस्मात आपला नाद खुळाच आहे हे गौर(कृष्ण)तलब आहे हे सांगितलेच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे लिखाण कितपत प्रातिनिधिक आहे ते मी सांगू शकत नाही, कारण माझ्या आसपासची ८०च्या दशकात जन्मलेली आणि आता सुखवस्तू असलेली पिढी अजिबात नॉस्टॅल्जिक दिसत नाही. सतत नवनवीन ट्रेन्ड्स, नवनवीन गॅजेट्स, जगभरातलं खाणंपिणं, खरेदी, कसलंतरी सेलिब्रेशन ह्यांच्या उपभोगात ते मश्गुल आहेत. त्याबरोबर नोकरीधंद्याची असुरक्षितता यांना 'आता आपलं काय करायचं राहिलंय?' वगैरे (म्हणजे अस्तित्ववादी) प्रश्न पडू देत नाही. सतत स्वतःला अपडेट करत राहिलो, तरच आपण ह्या स्पर्धेत टिकू हे त्यांना पक्कं माहीत आहे. स्वस्थ बसणं त्यांना ठाऊकच नाही. मग असे अस्तित्ववादी प्रश्न पडण्याची वेळच येत नाही. त्यांच्या लेखी इतिहास ही संकल्पनाच गंमतीशीर आणि काही तरी एक्झॉटिक आहे. दोन वर्षांपूर्वीचा सिनेमा किंवा गाणं त्यांना भयंकर बोअरिंग आणि डेटेड वाटतं. मग नॉस्टॅल्जिया कसला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रातिनिधिक आहेसं वाटतं. आपल्या वेळी असं नव्हतं हा डायलॉग कधीच आपली सोबत सोडत नाही. कॉलेज सोडल्याबरोबर एक दोन वर्षात आपण जुने होऊन जातो. आपल्या वेळचा ग्रुप म्हणजे खूप भारी, आपल्यासारखा दंगा, मस्ती कुणीच केली नाही असा प्रत्येक बॅचचा समजा असतो. पूर्वी वीस वर्षांनी पिढी बदलायची, हल्ली ती बॅचबरोबर बदलते. पूर्वी वर्षानुवर्षे तेच ते फिल्मी देव ठाण मांडून बसलेले असायचे. राखी कितीही सुटली तरी मुख्य हिरॉइन असायची. आता एकेकाळच्या हॉट डेम सोनाली बेंद्रेला सुद्धा काम मिळत नाही. माझ्या मागच्या पिढीत दिलीप, देव, राज च्या आठवणी काढणारे काका, मामा लोक्स पाहीलेत. आत्ता चाळीसच्या जवळ गेलेली किंवा पार केलेली पिढी ही पण स्वतःला युनिक समजू शकते. या पिढीने स्थितीवादही अनुभवला , बदलाची सुरुवात पाहिली आणि बदलाचा झंझावातही पाहीला.

ही मध्यमपिढी मागच्या पिढीच्या दैवतांची, भावनांची जाणिव ठेवून आहे तर रूढ अर्थाने पुढच्या पिढीमधल्या बदलांची नोंद घेते आहे. पण त्याच्याशी रिलेट करू शकतेच आहे असं म्हणता येत नाही. आधीच्या पिढीचं आमच्या वेळी असं नव्हतं हे कौतुकाने ऐकणारी ही पिढी आता हा डायलॉग नव्या पिढीला झेपत नाहीये हे समजून घेते आहे. या पिढीने आईवडिलांची कडक शिस्त अनुभवली, पण मुलांना स्वातंत्र्य दिलेले आहे. चारचौघात अपमान करणारे बाप लोक या पिढीच्या वाट्याला आले पण पुढच्या पिढीला स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून आदराने वागवणारी पण हीच पिढी आहे.

गंमतीचा भाग हाच आहे कि पूर्वीही बदल होतच होते. सांस्कृतिक, आर्थिक , पर्यावरणविषयक असे सर्वच बदल होत असत. पण त्याचा ग्राफ एका सरळ रेषेत होता. १९९१ नंतर हा ग्राफदेखील बदलला आणि बदलाच्या वाय अ‍ॅक्सीज ला समांतर धावू लागला. आज ३५ ते ४० च्या मधे (किंवा थोडे पुढेमागे असलेलेही ) सर्व या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आम्ही कपिलदेवला खेळताना पाहीला. सुनील गावसकरला पाहीला. विंडीजचा आग ओकणारा भयप्रद असा तोफखाना पाहीला. इंग्लंडमधल्या कत्तली पाहील्या. संदीप पाटीलला खेळताना पाहीला आणि ऐन भरात असलेल्या इम्रान खान, इयन बोथम, रिचर्ड हॅडली या कपिलच्या समकालीन पण आजही ग्रेट असलेल्या ख-या खु-या अष्टपैलू खेळाडूंनाही पाहीलेय. त्ञाचबरोबर मागच्या पिढीतल्या खेळाडूंच्या कहाण्या तोंडपाठ असत हे ही आठवतं. म्हणूनच गॅरी सोबर्स, डॉन ब्रॅडमन, इयन चॅपेल, टोनी ग्रेग, ग्रेग चॅपेल, हॉल, पतौडी, अजित वाडेकर, गुंडाप्पा विश्वनाथ या सर्वांच्या पराक्रमाला दाद दिलीय.

१९८० च्या नंतरच्या पिढीचं काय म्हणणं आहे हेच कळत नाही. विविध ब्लॉग्ज, फोरम्स, वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या खाली असणा-या प्रतिक्रिया यात कपिलच्या १९८३ च्या टीमला शिव्या देणा-या प्रतिक्रिया पाहून सर्दच झालो. या पिढीला त्यांनी जे पाहीलं अनुभवलं तेच खरं, बाकि सब झूठ असं म्हणायचंच का ? माझ्या आजूबाजूला प्रत्यक्षात तरी असं कुणी दिसत नाही. पण नेटवरचं पब्लिक असं मॅडसारखं का वागत असावं ? कपिलने काय केलय देशासाठी ही एक प्रतिक्रिया मला या पिढीबद्दल सहानुभूती उत्पन्न करणारी वाटली. ज्या वेळी खेळात पैसा नव्हता, ज्या वेळी क्रिकेट हा गेम आणि त्याच्या टेक्निक्स पूर्णपणे आत्मसात केलेल्या नव्हत्या, क्रिकेट म्हणजे परदेशात हारणे आणि देशात जिंकणे असा समज होता त्या काळी कपिलने जिंकायची सवय लावली. जिगरी खेळ काय असतो त्याचं प्रदर्शन घडवलं. पाच विकेट पडल्यानंतर भारताची खरी बॅटींग सुरू होते असं आम्ही म्हणायचो. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकून भारताची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला लावणारा कपिल हा भारतीय क्रिकेटमधला एक पहिला ओरिजिनल गॉड आहे. आमच्याच पिढीने कोवळ्या सचिनला आणि परिपक्व सुनीललाही पाहीले. सुनील गावस्कर खेळत असताना कसोटी क्रिकेटचं वर्चस्व होतं. वन डे हा फॉर्मॅट अजिबात सिरीयसली घेतला जात नव्हता, दौ-यातही क्वचितच त्याचा समावेश असायचा. म्हणूनच वन डे च्या फॉर्ममधे खेळल्या गेलेल्या दुस-या वर्ल्ड कपमधे जेव्हां सुनील खेळला तेव्हां त्याने साठ षटकं खेळून काढत ३६ धावा केल्या होता. यात हसण्यासारखं काहीच नाही. कारण रिस्क घेणं हा अपराध समजला जायचा. आजच राहुल द्रवीडने सांगितलंय कि प्रशिक्षक हवेतून चेंडू मारल्यावर त्याला रागवायचे. जमिनीलगत मारलेला फटका हेच सर्वश्रेष्ठ क्रिकेट असं शिकवलं जायचं. तरी देखील श्रीकांत, संदीप पाटील सारखे खेळाडू गाजले ते ८३ च्या वर्ल्डकप नंतर भारतात वन डे लोकप्रिय होऊ लागलं तेव्हां. लोक या सामन्यांना गर्दी करू लागले आणि बीसीसीआय ने यातला धंदा हेरला. कंपन्यांनी हेरला आणि पुढचा वर्ल्डकप चक्क भारतात झाला. इथून पुढे खेळात पैसा येऊ लागला. प्रायोजक गर्दी करू लागले आणि क्रिकेट बदललं. मग स्टार खेळाडूंना कंपन्या करारबद्ध करू लागल्या. खेळाडू व्यावसायिक बनू लागले. इमेजची काळजी करू लागले. काहींनी तर चक मेडीया मॅनेजर्सही नेमले. क्रिकेट बदललं. मग एखादा म्हणू लागला कि आमच्या वेळी असं नव्हतं कि त्याची प्रचंड टवाळी होऊ लागली, कारण सगळं बदललंच तर होतं ना.

असेच बदल सगळ्या क्षेत्रात झाले. क्रिकेट हे वानगीदाखल. नाहीतर लेखांची मालिकाच लिहीत बसावं लागेल. या पिढीच्या निमित्ताने केवळ काही वर्षांचा फरक असताना आउटडेटेड झालेल्या एका पिढीचं म्हणणं या धाग्याच्या निमित्ताने मांडलं. चुभूदेघे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पिढीला स्वातंत्र्य मिळाले हा बदल क्रांतिकारी वाटला असेल. त्या पिढीतल्या दोन पाच टक्के सोडले तर इतरांना जगातल्या लेटेस्ट गोष्टींचे ज्ञान कितपत होते याबद्दल शंका आहे. तो काळ खडतर पण सुखाचा होता असं म्हणता येईल. अल्पसंतुष्टता ही इथे ठायी ठायी रुजलेली आणि अनावश्यक गोष्टी बाळगायच्या नाहीत याबद्दल अप्रिहार्यतेतून आलेली जाणिव यामुळे खर्च कमी होते. ज्यांच्याकडे गोधन, शेती होती त्यांचे बरेचसे खर्च मर्यादीत असल्याने पडेल त्या कामाला मिळेल त्या दरात ना नव्हती. या पिढ्यांनी पाया घातला खरा. जागतिक पातळीवर कितीही बदल झाले तरी देशांतर्गत परिस्थिती तशीच राहत होती. आहे त्या तुटपुंज्या उत्पन्नात या पिढीने खस्ता खात पुढच्या पिढीत गुंतवणूक केली. दुचाकी वाहन, टीव्ही, फोन, विमानप्रवास, पर्यटन या चैनीच्या गोष्टी होत्या. कमाई आणि या खर्चांसाठी लागणारी तजवीज यातलं अंतर प्रचंड होतं. कर्ज मिळत नसे. मिळालं तरी ते घेण्याकडे कल नसे. गावाकडचा एक मनुष्य शहरात यायचा, आपलं आपल्या कुटुंबियांचं पोट भरायचा आणि त्यातूनही पैसे वाचवून गावाकडे पाठवायचा. आईवडील, भाऊबहीण यांची जबाबदारीही अंगावर असे.

सत्तरच्या आसपास न्युक्लिअर फॅमिलीचा कन्सेप्ट विशिष्ट वर्गात लोकप्रिय झाला. त्याच्या फायदा तोट्यांबद्दल लिहीत नाही. वृद्धाश्रमासारखी एकेकाळी निषिद्ध ठरलेली संकल्पना रुजली. बायकांनी काम करणं समाजमान्य झालं. घरातले चार चार सदस्य कमावते होऊन बॅलन्स साठू लागला. पूर्वीच्या काळी चैन समजल्या जाणा-या गोष्टी आवाक्यात आल्या. जुन्या पिढीत आणि या पिढीत या खर्चावरून खटके उडू लागले. अजूनही पुढच्या पिढीने आपापलं पहावं हा कन्सेप्ट आला नव्हता. मात्र गावाकडच्या लोकांची जबाबदारी ही कल्पना मागे पडत चालली. याचा परिणाम म्हणून गावाकडच्यांनाही शेतीत रस वाटेनासा झाला. शहरातल्या आपल्या भावाप्रमाणे आपण, आपल्या मुलांनीही नोक-या कराव्यात ही इच्छा जोम धरू लागली.

याचकाळात जागतिकीरणाने काय झालं हे लेखात अचूकपणे शब्दबद्ध झालेलं आहे. पुढे काय या प्रश्नाला मागच्याच्या मागच्या पिढीची सामाजिक जाणीव हे चांगलं उत्तर होऊ शकतं. फीनिक्स, इनऑर्बिट, पिरॅमिड सारख्या मॉलमधे वेळ घालवताना सहजच पाच पाच हजार मौजमजेसाठी खर्च करणा-या पिढीला एखादं मूल दत्तक घेणे, एखाद्या सामाजिक संस्थेशी रिलेट होणे, आपलं गाव माहीत असल्यास त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे अशा ब-याच वाटा आहेत. पोटापुरतं पेक्षा बरंच काही मिळून हा प्रश्न पडत असेल तर हरकत काय आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

याच पिढीचा प्रतिनिधी आणि खोटं वाटेल पण याच अर्थाचा एक चर्चाविषय अर्धवट लिहून पडलेला आहे.
तुर्तास भावनेशी फुल्टू अनुमोदन आहे.

भारताने नव्वदीत आर्थिक सांधा बदलला. आणि नव्या सहस्त्रकात जगण्याची साधने, सुविधाच नाही तर जगण्याचा वेगच बदलला. एकेकाळी दोन पिढ्यांमध्ये असणारी 'जनरेशन गॅप' स्वतःमध्येच दिसत असते. तेव्हाचा 'तसा-मी' आणि आताचा 'असा-मी' यांच्यातले द्वंद्व सतत चालू असते - ते आधीच्या पिढ्यानाही भोगावे लागले असेलही -पण या बदललेल्या व्यवस्थेमध्ये हे द्वंद्व अधिक टोकदार झाले रोजच्या रोज जाणवते आहे हे खरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख छान आहे.

पण असे प्रत्येकच पिढीला वाटत असावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपली पिढी हि नशीबवान आहे आणि तिने खूप बघितले /सोसले आहे हा फेनोमेना जागतिक आणि सार्वकालिक आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम