दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२१
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२५ जून
जन्मदिवस : लेखक जॉर्ज ऑर्वेल (१९०३), अणूकेंद्राचे शेल-मॉडेल सुचवणारा नोबेलविजेता हान्स येन्सन (१९०७), संगीतकार मदन मोहन (१९२४), पंतप्रधान व्ही. पी. सिंग (१९३१), लेखक व संशोधक सदानंद मोरे (१९५२), अभिनेत्री करिश्मा कपूर (१९७४), अभिनेता आफताब शिवदासानी (१९७८)
मृत्युदिवस : कवी, इतिहासाभ्यासक सत्येंद्रनाथ दत्त (१९२२), किसान चळवळीचे नेते समाजसुधारक सहजानंद सरस्वती (१९५०), रासायनिक खत उद्योगाचे शिल्पकार गोविंद पांडुरंग काणे (१९९१), अणुभंजनाचा पहिला प्रयोग करणारा नोबेलविजेता अर्नस्ट वॉल्टन (१९९५), समुद्रसंशोधक व ऑस्करविजेता सिनेदिग्दर्शक जॅक-इव्ह कूस्तो (१९९७), गायक, नर्तक मायकल जॅक्सन (२००९)
---
स्वातंत्र्य दिन : मोझांबिक (१९७५), स्लोव्हेनिया, क्रोएशिया (१९९१)
१७४० - बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवेपदी विराजमान.
१९३५ - भारताचा पहिला कसोटी क्रिकेट सामना सुरू.
१९४७ - 'ॲन फ्रँकची डायरी' प्रकाशित झाली.
१९५० - उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण. हे युद्ध १९५३पर्यंत चालले. २० लाख मृत. शीतयुद्धादरम्यानचा महत्त्वाचा संघर्ष. अद्यापही दोन देशांत डी-मिलिटराइझ्ड झोन.
१९६७ - कृत्रिम उपग्रहाद्वारे पहिला सार्वजनिक कार्यक्रम प्रक्षेपित.
१९७५ - भारताचे राष्ट्रपती श्री.फक्रुद्दीन अली अहमद यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शिफारसीवरून देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७८ - 'समलैंगिक स्वातंत्र्य दिन परेड'मध्ये सर्वप्रथम सप्तरंगी झेंडा झळकला.
१९८३ - भारताने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक जिंकला.
दिवाळी अंक २०२१
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
एकदा 'वाचली'. खरंतर पाहिली,
एकदा 'वाचली'. खरंतर पाहिली, किंवा अनुभवली असं म्हणता येईल. अजून अनेक वेळा अनुभवण्याची इच्छा आहे.
छापिल दिवाळी अंकापेक्षा
छापिल दिवाळी अंकापेक्षा वेगळ्या प्रकारचे माध्यम असल्याने, वेगळ्या प्रकारची, दर्जाची अनुभुती मिळावी अशी अपेक्षा आंतरजालावरील दिवाळी अंकांकडून असते. धनंजय यांचे असे प्रयोग अंकाला केवळ वाचनीय न ठेवता, प्रक्षणीय / अनुभवणीय करून ठेवतात.
मस्त प्रयोग आणि कविता! आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
च्यामारी
हापिसातून काहिच दृक -श्राव्य प्रकार जमणार नाहिये.
घरी जाइपर्यंत धीर धरावा लागेल बहुतेक.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
कविता किंवा दृश्य लघुनिबंध
कविता किंवा दृश्य लघुनिबंध, असे काहीही म्हणता येईल. कुठल्या विवक्षित नावाबाबत माझा आग्रह नाही.
अनुक्रमणिकेच्या सोयीसाठी "कविता" यादीखाली हा धागा घातला, ते चालण्यासारखेच आहे.
वर्गीकरणाबाबत फार मूलगामी चर्चेत जाऊ नये... म्हणजे जरूर जावे, पण माझ्याशी नव्हे
सांगायचे राहिले - संकल्पनाविषयक
सांगायचे राहिले - ही कृती दिवाळी अंकाकरिता संकल्पनाविषयक आहे.
रोचक प्रयोग
पहिल्यांदा शब्द मुंग्यांसारखे चालतांना वाटले. नंतर यंत्रातून पास्ता बाहेर पडत आहे असे वाटले. यांत्रिक-कंटाळवाणे. पण मग आणखी नंतर शब्द वाचल्यावर मजा आली.
प्रयोग
आधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे....
कृपया मुळ कविता नेहमी सारखी कोष्टकातपण देणार का? नाहीतर अवघड आहे आमच्यासारख्या दहा वेळा वाचून १ वेळा समजले असे वाटणार्या व पाव वेळा लक्षात रहाणार्याला?
दृश्य लय, गती आहे पण आवाज नाही आहे ना व्हिडिओ ला? का आमचे स्पीकर्स आज बगावत पे उतर आये है?
आवाज नाही, बरोबर
आवाज नाही, बरोबर.
रुंद कोष्टक बनवणे कठिण गेले
पुढचे शब्द वाचताना
पुढचे शब्द वाचताना मागची ओळ लक्षात नाही रहात, त्याकरता मूळ कविता दिसली पाहीजे ना माझ्यासारख्या वाचकाला.
शिवाय अती जलद गतीत वाचून पडलात, चक्कर आली, दुखापत झाली तर कवी तसे ऐसीअक्षरे जबाबदार नाहीत हा वैधानिक चेतावनी इशारा नको? अमेरीकेत कोणी स्यू केले म्हणजे?
राहवेना
म्हणून कविता ऐकण्याआधीची प्रतिक्रिया:
'स्यू'कर मेरे मन को, किया तूने क्या इसा१रा, बदला ये मौसम, इ.इ.इ.
१उच्चारसौजन्यः वसंते(कार्टे) रंग दे(बघू).
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाहव्वा
वाहव्वा...
झकास...
कल्पक.....
आताच पाहिला पहिला विडियो. हे असे सुचण्याचे कौतुक वाटते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मस्त
मस्त प्रयोग! ४-५ दा पाहिला. अजून बऱ्याचदा बघेन. सुंदर कल्पना.
धनंजय _/\_ कसं काय सुचत हे
धनंजय _/\_ कसं काय सुचत हे तुम्हाला!!! मस्त प्रयोग! भन्नाट कल्पना!
गेल्यावर्षीपण ज्या शब्दावर क्लिक केलय त्यानुसार पुढची ओळ येण्याची कल्पना भारी होती.
पण तरीही
आधीच कविता, त्यात प्रयोग , त्यावर धनंजय... अवघड आहे.... >> +१
छान च प्रयोग आहे!
वेगळ्या माध्यमामुळे, जे म्हणायचे आहे, ते 'दाखवून' देता येते, हे किती छान जमलंय, आणि विषयाची निवडही 'दाखवण्याजोगी', थोडी सुगम, थोडी दुर्गम अशी आहे.
आवाज येणे अपेक्षित आहे का? मला आला नाही.
तांत्रिकदृष्ट्या कसे साध्य करावे हे मला माहिती नाही, पण सध्या संपूर्ण पटलाच्या केवळ मध्यभागातील चौकोनात शब्द दिसत आहेत. जर ते जास्त दूरपर्यंत रांगेत दिसले असते, तर जास्त आवडले असते असे म्हणू का? कि एकावेळी ओळीतले केवळ ३-४ च शब्द दिसणे हाही कवितेचा एक भाग आहे?
एखादे वाक्य, एखादी तान, आपल्यासमोर उलगडतांना, पुढे काय आहे, ह्या विचारात श्रोत्यांना/वाचकांना गुंगवून ठेवणे, हे कलाकाराचे मोठेच कौशल्य आहे. तुम्ही तसे मुद्दाम दाखवले आहे, का नाही, हाही एक चर्चेचा विषयच होईल!
कलाकृतीचा 'संपूर्ण' अर्थ कळण्यात मजा नाही.
कुठल्याही कलाकृतीतली हीच मजा मला फार भावते, की कलाकाराला काय म्हणायचे असते, त्याकरता कलाकार कुठले निर्णय घेतो/घेते, पण बरेचदा अनवधानाने घेतलेले निर्णयही कलाकृतीला अधिक समृद्ध करून जातात.
धन्यवाद - (आवाज नाही)
धन्यवाद.
चित्रफितीत आवाज नाही - दृश्यमाध्यमच आहे या फितीत.
अगदी बाजूपासून आल्यास बरे दिसले असते, मान्य. काही नव्हे, तर मध्ये एक जाडसर रेषांची चौकट तरी हवी होती,आणि त्या चौकटीच्या कडेतून शब्द येऊ शकले असते.
तीन चारच शब्द दिसण्यामागील हेतू असा, की फक्त एकच आडवी ओळ वाचत जाण्याची नेहमीची क्रिया न होता सर्व ओळी वाचणे प्राथमिक व्हावे.