"ऐसी" दिवाळी अंक... शंका आणि तक्रार
खालील दिवाळी मंडळींचे दिवाळी अंकातील धागे आवडले.
उत्पल
अवधूत डोंगरे
श्रीरंजन आवटे
अवधूत परळकर
स्नेहदर्शन
शैलेन
सानिया
.
ही मंडळी एरव्ही कुठे असतात?
इतकं भन्नाट फक्त ह्यांना दिवाळीलाच लिहिता येतय असं काही आहे का?
मला वाटणारी शंका. ऐसीवर व्यासंग , जाण प्ल्स उत्स्फुर्तता आणि दर्जा असणार्यांची कमी नाही.
ऐसीवरील ही नेहमीचीच यशस्वी मंडळी असवीत. वारंवार आपले नाव समोर कशाला दाखवायचे म्हणून म्हणा किंवा
सामान्य आपल्या ज्ञानाने दिपवून टाकण्यापेक्षा "इतरही असे जाणकार आहेत; मी ही तसाच एक." ही जाणीव करुन देण्यासाठी अंगभूत विनय म्हणून त्यांनी हे इतर आय डी घेउन लिखाण केलं आहे?
तसेही जयदीप चिपलकट्टी हा डु आय डी आहे असे परवाच कुणीतरी एका धाग्यावर म्हणाले आहेच.
.
थोडक्यात प्रश्न :-
तुम्ही डु आय डी आहात का? डु आय डी का घेण्यामागचा उद्देश काय?
डु आय डी नसाल तर तुम्ही इतकं भारी भारी एरव्हीसुद्ध लिहू शकताच. तुम्ही का लिहित नाही?
(एकदा लिखाणाचा व्यसन असलं की स्वस्थ बसवणं शक्य नाही. तुम्ही एरव्हीही लिहितं रहात असणं स्वाभाविक आहे. ते तसे दिसले नाही म्हणून शंका येते.)
--मनोबा
थोडक्यात उत्तर
थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर यापैकी कोणी डूआयडी नाही. काही जणांनी आधी ऐसीवर अल्प का होईना, लेखन केलेलं आहे. उदाहरणार्थ - शहराजाद, उत्पल, शैलेन, सानिया. काही नावं नवीन दिसतात याचं कारण जालावरती, किंवा जालाबाहेरून त्या व्यक्ती, त्यांचं लेखन आम्हा संपादकांना माहीत असतं. (डोंगरे, परळकर, कुंडलकर, तांबे इ.) मग त्यांचं लेखन मिळवण्यासाठी आम्ही त्यांना विनवणी करणं, त्यांचे लेख त्यांच्यासाठी टंकून देणं, दारासमोर जाऊन भिका मागणं, किंवा प्रसंगी त्यांचं मूल पळवून ओलिस ठेवणं वगैरे प्रकार करतो. त्यामुळे ते नाईलाजाने का होईना लिहिते होतात. आमची आशा अशी असते की त्यांच्या लेखनाला मिळालेला प्रतिसाद पाहून ऐसीवर त्यांचा वावर वाढेल आणि त्यांचं लेखन किंवा निदान त्यांच्या अधिकाराच्या विषयावर त्यांचे प्रतिसाद तरी आपल्याला वाचायला मिळतील.
आभार
प्रतिसादाबद्द्ल आभार.
ह्या मंडाळींचे किम्वा एकुणातच नियमितत follow करण्यासारखे जालावर आपणास काय काय वाटते ते इथे शेअर केलत तर बरं होइल.
रत्नाच्या खाणीत आम्हीही जरा नजर फिरवून घेउत.
शहराजाद उत्तमच लिहितात. कल्पना आहे.
उत्पल आणि शैलेन ह्यांचं पाहण्यात आलं नव्हतं फार.
उत्पल यांचं ऐसीवरचं लिखाण इथे
उत्पल यांचं ऐसीवरचं लिखाण इथे सापडेल. त्यांची विनोदबुद्धी भन्नाट तरल आहे. उच्च पातळीचा वैचारिक विनोद करण्याचं कसब अत्यंत अभावानेच कोणाकडे दिसून येतं.
शहराजाद यांचं इथे. त्यांना भाषेविषयी विशेष प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी अधिक लिहावं यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न करतो आहे.
शैलेन यांनी वरील लेखापलिकडे स्मरण हा लेख ऐसीवर आधी लिहिला होता. तो नुकताच बोर्डावर वर आला होताच. सुदैवाने त्यांच्या या दिवाळीच्या लेखाखाली क्रमशः आहे, तेव्हा त्यांच्या खजिन्यातून अजून काही मौलिक नाणी मिळतील अशी आशा आहे.
एकंदरीत ऐसीवर नियमित दिसणारे, अधूनमधूनच दिसणारे, आणि कधीच न दिसणारे अशा सर्वांकडूनच दिवाळी अंकाच्या निमित्ताने आम्ही लेखन मागवतो/मिळवतो. जे स्वतःहून लेखन करतीलच असं नाही, पण ऐसीवर त्यांची ओळख व्हावी, त्यांचे विचार कळावेत यासाठी त्यांच्या मुलाखती घेतो. हे केवळ दिवाळीपुरतंच न रहाता वर्षभर झालेलं आवडेल. मध्ये सुलभा सुब्रह्मण्यम यांचं लिखाण असंच मागवलं होतं. ऐसीच्या वाचकांपैकी कोणाला जर अशा कोणा गुणी लेखक/कलाकाराची माहिती असेल, तर संपादकांची वाट न पहाता मुलाखत घ्या असंच मी म्हणेन. यात काही सहाय्य लागलं तर संपादक मंडळ आनंदाने देईल.
ते माहितिये
ऐसीवरची त्यांची वाटचाल दिसते हो.
मी ही मंडळी आणि ह्यांच्यासारखे इतर मोती जालावर कुठं मिळतील ते विचारतोय.
नियमित आवर्जून वाचणयसारखं काय काय आहे?(जसं मी नियमित टाइम्स मधलं स्वामिनॉमिक्स वाचतो, गविंच्या काही प्रतिक्रिया आल्यात का, अरविंद कोल्हटकरांचे काही लेख आलेत का, थत्त्यांनी अशात
कुणाला मार्मिक टॉण्ट मारला का हे सगळं ऐसीवर नियमित शोधत असतो; तद्वतच जालावर फॉलो करण्यासारखं (शक्यतो मराठीत) काय काय आहे ? ते विचारतोय.)
अतिशय सुरेख दिवाळी अंक आहे
अतिशय सुरेख दिवाळी अंक आहे यावेळचा. अजून सगळा वाचला नाही. पण जनरल चाळला आहे. जेवढे वाचलेत ते सगळेच लेख उत्तम आहेत. संपादकमंडळाला मनःपूर्वक धन्यवाद (बाहेरच्या लोकांना आवर्जून निमंत्रण दिल्याबद्दल आणि एरवी फार न लिहिणार्यांकडून लिहून घेतल्याबद्दल)
सर्वांना शुभ दीपावली!
दिवाळी अंक पुरेसा काळ वरती
धन्यवाद.
दिवाळी अंक पुरेसा काळ वरती दिसेल याची प्लीज व्यवस्था करा राव, आरामात वाचायची गोष्ट आहे.
तशी व्यवस्था आहेच. उजवीकडे दिवाळी अंकाचं मुखपृष्ठ दिसतं त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ते मोठं दिसेल, आणि अनुक्रमणिकेचा दुवाही दिसेल. तिथून कुठचेही लेख वाचू शकता.
दिवाळी अंकातील लेख वाचायला
दिवाळी अंकातील लेख वाचायला सुरुवात केली ती अवधूत डोंगरे यांच्या लेखाने. इतरक लेख चाळलेत. जबरदस्त अंक आहे. जबरदस्त लिहीणारे लोक आहेत याची खात्री पटली. निवांत वाचून काढतो.