जाणीव भान भाग - 6

जाणीव प्रारूप

p1

जेव्हा हॉटेलसारख्या ठिकाणी आपण एखाद्याला घेऊन जातो, तेव्हा आपण तुकड्या तुकड्याने त्याच्या सहवासाचा अनुभव न घेता त्याचे बाह्यस्वरूप, ध्वनी, त्याच्याबद्दलची असलेली जुजबी माहिती, त्याच्या आवडी निवडी इत्यादी गोष्टींचे एकसंध असे एक चित्र आपल्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला त्या व्यक्तीत व त्याच्यासंबंधातील इतर गोष्टी यात एक सहसंवाद दिसतो. हा मेंदू पृष्ठभागावरील सर्व माहितीचे संकलन करून अगदी कमी वेळेत त्याची कशी काय घट्ट वीण बांधू शकतो, हे एक न सुटलेले कोडे आहे. एका गृहितकानुसार संबंधित असलेल्या महत्वाच्या चेतापेशींच्या चलनवलनाचा वेग वाढत जातो. (आपण हे मेंदूच्या माथ्यावर ठेवलेल्या EEG मेंदूतरंगातून बघू शकतो) thalamus पासून सुरु होऊन cortex पर्यंत पोचत असताना त्याच्या स्वरूपात होणाऱ्या वेगवान बदलातून जाणिवेची कल्पना येऊ शकते.

या प्रायोगिक माहितीवरून जाणिवेचे सैद्धांतिक स्वरूप global-neuronal workspace या प्रारूपात मिळू शकते. या प्रारूपानुसार डोळे, कान इत्यादी ज्ञानेंद्रियांकडून मिळालेल्या माहितीचे पृथक्करण, प्रथम मेंदूच्या त्या त्या इंद्रियाशी संबंधित असलेल्या पृष्ठभागावर केली जाते. त्यानंतरच त्याची जाणीव आपल्याला होत असते. Prefrontal and parietal कॉर्टेक्स व मेंदूतील पृष्ठभाग यांना जोडणाऱ्या अती वेगवान मेंदूतरंगांच्या क्रियेनंतरच आपल्यात जाणीवभान येते.

p2हे प्रारूप आपण करत असलेल्या अगदी गुंतागुंतीच्या - जे मुळातच वेगवेगळ्या ज्ञानाच्या भेंडोळे असतात – क्रियांचा जाणिवेशी जोडल्याची साक्ष देतो. Lateral prefrontal व posterior parietal कॉर्टेक्समध्ये वेगाने घडणाऱ्या घटनेवरून हे लक्षात येत असल्यामुळे या प्रारूपाला पुष्टी मिळत आहे. उदाहरणार्थ, नवीन जटिल समस्या सोडवत असताना यांच्या चलनवलनाचा वेग जास्त असतो. मात्र अगदीच routine काम असेल तर यांचा वेग मंदावतो.

परंतु या प्रारूपाला जाणिवेचे सैद्धांतिक गणितीय प्रारूपाचा विरोध आहे. कारण या गणितीय प्रारूपात जाणीव हे वेगळे असे काही नसून मिळालेल्या माहितीची गोळाबेरीज आहे. हेच जर खरे असल्यास आपण मित्राला जेव्हा भेटतो तेव्हा केवळ ज्ञानेंद्रियातून मिळालेल्या माहितीपेक्षा अधिक काही तरी आपल्या मनात का येत असते? परंतु हे प्रारूप इंटरनेटच्या प्रारूपासारखा असू शकतो असेही म्हणता येईल. या प्रारूपाचे पुरस्कर्ते माणसाच्या वा उंदिराच्या मेंदूत वा संगणक यंत्रणेत फरक न करता नेटवर्कद्वारे माहिती प्रक्रियातून जाणीवेची कल्पना येते, अशी मांडणी करतात. फक्त आपल्याला नेटवर्कची रचना, त्यातील नोड्सची संख्या, त्यांच्या जोडणीचे स्वरूप इत्यादीविषयी माहिती कळल्यास जाणीवेचे स्वरूप कळू शकेल, असे त्यांना वाटते.

परंतु जसजशी नोड्सची संख्या वाढू लागली तसतसे प्रारूप क्लिष्ट होऊ लागले. गणितीय समीकरणं गुतागुंतीच्या होऊ लागल्या. अती वेगवान संगणकांनासुद्धा ही समीकरणं सोडविणे अशक्य होऊ लागले. फक्त 300 चेतापेशी असलेल्या दोन – अडीच मिलीमीटर लांबीच्या जंतूतील नेटवर्कचे विश्लेषणसुद्धा आतापर्यंत जमले नाही. कदाचित भविष्यात या गणितीय प्रारूपात सुधारणा होऊन काही उत्तरं मिळतीलही.

p3गणितीय प्रारूप global-neuronal workspace प्रारूपापेक्षा अगदी वेगळे आहे. कारण गणितीय प्रारूपात मेंदूची रचना कशी आहे याचा साधा उल्लेखही नाही. मात्र या दोन्ही प्रारूपात माहिती संग्रह आणि माहितीवर केलेली प्रक्रिया यामधून जाणीव भान येऊ शकते याबद्दल एकवाक्यता आहे. त्याचप्रमाणे हे दोन्ही प्रारूप माहिती प्रक्रियाच्या नेटवर्कवर लक्ष केंद्रित करतात, हेही नसे थोडके! यावरून याविषयी थोडी फार प्रगती होत आहे हे विशेष!

जाणीव हा संशोधनाचा विषय असल्यामुळे आपला मेंदू या संबंधात कसा क्रियाशील होतो यासंबंधी या क्षेत्रातील संशोधक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रारूपांची मांडणी करत नेमके उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. व त्यातून काही समस्यांचे उत्तर सापडत असले तरी इतर काही प्रश्न अनुत्तरित राहतात.

जाणीव व जाणिवेसंबंधीच्या यंत्रणा नेहमीच हुलकावणी दिल्यासारखे वागतात की काय असे वाटू लागते. अलीकडील न्यूरोसांयंटिफिक सिद्धांत प्रामुख्याने बाहेरून पुरविलेली माहिती (external inputs) आणि उत्स्फूर्तपणे संपादन केलेल्या क्रिया-प्रक्रिया (stimulated activity) यांच्यावर केद्रित केलेली आहे. परंतु या दोन्हीमध्ये काही अंतर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती भरून काढण्यासाठी वरील प्रारूपांच्या बरोबरच अजून एका प्रारूपाची (Temporo-spatial Theory of Consciousness (TTC)) रचना करण्यात आली. अशा प्रकारे अनेक प्रकारच्या प्रारू
पांचा प्रस्ताव केला जातो व काही दिवसांनी त्यातून काही प्रश्नांना उत्तर मिळते. नंतर त्यात भर पडून अजून एखादा प्रारूप संशोधनासाठी उपलब्ध होतो.
p4 मेंदूतील चेतापेशींची मोट आपण तांबडा रंग पाहत आहोत की पिवळा हे कसे काय ठरवतात, या जाणिवेच्या संदर्भातील प्रश्नाचा अजूनही उकल झाला नसेलही. जाणीव ही वैज्ञानिकरित्या मेंदूच्या अभ्यासातून स्पष्ट होणार याबद्दल नसतज्ञंना विश्वास वाटत आहे. इतिहासकाळात डोकावल्यास जेव्हा एखाद्या जटिल प्रश्नाचे उत्तर सापडत नसे – पाऊस का पडतो, गरम तव्यावरील भाकरी का फुगते, वा सूर्योदय कसा होतो इ.इ. - तेव्हा आपण अतींद्रिय शक्ती किंवा दैवी चमत्कार या सदरात ढकलून देत होतो. कालांतराने अशा प्रकारच्या प्रश्नांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळू लागले व या विषयाबद्दलचे आपले कुतूहल व जिज्ञासा इतिहास जमा झाले. त्यामुळे जाणीव हे न सुटणारे कोडे असे वाटत आहे म्हणून या प्रश्नाचे सुलभीकरण करून बाजूला सारण्यात अर्थ नाही. भविष्य काळात या गुतागुंतीच्या समस्येला नक्कीच उत्तर सापडणार आणि ही समस्या म्हणून राहणार नाही याबद्दल दुमत नसावे!

क्रमशः
या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो: जाणीव भान – 1 https://aisiakshare.com/node/8827
मेंदू’ नावाचे मशीन: जाणीव भान – 2 https://aisiakshare.com/node/8837
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे... जाणीव भान – 3 https://aisiakshare.com/node/8845
बधिरावस्थेचे गूढ: जाणीव भान – 4 https://aisiakshare.com/node/8852
मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण: जाणीव भान – 5 https://aisiakshare.com/node/8887

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet