समाज

राष्ट्रगीताची सक्ती : 'Curiouser and curiouser!” Cried Alice...

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा ह्यांच्या प्रस्तुत निर्णयाची पार्श्वभूमि आणि तत्संबंधी काही अन्य बाबी पाहताच Alice in Wonderland मधील 'Curiouser and curiouser!” Cried Alice... ह्याची आठवण येते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

नको भुलू जाहिरातींना !

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी बनवलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्राहकांनीच एकत्र येऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे. नाहीतर जाहिरातीचे युग आहे असे म्हणत या अतिरंजीत, खोटे दावे करणा-या जाहिरातींचा भडीमार होत राहणार. त्यासाठी अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया कार्यरत आहे. त्यांनी अ‍ॅप्सवरून तक्रार करण्याची सोय केली आहे. जाहिराती विरोधात तक्रार नोंदवा आणि त्याचा पाठपुरावा करा. जाहिरात ही ६५ वी कला आहे असे समजले जाते. जाहिरात कंपन्यांनी ही कला धनप्राप्तीसाठी अवगत करून घेतली आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

मायकेल हेर- 'डिसप्याचेस' आणि 'अपोकलिप्स नाउ' वाले- वारले

'डिसप्याचेस', १९७७ या व्हिएतनाम युद्धावरील प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक मायकेल हेर जुन २३ २०१६ ला वारले. 'अपोकलिप्स नाउ', १९७९ या अत्यन्त गाजलेल्या सिनेमाच्या जडणघडणीत सुद्धा त्यान्चा हात होता.

'डिसप्याचेस' मधील माझ्या अन्गावर आलेली काही वाक्ये:

“ I went to cover the war and the war covered me; an old story, unless of course you’ve never heard of it.”

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रवास करताना सावधानता बाळगा !

प्रवास हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे, बस किंवा विमानाचा प्रवास आपल्याला करावा लागतो. प्रवासी हा ग्राहक आहे. त्याला मिळणा-या सेवेत हलगर्जीपणा झाल्यास ग्राहकांनी त्याबाबत आवाज उठवायला हवा. त्यासाठी ग्राहकांनी तिकिटांसंबंधीच्या नियमांचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपला हक्क बजावायला हवा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !

मंडळी, उन्हाळा आला की घशाला कोरड पडते, तहान साध्या पाण्याने भागत नाही आणि मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो आणि कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन तो बहुतेक वेळा हुश्श.. करतो. पण मंडळी, या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो याचा आपल्याला विसर पडतो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक

उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सांख्यिकी : प्राथमिक अभ्यास

सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक्स हा विषय विज्ञानाचा एक भाग आणि विज्ञान, समाजशास्त्रं अशा विषयांचा अभ्यास करण्याचं एक तंत्र आहे. शाळेत आपण सरासरी, टक्केवारी अशा संकल्पना शिकतो. म्हटलं तर कोणत्याही दोन आकड्यांची सरासरी काढता येते. तरीही आजचं तापमान २४ अंश सेल्सियस आणि आजच्या दिवसात मी सव्वा लिटर पाणी प्यायलं, यातले दोन आकडे, २४ आणि १.२५ यांची सरासरी काढली जात नाही. मुद्दा असा की वेगवेगळ्या आकड्यांचा आपसांत संबंध कसा लावायचा यासाठी निरनिराळे नियम वापरले जातात. जे आकडे गोळा केले जातात त्याबद्दल काही प्राथमिक अंदाज, माहिती असणं आवश्यक आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की

ज्याची योग्य तक्रार त्यालाच परतावा....

अनुभव 1 - कोथरुड, पुणे येथे जाण्यासाठी एसटीच्या सात बंगला - जेजुरी गाडीचं तिकिट मी काढलं. बसच्या ठिकाण म्हणून माझ्या घराजवळच्या थांब्याचं नांव दिलं. तिकिट एसटीच्या अधिकृत आरक्षण केंद्रावर काढलेलं असल्यामुळे मला रीतसर संगणकीकृत तिकिट मिळालं.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - समाज