Skip to main content

पनीर पराठा

मंडळी, हा माझी पहिलीच पाककृती आहे.

साहित्य:
किसलेले पनीर १ कप
मटर १/२ कप
आल ,लसूण,हिरवी मिरची पेस्ट
किसलेला कांदा १ कप

step 1

गरम मसाला
धना पावडर
जिरे
आमचूर पावडर

step2

मीठ
तेल
कणिक

कृती :
फ्रोझन मटार गरम पाण्यात ५ मिनिटे उकडून घ्या.नंतर मिक्सर मध्ये थोड बारीक करा.
एका कढईत तेल तापवून घ्या. मग त्यात जिरे टाका.
जिरे तडतडले कि आल-लसुण,हिरवी मिरची पेस्ट टाकुन चांगल परतुन घ्याव.
नंतर किसलेला कांदा टाकून चांगला परतुन घ्या.
त्यात गरम मसाला, आमचूर पावडर , धना पावडर ,मीठ (चवीनुसार) टाका.
बारीक केलेले मटार टाकून नीट एकत्र करा.
थोड्यावेळाने किसलेले पनीर टाका.
झाकण ठेऊन एक वाफ काढा.
step 3
हे झाले तुमचे मिश्रण तयार ......

थोडे मिश्रण थंड झाले कि पुरणपोळी सारखे भरून घ्या व हलक्या हाताने, हळु हळु फिरवत चपाती प्रमाणे लाटुन घ्या.
step 4
मग पराठा अलगद उचलुन तव्यावर टाकुन, मध्यम आचेवर थोड लोणी सोडुन खमंग भाजुन घ्यावा.

step 5

step 6
गरमागरम पनीर पराठा ताज्या दह्या /लोणच्या बरोबर, किंवा चटणी,केचप सोबत खावा.
step 7

आवड/नावड

ऋषिकेश Wed, 09/11/2011 - 10:15

पाकृ छान!
ऐसी अक्षरेवर स्वागत!

अनामिक Wed, 09/11/2011 - 21:13

अरे वा, आमच्याकडेपण तुमच्याकडच्या सारख्याच ताटल्या आहे. हेच नव्हे, आमच्याकडेपण असाच पनीर पराठा करतात. हेवी असतात पण हे पराठे. पाकृसाठी - चान चान!

राजेश घासकडवी Thu, 10/11/2011 - 04:54

In reply to by अनामिक

या ताटल्या किती लोकांकडे बघितल्या आहेत याची गणती विसरलो. आमच्याकडेही आहेत हे वे सां न ल. पराठेदेखील साधारण असेच करतात. त्यामुळे अगदी घरच्यासारखं वाटलं.

आडकित्ता Wed, 09/11/2011 - 22:08

तै.
मटार मिक्षर मधून काढण्याची आयडीया उत्तम. मटार अन कांदा नीट शिजले नाही, तर पराठा नीट लाटला जात नाही ;;)
>बल्लवाचार्य
आडकित्ता

रोचना Wed, 09/11/2011 - 22:31

फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले. फोटो मस्त आले आहेत. कणीक पुरण पोळीसारखीच सैल मळावी लागते का?
शेवटच्या फोटो मध्ये चटणी-लोणचे कोणते आहेत? डावीकडची सुकी दाण्याची चटणी आहे का?

आडकित्ता Mon, 14/11/2011 - 22:36

पराठा इतका झक्कास केलाय, की नुस्ता विरघळेल तोंडात. ते टोमॅटो सॉस कशाला वाढलंय? ;;)