प्राक्तन

कुणी रेखिली रेघ माथी कुणाच्या ?
कुणी भेदिले गूढ सारे ? कशाला?
दिले घेउनी मी कुणाचे कुणाला ?
कशासाठी हे प्रश्न पुसणे मनाला?

भले सर्व-सारे, बुरे सर्व-सारे
स्वतःच्याच पाशात गुन्तीत जावे
दुजाला कशाला विचारून र्‍हावे
मना फक्त स्वार्थात लिम्पून घ्यावे

पुन्हा षण्ढतेला पुन्हा तीच उकळी
चर्या निरोगी पोटास पाळी
मुक्याने वरी बोट दावी कपाळी
पुन्हा ती दिठी अन् पुन्हा तीच झोळी...

field_vote: 
0
No votes yet