मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९०
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---
'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.
यशोदीप प्रकाशनतर्फे डॉ. सतीश शिरसाठ यांच्या 'प्राजक्त' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खान बोलत होते. डॉ. बाळासाहेब सोनवणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.
'समाजासाठी झटणाऱ्या ध्येयवेडया लोकांना जगू द्या. समाजाच्या शांतीसाठी झटणारी आम्ही माणसे आहोत. हिंदू-मुस्लिम संघर्षातून आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण माणूस म्हणून जगण्याची गरज आहे. पोलिस घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये, असा महाराष्ट्र मला बघायचा आहे,' याकडे खान यांनी लक्ष वेधले.
१. मनोरुग्ण कोण आणि कोण नाही हे त्या डॉक्टरांनी सांगायचे असते हे या अतिरेकी पुरोगामी गाढवाला माहीत नाही.
२. याचे नाव व याचे मन व याची बुद्धिमत्ता व याची बायको या देखिल अस्तित्वात नसलेल्या आणि उगाच काहीतरी अर्थ देऊन मानलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. (स्पष्टिकरण - देव काय हे सांगायला जसं दगडावर बोट ठेवता येतं तसं बायको म्हणून एका स्त्रीवर बोट ठेवता येतं. संकल्पनात्मक फरक शून्य आहे.)
३. समाजात संघर्ष ० असू शकतो, पोलिसांची ० गरज असू शकते असा गाढवी गांधीवाद सध्याला दुर्लक्षित करू.
=====================================
नास्तिक अतिरेकी असतात, सच्चे नास्तिक जगाला एक मोठा धोका आहे असं मी मागे म्हणालो आहे. हा बाबा त्यातला एक दिसतो. अख्ख्या महाराष्ट्राला मनोरुण मानणारास कोणत्या इस्पितळात उपचार द्यावेत?
हे नाही पटलं जी.
हे नाही पटलं जी.
इस्लाम त्याच्या शुद्ध स्वरुपात एक धोका आहे असा वादंग जगात चालू आहे. म्हणजे लोक म्हणताहेत कि २ बिलियन मुस्लिम जो इस्लाम पाळून गुण्यागोविंदानं राहतात ते इस्लामचं काँप्रोमाइज्ड रुप आहे. अतिरेकी पाळतात तो इस्लाम मूळ आहे. (यावर सरकार वा समाज अधिकृत भूमिका घेत नाही तोवर मी स्वकष्टानं अभ्यास करून मत बनवणार नाही. उत्साह नाही आणि मुद्दा किचकट आहे. पण मी डिबेट ऐकत असतो.)
---------------------------
पण हे जे इस्लामचं असं काही डेंजरस आहे असं काहींना वाटतं, तसं शुद्ध नास्तिकवादाचं मूळ स्वरुप खूप बेकार (या अतिरेकी इस्लामपेक्षा) आहे याची माझी व्यक्तिगत खात्री आहे. जगातले सध्याचे नास्तिक हे केवळ नावाचे नास्तिक आहेत. त्यांच्यावर अस्तिकवादाच्या लेगसीचा प्रचंड प्रभाव आहे. पण ते हळूहळू शुद्ध रुपाकडे जात आहेत.
डंपिंग
काळ्या-पिवळ्या टॅक्सीज आणि रिक्षा या ओला आणि उबर पेक्षा जास्त भाडे आकारतात. परंतु ज्या अर्थी रिक्षा-टॅक्सी मालक-चालक त्या धंद्यातून गडगंज श्रीमंत होताना दिसत नाहीत. त्या अर्थी ओला आणि उबर जे "प्रिडेटरी" भाडे आकारत आहेत ते व्हाएबल कॉस्टच्यापेक्षा कमी असते असे म्हणता येईल.
या केसमध्ये (अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस किंवा) ॲण्टी डंपिंग प्रोव्हिजन्स लागू होत नाहीत का? की त्या फक्त "गूड्स" साठी लागू असतात? सर्विसेससाठी नाही?
काँपिटिशन ॲक्ट २००२
काँपिटिशन ॲक्ट २००२ गुड्सप्रमाणे सर्व्हिसेससाठीही लागू आहे.
काँपिटिशन ॲक्ट तीन प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालतो:
१) Anti-competitive agreements
२) Abuse of dominant position
३) Combinations
उबर/ओलाकडे dominant position नाही. त्यांनी एकमेकांशी मर्जरबिर्जर न केल्याने ते कॉम्बिनेशनही नाही.
Anti-competitive agreements हा जरा किचकट प्रकार आहे. याची व्याख्या अशी केली आहे, की त्यात जगातलं काहीही बसू शकतं. पण त्यात एक मेख अशी आहे, की "such agreement causes or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India" हा निकष पूर्ण व्हायला लागतो. तसंच, आतापर्यंतचा अनुभव (कोर्टातला) असा आहे की जिथे "प्राईस वॉर" असतं तिथे हा adverse effect on competition वाला निकष पूर्ण होत नाही म्हणून काँपिटिशन कमिशन त्यात हात घालत नाही.
नाही. असा समज बिलकुल नाही. या
नाही. असा समज बिलकुल नाही. या कायद्याचं लॉजिक असं काहीसं आहे.
कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.
याही केसमध्ये उबेर/ओला नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून डॉमिनंट पोझिशन मिळवत आहेत असं एखादा चतुर वकील पटवून देऊ शकतो. पण ग्राहकाला फायदाच होत असल्याने या आर्ग्युमेंट्चा उपयोग नाही.
कोणत्याही प्लेयरने इतर
कोणत्याही प्लेयरने इतर प्लेयरची मारणे ही अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. फक्त या मारामारीत आपल्या डॉमिनंट पोझिशनचा वापर करून ग्राहकाची मारली जात तर त्यासाठी कायदा आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाची मारली जाता कामा नये.
हे राबवणार कसं? एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं. नंतर कंपनी काय करेल हे मर्जरच्या परवानगीपूर्वी कसं सांगता येईल? कारणं देखिल इनपुट कॉस्ट इ देता येतील.
नाही ना सांगता येत. म्हणून
नाही ना सांगता येत. म्हणून तसलं मर्जर करण्यापूर्वी काँ० कमिशनला नोटिस द्यावी लागते. मग कमिशन चौकशी करतं (The Commission shall, on receipt of a notice under sub-section (2) of section 6, inquire whether a combination referred to in that notice or reference has caused or is likely to cause an appreciable adverse effect on competition in India).
एकदा नोटीस दिली की ती (मर्ज्ड) कंपनी कायमची रडारवर येते. आणि त्याची वारंवार चौकशी होऊ शकते.
एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं
एकदा मर्जर झाली कि ग्राहकांचं शोषण होऊ शकतं
हा बागुलबुवा नेहमीच दाखवला जातो, पण गेल्या १-२ दशकात तरी असे झाल्याचे उदाहरण नाही. ज्या क्षणी ओला किंवा तत्सम कंपनी पॉझीटिव्ह कॅशफ्लो मिळवु शकेल त्या क्षणी तिला स्पर्धा चालु होइल.
कष्ट न करता मिळालेले ( किंवा दुसऱ्यांच्या पैसे ) पैसे असलेले असलेले शेकडो व्हीसी आणि पीई आहेत. त्यांच्या पैश्यावर म.म. ग्राहकांनी मजा मारुन घ्यावी. हे वेल्थ डिस्ट्रीब्युशन चालु आहे. फक्त तुमचे पैसे असल्या कोणी व्हीसी किंवा पीई फंडात गुंतवु नका म्हणजे झाले.
'फुले-शाहू-आंबेडकर यांचा
'फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी असे म्हटले जाते. ते तिघे पुरोगामी होते; पण महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, आणि आजही नाही,' असे टीकास्त्र प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी मंगळवारी सोडले. 'ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी मानणारे लोक मनोरुग्ण समजले जातात. देव, धर्म अशा काल्पनिक गोष्टी मानणारे माझ्या दृष्टीने मनोरुग्णच आहेत,' असे वक्तव्य त्यांनी केले.
हा मला पडलेला प्रामाणिक प्रश्न आहे.
चित्रपट हा असत्याधारीत असतो. बहुतेकदा.
मग माणसं चित्रपटगृहात २ ते ३ तास जातात, तिकीट काढून जातात. हे मनोरुग्ण असल्याचे लक्षण आहे किंवा कसे ?
प्रामाणिक प्रश्न आहे.
.
.

.
.
हा फॉरवर्ड आला होता.
.
त्या बालकामगाराचा प्रश्न निरागस आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या कृषिमालाला "योग्य भाव" मिळायला हवा चा बकवास जो सुरु असतो त्याच्या बॅकग्राऊंड वर ..... एका बाजूला भाव वाढवून दिले नाहीत व जे दिलेले आहेत ते पुरेसे नाहीत असं सांगून शेतकऱ्यांचं कल्याण साधण्यात आपण अयशस्वी ठरलोत ... "अशी अपराधीपणाची भावना" द्यायची व दुसऱ्या बाजूला व त्याच वेळी भाव जास्त असल्यामुळे मुलांना जेवायला घालणे आईबापांना परवडत नाही व म्हणून "अपराधीपणाची भावना" द्यायची आणि भुक न लागण्याची गोळी पाहिजे चा बकवास करायचा. समाजाचं केलं जाणारं टॉर्चर अफाट आहे.
आणि हे सगळं २०१७ च्या इसवीत ??? म्हंजे गेल्या वर्षी, २०१६ मधे, मधे अन्नधान्याचं रेकॉर्ड उत्पादन झालेलं असताना.
Are you going to say - Gabbar is taking that picture too seriously ?????
एलफिन्स्टन रोड स्थानकातील
एलफिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनिमित्ताने सोयी आणि दर यांच्याबद्दल उत्खनन केले तेव्हा खालील चार्ट्स सापडले.
http://www.reliancemumbaimetro.com/fares.html
यावरून असे दिसते की घाटकोपर ते वर्सोवा या अंतरासाठी अपेक्षित असलेले भाडे ११० रुपये आहे जे जुलै २०१५ मध्ये फेअर फिक्सेशन कमिटीच्या अहवालानुसार ठरवण्यात आले आहे. तिथे असेही दिसले की जानेवारी २०१५ पासून पुढील आदेश मिळेपर्यंत डिस्काउंटेड भाडे ४० रुपये आकारले जात आहे.
हा ७० रुपयांचा फरक कोण सोसत आहे? मेट्रोने प्रवास न करणारे आम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी?
बहुतेक जाहिरातदार
घाटकोपर स्थानक हे 'व्हिवो घाटकोपर' आहे. अंधेरी ही 'बँक ऑफ बरोडा अंधेरी.' पद्रुमा हा 'मॅजिकब्रिक्स WEH' आहे. फक्त स्टेशनातल्या डेकोरशनच्या पलिकडे व्यवस्थित नावेही घोषणांत हीच घेतली जातात, नकाशातही अशीच लिहीली जातात. शिवाय प्रत्येक स्टेशनात डॉमिनोज, बर्गरकिंग, मॅड ओव्हर डोनट्स, ओला, एसबीआय, बँक ऑफ बडोदा इत्यादींचे स्टॉल्स आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेन अठरापगड जाहिरातींनी भरलेली असते.
फक्त अंदाज हां. कदाचित हे उत्पन्न त्यांनी पकडूनही तोटा होत असावा. काहीच ठोस माहिती नाही.
कोणत्याही विचारवंत किंवा
कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.
---
बाकी चांगला विचारवंत व त्याचे विचार स्वस्त बनणे (म्हंजे सोमि वर व्हायरल होणे) हे इष्ट च आहे.
.
---
.
जाताजाता : Polarization and fake posts: How social media won the day -- ट्रंप, रशिया, सोमि, फेकन्युज, झुक्या वगैरे बद्दल्
.
.
अन्तर्देशीयीकरण
कोणत्याही विचारवंत किंवा चांगल्या लेखिकांचा कचरा करायचा असेल तर त्यांचं एखादं वाक्य (ते त्यांचं आहे किंवा नाही याचे व्हेरिफिकेशन न करताच) संदर्भ-स्पष्टीकरणाशिवाय काढावं, त्याची प्रतिमा बनवावी आणि सोशल मिडीयावर डकवून द्यावी. लगेच स्वस्त बनतात.
याला आम्ही 'इनलँडायझेशन' म्हणतो. एके काळी इनलँड लेटर्सवरच्या सर्कारी संदेशांत तसल्याच लायकीची वाक्ये असत. (कोण जाणे, कदाचित अजूनही असतील. कित्येक युगांत इं.ले. वापरले नाही.) अर्थात, पोष्टखाते अगोदर व्हेरिफाय करतही असेल कदाचित, पण कोणास ठाऊक! (आणि समजा नाही केले व्हेरिफाय, तरी इथे कोणाला पत्ता लागणार आहे? तसेही ते सर्कारी संदेश नक्की कोण वाचतो?)
आमचा हातभार:
"अपने शिशु को स्तनपान कराएँ" - महात्मा गाँधी.
(टीप: "अपने शिशु को स्तनपान कराएँ" असा एक सर्कारी संदेश इं.ले.वर अनेकदा खरोखरच छापला जात असे. तसेच, महात्मा गांधींचे संकीर्ण संदेशही अधूनमधून असत. आमचे योगदान इतकेच, की आम्ही त्या दोहोंचे फक्त एक छानसे कोलाज केले. बस्स.)
आज सकाळी मी बाहेर पडलो होतो
आज सकाळी मी बाहेर पडलो होतो तेव्हा शेजारच्या बिल्डिंग मधल्या चारपाच मुलांनी ओरडून सांगितले - "ओ, समोर बाँब आहे, बाजुने जावा". पाहतो तर खरंच तिथे समोर लक्ष्मीतोटा लावलेला होता व माझा पाय त्याच्या जवळपास पडणार होता.
च्यायला आमच्यावेळी हे असलं नव्हतं.
आमच्या लहानपणी एकदा दिवाळीत.... भुंगा (चमनचिडी) नावाचा फटाका लावला होता आणि तो पेटल्यानंतर भुसकन उडाला व् समोरून येणाऱ्या काकांच्या धोतरात तो शिरला ..... आणि ते बघुन आम्ही सगळेजण हसत, टाळ्यापिटत पळत सुटलो होतो.
पूर्वीची दिवाळी राहीली नाही. (हे वाक्य - पूर्वीचं पुणं राहीलं नाही - या चालीवर वाचावे.)
डोहाळेजेवण
आपल्याकडे डव्हाळजेवण पण असतं. म्हणून विचारलं.
डोहाळेजेवण नाही, पण बेबी शॉवर असतात.
प्रेग्नन्सीच्या नेमक्या कोठल्या स्टेज वा आस्पेक्टचा सार्वजनिक समारंभ करावा, हे त्या-त्या कल्चरवर अवलंबून असावे, नाही का? पण म्हणून डोहाळेजेवण नसते म्हणजे डोहाळे लागत नसावेत म्हणणे हे म्हणजे मला जेव्हा जेव्हा म्हणून शी लागते तेव्हा तेव्हा मी त्याचा सार्वजनिक समारंभ ('शीजेवण'?) करत नाही म्हणजे मला कधी शीच लागत नाही, असे अनुमान काढण्यासारखे आहे.
इत्यलम्|
...
Possibly because the mother-to-be is being showered with gifts for the impending baby?
आणि हो, ती गिफ्टे बाळाकरिताच म्हणता यावीत. टिपिकल बाळोपयोगी स्टफ - दुपटी, बाळाचे कपडे, दुधाच्या बाटल्या, खेळणी, बेबी मॉनिटर, झालेच तर डायपर न् काय काय.
शिवाय समारंभात टिपिकल बेबीशॉवरछाप पार्टी गेम्स पण असतात. बोले तो, उत्सवमूर्ती प्रेग्नंट बाईच्या पोटाचा घेर काय असेल, याचा सर्व उपस्थितांनी (नो एक्सेप्शन्स) आपापल्या परीने अंदाज बांधणे आणि मग सरतेशेवटी टेपने मोजून शहानिशा करणे. झालेच तर प्रेग्नंट बाईला पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची झलक दाखवण्यासाठी, चॉकोलेट सिरप आणि मस्टर्ड सॉस वापरून (यात अधिक कल्पकतेला वाव आहे याची सर्व गरजूंनी अवश्य नोंद घ्यावी.) एका डायपरच्या आत त्यांचा शीसदृश कालवा करून, नंतर मग तो डायपर व्यवस्थित गुंडाळून तो उत्सवमूर्तीस सादर करणे आणि तीस तो उघडावयाची विनंती करणे. वगैरे वगैरे. अन् काय न् काय.
मला तर बेबी शॉवर म्हणजे बाळाच्या पहिल्या आंघोळीशी
असे वाटणे एक वेळ साहजिक आहे, पण...
किंवा लघवीशी संबंधित आहे असं वाटायचं.
आयला! ट्रम्प निवडून आला, म्हणून काय तमाम दुनिया ट्रम्पसारखी असते असे वाटले काय? ;-)
बाकी, ख्रिश्चनांनी पेगनांकडून (नाताळच्या तारखेपासून) बरेच काही ढापलेले आहे, याची कल्पना आहे, परंतु तरीही... संत निकलाउस पेगन कसा?
(आणि हो, मागच्या प्रतिसादात 'Absence of proof is not necessarily a proof of absence' हेही ठेवून द्यायचे घाईत राहून गेले, तेवढे अॅडजस्ट करून घ्या प्लीज.)
त्या संकल्पनेशी रिलेटेड बरीच
त्या संकल्पनेशी रिलेटेड बरीच शब्द संपदा आपल्याकडे आहे. आणि १९९१ पासून रोज नियमित इंग्रजी पेपर वाचून देखिल तत्सम संकल्पना वाचनात आली नाही म्हणून विनोदी अंगाने प्रश्न विचारला आहे. समजून घ्या ना राव.
नायक सोडून कोणत्याही पिक्चरात हिरोला संडासला जाताना पाहिलं नाही. पण एकदा तरी दिसलं अगदी गावठी स्टाईल.
प्रेग्नंसी क्रेविंग शब्द एकदापण वाचनात आला नाही. उलट मला एक शब्द असेल असं वाटलं, जॉइंट नाही.
पण मला शंका आहे
बोले तो, I daresay you must have noticed, पण...
[सं० सम् + न्यास (= त्याग, विसर्जन)]
याचा अर्थ, 'संन्यास' आणि 'संडास' या दोहोंचेही मूळ एकच असल्याचे गमते. (सम् + न्यास.)
म्हणजे, संन्यास आणि संडास एकच?????? दोहोंमध्येही कशाचा तरी त्याग करणे अपेक्षित असले, तरीसुद्धा?
स्मार्ट स्पिकर रिव्यू Harman
स्मार्ट स्पिकर रिव्यू Harman Kardon's new Invoke is the first smart speaker to be powered by Microsoft's Cortana voice assistant.
लिंक:https://www.neowin.net/news/harman-kardon-invoke-review-a-great-product…
स्पीच असिस्टंट गॅजेट्सचा वापर किती वाढला आहे? स्मार्ट होम?
सरकारने आता अर्थव्यवस्थेला
सरकारने आता अर्थव्यवस्थेला स्टिम्युलस देण्यासाठी प्याकेज आणायचे ठरवले आहे.
तर यातून कोणता धडा मिळतो?
Market on its own can't achieve a shit?
तसे नसेल तर "मार्केटला स्वत:हून काही करता न येण्यासाठी" कोणते अडथळे सरकार किंवा समाजाकडून (म्हणजे खरे तर मार्केटकडूनच) आहेत ते कोणी सांगू शकेल का?
आपण ज्याला देव मानतो (पक्षी-
आपण ज्याला देव मानतो (पक्षी- मार्केट) तो ऑम्नीपोटंट नाही असं कायसं समजलं.
मार्केट वि. सरकार या डिबेट चा मुद्दा नेहमीच, व स्किलफुली दुर्लक्ष केला जातो व तो म्हंजे मार्केट पर्फेक्ट नाही. मार्केट मध्ये फेल्युअर्स असतात, फ्रिक्शन असते.
मार्केट कडे प्रत्येक समस्येची सोल्युशन्स तयार असतात व समस्या आली रे आली की मार्केट ते सोल्युशन आचरणात आणून समस्येचे निराकरण करते हा मोठा गैरसमज आहे.
या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीच्यामागची अनेक कारणे असतात त्यातले एक म्हंजे सरकारमधे फेल्युअर्स नसतात असे मानणे. दुसरे म्हंजे कितीही प्रतिवाद केला तरी रेसिड्युअल मार्केट विरोध असतो तो घालवणे अतिमहा कठिण काम आहे. तिसरे म्हंजे मार्केट पार्टिसिपंट्स स्वत: मार्केट विरोधी (क्रोनी) असतात. उदा शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी. शेती ही पर्फेक्टली प्रायव्हेट सेक्टर आहे. व हा क्रोनिइझम .... मार्केट मधला कॉन्फिडन्स कमी करण्याचे काम करू शकतो.
.
.
Market is better than govt - ह्या दिशेने विचार करून पहा.
.
प्रतिसादाच्या लेंड्या
प्रतिसादाच्या लेंड्या
भाषा म्हणायची का काय! असभ्य, असांसदीय आणि फक्त विखारी कमेन्ट. koNi saadhaa niShedhahI noMdaवत नाही हे अजुनच आश्चर्यजनक तसेच चीड आणणारे आहे.
____
@गब्बर - पुन्हा "दोस्तानु" अशी भाषा वापरु नकोस. इथे दोस्त कोणी नाही. फक्त मूकपणे तमाशा पहात मनातल्या मनात टाळ्या वाजवणारे लोक आहेत.
माझं सोडा
तुम्ही सतत गटारातच लोळत असता ते पहा. शिवाय ऐसीवरील धाग्यांचंही तुम्ही गटार करून सोडलेलं आहे. "दोस्तानू"बद्दल लिहलेलं तुमच्या डोस्क्यात शिरेल इतकी बुद्धी तुम्हाला नाही तेव्हा ते स्पष्ट करण्यात अर्थ नाही. तुमच्यासारख्या गाढवाला फार प्रतिसाद देण्यात अर्थ नाही तेव्हा इत्यलम.
कायबी कळत नाही ट्रंप काय करतो
कायबी कळत नाही ट्रंप काय करतो नाय करत. त्या बातम्या वाचत नाही.
# आता हा लेख लोकसत्तात का आला? इकडे स्वैराचार बराच फोफावला आहे काय?
पॉलीअॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्थालोकसत्ता चतुरंग
दीडपानी लेखात नक्की काय म्हणायचय?





नास्तिक अतिरेकी असतात
हे नाही पटलं जी. अती आस्तिक पाहिजे असं वाटतंय.
बाकी काल्पनिक गोष्टी मानणं (विशेषतः देव ) म्हणजे मनोरुग्ण म्हणजे कुठल्या कुठं अन गुढग्याला... असं दिसतंय