ब्लॉगीचे श्लोक

ब्लॉगाधीश जो ईश सर्वांगुणांचा।
मुळारंभ आरंभ संशोधणाचा।
नमूं नटवरा मूळ चौफेर चर्चा।
धंदा खरा हा महामानवांचा।।1।।

मना सज्जना ब्लॉगपंथेचि जावें।
तरी अंतरी खाजवितो स्वभावें।
जनी निंद्य तें सर्व ओतूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व फुल्यां घालावें।।2।।

प्रभाते मनीं ब्लॉग चिंतीत जावा।
पुढें वैखरीं ब्लॉग आधीं वदावा।।
अनाचार हा बौद्धिक सोडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो।।3।।

विनातर्क संदर्भ कामास ये रे।
मना सर्वदा फक्त बुध्दी नको रे।।
मनासी उगा नीति सांगू नको हो।
मना अंतरीं विचार अतिसार राहो।।4।।

मना सत्यसंकल्प विसरूनि जावा।
मना विकृतेतिहास पुन्हा वदावा।।
मला कल्पना काय बा वीषयांची।
ठोकूनि द्या हो जनीं सर्व ची ची।।5।।

असे रे मना तज्ञ मी क्रांतिकारी।
लावितो मनी शोध नाना विकारी।।
उठा रे मना क्षोभ हा अंगिकारूं।
चारेक पेगांत उधळतात वारू।।6।।

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें।
मना भव्य थापा मारु ते लिहावें।।
स्वयें सर्वदा अगम्य वाचे वदावें।
पहा सर्व लोकांसि रे गंडवावें।।7।।

प्रोफाइल त्यागिता किर्ति ब्लोगें उरावी।
मना सज्जना हेचि क्रिया धरावी।।
घडे लावणे शोध धादांत खोटे।
न होता मनासारिखें दुःख मोठें।।8।।

सदा सर्वदा प्रीति ब्लॉगे धरावी।
स्वत:ची स्तुति तोंड फाटे करावी।।
जनी दुःख तें सूख मानीत जावें।
ब्लॉगि काहिबाहि मात्र नचुकता लिहावें।।9।।

सदा सर्वदा ब्लॉग तुझा पहावा ।
ब्लोगे कारणी देह माझा पडावा।।
उपेक्षू नको ब्लॉगवंता अनंता।
ब्लोगुनायका ब्लॉगणे हेचि आता ।।10।।

।।जय जय ब्लॉगवीर समर्थ ।।

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

न्म्स्कार!
आपले विनंती पत्र मिळाले. लवकरच पुढील वर्षापासून आठवी ते बारावी या सर्व इयत्तात आपले वरील ब्लॉगीचे श्लोक अभ्यासक्रमात लावले जातील. इंग्रजी भाषेत भाषांतरीत केल्यास हे ब्लॉगीचे श्लोक इंग्रजी अभ्यासक्रमातही लावता येतील. सदरहू कारणासाठी तातडीने भाषांतरास लागावे ही विनंती.

राजे टोपी
शिक्षणमंत्री,
महा-राष्ट्र षासन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

अनुदिनि अनुतापे तापलों ब्लॉगराया |
परमदिनदयाळा नीरसी स्पॅममाया |
अचपळचि विचारू, नावरे ट्वीटवीता |
कुणिहि जन बघेना, ब्लॉग तैं धाव आता ||

ब्लोगाची शते ऐकता दोष जाती |
मतीमंद वीचारजिल्ब्या तळीती |
चढे पूर्णही दंभसामर्थ्य अंगी |
म्हणे दास तो कीर्ति आभासिं भोगी ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पूर्वी एका संस्थळावर टाकलेले हे श्लोक -

वदनी कवल घेता
नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म
जय जय रघुवीर समर्थ

च्या चालीवर -

संस्थळी प्रतिसाद देता
सौजन्य सांडूनच चाला
महाभारत होते सौजन्य सांडता फुकाचे
शब्दाने शब्द वाढे शब्द हे आगलावे
फक्त उद्दामपणा बास नोहे (धागाकर्त्याच्या) धोतरासच हात घाला
जय जय गेंडाकातडीधारक जनता समर्थ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0