पनीर पराठा
मंडळी, हा माझी पहिलीच पाककृती आहे.
साहित्य:
किसलेले पनीर १ कप
मटर १/२ कप
आल ,लसूण,हिरवी मिरची पेस्ट
किसलेला कांदा १ कप
गरम मसाला
धना पावडर
जिरे
आमचूर पावडर
मीठ
तेल
कणिक
कृती :
फ्रोझन मटार गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्या.नंतर मिक्सर मध्ये थोड बारीक करा.
एका कढईत तेल तापवून घ्या. मग त्यात जिरे टाका.
जिरे तडतडले कि आल-लसुण,हिरवी मिरची पेस्ट टाकुन चांगल परतुन घ्याव.
नंतर किसलेला कांदा टाकून चांगला परतुन घ्या.
त्यात गरम मसाला, आमचूर पावडर , धना पावडर ,मीठ (चवीनुसार) टाका.
बारीक केलेले मटार टाकून नीट एकत्र करा.
थोड्यावेळाने किसलेले पनीर टाका.
झाकण ठेऊन एक वाफ काढा.
हे झाले तुमचे मिश्रण तयार ......
थोडे मिश्रण थंड झाले कि पुरणपोळी सारखे भरून घ्या व हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या.
मग पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन खमंग भाजुन घ्यावा.
गरमागरम पनीर पराठा ताज्या दह्या /लोणच्या बरोबर, किंवा चटणी,केचप सोबत खावा.
अरे वा!
अरे वा!