अमृतांजन पुलाखालची स्मरणशिला.
पुणे-मुंबई रस्त्यावरील घाटामध्ये काही पिढ्या उभा असलेला आणि ’अमृतांजन पूल’ ह्या नावाने माहीत असलेला पूल अलीकडेच काही दिवसांपूर्वी पाडण्यात आला हे आपण सर्वांनी वाचलेले आणि पाहिलेले आहे. हा घाटरस्ता बांधला गेला त्या घटनेच्या स्मरणासाठी एक संगमरवरी स्मरणशिला त्या पुलाच्या खाली मला आठवते तेव्हांपासून उभी होती. त्या पूर्वीहि ती तेथेच असणार. तिचे चित्र खाली दाखवीत आहे.
पूल पाडल्यानंतर त्याखालील स्मरणशिळेचे काय झाले हे जाणून घ्यायची मला इच्छा आहे. हे कोणास ठाऊक आहे काय? असल्यास खाली प्रतिसाद देऊन कळवावे. हा लेख कोठल्यातरी संग्रहालयात ठेवला जावा जेणेकरून इतिहासाचा हा दुवा पुढच्य़ा पिढ्यांसाठीहि टिकून राहील. इतिहासाचे पुरावे जपण्याबाबतची भारतीय अनास्था प्राचीन आहे. त्या अनास्थेचा बळी हा लेख न व्हावा. संबंधित खात्यामध्ये कोणाचा काही संबंध असल्यास तेथे खटपट करून हे सहजसाध्य आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
लेखाचे जतन -
लेखाचे जतन -
हा लेख कोठल्यातरी संग्रहालयात ठेवला जावा जेणेकरून इतिहासाचा हा दुवा पुढच्य़ा पिढ्यांसाठीहि टिकून राहील. इतिहासाचे पुरावे जपण्याबाबतची भारतीय अनास्था प्राचीन आहे. त्या अनास्थेचा बळी हा लेख न व्हावा.
नेहरु सेंटर वरळी - डिस्कवरी ओफ इंडिया प्रदर्शन - इथे बरीच चित्रे, माहिती ठेवली आहे. तिथे लेख पिडीएफ देता येईल.(लेखाची लिंक कॉमेंट मध्ये टाकून.) संपर्क इमेल नाही पण फोन आहे.
(फेसबुक पेज
मुख्य साइट
http://www.nehru-centre.org
http://www.nehru-centre.org/library/
?
कारण बिनपुलाची ती पाटी ठेवणार कुठे आणि कशाला?
हा काय चेशायर१ क्याट२सारखा काही प्रकार आहे काय?३
बोले तो, "स्मरणशिलेविना पूल असू शकतात. परंतु, पुलाविना स्मरणशिला??????" असे काही?
----------
१ Cheshireचा उच्चार मराठीत आमच्यात असाच करतात. (Courtesy: चिंजं.)
२ आणि Catचा असा.
३ आठवा: ॲलिस इन वंडरल्याण्ड. “Well! I've often seen a cat without a grin,' thought Alice 'but a grin without a cat! It's the most curious thing i ever saw in my life!”
सापडले उत्तर...
थोड्या खटपटीनंतर मलाच वरच्या प्रश्नाचे उत्तर सापडले. 'हिंदु'मधील ह्या बातमीनुसार ती संगमरवरी शिला बांधकामखात्याच्या लोणावळ्यातील कार्यालयामध्ये सध्यापुरती ठेवली आहे आणि नंतर ती कोठेतरी सुरक्षित स्थळी ठेवण्यात येईल.