पाकिस्तान-२

शालेय इतिहासात कोणती घटना घडली, केव्हा आणि कुठे घडली हे शिकवले जाते. पण, एखादी विशिष्ट घटना का घडली, कुठे चूक झाली, हे कमी शिकवलं जातं?
हे विधान ॲडॉल्फ हिटलरने लिहिलेल्या 'माईनकाम्फ' मधील आहे, पण ते अर्थपूर्ण आहे. मी हिटलरला पाकिस्तानच्या इतिहासात असाच आणत नाहीये. तर त्याला मुख्य पात्रांत स्थान देतोय.
शेवटी, 1947 च्या दोन दशकांपूर्वीच पाकिस्तानची मागणी का उद्भवली? वेगळा मुस्लिम देश यापूर्वीही निर्माण होऊ शकला असता. जर दोन धर्म गेल्या अनेक शतकांमध्ये एकत्र राहण्यासाठी कधीही योग्य नव्हते, तर मग फाळणी आधीच झाली असती. असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की पूर्वी मुघल राजवट होती, त्यामुळे अल्पसंख्याक असूनही मुस्लिमांना वेगळ्या देशाची गरज नव्हती.
पण, हा युक्तिवाद भारतापुरता मर्यादित ठेवून चालनार नाही. जगात काय चालले होते? प्रत्येकजण अचानक स्वतःची हक्काची का शोधू लागला होता?
पहिल्या महायुद्धानंतर, साम्यवाद आणि नाझीवाद दोन्ही उदयास आले. दोन्ही कल्पना भारतात आल्या आणि दोन्हींचा भारतावर प्रभाव पडला.
हिटलरची नवी उंची गाठत असताना 1930 पासून 'टू नेशन थिअरी' उघडपणे समोर येऊ लागली.जगभर ‘पितृभूमी’ (फादरलॅंड) आणि ‘शुद्ध वंश’ असे शब्द जिभेवर येऊ लागले. 'पाकिस्तान' या शब्दाचे निर्माते चौधरी रहमत अली यांच्यावर नाझीवादाचा इतका प्रभाव होता की त्यांनी हिटलरची अनेक वाक्ये तोंडपाठ केली होती. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला त्याच वर्षी त्याने शुध्द मुस्लीम देश पाकिस्तान असे पत्रकं वाटायला सुरुवात केली होती.
आपल्या वंशांची, आपल्या धर्मांची, आपल्या हजारो वर्षांच्या पूर्वजांची भूमी शोधून लोक एकत्र करणे, हिंदुत्व या शब्दाद्वारे हिंदूंना एकत्र करणे, मुस्लिम लीगच्या माध्यमातून मुस्लिमांना एकत्र करणे, ज्यूंचा झिओनिझम. युरोपमधील विविध ख्रिश्चन गटांचे जर्मन, पोल, रोमनी, फ्रेंच इ. देशात विभागले जाणे, इतर वंशीयांना देशातून बाहेर काढणे, सर्व काही एकाच वेळी सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धाने शिखर गाठले. केवळ युरोपातच नाही, तर भारतासारख्या देशातही.
रहमत अली हा तरुण रक्ताचा होता, त्याच्यावर हिटलरचा प्रभाव पडला, यात काहीही आश्चर्य नाही. त्यावेळी जर्मनी आणि हिटलरच उगवता सूर्य होता. मोहम्मद अली जिना यांच्या विचारांमध्ये तफावत आहे. एकीकडे इस्लाम देशाची इच्छा आहे, तर दुसरीकडे इंग्रज गेल्यानंतर मुस्लिमांचे काय होईल, अशी भीतीही आहे. जशी युरोपातील ज्यूंची परिस्थिती झाली होती तशीच भारतात मुस्लिमांची होईल का? ज्यूंना त्यांची जमीन शोधली, पण भारतीय मुस्लिम कुठे जाणार? त्यांची जन्मभूमी कुठे आहे? ते पिढ्यानपिढ्या भारतीय आहेत.
भीतीने झाले की बळजबरी झाले. युद्धाने झाले की कूटनीतीने घडले. अवघ्या दोन दशकांत असे कापून-छाटून, वंश-धर्मावर आधारित दोन देश निर्माण झाले. युद्धानंतर पश्चिम आशियाच्या एका सीमेवर ज्यूंचा देश इस्रायल आणि दुसऱ्या सीमेवर मुस्लिमांचा देश पाकिस्तान बनला.
काही देश असे राहीले ज्यात नाझीवादाचे भूत कुठेतरी कोपऱ्यात लपून राहिले. जिथे लोकशाही प्रबळ राहीली. खेदाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान त्यातला एक नव्हता, ज्याची किंमत त्याला पुन्हा पुन्हा चुकवावी लागली. लियाकत अली खानना ज्या बागेत गोळ्या घातल्या गेल्या त्या कंपनी बागेचे नाव लियाकत बाग ठेवले गेले. योगायोगाने पाच दशकांनंतर बेनझीर भुट्टो यांचीही याच बागेत हत्या झाली. लियाकत अली खान यांना एका अफगाण व्यक्तीने गोळ्या घातल्या, जो पाकिस्तानमध्ये राजकीय निर्वासित होता. तो सरकारी खर्चाने अबोटाबादमध्ये त्याच भागात राहत होता, ज्या भागात लादेनला काही वर्षांनंतर आश्रय देण्यात आला.
त्याला पकडन्या पुर्वीच त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुख्य पोलिस अधिकाऱ्याच्या विमानाचा अपघात झाला (किंवा केला गेला.) असा अंदाज वर्तवला जातो की अमेरीका-सोव्हिएत शीतयुद्धातील पहिली गोळी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत खान यांना लागली, ही हत्या हा एक आंतरराष्ट्रीय कट होता, ज्यामध्ये ब्रिटिशांचाही सहभाग होता ज्यांची पाकिस्तानवरील प्रशासकीय पकड संपलेली नव्हती. मात्र, स्कॉटलंड यार्डच्या टीमला पाचारण करून तपास केला असता, कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.
एकीकडे लियाकत अली खान यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांच्याकडे वीस अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मागितली होती, तर दुसरीकडे त्यांना सोव्हिएत युनियनला भेट देण्याची घाई झाली होती. त्यांची हत्या हा 'टर्निंग पॉइंट' ठरला, त्यानंतर सोव्हिएत हा पर्याय संपला. पाकिस्तान पूर्णपणे अमेरिकेच्या तावडीत आला. हळूहळू स्वतःच्या सैन्याच्या तावडीत.
(क्रमशः)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मोहम्मद अली जिना यांच्या विचारांमध्ये तफावत आहे. एकीकडे इस्लाम देशाची इच्छा आहे, तर दुसरीकडे इंग्रज गेल्यानंतर मुस्लिमांचे काय होईल, अशी भीतीही आहे. जशी युरोपातील ज्यूंची परिस्थिती झाली होती तशीच भारतात मुस्लिमांची होईल का? ज्यूंना त्यांची जमीन शोधली, पण भारतीय मुस्लिम कुठे जाणार? त्यांची जन्मभूमी कुठे आहे? ते पिढ्यानपिढ्या भारतीय आहेत.

अं… इस्राएलची स्थापना १९४८ची नव्हे काय? बोले तो, जीनांच्या मृत्यूच्या थोड्याश्याच अगोदरची? (स्वतंत्र इस्राएलची घोषणा: १४ मे १९४८. जीनांचा मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८.) आणि, मुख्य म्हणजे, हिंदुस्थानच्या फाळणीच्या बऱ्याच नंतरची? (फार कशाला, पॅलेस्टाइनची फाळणी करून एक भाग ज्यूंना, एक भाग अरबांना, आणि जेरुसलेम आंतरराष्ट्रीय राजवटीखाली, अशी वाटणी करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा ठरावदेखील (बादवे या ठरावास भारताने विरोध करणारे मत नोंदविले होते.) २९ नोव्हेंबर १९४७चा, म्हणजे हिंदुस्थानच्या फाळणीच्या थोड्या नंतरचा.) मग अशा परिस्थितीत, पाकिस्तानच्या मागणीमागील विचारांत ‘ज्यूंना त्यांची जमीन मिळाली’ या बाबीचा प्रभाव जीनांवर कसा असू शकेल, हे लक्षात येत नाही.

(बाकी लेखमाला उत्तम चालली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिनांचा विचार ज्यूंची युरोपात जशी परिस्थीती झाली तशीच स्वतंत्र भारतात मुस्लिमांची होईल का? असा होता. पुढचा विचार लेखकाचा आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक. That makes better sense. Smile आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्राएलची ‘स्थापना’ तांत्रिकदृष्ट्या १९४८ ची असली तरी एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ज्यूंना तिथे ‘त्यांची’ जमीन टप्प्याटप्प्याने ‘मिळत’ आलेली होती. तिथे ज्यूंचं स्वत:चं राष्ट्र वसवण्याला ब्रिटनने १९१७ सालीच पाठिंबा जाहीर केलेला होता.

(हा विषय निघाला की बरेचसे शब्द अवतरण चिन्हात टाकावे लागतात.)

-----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

तिथे ज्यूंचं स्वत:चं राष्ट्र वसवण्याला ब्रिटनने १९१७ सालीच पाठिंबा जाहीर केलेला होता.

(प्रस्तुत धाग्याचा हा विषय नाही, परंतु तरीही.) १९१७ साली त्या भूमीवर ब्रिटनचे कोठल्याही प्रकारचे स्वामित्व अथवा कोणताही अधिकार नव्हता. (तोवर ती ऑटोमन साम्राज्याची भूमी होती.) जी गोष्ट 'द्यायला' मुळात ब्रिटनची नव्हती, ती ब्रिटनने कोणालाही 'देण्या'चा (अथवा तसे 'वचन' वा 'पाठिंबा' देण्याचा) प्रश्न फिजूल आहे.

दुसरे म्हणजे, ब्रिटनने एकसमयावच्छेदेकरून अरबांनासुद्धा ऑटोमन आधिपत्याखालील तमाम अरब भूमी 'देऊन टाकण्या'चे वचन दिले होते. (पुन्हा, जी भूमी 'द्यायला' ब्रिटनची किंवा ब्रिटनच्या ताब्यातली नव्हती.) या 'वचना'तून पॅलेस्टाइनला वगळण्यात आलेले नव्हते. तेव्हा पॅलेस्टाइनमध्ये अरबांचीच बहुसंख्या होती, नि ज्यू हे अल्पसंख्याक होते, हे लक्षात घेता, पॅलेस्टाइनला 'तमाम अरब भूमी'चा भाग न मानण्याचे तेव्हासुद्धा काहीच कारण नव्हते. (थोडक्यात, ब्रिटनने (त्यांची किंवा त्यांच्या ताब्यात नसलेली) पॅलेस्टाइनची जमीन ही ज्यू आणि अरब दोघांनाही एकसमयावच्छेदेकरून 'देऊ केलेली' होती.)

थोडक्यात, ब्रिटनच्या या पाठिंब्याला (क्रिप्स मिशनच्या हिंदुस्थानला युद्धानंतर वसाहतीचे स्वराज्य देण्याच्या योजनेची वासलात गांधीजींनी जेणेकरून a post-dated cheque drawn on a failing bank या शब्दांत लावली होती, तद्वत्) काडीचीही किंमत असण्याचे काही कारण नाही. (हिंदुस्थानच्या बाबतीत निदान हिंदुस्थान तेव्हा वसाहतीचे स्वराज्य 'द्यायला' ब्रिटनच्या ताब्यात तरी होता; पॅलेस्टाइनची १९१७ साली तीही परिस्थिती नव्हती.)

--------------------

"ज्यूंना तिथे ‘त्यांची’ जमीन टप्प्याटप्प्याने ‘मिळत’ आलेली होती" म्हणण्यापेक्षा, ज्यूंनी तेथील जमीन 'आपली' म्हणून टप्प्याटप्प्याने येनकेनप्रकारेण बळकावायला सुरुवात केलेली होती, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे. (आणि, 'योग्य' वेळी झालेल्या हिटलरच्या ज्यू-हत्याकांडामुळे त्यांना तसे करण्यास (दाखवायचे आयते) 'कारण' मिळाले.)

(सर्व अवतरणे सुस्थानी आहेत.)

(अतिअवांतर: याचा अर्थ असा नव्हे, की हिटलरची नि युरोपातील ज्यूंची ज्यू-हत्याकांडासंदर्भात किंवा अन्य कशाकरिताही हातमिळवणी होती. किंबहुना, पॅलेस्टाइनच्या भूमीत ज्यूंच्या 'राष्ट्रा'ची स्थापना करू पाहणाऱ्या काही आद्य 'स्वातंत्र्यसैनिकां'नी, पॅलेस्टाइनच्या भूमीतून ब्रिटिशांना हुसकावून लावून तेथे ज्यूंच्या राष्ट्रस्थापनेप्रीत्यर्थ हिटलरशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता, नि त्याकरिता मदतीची याचना करणारे पत्रही हिटलरला लिहिले होते. (येथे 'आपल्या' सुभाषबाबूंची आठवण आल्यावाचून राहवत नाही.) मात्र, हिटलरने त्या पत्राकडे साफ दुर्लक्ष केले. (गरजूंनी Avrom Stern किंवा Stern Gang गुगलून पाहावे.))

--------------------

इस्राएलची ‘स्थापना’ तांत्रिकदृष्ट्या १९४८ ची असली

तुमचे म्हणणे बरोबर आहे; 'स्थापना' हा शब्द मी अवतरणांत टाकायला हवा होता. फॉर द रेकॉर्ड, त्यापुढे मी 'इस्राएलच्या स्वातंत्र्याची घोषणा' असे शब्द वापरले आहेत. फरक आहे.

दुसरी गोष्ट अशी, की, 'इस्राएल' नावाच्या काही राजकीय एंटिटीची घोषणा करून तिला त्या दिवशी अस्तित्वात आणले गेले, ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. नि त्या दृष्टीने 'स्थापना' हा शब्द सयुक्तिक आहे, असे मला वाटते. भले त्या एंटिटीला कोणी मान्यता द्यावी की न द्यावी, तशी मान्यता दिली आहे की दिलेली नाही, त्याच्याशी संबंध ठेवावेत की न ठेवावेत, हे पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. Whether we like it or not, असे काहीतरी तूर्तास अस्तित्वात आहे, हे नाकारण्यासारखे नाही.

(उदाहरणार्थ, मुझफ्फराबादेत काहीतरी सरकारसदृश अस्तित्वात आहे, हे खरेच आहे. तुम्ही त्याला भले मान्यता देऊ नका (नि देऊ नयेही). फार कशाला, त्या प्रदेशास 'आजाद कश्मीर' म्हणायचे की 'पाकव्याप्त कश्मीर', हादेखील सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. परंतु, त्या प्रदेशावर जम्मू आणि कश्मीर सरकारचे आणि/किंवा भारत सरकारचे तूर्तास काहीही नियंत्रण नाही, या वस्तुस्थितीवर त्याने काहीही फरक पडत नाही. पुढेमागे पडेलही कदाचित. तोवर वाट पाहू.)

तिसरी गोष्ट अशी, की 'इस्राएल' असे जर काही अस्तित्वातच नाही, तर मग गाझामध्ये तूर्तास जो पॅलेस्टिनींचा संहार चाललेला आहे, ते नक्की कोण करते आहे? नि पॅलेस्टिनी लोक तरी नक्की कोणाबरोबर लढताहेत? आणि, जी एंटिटी अस्तित्वात आहे, तिची 'स्थापना' कधी ना कधी होऊ शकतेच, नाही का? भले त्या एंटिटीला आणि/किंवा तिच्या स्थापनेला तुमची मान्यता नसली, तरीही?

चौथी (आणि गमतीची) गोष्ट. (माझ्या आठवणीप्रमाणे) १९९३पर्यंत भारताने इस्राएलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केलेले नव्हते. तोवर भारताची इस्राएलला (असलीच तर, फार फार तर) informal मान्यता असावी, अधिकृत मान्यता नव्हती. दिल्लीत तेव्हा पीएलओची बाकायदा Embassy वगैरे असे, इस्राएलची नसे. (आता फार फार तर पीएलओच्या वकिलातीची जागा पॅलेस्टाइनच्या वकिलातीने घेतली असेल. आणि इस्राएलची वकिलात आणखी एक वेगळी आली असेल. तो मुद्दा नाही.) मात्र, याच (१९९३अगोदरच्या) काळात मुंबईत इस्राएलची कॉन्सुलेट सुखेनैव, गुण्यागोविंदाने नांदत असे. लोकही इस्राएलला जातयेत असत, व्यापारी संबंधही थोडेफार असावेत.

त्यामुळे, एखादी गोष्ट मान्य नसणे (किंवा तिला मान्यता न देणे) ही एक गोष्ट, आणि ती गोष्ट मुळात अस्तित्वात असणे किंवा नसणे ही वेगळी गोष्ट. आणि, जी गोष्ट अस्तित्वात असू शकते (whether we like it or not), तिची स्थापना होऊ शकते. मान्यता नसली, तरी (मान्यता न देता) अस्तित्व acknowledge करण्यात निदान मला तरी अडचण दिसत नाही. (हा बॉस्को नावाचा परग्रहावरचा गुलाबी उंट नाही.)

--------------------

असो, या धाग्यावर फार अवांतर झाले. आता मी थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश भारत सोडून जाणार आणि भारताची सत्ता भारतीय लोकांकडे सोपविणार ह्याची चिन्ह दिसू लागल्या नंतर च प्रत्येकाची सत्ता काबीज करण्याची ईच्छा जागृत झाली.

ब्रिटिश गेल्यानंतर भारतात राजकीय व्यवस्था कशी असेल ?
ह्या विषयी स्पष्ट असे काहीच माहीत नव्हते.

ब्रिटिश लोकांनी भारताची राजकीय व्यवस्था नीट मार्गी लावून नंतर स्वतंत्र दिले असते तर .
विभाजन झाले नसते.

बहुसंख्य हिंदू असणाऱ्या देशात आपल्याला सत्तेत जागा मिळणार नाही ही खरी भीती मुस्लिम लोकात असेल.
त्याच लोक भावनेचा फायदा घेवून धर्मावर आधारित देश बनवायची असा विचार महत्वकांक्षी धार्मिक नेत्यांच्या मनात आला असावा
स्वतंत्र लढ्यात सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येवून ब्रिटिश सरकार च विरोध केला पण आता स्वतंत्र मिळणार ह्याची चिन्ह दिसू लागल्यावर मात्र धार्मिक वाद सुरू झाले .
ह्याचा अर्थ एक च आहे सत्तेवर कब्जा करण्याची इच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिश लोकांनी भारताची राजकीय व्यवस्था नीट मार्गी लावून नंतर स्वतंत्र दिले असते तर .

ब्रिटनने कोणताही देश 'सोडताना' असे कधी काही केल्याचे उदाहरण बहुधा नसावे. (कशाला करतील?)

(परंतु तसेही, हिंदुस्थान 'सोडण्या'अगोदर कोणताही प्रदेश 'सोडण्या'ची वेळसुद्धा ब्रिटनला पूर्वी कधी बहुधा आली नसावी. (अपवाद बहुधा फक्त अमेरिकेचा. परंतु, तिथे ब्रिटनने तो प्रदेश 'सोडला' नाही, तर स्थानिक वसाहतींतील प्रजेने तो प्रदेश 'ताब्यात घेऊन' ब्रिटिशांना तेथून 'घालवून दिले'. फरक आहे.) त्यामुळे, या 'उदाहरण नसण्या'च्या दाव्यालाही फारसा अर्थ नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0