खडा पावभाजी
देवदत्त
1 minute
"काय घेणार?
"इडली. तू?"
"मला भूक लागलीये. खडा पावभाजी घेतो."
"मला सांग भेंजो, बंड्यामामा भाजी कशी आणतात हाॅटेलसाठी?"
"म्हणजे?"
"अरे म्हणजे एरवी नाही. पण हल्ली मार्केटमधे भाजीवाल्यांना बसू देत नाहीयेत ना? पोलिसांचं का म्युन्सिपाल्टीचं कायतरी मॅटर झालं म्हणून?"
"ओह ओके. मामा थेट मंडईतनं टेंपो मागवतात. भाज्या फ्रीझरमधे टाकल्या की चार दिवस पुरतात."
"कळलं. पण मग जास्त भाज्या मागवून लोकांना का विकत नाहीत? पब्लिकलाही भाज्या मिळतील, आणि बंड्यामामांचाही प्राॅफिट वाढेल. वाटल्यास चारऐवजी दर दोन दिवसात टेंपो आणायचा."
"आयडिया वाईट नाही. भेंजो पण रेस्टॉरंटच्या लायसन्सवर भाज्या विकता येतात का?"
"ग्रीन सॅलड मिळतं की रेस्टॉरंटमधे. अनकट ग्रीन सॅलड पार्सल ओन्ली असं टाकायचं मेनूत."
"नाहीतर अल्ट्रा खडा पावभाजी विदाऊट पाव!"
Node read time
1 minute