आपल्याला काय वाटते?

बरेच लोक अनाथालयातून मूल दत्तक घेण्यापेक्षा नातेवाईकांचेच मूल दत्तक घेतलेले बरे असे म्हणतात... (बरेचसे दत्तक घेऊ इच्छीणारे व आपल्या सारखे बघे ही)
काय कारणे असतील? रक्ताचे, जात-पात-कूळ-गोत्र ही कारणे सोडून अजून काही दूसरे विचार त्या मागे असतील का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

चर्चाप्रस्ताव मांडताना प्रस्तावकाने याहून थोडी अधिक मेहनत घेणं अपेक्षित आहे. आपला मागचा चर्चाप्रस्ताव याच विषयावर होता, व इतकाच त्रोटक होता. हेच प्रश्न आधीच्या चर्चेत विचारले असते तर चर्चा करण्यासाठी अधिक चांगली पार्श्वभूमी तयार झाली असती. तुम्ही या विषयावर अर्थातच बराच विचार केलेला असावा असं वाटतं. पण दुर्दैवाने तुमचे विचार पुढे येत नाहीत. अशा एकोळी-दोनोळी प्रस्तावामुळे सर्वांनी एकाच पातळीवरून करण्याच्या चर्चेपेक्षा 'अमुक अमुक विषयावर निबंध लिहा' या स्वरूपाची मास्तरी आज्ञा वाटते. त्यामुळे वाचकांचा लिहिण्याचा उत्साह कमी होतो.

तेव्हा चर्चाप्रस्ताव लिहिताना थोडं तारतम्य बाळगा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@राजेश घासकडवी
क्षमस्व.. 'अमुक अमुक विषयावर निबंध लिहा' या स्वरूपाची मस्तरी आज्ञा असा अजिबातच हेतू नाही...
मागचा विषय या सन्दर्भात होता पण नक्कीच वेगळा होता.. असो... आणि मी मागच्या धाग्यात माझे विचारही पूढे आणलेले आहेत फक्त मला १ दिवस उशिर झाला...
आणि ब-याच जणाना तो धगा अवघड वाटल्यामुळे मी त्या धाग्यातच नमूद केले आहे की मी याच सन्दर्भात सोपे काहितरी चर्चेला आणेल.. मला वाटले त्या प्रमाणे मी आणलेले आहे पण बहुदा तुमच्या मते ते नसेल (म्हणजे तारतम्य बाळगलेले नसेल)... असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

चर्चेचा विषय अवघड की सोपा हा मुद्दा नसून मांडणी कशा प्रकारे केली आहे याबद्दल मतं मांडायची आहेत. महाभारताची कथा 'भाऊबंदकीपायी मोठ्ठं युद्ध झालं. आणि त्यात बरेच लोक मेले' अशीही सांगता येईल. पण इतकी त्रोटक केल्यावर ती कथा मरून जाते. तसंच काहीस तुमच्या चर्चाप्रस्तावांबद्दल होतं आहे असं सुचवायचं होतं.

ऐसी अक्षरेच्या लोगो खाली चर्चा वर क्लिक केलंत तर इथे मांडल्या जाणाऱ्या चर्चाप्रस्तावांची काही उत्तम उदाहरणं दिसतील. त्यांमध्ये काही सामायिक गोष्टी दिसतात.

१. मुख्य प्रश्नाच्या आवाक्याचा थोडक्यात आढावा घेतलेला दिसतो.
२. प्रस्तावकाने आपली काही निरीक्षणं थोड्या विस्ताराने मांडलेली दिसतात.
३. हा विशिष्ट विषय नक्की का महत्त्वाचा आहे याबद्दल काही शब्द दिसतात.
४. मुख्य प्रश्नाचे वेगवेगळे पैलू, त्या प्रश्नाशी संबंधित प्रश्न विचारलेले दिसतात.
५. मुख्य विषयावर कोणी महत्त्वाच्या व्यक्तीने लिहिलेलं असेल, किंवा तो प्रश्न हाताळणारा एखादा सिनेमा असेल तर त्याचे संदर्भ येतात.
६. ....

हे सगळंच भरून प्रस्ताव फुगवण्याचा काही फॉर्म्युला नाही. मात्र तुम्ही ज्या प्रश्नावर खरोखरच खूप विचार केलेला असतो (जसा तुम्ही या विषयावर केलेला आहे) तेव्हा आपल्या मनातच याबाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संवाद झालेले असतात. त्यांची झलक वाचकांना दिली तर चर्चाप्रस्ताव खुलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही स्टार प्लस वर प्रसारीत होणारी 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही मालिका बघता का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अन याच विषयावर पुस्तक लिहीत आहात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही