अपशब्द

पुस्तकांच्या दुकानात 'रूड फ्रेंच' नावाचं पुस्तक दिसलं. त्याची प्रस्तावना वाचली आणि रहावलं नाही. लेखकांच्या परवानगीशिवाय प्रस्तावनेचं (अगदी शब्दशः नसलेलं, माझ्या शब्दांतलं) भाषांतर आणि इतर काही लिहीत आहे:

बरेच लोकं, शब्दकोषाची पानं उलटताना शिव्या आणि अपशब्दांचे अर्थ अगदी सुरूवातीलाच पहातात. आणि कधीमधी प्रकाशकाकडे या शब्दांची तक्रार करणारी पत्रंही पाठवतात. बोली भाषेच्या ह्या 'लेण्यां'मुळे जेवढ्या लोकांच्या शेंड्यांना झिणझिण्या येतात तेवढ्याच लोकांना त्यांची गंमतही वाटते. या शब्दांना सामान्यतः भाषेचा विचित्र प्रकारही समजलं जातं; सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. प्रेम बसावं असा राक्षसच! पण या शब्दांना फक्त बीभत्सता आणि हिडीसपणाची भाषा समजणं म्हणजे शिव्या-अपशब्दांचे स्थान न समजण्यासारखे आहे.

या पुस्तकातून लेखकांना फ्रेंच स्लँग (मराठी?) फक्त खरबरीत आणि गलिच्छ शब्द-वाक्प्रचारांपुरती मर्यादित नाही हे दाखवून द्यायचं आहे. या पुस्तकाद्वारे ही स्लॅंग किती ताकदवान, रंगीबेरंगी आणि अभिव्यक्तीने ठासून भरलेली आहे हे दाखवायचं आहे. व्हीक्टर ह्यूगो (प्रसिद्ध फ्रेंच लेखक)ने या भाषेचं वर्णन "लढाईची भाषा" असं केलं होतं; कारण ही भाषाच मुळात गरीब, तळागाळातल्या आणि बंडखोर लोकांच्या अनुभवातून भाषा आहे. (चित्रबोध-२ मधे ऋषिकेशने आफ्रीकेतल्या आदिवासींच्या आपल्यासाठी विचित्र असणार्‍या प्रथा आणि त्यांची कला यांच्याबद्दल लिहीलं आहे त्याची इथे आठवण झाली.) ही भाषा आगळीक, अवहेलना आणि टर उडवण्याची आहे. पण विनोद हा या भाषेचा मानाचा तुरा आहे - विनोद ही कठीण काळातली उत्तम बचावनीती आहे.

पुस्तकात 'पोलिटीकल करेक्टनेस' सांभाळला आहे असं प्रस्तावनेत लेखकांचं म्हणणं आहे. 'रूड फ्रेंच' या पुस्तकाचा हेतू फ्रेंच भाषेच्या अपशब्दांच्या भाषेचा शोध घेणे आणि त्या भाषेच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करतानाच माहितीची देवाणघेवाण आणि करमणूक हे सुद्धा आहे.

याच धर्तीवर 'पोलिटीकल करेक्टनेस' सांभाळत आपणही मराठीची प्रमाण भाषा आणि असंख्य बोली भाषा, इतर भाषांमधून मराठीत आलेले शब्द यांची श्रीमंती मिरवावी, त्यातून थोडीबहुत करमणूकही व्हावी असा हा धागा सुरू करण्यामागचा उद्देश आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

माझ्याकडून अशा प्रकारचा एक किस्सा/थोडं Lost in translation & transformation ही त्यात आहे.

अशाच एका शुक्रवारी रात्री घरमित्र (housemates) बिअर आणि व्होडकावर थोडे उच्च पातळीवर पोहोचले होते. त्यांच्या उच्च पातळीवर पोहोचण्यावरच मी पण उच्च पातळीला पोहोचले होते म्हणायला हरकत नाही. तेव्हा मी एका पोलिश मित्राची काहीतरी छोटीशी खोडी काढले. त्यानेही सात्त्विक संतापाने मला 'मोफो' अशी शिवी दिली. मग निरागस प्रश्नोत्तरमालिका सुरू झाली.

मित्र: मोफो ...!
मी: ही शिवी मला देणं किती निरूपयोगी आहे हे तुला कधी समजणार?
मित्रः का? ते सोड. तुझ्या भाषेत याच अर्थाची शिवी आहे का? (त्याने ठ आणि भ समोर हात टेकले होते.)
मी: होय तर. फक्त आईच कशाला, आमच्याकडे बहिणीलाही आईएवढाच मान मिळतो.
मग शब्द, त्यांची फोड, थोडं उच्चार घोटून घेणं वगैरे झालं. तोपर्यंत मी खोडी काढली होती हे तो विसरला ... असं मला पुढच्या प्रश्नावरून वाटलं.

मित्र: आईला काय म्हणतात हे समजलं, वडलांना काय म्हणतात?
मी: बाबा.
मित्र: बाबा म्हणजे फादर का डॅड?
मी: डॅड
मित्रः You are such a babac****

त्यापुढे बराच वेळ कोणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. या मित्राच्या विनोदबुद्धीवर पुढे आम्ही कोणीही, कधीही शंका घेतली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहाहा! काय मस्त धागा आहे. वेळ मिळेल तशी भर घालीनच. तूर्तास रंगीबेरंगी प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा मस्त विषय.. धाग्यावर लक्ष ठेऊन आहेच!
मात्र तुर्तास, बिकाश्रींनी प्रचार केलेला मौन हा शिव्यांमधील मेरुमणी सध्या धारण करतो आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहाहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

घ्या! आम्ही यांना कोणता रंग आवडतो म्हणून विचारलं तर पांढरं निशाण काय फडकवता? बरं किती भाषांमधून मौन आहे म्हणे तुमचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पांढर्‍या रंगात 'ए टु झेड' म्हणजे 'अ' ते 'झ' सारे नाही का आले? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

देवीतुल्य स्त्रियांनी असे धागे काढणे कितपत योग्य आहे भेंडी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

बघ ना... च्यायची कटकट! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

या वरून २ आठवणी :
१. 'छक्के-पञ्जे' या मराठी चित्रपटात सविता प्रभुणे आणि दिलीप प्रभावळकर प्रेमात पडतात. पण सविताच्या वडिलाञ्ची (आत्माराम भेण्डे) सम्मती मिळवायची ही प्रभावळकरांसाठी कठीण परीक्षा असते कारण जावयाला दणदणीत शिव्या देता यायला पाहिजेत अशी त्याञ्ची अट असते आणि प्रभावळकर पडले अगदीच मुळमुळीत स्वभावाचे मराठी व्याकरणाचे प्राध्यापक. पण हिम्मत करून ते वडीलान्ना भेटायला जातात. वडीलान्नी "शिव्या देता का ?" असे विचारताच प्रभावळकर सुरू करतात, "अरे, तू मध्यमपदलोपी द्विगू समास... उभयान्वयी अव्यय... बहुव्रीही.." वगैरे !! वडील चारी मुण्ड्या चीत !
तो प्रसङ्ग प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे. दुवा शोधला पण मिळाला नाही.

२. मी विद्यापीठाच्या वसतीगृहात असताना एका सौम्य रॅगिंगला सामोरे जावे लागले. तेव्हा मला अत्युच्च शिव्या द्यायला साङ्गीतले. प्रसङ्ग बाका होता. तोपर्यन्त 'आयला' असे देखील मी उच्चारले नव्हते (अजूनही तोण्डाने उच्चारलेले नाही इतका मी मुळमुळीत.). परत अश्या आणिबाणीच्या प्रसङ्गाने कसे वागायचे असते हे कळायची अक्कल आणि त्याप्रमाणे वागायची धडाडी नव्हती (छक्के पञ्जे तेव्हा पाहिला नव्हता ना !) त्यामुळे सीनियर्स्ना शिव्या देण्याची कधी नव्हे ती इतकी उत्तम सन्धी असूनही वाया घालवली मी. मी म्हणालो, की मला शिव्या माहीत नाहीत, कारण मी अश्या वातावरणात वाढलेलो नाही. माझ्या आजूबाजूला असे लोक राह्त नाहीत. मग त्यान्नी विचारले, "कुठे राहतोस ?". मी बोलून गेलो, "मुम्बईत शिवसेना-भवनाजवळ". ते ऐकताच हसण्याचे जे काही स्फोट झाले उसकी सदा अभीतक कानों में गूँज रही हैं | क्षणभर मला कळलेच नाही काय झाले आणि थोड्या क्षणान्नी डोक्यात प्रकाश पडल्यावर मी देखील हसण्यात सामील झालो. (नन्तर माझ्या मागून, एका गावतल्या मुलाने सीनियर्सच्या सकल कानाञ्चे यथायोग्य समाधान करणारी अभूतपूर्व अशी सरबत्ती करून त्या सर्वाञ्चे आत्मे तृप्त केले.. त्यानन्तर मी अनेक प्रकारचे 'अप'शब्द ऐकले पण त्या प्रकारच्या शिव्यान्ना तोड नाही)

---
प्रश्न :

एक 'अप'शब्द ब्राह्मणी उच्च/मध्यमवर्गातही सर्रास वापरला जातो, तो म्हणजे, 'अरे कार्ट्या / अगं कार्टे' किंवा 'शिञ्चे कार्टे'
कार्टे या शब्दाचा अर्थ 'स्मशानात मर्तिकाचे विधी करणार्‍या ब्राह्मणाचे अपत्य' आहे असे वाचल्याचे आठवते.(शब्दरत्नाकर - वा. गो. आपटे) हा शब्दकोश आत्ता माझ्याजवळ नसल्याने गरजून्नी खात्री करून घ्यावी.
अश्या प्रकारचे शब्द, ज्याञ्चे मूळ अर्थ माहीत नसतानाही प्रसङ्गानुसार वापरले जातात, आणि ते वापरले जाताना वापरणार्‍या व्यक्तीला कोणती विशिष्ट भावना व्यक्त करायची असते, हा ही एक अभ्यासाचा विषय. मी कधीच न वापरल्याने मला साङ्गता येणार नाही. ज्यानी वापरला आहे ते साङ्गू शकतील काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसाद आवडला.

निसरड्या जमिनीवरून चालण्याचा प्रयत्न करणार्‍या धाग्याला हलकेच धक्का देऊन ढुंगणावर आपटवलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अश्या प्रकारचे शब्द, ज्याञ्चे मूळ अर्थ माहीत नसतानाही प्रसङ्गानुसार वापरले जातात, आणि ते वापरले जाताना वापरणार्‍या व्यक्तीला कोणती विशिष्ट भावना व्यक्त करायची असते, हा ही एक अभ्यासाचा विषय. मी कधीच न वापरल्याने मला साङ्गता येणार नाही. ज्यानी वापरला आहे ते साङ्गू शकतील काय ?

मलाही फार माहिती आहे असं म्हणणार नाही.
पण अनेक शब्दांचे मूळ अर्थ आता घासून गुळगुळीत झालेले आहेत. तळागाळातल्या वर्गातल्या लोकांकडून येणारा खरबरीतपणा पुरता गेलेला आहे. च्यायला, आयला असे शब्द अगदी सहज सुचलेले. पण पुचाट, शिंच्या/शिंचे हे ही शब्द तसेच. माझ्या ओळखीतल्या 'आजी' वयाच्या स्त्रिया, ज्यांच्यापैकी बर्‍याच आता हयातही नाहीत, त्यांच्या तोंडी शिंच्या/शिंचे हे शब्द फार होते. बरं हा वर्ग तळागाळातला नाहीच, जातीच्या उतरंडीत सर्वात वरचा. शिंच्या हा शब्द शेंदाडीच्या यावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ रांडेचा असाच होतो असं जेव्हा एका काकांकडून समजलं तेव्हा "आपण अगदीच कुचकामी" अशी लाज वाटली होती. (मग त्यांनी जाताजाता मेरियम वेबस्टरवर know चा अर्थही बघायला सांगितला.) अनेक आज्या सहज, येता-जाता स्वतःच्या पोरांचाही उद्धार शिंच्या या शब्दाने करायच्या.
शेंदाडशिपाई, पुचाट हे शब्द आता पोलिटीकनली इनकरेक्ट वाटतात का? कुंती या शब्दांत इंग्लिशमधल्या आजच्या एका अतिशय अपमानास्पद समजल्या जाणार्‍या अपशब्दाचं मूळ आहे असा काही लोकांचा दावा आहे.

एकेकाळी असणारे काही शब्दांचे अर्थ आता बदललेले आहेत. च्यायला, आयला हे अपशब्द मानायचे का असा प्रश्न अनेकदा पडतो.

----

दुसर्‍या देशांत गेल्यास तिथले वाहतुकीचे नियम वेगळे असू शकतात हे पूर्णपणे लक्षात आलं नव्हतं. साहेबाच्या देशात झेब्रा-क्रॉसिंगवर पादचार्‍यांना आधी जाऊ द्यावं असा नियम आहे. (बहुदा) डेन्मार्कमधे असा नियम नाही. तिथल्या एका झेब्रा-क्रॉसिंगवरून मी गप्पांच्या नादात तशीच चालत निघाले आणि एका सायकलवाल्याशी होणारी टक्कर त्याच्या प्रसंगावधानामुळे झाली नाही. त्याने डेनिशमधे मला काहीतरी शिवी दिली, असा माझा समज झाला. मी पण तेवढ्याच जोरात त्या सायकलवाल्याच्या अंगावर 'मेरी ख्रिसमस' असं ओरडले तेव्हा एका मित्राने माझी चूक होती हे लक्षात आणून दिलं. मग निदान अपशब्द न वापरल्यामुळे अगदीच "ही फारच लाज आणते" असं इतरांचं झालं नाही.

----

माझं आजोळ कर्जतच्या जवळ. त्या भागात कातकरी लोकांची वस्ती बर्‍यापैकी आहे. सगळ्या शेतकरी लोकांच्या घरी कातकरी गडी असायचे. त्यांची भाषा ब्राह्मण आणि मराठा लोकांच्या तोंडात आलेली दिसायची. विवक्षित असे शब्द आता आठवत नाहीत. पण, मोफोला समानार्थी शुद्ध मराठी शब्द मी तिथेच शिकले. गंमत म्हणजे, आमच्या घरी असणार्‍या गड्याच्या दोन मुली, सख्ख्या बहिणी, आपसांत भांडणं झाली की एकमेकींना आई-बहिणीवरून शिव्या देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहा..
बरं, या शिव्या फक्त आईबहिणींवरूनच असतात, बायकोच्या उल्लेखाने स्फुरण चढत नसेल कुणाला भांडायला.किंवा युनिसेक्स क्रायटेरियामुळे बायको हा जेंडरस्पेसिफिक फॅक्टर विचारात घेतला नसावा.
आईबहिणींवरूनच्या शिव्या तर खूपच साधारण, त्याचबरोबर खुद्द आईबापाने देखिल मुलगा-मुलगीला अनौरस म्हणून शिवी देणं तसं विचित्रच. मराठी-इंग्रजीतल्या शिव्या तर बर्‍याच माहित आहेत-होत्या. पण एकदा रेल्वेतून जाताना एका मुस्लिम स्त्रीने तिच्या मुलाला 'नस्ल-ए-हरामा' अशी नजाकतदार शिवी दिल्यानंतर शेजारच्या डब्यात जाऊन खो खो हसून आल्याचं आठवतंय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

आणखी मजा पहा. माझ्या माहितीप्रमाणे मराठी स्त्रिया आपसांत भांडताना एकमेकींचं शील, चारित्र्य काढतात (उदा: बाजारबसवी, गावभवानी इ.). इंग्रज बायका आपसांत तेच करतात (bitch). सभ्य उल्लेखात बाई मंद असल्याचं सुचवलं जातं (cow). शक्य असेल (आणि तेवढा नाठाळपणा असेल) तर (शक्यतोवर मुली, स्त्रियांनीच) सभ्य ब्रिटीश स्त्रियांसमोर एखादीचा उल्लेख "काऊ" असा करा आणि गंमत पहा. चीनी आणि पोलिश मित्रांकडून जे समजलं त्या शिव्याही साधारण अशाच प्रकारच्या होत्या; अर्थ वेगवेगळे, पण सुचवायचं आहे ते हेच!

नवीन किंवा परकी भाषा शिकताना संस्कृती माहित नसेल तर जागोजागी अडखळायला होतं. अपशब्दांची भाषा, भाषेच्या मर्यादेपलिकडे जागतिक आहे का काय असा प्रश्न पडला. जगाच्या वेगवेगळ्या भागातल्या, तळागाळातल्या लोकांचा तसा एकमेकांशी संबंध येणं कठीण आहे. पण उच्चभ्रू व्यापारी, राजे, आणि सैनिक, खलाशी लोकांचा संबंध येत असणार. सांस्कृतिक देवाणघेवाण अशीही झालेली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रकाशीत केलेले एक पुस्तक नुकतेच माझ्या वाचण्यात आले. मराठीतील अपशब्द आणि शिव्या या विषयाला वाहीलेले हे पुस्तक वाचनीय आहे. लेखक मराठे नावाचे एक गृहस्थ आहेत. तूर्तास पुस्तक विकत घेण्यास गेले तर मिळत नाही. पुस्तक अभ्यास करून लिहीले आहे. जिज्ञासूंनी जरूर वाचावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0