माहितीपर लेखन

मराठीतील पहिल्या वेब कंटेट चॅनेलची वर्षपूर्ती

भाडिपा : भारतीय डिजिटल पार्टी
उदाहरणार्थ मराठीतील पहिला वेब कंटेट चॅनेल वगैरे वगैरे

समीक्षेचा विषय निवडा: 

आश्चर्यकारक विज्ञान

आश्चर्यकारक विज्ञान या नावाने प्रकाशित केलेल्या या संचातील भुलभुलैय्या, महाशक्तीशाली लेसर, उर्जानाट्य,व अलिबाबाची गुहा ही विज्ञानविषयक पुस्तकं वाचत असताना आताच्या नवीन पिढीचा हेवा वाटू लागतो. कारण २०-३० वर्षापूर्वी आपल्या मनातील कुतूहलकारक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, पालक, भाऊ-बहीण, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक, पाठ्य पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, वाचनालय यांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते. (व त्या उत्तरावाचून काही अडत नाही हे लक्षात आल्यानंतर गप्प बसावे लागत होते.) परंतु आज गूगल अंकल एका क्लिकमध्ये सर्व माहिती तुमच्या डोळ्यासमोर हजर करतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

पश्चिम घाट बचाव मोहीम आणि जगदीश गोडबोले

पश्चिम घाट बचाव मोहीम आणि जगदीश गोडबोलेजगदीश गोडबोले हे पुण्याचे अवलिया पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्व, ज्यांनी पर्यावरण क्षेत्रात ३०-३५ वर्षांपूर्वी इतके काम करून ठेवले आहे, पण मला वाटते ते आणि त्यांचे काम काहीसे विस्मृतीमध्ये गेले आहे. काही वर्षांपूर्वी वाचनालयात सापडलेले जगदीश गोडबोले यांचे मोहीम इंद्रावतीची हे पुस्तक वाचले होते. इंद्रावती नदी जी महराष्ट्र, आणि आजचे छत्तीसगड ह्या दोन राज्यांच्या सीमेवरून वाहते, त्या भागातील आदिवासी जीवनाच्या शोधमोहीमेबद्दलची माहिती त्यात होती. जगदीश गोडबोले यांनी पवना धरणग्रस्तांच्या बाबतीत काम केले आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

पूर्वज-वि. ग. कानेटकर

आज सकाळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध साहित्यिक वि. ग. कानेटकर यांचे निधन झाल्याचे वाचले. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पूर्वज हे पुस्तक वाचून ही समीक्षा लिहिली होती. ती येथे देत आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 

श्रीविठ्ठलः एक महासमन्वय

रा. चिं. ढेरे गेले. त्यांना मी कधी पाहिले नव्हते, भेटले नव्हते किंवा भेट घ्यायचा कधी प्रयत्नही केला नव्हता. पण त्यांच्या लिखाणातून मी त्यांना इतकी उराउरी भेटले होते, की त्यांना मी फार जवळून ओळखत होते असे वाटते. संशोधन कसे करावे आणि ते कसे सादर करावे याचे धडे त्यांच्या लिखाणातून मिळत राहतात. अतिशय काटेकोर संशोधनपद्धती वापरून संशोधन करणारा, शोधाच्या नव्या वाटा, नवी साधने शोधणारा आणि ते संशोधन ललित भाषेत मांडणारा एक प्रकांड विद्वान म्हणून त्यांच्याविषयी आदर वाटतो, तशी आपुलकीही. कारण त्यांचे संशोधनपर लिखाण पोटार्थी नाही, रुक्ष नाही, बढतीच्या मिषाने केलेले नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

इथे फोटो कसे चढवावेत?

नवीन सदस्यांना मदत असा ह्या धाग्याचा हेतू आहे.
फोटो चढवणं जरा कठीण वाटू शकतं. खाली दिलेली पद्धत वापरल्यास फोटो चढवणं सोपं वाटू शकेल.
इथे फोटो चिकटवण्यासाठी आधी तो फोटो जालावर असणं आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की तुमच्या लॅपटॉप किंवा
वैयक्तिक संगणकावरून थेट इथे फोटो टाकणं शक्य होणार नाही. जालावर म्हणजे पिकासा, फ्लिकर किंवा तत्सम
कुठल्याही साईटवर असलेला फोटो इथे चिकटवता येईल. इथे मी पिकासाचं उदाहरण घेतलं आहे.

पायरी १

पिकासा अकाउंट मध्ये लॉगिन करून अपलोड वर टिचकी मारा

गणितस्य कथा: रम्या: |

एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ, आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे रंजकपणे मांडला आहे – त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके!

- डॉ. श्रीकृष्ण दाणी
समीक्षेचा विषय निवडा: 

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

दि अल्टिमेट गिफ्ट

Self help या आजकालच्या तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांच्या ढिगार्‍यातून खरोखरच एखादे तरी वाचनीय पुस्तक मिळू शकेल याबद्दल शंका असतानाच जिम स्टोव्हाल या लेखकाचे दि अल्टिमेट गिफ्ट हे पुस्तक हाती लागले. सोप्या व मोजक्या शब्दात आपली जडण घडण कशी असावी, आपली जीवनशैली कशी असावी, कुठल्या जीवनमूल्यांना अग्रक्रम द्यावीत, इत्यादी अनेक पैलूवर या पुस्तकात फार सुंदर मांडणी केलेली आहे. कुठलेही शब्दालंकार नाहीत, साहित्यिक टीका टिप्पणी नाही, संदर्भबंबाळपणा नाही, वस्तुपाठ म्हणून इतरांचा उल्लेख नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - माहितीपर लेखन