Skip to main content

संकीर्ण

पक्षीनिरीक्षण - बाळगावा असा छंद

बाल्कनीत टांगलेल्या साखरेच्या पाण्यावर हक्क सांगण्यासाठी इनमीनतीन-सव्वातीन इंचांच्या दहा-बारा हमिंगबर्ड्सची एकमेकांवरची दादागिरी तर आता रोजचीच झाली आहे. समोरच्या झाडावरील रिकाम्या घरट्यात काही महिन्यांत घुबडांची पिलं असतील. समोरच्या खोलीत काम करत असताना माझ्या बाल्कनीचा दरवाजा आता सतत उघडाच असतो आणि लॅपटॉपच्या शेजारी आता कायम दुर्बीण असते. कोणतातरी दुर्मीळ पक्षी माझ्या बाल्कनीत कधीतरी येईल याची मी वाट पाहतो आहे!

विशेषांक प्रकार

Power - Audrey Lord

संकीर्ण #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

Power - Audrey Lord

स्वैर भाषांतर - फूलनामशिरोमणी

कविता आणि युक्तिवादातला फरक इतकाच, की,
तयारी असावी लागते घात करून घेण्याची,
पोटच्या पोरांऐवजी,
स्वतःचा!

इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १

"... नेमाने झोपून नेमाने उठायला मी काही अभ्यासू आणि कष्टाळू कॉलेजतरुण नव्हे. अभ्यास करून, कष्ट करून आयुष्यात मला काही मिळवायचं आहे का? नाही. जरी कष्ट केले तरी काही मिळणार आहे का? नाही. तशी धमक माझ्यात आहे का? नाही. मला महत्त्वाकांक्षा नाही. यापूर्वी नव्हती आणि आत्ताही नाही. मग निष्कारण सकाळी लवकर उठून आपल्या उर्वरित आयुष्याचा हा पहिला दिवस आहे असं स्वत:ला बजावून सांगून पुढे मी काय करणार आहे? काही नाही. म्हणून मग कालची रात्र अशीच काहीबाही वाचत विचार करत मनन करत जागून काढली. या निशा सर्वभूतांना तस्यां जागर्ति संयमी. शितावर जमलेली भुतं जेव्हा झोपलेली होती तेव्हा संयमाने निशापाणी करीत विश्वाची चिंता करीत मी आपला जागा होतो. ह्या चिंतेचं ओझं जेव्हा पेलवेनासं झालं तेव्हा श्रान्त आणि क्लान्त मनाने रामप्रहरी जो डोळा लागला तो हा आत्ता उठतो आहे. माझ्या उर्वरित आयुष्याची ही पहिली संध्याकाळ आहे. तेव्हा चहा घेऊन ये."

विशेषांक प्रकार

ॲस्टेरिक्स-ओबेलिक्स गोतावळ्याच्या अभूतपूर्व जगात

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

ॲस्टेरिक्स-ओबेलिक्स गोतावळ्याच्या अभूतपूर्व जगात

- प्रभाकर नानावटी

विशेषांक प्रकार

पारंपरिक पूर्णब्रह्म - आशिष नंदी

संकीर्ण

पारंपरिक पूर्णब्रह्म

- आशिष नंदी

रेचल ड्वायर यांनी ‘स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज, लंडन’ इथे आयोजित केलेल्या परिषदेत, नोव्हेंबर २००२मध्ये केलेल्या बीजभाषणाचा सारांश.

विशेषांक प्रकार

ती गेली तेव्हा...

संकीर्ण

ती गेली तेव्हा...

- शशांक ओक

माझे आई-वडील दोघेही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गेले. दोन्ही वेळा पाऊस होताच...

विशेषांक प्रकार

'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?

संकीर्ण

'Panini': भाषाशास्त्रज्ञ की सॅन्डविच?
(अर्थात, कंप्युटेशनल भाषाविज्ञानाशी तोंडअोळख)

- वरदा कोल्हटकर

विशेषांक प्रकार