उच्च शिक्षणातील वास्तव: चिमण्यांना घारीचे पंख देण्याचा प्रयोग?
( हा लेख कुणाच्याही बाजूने पक्ष घेण्यासाठी नाही, तर शिक्षण क्षेत्रातील गंभीर परिस्थितीची वास्तवता स्पष्ट करण्यासाठी लिहिला आहे.)
काही दिवसांपूर्वी एका निवृत्त अधिकाऱ्याशी झालेल्या चर्चेत माझ्या मित्राच्या भावाची कथा सांगितली. तो हुशार होता. आरक्षण आहे म्हणून वयाच्या तिशी उलटेपर्यंत परीक्षा देत राहिला. नंतर निराश होऊन डिप्रेशनमध्ये गेला. घरचा आणि हितचिंतकांचा सपोर्ट असल्याने तो डिप्रेशनमधून बाहेर पडू शकला. तीस उलटल्यावर मेहनतीचे काम शिकणे ज्यांना संभव नाही, असे लाखो तरुण रस्त्यावर येतात. कथा ऐकल्यावर ते म्हणाले, “चिमण्यांना घारीचे पंख लावले, तर त्या उंच आकाशात उडू शकणार नाहीत; उलट मरून जातील.” उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि आरक्षणाचा मुद्दा आज याच वास्तवाभोवती येऊन ठेपला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, आयआयटी, केंद्रीय विद्यापीठे आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ताणतणाव, कौटुंबिक व आर्थिक दबाव किंवा प्रचंड स्पर्धेमुळे शिक्षण अर्ध्यावरच (ड्रॉपआउट) सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून, यामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे; जे या शिक्षणप्रणालीतील गंभीर परिस्थितीवर प्रकाश टाकते.
जे विद्यार्थी आयएएस आणि आयआयटीसारख्या इत्यादी कठीण परीक्षा देतात, त्यांच्यात योग्यता निश्चित असते. आरक्षणाची कट-ऑफ(10-15 %), वयोमर्यादा (कुशलता क्षेत्र सोडून) एमटीएस–आयएएस (२५–३०) आणि प्रयत्न करण्याच्या संख्येवर मर्यादा (परीक्षेनुसार २–५) ठेवण्याची गरज आहे. अयशस्वी होणारे योग्य वयात दुसरा मार्ग शोधू शकतात. नवीन नोकरीत ३० वर्षांपुढील उमेदवारांना प्राधान्य मिळत नाही, हे नोकरी बाजारातील वास्तव आहे.
आयआयटी केस आणि परिणाम
आधी अनेक वर्षांपूर्वी एक ऐकलेला किस्सा. नोकरी लागल्यावर एका शिक्षिकेने सुरुवातीला विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि अभ्यासात सुधारणा करण्यासाठी कडक भूमिका घेतली. पहिल्याच परीक्षेत तिने कठीण निकाल लावला, तेव्हा मुख्याध्यापकांनी तिला फैलावर घेत खडे बोल सुनावले, “तुम्हाला येथे विद्यार्थ्यांना कुंभारासारखे माठ घडवण्यासाठी नाही, तर सरसकट पास करून कोर्स पूर्ण करण्यासाठी ठेवले आहे; जर मुलांनी नापास होऊन उद्या कायदेशीर खटला केला, तर तुम्हाला वाचवायला कोणीही पुढे येणार नाही!” अधिकांश राज्यांमध्ये दहावीच्या परीक्षेचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक असतो.
प्रा. शिरीष केदारे यांना ऊर्जा विज्ञान व सौर तंत्रज्ञानातील संशोधनासाठी डॉ. पी. के. पटवर्धन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अवॉर्ड, डिपार्टमेंटल एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड तसेच अनेक राष्ट्रीय पुरस्कार व पेटंट्स मिळाले आहेत; तर प्रा. सूर्यनारायण डूलल्ला यांना उत्कृष्ट अध्यापनासाठी ‘प्रोफेसर एस. पी. सुखात्मे एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड’ (२०२१), ‘आयआयटी बॉम्बे एक्सलन्स इन टीचिंग अवॉर्ड’ (२०१७), तसेच सुरुवातीच्या संशोधन काळात ‘यंग फॅकल्टी अवॉर्ड’ आणि IEEE कडून सन्मान प्राप्त झाले आहेत.
एका मुलाने निराश होऊन आत्महत्या केली त्या नंतर जे काही मुंबई आयआयटीमध्ये घडले आहे त्याचे परिणाम दूरगामी होतील. पहिले म्हणजे उत्कृष्ट शिक्षक मिळणे कठीण होईल. दुसरे, नोकरी टिकविण्यासाठी किंवा कायदेशीर भीती व दबावामुळे, पात्रता नसताना विद्यार्थ्यांना पास केले जाणार. तिसरे म्हणजे, या घटनेवर सोशल मीडियावर झालेल्या चर्चेमुळे खासगी क्षेत्रातील लहान व मध्यम उद्योग, नोकरी देताना कायदेशीर कटकटींचा विचार करूनच निर्णय घेतील.
शेवटी आरक्षण आणि कायद्यांमध्ये सुधारणा केली नाही, तर आरक्षित वर्गाला लाभ होण्याऐवजी नुकसान जास्त होणार. हे निश्चित आहे. आरक्षित समाजाच्या व्यापक हितासाठी मोठ्या नेत्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही प्रोफेसरांना आयआयटी पासून दूर जण्यापासून रोखले पाहिजे. सरकार आणि न्याय व्यवस्थेने ही कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे. दुर्दैवाने, व्होट-बँक साठी आरक्षित समाजाचे नुकसान सर्वच करतील.
टीप: दासबोधातील दृष्टिकोन समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणतात,
“दुसऱ्याचा प्राण घ्यावा। आपला आपण स्वयें द्यावा।
विसरवी जीवभावा। तो तमोगुण॥”
विष आवरा आता.
पटाईत काका, एरवी तुम्ही भोंदू बाबाबुवा, छद्मविज्ञान किंवा मोजीजींची तळी उचलून धरण्यासाठी जे लिहिता, त्याची टिंगल करण्याची तीव्र इच्छा मला होते. इथे तुम्ही आरक्षण, आणि विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निमित्तानं संदर्भासारखं वाटणारं गोलमाल दाखवत जे काही विष लिहिलं आहेत, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे!
आय० आय० टी० मुंबईतील…
आय० आय० टी० मुंबईतील आत्महत्त्या प्रकरण सध्या गाजत आहे. या निमित्ताने माझे २ पैसे ४० वर्षापुर्वीच्या अनुभवावर आधारित-
आय० आय० टी० मध्ये बाहेरच्या समाजातील जातीव्यवस्था पाळली जात नसली तरी आय० आय० टी० ने स्वत:ची एक जातीव्यवस्था निर्माण केली आहे. मुख्य कारण स्पर्धात्मक वातावरण अत्यंत विषारी पातळीवर पोचले आहे. मानवी जीवशास्त्राचे भान खालपासून वर पर्यंत असल्याचे अजिबात जाणवत नाही (तसे असते तर रात्री-बेरात्री विज्ञार्थ्यांवर जागरणे लादून तब्येतीची वाट लावण्याचे उद्योग तिथे राजरोस चालू दिले नसते) तिथे "चातुर्वर्ण्य मया सृष्टं..." या गीतावचनाचा उघड जयघोष करणारे प्राध्यापक मी स्वत: बघितले आहेत. सध्याची परिस्थिती माहित नाही. पण सवलतींचा लाभ घेत असलेली मुले अभ्यासू मुलांना अभ्यास करू देत नसल्याच्या तक्रारी कानावर आल्या आहेत (मला स्वत:ला वैयक्तिक अनुभव नाही).
पण मेडीकल कॉलेजेसच्या तुलनेत आय०आय०टी०मधले वातावरण खूपच चांगले आहे, असे माझे स्पष्ट आहे. जगातील आणि भारतातील वैद्यकीय शिक्षण अतिशय विकृत आणि चिंताजनक बनले आहे. याचा एकेमेव पुरावा म्हणजे त्यांच्या मानसिक आरोग्यावर जगभर होणारे संशोधन... आज विज्ञार्थी आय०आय०टी० मधून बाहेर पडला की आपल्या मातृसंस्थेवर भरभरून प्रेम करतो. सर्व आय० आय० टी० ना माजी विज्ञार्थ्यांकडुन मिळणार्या देणग्या याचे प्रमाण आहे.
*मेडीकल कॉलेजेसना अशा भरभरून देणग्या त्यांच्या यशस्वी विज्ञार्थ्यांकडुन किती मिळतात हा माझ्या कुतुहलाचा विषय आहे.*
साहिल वाकोडेसारख्या घटनापासून संस्थात्मक हानी टाळायची असेल तर मला एक उपाय सुचवावासा वाटतो-
परिक्षा हॉलमध्ये कुणी संशयास्पद वर्तन करत असल्यास प्रथम त्याला रस्टीकेट करण्या आधी क्वारण्टाईन करून परिक्षा द्यायला लावावी. तिथे सीसीटीव्हीची कड्क निगराणी ठेवावी.
सगळे जण साहील वाकोडे हुशार असल्याचे सांगतात. त्याला तिने महीने छळ झाल्याचे बोलले जाते, मग त्याच्या आईवडीलांना त्याच्याबरोबर काही दिवस येऊन राहण्यास का सांगितले नाही. आमच्या वेळेस आईवडीलांना काही दिवस मुलांबरोबर येऊन राहता येत असे?
समुपदेशन सीसीटीव्हीच्या कडक निगराणीमध्ये व्हावे. समुपदेशन हा माझ्या मते मोठ्ठा विनोद आहे आणि बर्यावेळा समुपदेशक समस्या सोडविण्यापेक्षा गंभीर करताना दिसतात. समुपदेशनाचे समर्थक याबद्द्ल अवाक्षर काढत नाहीत.
जाताजाता - काहीवर्षांपूर्वी मी एका प्राध्यापकांना काही निमित्ताने फोन केला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांनी राजीनामा दिला आहे आणि अमुक दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे. मला धक्का बसला तेव्हा मी राजीनाम्याचे कारण विचारले.
ते म्हणाले, "प्रवेश परिक्षेत शून्य मार्क पडलेल्या विज्ञार्थ्याला मी प्रवेश द्यावा, यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. त्याला अर्धा मार्क जरी असता तरी त्याचा १ मार्क देऊन मी त्याला प्रवेश दिला असता."
-राजीव उपाध्ये
देशात मोजून 10 एक च
देशात mojun10 ते 12 च उच्च पदस्त अधिकारी आहेत ते उत्तम काम करत आहेत. बाकी काय करतात कोणाला माहित नाही.
चांगल्या अधिकाऱ्यांन मधील एक तुकाराम मुंडे साहेव.