फाउंटन
"फाउंटनला कोणती बस जाते?"
"बावीस नंबर. म्हणजे बसवर बावीस ही संख्या लिहिली असेल ती. आतापासून येणारी बावीसावी बस नव्हे. हु हु हु"
"हा हा हा. उत्तम विनोद होता."
"धन्यवाद. पण बसवर हुतात्मा चौक लिहिलं असेल - आता फ्लोरा फाउंटन म्हणत नाहीत त्या जागेला."
"अहो पण मी तिथे जातच नाहीये."
"तुम्हीच विचारलंत ना - फाउंटनला कोणती बस जाते?"
"हो, पण फ्लोरा फाउंटन नाही."
"मग?"
"फाॅना फाउंटन!"
"म्हणजे?"
"फ्लोरा म्हणजे वनस्पतीजगत. फाॅना म्हणजे प्राणीजगत. फाॅना फाउंटनजवळ विविध प्रजातींचे प्राणी आढळतात, म्हणून फाॅना फाउंटन."
"खरंच?"
"हो तर. मुंगीपासून निळ्या देवमाशापर्यंत जवळपास स-ग-ळे. हायड्रा, सालामांडर, कोमोडो ड्रॅगन, शहामृग, बिबळ्या. पुण्यवान लोकांना एडियाकारन बायोटासुद्धा दिसतात म्हणे."
"अरे वा. मजाच आहे सगळी."
"हो तर. फारच रोचक जागा आहे. फक्त एकच भीती आहे हो."
"कसली? बिबळ्या हल्ला करेल अशी?"
"नाही. अख्खं फाॅना फाउंटन वनताराला घेऊन जातील याची."
…
फॉना फाउंटनचे प्राणी (जबरदस्तीने) ‘वनतारा’ला उचलून नेण्याच्या निषेधार्थ जी हाणामारी होईल, तीत बळी पडणाऱ्यांच्या नावाने फॉना फाउंटनचे पुनर्नामकरण ‘हुतात्मा चौक’ असे होईल काय?
(च्या**, महाराष्ट्राचे — खरे तर मुंबईकरांचे१ — नि गुजरात्यांचे पंगे सनातन म्हणायचे, हं?)
१ मुंबई म्हणजे तमाम महाराष्ट्र नव्हे. असो.
राणीच्या बागेतील ३५…
राणीच्या बागेतील ३५ वर्षाच्या पाणघोड्याचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. कशासाठी ठेवतात प्राण्यांना येथे? आणि का बघायला जायचे असते त्यांना बघायला? हेच आपल्या दारात आले तर वनविभाग पिंजरे लावून पकडून पुन्हा जंगलात सोडतात. मग येथे पुन्हा पिंजऱ्यात का ठेवतात?
तुमचा मुद्दा मला मान्य आहे…
तुमचा मुद्दा मला मान्य आहे. पण प्राणि संग्रहालये जगभर अजुनही चालू आहेत. सर्वांना निसर्गात जाणे जमेल असे नाही. त्यामुळे निसर्ग दाराशी आणला जातो. तिथे काय शिकतात हे समजण्यासाठी हे अवश्य बघावे. जिज्ञासा, निरीक्षणशक्तीलाअ चालना इ० साध्य होत असावे.
बाकी भारतात मनुष्यप्राण्याच्या आयुष्याला किंमत नाही तिथे इतर प्राण्यांच्या आयुष्याला कोण विचारणार?
पर्वताप्रति प्रेषित...
त्याऐवजी, वनतारा फॉना फाउंटनभोवती बांधणे स्वस्तात पडणार नाही काय?