ही साठफळांची कहाणी सूफळ कायम्चूर्ण!

जगप्रसिद्ध आहारात अज्ञ चिक्की केंटकीमध्ये तिच्या बगिच्यात मशागत केलेल्या लॉनच्या भोवताली शोभिवंत फुलझाडांची रोपे लावण्यात गढून गेली होती. आज ती "मज आणुनी द्या तो लॉनमोअर केंटुकीनाथाऽऽऽ" असे लडिवाळ स्वर, स्व. सुधीर फडके अगदी गहिवरून जातील इतक्या लाडिकपणे आळवत होती. तिच्या सख्ख्या शेजारी एक पांढऱ्या तोंडाचा टप्पू अमेरिकन बुढा चार्ली रहायचा. त्याच्या बगिच्यात तात्काळ फलोत्पादक झाडांची नेहेमीच रेलचेल असे. चिक्की बगिच्यात गात, बागडताना दिसताच तो आपले बागकाम सोडून भान हरपून पहात बसला. एकदा गायला लागली की चिक्कीची ब्रम्हानंदी टाळी लागे. ती कधी बेलीडान्स तर कधी साल्सा डान्सच्या स्टेप्स घेई आणि कधी हेजकटर अन् खुरपी धरून झांजा चिपळ्यासारखे बडवत बसे. तात्काळ फलोत्पादक बुढ्याच्या आश्चर्याने आ वासलेल्या पांढऱ्या तोंडात दोन हरणटोळ लपाछपी खेळत होते याचा त्याला पत्ताच नव्हता.

एक गिरकी घेऊन ठुमकत मुरडत चिक्की बसली तर तिच्या तशरीफच्या टोकरीखाली काही नव्या रोपांनी प्राण सोडला आणि पन्नासेक कुंड्या धारातीर्थी पतन पावल्या. मोहक आयुष्यातला बराचसा वेळ आंतरजालावर बागडण्यात जात असल्याने बसून बसून तिच्या फक्त मध्यप्रदेशाचा अप्रतिम विकास अवघ्या शून्य मंडळाला भेदू लागला होता. तिचा नवीन फोटू पाहून एक जालीय मित्र म्हणे तू आता आशा पारेखसारखे म्हणू शकतेस, "मै आपके पास बडी आस लेके आई थी." तरी तिच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही. कधीकधी तिला कपडे घालताना ते आपल्या पार्श्वभागाला गवसणी घालण्यास का तयार नसतात असे अॅबसर्डसुलभ प्रश्न पडत राहायचे. तर ते असो.

चिक्कीच्या घराजवळच्या तलावातल्या मगरी, तिच्या बगिच्याजवळच्या एका खड्ड्यात अंडी घालायच्या. चिक्की आता फुल्ल जोशात "हा भार सोसंना, जड झालंय पिकावानी, अंगात ज्वार भरल, तुज्या प्रितीच पाज पानी, चोंबडी पळाली तंगडी धरून " हे गाणे तार स्वरात गात वेगाने झाडांची कापणी करत होती. बागकामाचे ढोंग करत शेजारून पांढऱ्या तोंडाचा तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढा कॉकऽ कॉकऽ कॉक ऽ कॉक ची बांग देत ठेका धरत होता. आता तिच्या उर्वरीत मुडदूस देहाला अमर्याद नितम्बाचा भार सोसंना झाला तेंव्हा ते धप्पकन खड्ड्यात मगरीच्या अंड्यावर आपटलं. तिच्या अंगात ज्वर भरलं असल्यानं त्याच्या उष्णतेने लगेच मगरीच्या अंड्याची भुर्जी तयार झाली. चिक्की जगप्रसिद्ध आहारात अज्ञ असल्याने भुर्जीमधली पोषणमूल्ये जाणून घ्यायला ती घनव्याकूळ झाली आणि भान हरपून त्या खड्ड्यातच भुर्जी चघळत बसली.

तिथेच टपलेल्या पांढऱ्या तोंडाच्या तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढ्याला ती खड्ड्यात पडल्याचे दिसताच त्याने टुणकन प्राण पणाला लावून तिला खड्डयाबाहेर काढले आणि मुक्यानेच तिच्या तोंडाला चिकटलेली पोषक भुर्जी चाटुन घेतली. त्याच्या शुभ्र, चांगुलक्या दाढीमुळे गुदगुल्या होऊन चिक्की खुदुखुदु हसू लागली. इतक्यात एक कॅथलिक मगर तिच्या अंड्यांचा आढावा घेण्यास तिथे सुळकन पोचलीच. आपल्या अनौरस अंड्यांची विल्हेवाट भुर्जीद्वारे लागल्याचे पाहून तिचा जीव तळ्यात पडला. आता उजळ शेपटीने तळ्यात संचार करायला ती
मोकळी झाली होती. मगर पाहून भयभीत झालेला पांढऱ्या तोंडाचा तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढा, चक्रम चिक्कीला म्हणे, "हे क्रेझी चिक डू यू वॉन्ना डाय?" चिक्की फिसकन हसून म्हणे, "नाय बे गँडो, माझे केस अजून काळेचं हाय". यमक ऐकून पांढऱ्या तोंडाच्या तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढ्याची दातखीळ बसून त्याने आपल्या टकलावरून हात फिरवला.

प्रेमाने तिला आपला बगिचा दाखवला. चिक्की मोकाट चेकाळून भरपूर फळे तोडू लागली तसा बुढा खुश झाला. नंतर चिक्की नको नको म्हणत असतानाही त्याने आनंदाने चिक्कीच्या घरी भरपूर तात्काळ फलोत्पादक रोपटी लावून दिली. मग ते दोघेही थोडावेळ स्प्रिन्कलर्सच्या तुषारात 'गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी' खेळले. चिकट्राव फार्माशिष्ट संध्याकाळी घरी आला तर काय, त्यांचा सकाळी जेमतेम लॉनच असलेला बगीचा आता फळझाडांनी लद्बदला होता.तो इतका दचकला, चुकून भलत्याच घरी आलो की काय असं त्याला वाटलं. इतक्यात त्याला चिक्कीची चिरपरिचित चमत्कारिक आकृती दिसलीच. तिला पाहून त्याचा जीव नेहेमीप्रमाणे आगीतून फुफाट्यात पडला. नुकतंच लॉनमोअर खरेदीचं जीवघेण संकट टळलं असल्यान आनंदाच्या डोहात तरंगत असलेल्या चिकट्रावाला लदबदलेली फळझाडे पाहून कापरं भरलं. अरे देवा, आता या फळांचं करायचं तरी काय? त्याला नेहेमी संकटात पडायचीच सवय होती. कुठल्याही संकटातून सफाईने सोडविण्याचा मक्ता चिक्कीने घेतला होता. मग काय चतुर चिक्कीने लगेच जालीय जीवनाचा तात्पुरता त्याग करून त्वरित आहारशाळा उघडली. चिकट्रावाला सर्व फळे तोडून आहारशालेत आणण्याचं फर्मान सुटलं. तो हेलपाटे घालून टोपल्यांनी फळे आणून आहारशालेत ओतू लागला. चिक्की तिथे सफरचंदाचं लोणचं, मेपल सिरपवलेली ब्रोकोली, अॅस्परॅगसचा गुळांबा, पत्ताकोबीच्या जिलब्या, संत्र्याचे थालीपीठ, पेरूचा वायासॉस, कलिंगडाची साठ (वाळवलेली गुलाबी पोळी), मोसंबीच्या नुडल्स, स्ट्रोबेरीचे सांडगे, मुळ्याचा वॅनिला मिल्कशेक आणि जांभळाचे लसूण- गुळ घातलेले पराठे असे विविध पदार्थ वायुवेगाने करू लागली.

तिचा झपाटा, पाकविकृती आणि वैविध्य पाहून व परिमळु इन्हेलून चिकट्रावला भोवळ आली. चिक्की मात्र अभेद्य खडकाप्रमाणे अविचल होती. परंपरागत भारतीय पाककलेला नवे कु-रूप देण्याचा चंग तिने बांधला होता याची तिला अशीच कधीतरी आठवण येत असे. या अद्वितीय पाकसिद्धीने केंटकीच्या अवघ्या आसमंतात चेर्नोबिलपेक्षा भयंकर अवर्णनीय गंधगळती परिमळु लागली. या अनाकलनीय भीषण गंधाने केंटकीत हाहाःकार उडाला. भयभीत नागरिक स्थलांतर करू लागले. यू एस आर्मी येउन घातपाताचा शोध घेऊ लागली. तेंव्हा कुठे या न्युट्रीफ्रुटी स्थलांतर प्रेरक गंधस्फोटाच्या दहशतीचे आकलन झाले. केंटकी फ्राईड चिकन साम्राज्याला हर्षवायू झाला. त्यांना कधीचे हे शहर रिकामे करून नवीन पन्नासेक कारखान्यासाठी ताब्यात घ्यायचे होते. त्यांनी चिक्कीचा सत्कार केला.

चिक्कीला केंटकीचे मेयर पद घोषित झाले आणि पांढऱ्या तोंडाच्या तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढयाला पर्यावरण अज्ञ नेमण्यात आले. चिकट्राव नेहेमीप्रमाणे कोमात न जाता फॉर अ चेंज, "ये क्या हुव्वाऽऽ, कैसे हुवाऽऽ, कब हुवाऽऽ, क्युं हुवाऽऽ, ओ छोडो ये न सोचो" म्हणत बुचकळ्यात पडला. चिक्की लगेच जालीय जीवनाचा बॅकलॉग भरून काढण्यात गढून गेली. दरम्यान तिकडे शेजारी पांढऱ्या तोंडाचा तात्काळ फलोत्पादक टप्पू बुढा मात्र विरहाने व्याकुळ होऊन, "तू छुपी है कहाँऽऽऽ मै तडपता यहाँऽऽऽ" असे आर्त सूर छेडत बसला आहे. चिकट्राव टप्पू बुढ्याला हिंदी गाणी शिकवल्याबद्दल भिंतीवर डोके आपटत बसला आहे.

ही साठफळांची कहाणी सूफळ कायम्चूर्ण!

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

Smile
काय्मचं कायम्चूर्ण घ्यावं लागणार बहूदा.
सर्वात्मकासारखा लेख झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

टंकाळा, टंकाळा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अशा प्रकारचे सगळे लेख लिहून झाले की आमच्यासारख्या अज्ञ वाचकांसाठी त्याचे रसग्रहण क्लासेस चालू करावे ही णम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचाग्निसाधन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अॅबसर्डसुलभ शब्द मस्त आहे.

अॅस्परॅगसचा गुळांबा, पत्ताकोबीच्या जिलब्या, संत्र्याचे थालीपीठ, पेरूचा वायासॉस, कलिंगडाची साठ (वाळवलेली गुलाबी पोळी), मोसंबीच्या नुडल्स, स्ट्रोबेरीचे सांडगे, मुळ्याचा वॅनिला मिल्कशेक आणि जांभळाचे लसूण- गुळ घातलेले पराठे

ही पदार्थांची यादी बघून 'लिक्विड उसे जीने नही देगा और आक्सिजन उसे मरने नही देगा' च्या चालीवर एकाच वेळी तोंडाला पाणी सुटलं आणि तोंडचं पाणी पळालंही. ही पाणी सुटण्याची आणि पळण्याची क्रिया इतक्या घनघोर वेगाने सुरू झाली की माझ्या तोंडात एक महाप्रचंड भोवरा निर्माण झाला. मग मी त्या व्हॅक्यूमोत्पादक भोवऱ्याचा फायदा घेत जी समोर दिसेल ती वस्तू गिळंकृत करायला सुरूवात केली. अर्थातच माझं वजन साडेतीन मिनिटांत दहा किलोंनी वाढलं. इतके दिवस माझ्या हाडकुळेपणाची चेष्टा करणारा जगद्वृंद आता आपल्या कंठांना नेकटाय आणि इतरही बंधनांतून मुक्त करून माझ्या सुधृढ शरीराची तारीफ करू लागला. माझ्या डॉक्टरांनीही खुष होऊन साडेतीन प्रिस्क्रिप्शनं बक्षीस म्हणून दिली, जी मी इंग्लंडच्या राणीकडून सरकी स्वीकारणाऱ्या तमाम 'सर'दारांसारखी त्यांच्यासमोर गुढगे टेकवून आणि सर झुकवून स्वीकारली. हा सगळा प्रताप या उसंत सखणीच्या लेखनाचा! अशा लेखिकेच्या मी प्रेमात पडलो नाही तरच नवल. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या असंख्य कविता लिहून त्या फेसबुकासारख्या उच्च दर्जा मासिकात प्रसिद्ध करणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL
शीर्षक वाचूनच खूप खिदळले. बाकी या साहित्याला 'मँगोपल्पफिक्शन' म्हणावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे अश्या प्रकारचे पहिले लिखाण वाचल्यानंतर कथनशैली आणि सांगायची गोष्ट याबाबत काही उत्सुकता निर्माण झाली होती, ती त्यानंतर प्रत्येक लेखामागे विरत गेली. आता तर प्रत्येक वेळी तुमचे अश्या प्रकारातले नवे काही वाचल्यावर 'माझी गल्ली याहीवेळी चुकलीच..' म्हणत माघारी वळावे लागते आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले काही लेख मस्त आवडले होते. या लेखात लढाया मारल्या असल्या तरी युद्ध काही साधले नाही असेच म्हणावेसे वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"नाय बे गँडो, माझे केस अजून काळेचं हाय".

चिक्कीतैंची शब्दसंपदा (आणि पर्यायाने चिक्कीतैंची 'मातृभाषा' या संज्ञेस सार्थ करणारी चिक्कीतैंच्या जननीची शब्दसंपदा) काहीशी अन्कन्वेन्शनल आणि अनॉर्थोडॉक्स आहे, एवढेच निरीक्षण तूर्तास या निमित्ताने नोंदवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरीक्षण ओक्के पण १९६४ मधे संगम सिनेमा आला होता वैजयंतीमालाचे गाणे आठवले त्यामुळे आज २०१३ मधे हे अन्कन्वेन्शनल आणि अनॉर्थोडॉक्स असावे काय याचा विचार करत आहे. उलट मुझे तो ये मॉडेल पुराना लगता है! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख अ ते ख अहा! Smile
मजा आली.. पंचेस जमले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चिक्की तिथे सफरचंदाचं लोणचं, मेपल सिरपवलेली ब्रोकोली, अॅस्परॅगसचा गुळांबा, पत्ताकोबीच्या जिलब्या, संत्र्याचे थालीपीठ, पेरूचा वायासॉस, कलिंगडाची साठ (वाळवलेली गुलाबी पोळी), मोसंबीच्या नुडल्स, स्ट्रोबेरीचे सांडगे, मुळ्याचा वॅनिला मिल्कशेक आणि जांभळाचे लसूण- गुळ घातलेले पराठे असे विविध पदार्थ वायुवेगाने करू लागली.

चिक्कीताईंकडून या रेशिप्या मागवून सखूमावशींनी यातली निदान एकतरी आम्हाला दाखवावी अशी विनंती. विशेषतः स्ट्रॉबेरीचे सांडगे आणि कलिंगडाची साठ यांच्याबद्दल कुतूहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.