Skip to main content

काही अलिकडे काढलेली व्यक्तीचित्रे

संपादकाना विनंती - ही चित्रे मोठ्या स्क्रिनवर बघण्यात मजा असल्याने लांबी रूंदी संपादीत करू नये

प्रियदर्शिनी कुलकर्णी मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पं. विश्वजित रॉयचौधरी, मल्लिकार्जुन मन्सुर स्मृती समारोह, पुणे

पद्मश्री पं. सुरेश तळवलकर

तबलावादक रामदास पळसुले

ओजस अधिया, गांधर्व महाविद्यालय, पुणे.

केदार नाफडे, गांधर्व महाविद्यालय, पुणे.

मिहिर Mon, 16/09/2013 - 12:18

अवांतर: समारोह हा शब्द कार्यक्रमाच्या अधिकृत नावात होता? मला स्वतःला हा शब्द बराच खुपतो, हिंदी वळणाचा वाटतो. त्यातुलनेत समारंभ, सोहळा हे शब्द आवडतात.

चित्रगुप्त Mon, 16/09/2013 - 12:42

फोटो आवडले.
('काढलेली व्यक्तीचित्रे' यावरून असे वाटले होते की हाताने काढलेली (रंगवलेली) पोर्ट्रेट्स असावीत).

तर्कतीर्थ Mon, 16/09/2013 - 15:06

@मिहिर

मूळ समारंभाच्या नावात समारोह हा शब्द नाही. ते स्वातंत्र्य मी घेतले आहे. पण अशा अनेक गोष्टी भाषिक व्यवहाराच्याबाबत आपल्याला खटकतात. अलिकडे मराठीत रूळलेला "माझी मदत कर" हा प्रयोग हिंदींच्या प्रभावामुळे (मेरी मदत करो) असाच खटकतो. हिंदी भाषक पण आपले बंबय्या हिंदी ऐकुन खवळत असतील.

@चित्रगुप्त

तुमची शीर्षकावरुन जी दिशाभूल झाली त्याबद्दल क्षमस्व! पण चित्रे "काढली जातात" तसे फोटो पण "काढले जातात". पण तुम्ही योग्य पर्याय सुचवु शकता...

विसुनाना Tue, 17/09/2013 - 12:20

छान प्रकाशचित्रे. प्रियदर्शिनी कुलकर्णी व पं. सुरेश तळवलकर यांच्या चेहर्‍यावर तल्लीनतेचे भाव उल्लेखनीय.

एक शंका : तबलावादकांच्या डोक्यावर कुरळ्या केसांचे वलय असणे अनिवार्य आहे का? झाकीर हुसेन - विजय घाटे प्रभृती आणि इथे प्रकाशचित्रातले दोन तबलावादक तसे दाखवतात. एक सुरेश तळवलकरांचा अपवाद.

तर्कतीर्थ Tue, 17/09/2013 - 13:01

In reply to by विसुनाना

हिरोंची जीवनशैली वरील छाप (पेहेराव, वेषभूषा त्यात आपोआप आलेच) ही एक नॉर्मल गोष्ट आहे. :)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

राजेश घासकडवी Tue, 17/09/2013 - 17:37

व्यक्तिचित्रं आवडली. मात्र सगळीच चित्रं आडवी काढण्याऐवजी काही उभी शोभून दिसली असती असं वाटतं. विशेषतः तळवलकर आणि पळसुले यांची चित्रं.

तर्कतीर्थ Tue, 17/09/2013 - 19:11

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमची सूचना विचार करण्या जोगी आहे. पुढच्या वेळेस याचा विचार नक्की करीन.

सानिया Wed, 18/09/2013 - 18:41

प्रियदर्शिनी कुलकर्णी व पं. सुरेश तळवलकर यांची व्यक्तिचित्रं विशेष आवडली.