होय नाही

टळटळीत दुपार निघून जाते
अन् सायंकाळही येत नाही
या सीमारेषेवर तुझी आठवण
कधी येते कधी येतही नाही.

रात्र निरोप घेते पहाटेचा
अन् पहाटही येत नाही
अशा वेळी कधी बिलगतेस
कधी बिलगतही नाहीस.

वास्तवाच्या जरा पलिकडे
भासाच्या जरा अलिकडे
कधी वाटते काही घडते
कधी वाटते घडतही नाही.

काळाच्या अशा तुकड्यांमध्ये
वावरतो चुकल्यासारखा असा
कधी वाटते जगतही नाही
कधी वाटते मरतही नाही.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

होय नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

श्रोडिंजरची मांजर दिसते ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुम्हाला मांजरींचे भारी प्रेम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशेषतः श्रोडिंजरच्या मांजरीवर भारी प्रेम. तिच्याशिवाय मिरवणं कठीण जातं. ती नसेल तर मग 'ही भौतिकशास्त्र शिकल्ये का नाही शिकल्ये', असे प्रश्न लोकांना पडतात ना!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जंगलात मोर नाचला. कोणीही पाहिले नाही. मग तो मोर नाचला की नाही?१, २, ३

(किंबहुना, तो मोर होता की नाही?)

----------

मात्र, आम्ही थोडीशी पिऊन जराश्या झोकांड्या त्या काय दिल्या, तर - हाय, रे दैवा! - सगळ्यासगळ्यांनी पाहिले!!! (याचा अर्थ आम्ही निश्चित चढवली असली पाहिजे.)

या प्रतिसादातल्या लॉजिकसारखेच (उफराटे) लॉजिक आहे हे.

'कवीने कविता पाडली. तिला कोणीही प्रतिसाद दिला नाही. मग कवीने कविता पाडली की नाही?' अशा छापाचे आर्ग्युमेंट (निदान प्रस्तुत कवितेच्या संदर्भात तरी) कोणास करता येऊ नये, एवढेच या प्रतिसादामागील प्रयोजन.३अ

३अ उलटपक्षी, 'मी कविता पाडतो, म्हणजे मी आहे' या (देकार्तनीतिसम) तत्त्वास अनुसरून, स्वतःच्या अस्तित्वाची ग्वाही (बहुधा स्वतःसच) देणे, ही कवीची कविता पाडण्यामागील प्रेरणा असू शकेल काय?

बोले तो, 'तो मोर अस्तित्वात होता, किंवा कसे?' अथवा 'तो मोर होता, की आणखी काही होते?' यांपैकी कोठल्याही अर्थाने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कधी वाटते जगतही नाही
कधी वाटते मरतही नाही.

लिक्विड ऑक्सिजनवर आहात काय? ('लिक्विड उसे जीने नहीं देगा, और ऑक्सिजन उसे मरने नहीं देगा|')

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेवता जेवता हा प्रतिसाद वाचला अन् पोटात समुद्रमंथन झाले! बोले तो खऱ्या अर्थाने भावना समजल्या!

जेवताना तरी ऐसी-वाचन बंद ठेवलेच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

संदीपान .. अप्रतिम कविता आहे .
खरेतर त्याची उपरती होण्यास, त्यातले संदर्भ आपापलया जीवनात येऊन गेले असले पाहिजेत अन्यथा खवचट प्रतिक्रिया अपेक्षितच असणार.. वरील प्रतिक्रिया बहुअंशी तश्याच स्वरूपाच्या आहेत.
तुम्ही आपले लिहिते व्हा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0