दोन नको देऊ..

लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे ही. सदुबा नावाचा माणूस असतो. कलाबाई त्याची बायको. दोघं मस्त जगत असतात. एक दिवस सदुबा मित्राला जेवायला बोलवायचं ठरवतात.
सदुबाचा मित्र गणपा खूप सज्जन माणूस होता. वेळप्रसंगी सदुबा आणि कलाबाईला कामा पडायचा.
एक दिवस सदुबानं दोन मासे आणून कलाबाईकडं दिले व मस्त आमटी, भाकरी, भात बनवायला सांगितले. जेवायला गणपा येणार आहे हेही सांगितले.
कलाबाईनं मस्त जेवण रांधलं. माशाचं कालवण म्हटल्यावर तिला मन आवरेना. थोडं वाढून घेतलं आणि भाकरी सोबत खाल्लं. अजून थोडे घेतलं, अजून थोडे.. असे करता करता सगळं कालवण संपवलं. नंतर
नवऱ्याला काय सांगावे याची
चिंता तिला पडली.
सदुबा घरी आला, कलाबाईला सैपाक झाला की नाही हे विचारले. ती म्हणाली सुरीला धारच नाही. मासे कसे कापणार? सदुबाकडे सुरी दिली. सदुबा सुरी घेऊन मागील दारी धार लावायला गेला. तेवढ्यात गणपा पुढच्या दारी आला. कलाबाई त्याला म्हणाली, भाऊजी जेवण बिवण काही नाही. हे ना तुमचे कान कापून घेणार आहेत. त्यांनी नवस केला होता देवाला माणसाचे कान वाहीन म्हणून. ते पहा चाकूला धार लावत आहे. गणपानं पाहिलं तर खरंच सदुबा चाकूला धार लावत होता.
ते पाहून गणपा घाबरून पळाला. इकडे कलाबाई नवऱ्याला म्हणाली. अहो, अहो तुमचा मित्र मासे घेऊन पळाला . धावा, पकडा. सदुबा तसाच चाकू हातात घेऊन गणपाच्या मागं लागला. धावता धावता अरे दोन नको देऊ एक तरी दे असा आवाज देऊ लागला. इकडं गणपाला वाटलं दोन नको एक तरी कान दे असं म्हणतोय सदुबा. गणपा अजून जोराने धावत सुटला.
संपली माझी गोष्ट.
( कृपया गंमत म्हणून वाचावी.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्मार्ट कालवण आपलं बायकु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आ'बाबा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Embrace your inner sloth.

धन्यवाद सामो जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

कथा चांगली आहे.

ही तुमची स्वत:ची आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्‌च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||

धन्यवाद मनीषा! माझ्या आईकडून ऐकली आहे लहानपणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

लहानपणी अशा गोष्टी सांगून त्यांना हळूहळू तयार केले जायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणाला, कशासाठी तयार केले जायचे. आबाबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

जगरीत,टक्केटोणपे,लबाडी वगैरे. सगळं कसं गोग्गोड असतं हा समज मुलांचा दूर करायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आबाबा. तुम्ही सज्जन असूनही हे नाव का घेतले आहे? मला तुम्हाला आचरटबाबा म्हणायला आवडत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

लहानपणापासून अजूनही वागण्या बोलण्यात आचरटपणाच भरलेला आहे.
समाजात जसे वागतात तसे न करता प्रयोग करून बघू म्हणजे आचरटपणा.
टाकाऊ वस्तूंचा उपयोग करायला जाणे हासुद्धा आचरटपणाच मानला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।