Skip to main content

दिनविशेष

सोम (Somme) लढाईच्या शताब्दी निमित्ताने : पहिले महायुद्ध आणि मराठी साहित्य

शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी, जुलै १ १९१६, पहिल्या महायुद्धातील सोमच्या (Somme) लढाईला सुरवात झाली. ही लढाई म्हणजे मानवी इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस आहे.

ही लढाई आपल्याला वाटते त्यापेक्षा फार जवळची आहे कारण त्यात कित्येक मराठी बोलणाऱ्या माणसांनी जीव गमावला आहे. १२ लाख भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला आणि त्यातील ७४,००० जणांनी प्राणांची आहुती दिली. (दुसर्या महायुद्धात ८७,०००; १९७१च्या युद्धात ३,९००; १९६२च्या ३,०००; १९६५च्या ५,३०० जवान शहीद झाले होते. सर्व आकडे विकिपेडिया वर आधारित.)

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर...त्यांच्या ताकतीचा विनोद पुन्हा निर्माण झाला नाही

आज, जून २९ २०१६, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांची १४५वी जयंती. दोन-तीन गोष्टी लिहाव्याश्या वाटतात...

त्यांची सर्व नाटक आता वाचायला भिकार वाटतात पण त्यांच्या ताकतीचा विनोद (मराठी गद्यात) पुन्हा निर्माण झाला नाही. मी कधी कधी कल्पना करत असतो की आज कोल्हटकरांनी कशा कशा वर लिहलं असत... वेळ पुरला नसता त्यांना...

त्यांच्या पत्रांची दोन पुस्तके मी वाचली आहेत. त्यातून त्यांचे जे विलक्षण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभ राहत ते मला एकीकडे हसवत असत आणि एकीकडे खिन्न करत. ती पत्र वाचून वाटत त्यांच्याशी जाऊन गप्पा माराव्यात...त्यांना आणखी बोलत करावं!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

आजचे दिनवैशिष्ट्य - ७

दिनवैशिष्ट्य दाखवतय: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर जन्म २१ जून १८६१...माझ्या मते ती तारीख आहे २९ जून १८७१..https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/khand4-suchi?id=7562:2011-12-24-09-01-18&catid=4:2010-10-21-05-11-34

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स