प्रेम - दोन कविता

कवयित्री - सुवर्णमयी

या उंच कड्यावर
उभारलेलं घर
कोसळेल
केव्हातरी

कुणी बुलडोझरचा
धक्का देईल तेव्हा
या छोट्या दगडांच्या
चित्राचं काय होईल?

न जुमानता
विखुरलेले
एका ठिकाणी
गोळा केले
नीट रचले

इथं नवं काही
होईलही
नव्या माणसांना
त्या वेळी या
दगडांकडे पाहून
काही कळेल का?

कसे असतील ते दगड
काय करतीत ते त्यांचं?

गृहित धरलेले
सर्व तुटते
दूर जाते
विसंगत दिसणारं
राहतं काही शिल्लक
अनपेक्षितपणे

प्रेमाचं हे
एक वास्तव आहे !

--

ती
धुरकट सावलीच्या सोबतीनं
ज्वालामुखी
बघते

अंधार्‍या गर्भातून
येणारा ध्वनी
कसा विरतो ते
ऐकते

त्या कल्लोळात
वाजणारी वाद्यं
खोटीच!
बेसूर भासतात ती

दूरवर
कोसळत असतो
टपावर
गच्चीवर
कौलांवर
तिच्या नावाचा
पाऊस
ताल धरून

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दोन्ही कविता आवडल्या. सध्या इतकंच नोंदवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन्ही कविता आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

छान आहेत. आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.

काही ठिकाणी ओळी तोडलेल्या जागा समजल्या नाहीत. उदाहरणार्थ :
> अंधाऱ्या गर्भातून
> येणारा ध्वनी
> कसा विरतो ते
> ऐकते

असे का नाही?
> अंधाऱ्या गर्भातून
> येणारा ध्वनी
> कसा विरतो
> ते ऐकते

समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडल्या. पहिली जास्त आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडल्या.

मोडलेलं दगडांचं चित्र ही प्रतिमा आवडली. एकावर एक सुसंगत ठेवलेल्या दगडांना तेव्हा त्या संगतीचा अर्थ असतो. मोडून तुकडे झाल्यावर तो विरतो. हे छान सांगितलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0