सायकल

सायकल व आपलं नातं जुने व घट्ट आहे
बालपण तारुण्य यांच्या आठवणी सायकल शी निगडित आहेत
पूर्वी रॅलीज व हर्क्युलस कंपनीच्या सायकल्स असायच्या
सायकल चा रंग काळा असे
मात्र पोस्टमन च्या सायकली ह्या लाल रंगाच्या असायच्या
तो एक कौतुकाचा विषय असे
सायकल च्या मागे कॅरियर असे तर पुढे लहान मुलासाठी बास्केट वा छोटे सीट असायचे त्यावर बसून गावात फेरफटका मारणं म्हणजे बच्चे कंपनीची चंगळ असे
सायकल वरून मित्रासमवेत सहलीला जाणे या सारखा आनंद नसे
५-६ मंत्रांचे टोळके -मागे कॅरियर ला लावलेला जेवणाचा
डब्बा
कुठल्या तरी रम्य ठिकाणे सहल असायची
मग वन भोजन
डब्ब्यात शिरा पुरी असा बेत असायचा
मित्रासांवत जेवताना मस्करी गप्पा अशी धमाल असायची
सायलक शी निगडित पंक्चर -धडपडणे -गुढगे फुटणे -
चेन पडणे हे अविभाज्य घटक आहेत आपण सर्वानी हे एकदा तरी अनुभव ले असणारच
त्या काळे गियर ची सायकल हे एक अप्रूप व आकर्षण असायचे
चेन ला ऑइल बाथ असायचा
लहान मुलांसाठी छोट्या सायंकाळी असायच्या
आधी सायकलिंग चे धडे त्या वर गीरवावे लागे
मोठी सायकल लहानपणी चालवण्याची भारी हौस
पण सीट वर बसलं की पाय तोडलं पर्यत येत नसे
मह मध्ये पाय घालून हाफ पेडलिंग करत हौस भागवावी लागे
आता सायकल मध अनेक व्हारायटी आल्या आहेत
पुणे व ऍमस्टरडॅम हि शहरे पूर्वी सायकलिंग साठी विख्यात होती
मागे क्यारीयर ला डब्याची पिशवी लावून कामगार कारखान्यात जात असे
परदेशात लोकांना सायकलिंग चे वेड आहे
सायकल साठी खास ट्रॅक्स बनवले गेलेले असतात
डेल इंटेल चे सर्व कर्मचारी सायकल वरून कामाला जातात -त्यांचे पण व्हिडो पाहण्या जोगे आहे
माझे जावई नॉर्वेत आहेत ते कामाला सायकल वरून जातात
स्पोर्ट्स सायंकाळी हा की वेगळा व चित्त थरारक प्रकार आह
मुले सायकल वरून डोंगर चढतात
त्याचे व्हिडो पाहणे हा एक निराळा आनंद आहे
सर्कशीतली सायकल हा एक मजेदार प्रकार आहे एक चाकी सायकल ती दोरी वरून चालवणं-या मुली
तोल सांभाळण्या साठी हातात छत्री याचे लहान पाणी मजा वाटायची
सायकल व रोमान्स यांची अभेद्य नाते आहे
मैत्रिणी संवे गप्पा मारत जोडोनि सायकल चालवणे हा रोम्यांटिक प्रकार आहे
लग्ना नंतर मी व हि महाबळेश्वर ला गेलो होतो
तिथे सायकली भाड्यानी मिळतात
मी एक सायकल घेतली व हिला डब्बल सीट घेऊन महाबळेश्वर पालथे घातले
आराम हॉटेल मध उतरलो होतो
आराम हॉटेल ते वेण्णा लेक डबल सीट सायकल म्हणजे मज्जाच मजा
हॉटेल पासून लेक सारा उतार आहे उतारावर मजा येते पण परतताना डाँ लागतो
मग सायकल हातात घेऊन गप्पा मारत हॉटेल गाठायचे
बॉलिवूड मध्ये पण सायकल वर अनेक गाणी चित्रात झाली आहेत
माना जनाब ने पुकारा नही हे देवानंद व नूतन चे पेईंग गेस्ट मधले रोम्यांटिक गाणे आहे
लो मैने कासम ली हे मुमताज व देव साहेब चे सायकल वरील तेरे मेरे सपाने मधील गाणे कोण विसरेल ?
महमूद च्या पडोसन सिनेमात काश्मीर कि कली सायरा चे सायकल वरील मै चली मै चली प्यार कि गेली हे गाणे पण त्या काळी लोकप्रिय होते
एक हि रास्ता मधील सुनीलदत्त व मीना कुमारीचे सावले सलोने आई दिन बहरके गाणे पण लोक प्रिय होते
डब्बल सीट व डबल पेडल असलेली सायकल होती
आता जीवन वेगवान झाले आहे सा-यांना घाई आहे
मोटार सायकल -मोटार -स्कुटर लोक वेगाने दामटत असतात
पैसा कमवायची घाई -रिलेशन जमवण्याची तोडण्याची घाई
सारा घाईचा मामला आहे
सायकल म्हणजे निवांत पणा
सायकल म्हणजे रोमान्स
सायकल म्हणजे नॉस्टेल्जीया

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How about 'embrace our inner sloth' by slowin down being more mindful reducing wasteful convenience being economical with our energy recycling creatively and reconnecting with nature.

छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0