Skip to main content

ही बातमी समजली का - भाग १९४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

अमित.कुलकर्णी Tue, 14/05/2019 - 12:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे विमानांसाठी फारच सोयीचे ठरेल, विशेषत: पाऊस-वादळ-ढग असताना जेव्हा खालच्या लोकांना विमान दिसू शकत नाही.

एक शंका - ढगांमुळे शत्रूला आपली विमाने दिसणार नाहीत- हे पटले, पण आपल्या वैमानिकांनाही (ढगांमुळेच) खालचे काही दिसणार नाही - मग "अचूक लक्ष्यभेद" (उर्फ सर्जिकल स्ट्राईक) कसा काय करता येईल?

चिमणराव Sat, 18/05/2019 - 05:55

In reply to by अमित.कुलकर्णी

'डोळ्यांनी बघून' हल्ला/मारा करणे १२००किमी/तासाने जाणाऱ्या विमानांतून शक्य नसणारच. जिपीएस आधारित लक्ष्य असणार.

'न'वी बाजू Mon, 20/05/2019 - 05:44

In reply to by अमित.कुलकर्णी

लहान होतो आम्ही तेव्हा. बहुधा इयत्ता पहिलीत असू. बांग्लादेशचे युद्ध (१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध) नुकतेच पेटले होते. रेडियोवरून युद्धाच्या बातम्या येत असत, असे अंधुकसे आठवते. परंतु त्याहीपेक्षा, पुण्यात (आणि बहुधा मुंबईतसुद्धा - चूभूद्याघ्या.) रात्री अनेकदा वेळीअवेळी एअररेड वॉर्निंगचे भोंगे वाजू लागत. मग घरोघरी ब्लॅकाउट करावा लागे. बोले तो, घरातले सगळे दिवे बंद करून बसावे लागे. अशा वेळी घरात लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशसुद्धा चुकूनही बाहेरून दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना काळा कागद लावून ठेवलेला असे. (एकदा 'तुमच्या घरातल्या मेणबत्तीचा प्रकाश बाहेरून दिसतोय' म्हणून तंबी द्यायला एक सद्गृहस्थ दारी आले होते, असेही स्मरते. सदर सद्गृहस्थ बहुधा स्वयंसेवक असावेत, अशी आता शंका येते. परंतु ते असो.) मग अर्ध्यापाऊण तासानंतर सवडीने एकदा का 'ऑल क्लियर'चे भोंगे वाजले, की पुन्हा दिवे लावून आपापली कामे करायला मोकळे.

एकंदरीत कटकट असायची. त्यामुळे, पाकिस्तान्यांचा राग यायचा. वाटायचे, हे लेकाचे आपल्यावर बाँब टाकायला येतात काय, आपणही जाऊन यांच्यावर एखादा बाँब टाकून यावे. फक्त, बाँब टाकण्याच्या मोडस ऑपरंडीबद्दल किंचित घोळ होता. बोले तो, पाकिस्तानवर हवेतून बाँब टाकायचा, तर तेथे जायला नि वरून बाँब टाकायला किमानपक्षी एखादे विमान (आणि एखादा बाँब) एवढे साहित्य तरी लागेल, याची अंधुकशी कल्पना होती, परंतु आपली सेनादले ही सामुग्री आपल्याला उदार मनाने पुरवितील, असा विश्वास होता. पुढचा प्रश्न म्हणजे नॅव्हिगेशनचा - तेथे जायचे कसे? याची काय तजवीज केली होती, ते आता आठवत नाही, परंतु बहुधा निघण्यापूर्वी रस्ता विचारून घेऊ, असा काही प्लान असावा. सरतेशेवटी, तेथे पोहोचल्यावर (१) तेथे पोहोचलो, हे, आणि (२) बाँब नक्की कोठे टाकायचा, हे कसे समजणार? तर त्याला उपाय अतिशय सोपा होता. त्या भागात पोहोचल्यावर वरून रेल्वेस्टेशन शोधायचे, नि त्यावरची पाटी वाचायची. तेथे पिवळ्या रंगाच्या पाटीवर देवनागरीतून छानपैकी 'पा-कि-स्ता-न' असे स्टेशनाचे नाव लिहिलेले असेलच. ते वाचून खात्री झाली, की द्यायचा टाकून बाँब, नि काय! नि मग शांतपणे परत यायचे.

पुढे मोठे झाल्यावर आम्ही भारतीय वायुसेनेत दाखल झालो नाही. दे डोंट नो व्हॉट दे मिस्ड. देअर लॉस, नॉट माइन. असो चालायचेच.

..........

, पाकिस्तानातल्या रेल्वेस्टेशनच्या नावाच्या पाट्या भारताप्रमाणे पिवळ्या रंगाच्या नसतात, तसेच, त्यांवर तूर्तास देवनागरीतून मजकूर लिहिण्याची प्रथा नाही, याची आम्हांस तेव्हा कल्पना नव्हती. अर्थात, प्राथमिक शाळेत असताना आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याकारणाने, जुजबी इंग्रजी आम्हांस तेव्हासुद्धा वाचता येत असेच, त्यामुळे अडचण अशी आली नसतीच. परंतु तरीही, वन वुड हॅव थॉट दॅट द पाकिस्तानीज़ वुड हॅव बीन दॅट मच ओब्लायजिंग. एक साधी पाटी देवनागरीतून टाकायला काय जाते त्यांना, कळत नाही. शिवसेनावाले याकडे लक्ष देतील काय? मराठी पायलट जेथे बाँब टाकायला जाणार, तेथे देवनागरीतून पाटी नको?

असो चालायचेच.

नंदन Mon, 20/05/2019 - 13:20

In reply to by 'न'वी बाजू

बांग्लादेशचे युद्ध (१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध) नुकतेच पेटले होते. रेडियोवरून युद्धाच्या बातम्या येत असत, असे अंधुकसे आठवते. परंतु त्याहीपेक्षा, पुण्यात (आणि बहुधा मुंबईतसुद्धा - चूभूद्याघ्या.) रात्री अनेकदा वेळीअवेळी एअररेड वॉर्निंगचे भोंगे वाजू लागत. मग घरोघरी ब्लॅकाउट करावा लागे. बोले तो, घरातले सगळे दिवे बंद करून बसावे लागे. अशा वेळी घरात लावलेल्या मेणबत्त्यांचा प्रकाशसुद्धा चुकूनही बाहेरून दिसू नये म्हणून खिडक्यांच्या काचांना काळा कागद लावून ठेवलेला असे. (एकदा 'तुमच्या घरातल्या मेणबत्तीचा प्रकाश बाहेरून दिसतोय' म्हणून तंबी द्यायला एक सद्गृहस्थ दारी आले होते, असेही स्मरते. सदर सद्गृहस्थ बहुधा स्वयंसेवक असावेत, अशी आता शंका येते. परंतु ते असो.) मग अर्ध्यापाऊण तासानंतर सवडीने एकदा का 'ऑल क्लियर'चे भोंगे वाजले, की पुन्हा दिवे लावून आपापली कामे करायला मोकळे. एकंदरीत कटकट असायची.

रोहिंग्टन मिस्त्रीची 'Such A Long Journey' नावाची, (शिंव्हाच्या छाव्याच्या छाव्याने काही काळ बॅन करवलेली कादंबरी) याच सुमारास मुंबईत घडते. त्यातला मध्यमवयीन पारशी कुटुंबप्रमुख १९६२ - १९६५ असं सारखं सारखं घर लाईटप्रूफ करून वैतागतो आणि लावलेले काळे कागद काढायच्या फंदातच पडत नाही (आणि परिणामी १९७१च्या युद्धातली एक कौटुंबिक कटकट टाळतो) - असं खास पारसी विक्षिप्त ढंगातलं चित्रण त्यात आहे, ते आठवलं.

गड्डा झब्बू Thu, 23/05/2019 - 01:53

In reply to by 'न'वी बाजू

बाँब नक्की कोठे टाकायचा, हे कसे समजणार? तर त्याला उपाय अतिशय सोपा होता. त्या भागात पोहोचल्यावर वरून रेल्वेस्टेशन शोधायचे, नि त्यावरची पाटी वाचायची. तेथे पिवळ्या रंगाच्या पाटीवर१ देवनागरीतून२ छानपैकी 'पा-कि-स्ता-न' असे स्टेशनाचे नाव लिहिलेले असेलच. ते वाचून खात्री झाली, की द्यायचा टाकून बाँब, नि काय! नि मग शांतपणे परत यायचे.

एवढे कष्ट करण्या पेक्षा फक्त वरून आवाज द्यायचा ए अब्दुल, कि चार सहा लोक हा भाई जान म्हणून आवाज देतील तेव्हा टाकायचा बॉम्ब हाकानाका.

चिमणराव Sat, 18/05/2019 - 23:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतीय मांजरींच्या ( बोक्यांचेही धरा) चेहऱ्यावर १) केविलवाणे, २)अगतिक, ३)सुस्ती आलीय हे भाव दिसतात.

बोका Fri, 17/05/2019 - 21:19

कळव्यातील कामगारांच्या मजूरीचे दर समजले का ?
जर बाई पेंटर असेल तर दर काय ? ७०० की ५०० ?
बाप्याचा दर काय ?
image

अनुप ढेरे Mon, 20/05/2019 - 15:55

In reply to by चिंतातुर जंतू

अहो, एक व्हिडो एम्बेड करयचा प्रयत्न करत होतो. नाही जमलं. :(

पण मेन त्यातला मुद्दा असा की त्या नेल्सन का कायशाशा पोलवाल्या माणसाने असं सांगितलं
"फार जास्तं लोक भाजपाला मत दिलं असं म्हणत होते सो आम्ही आकडे थोडे अड्जस्ट केले आहेत."
अरे!?

"आमच्या मते लोक घाबरुन आम्ही भाजपला मत दिलं असं सांगत होते. त्यामुळे आम्ही आकडे थोडे ॲडजस्ट केले आहेत्"

चिंतातुर जंतू Wed, 22/05/2019 - 13:39

अनिल अंबानींनी कॉंग्रेसवर दाखल केलेले खटले निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी का मागे घेतले असतील?
Anil Ambani to withdraw ₹5000 crore worth defamation suits against Congress leaders, National Herald

अस्वल Wed, 22/05/2019 - 21:54

In reply to by चिंतातुर जंतू

ज्या पोराशी पंगा घेतला, तोच वर्गातला मॉनिटर झाला तर?
रिस्क नको. आधीच धाकल्या अंबानींच्या गंजीफ्राकात काय कमी भोकं आहेत की अजून एक परवडेल?

चिमणराव Thu, 23/05/2019 - 06:58

डिफेमेशन खटले कोणते किती निर्णायक झालेत झटपट? मोठमोठे कीसपाडणारे वकील पोसायचे. गंजीची भोकं वाढवायची? पण आताच का हा प्रश्न चक्रावणाराच.

चिंतातुर जंतू Thu, 23/05/2019 - 13:15

आतापर्यंत जे कल जाहीर झाले आहेत त्यानुसार जनमताचा कौल स्पष्टपणे 'फिर एक बार मोदी सरकार'कडे असल्याचे दिसत आहे.

अस्वल Thu, 23/05/2019 - 22:06

In reply to by mayu4u

थँक्स!
- एक मोदी विरोधक.
- पण भाजपा विरोधक नाही
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-पण रा.स्व.संघ विरोधक

असो. जिमला जाणारे उद्यापासून परत.

सामो Thu, 23/05/2019 - 22:08

In reply to by अस्वल

थँक्स!
- एक मोदी सपोर्टर.
- भाजपा सपोर्टर्
- फॅनॅटिझम विरोधक
- पण काँग्रेस सपोर्टरही नाही
-रा.स्व.संघ - न्युट्रल्

चिमणराव Sun, 26/05/2019 - 05:18

In reply to by सामो

नेपाळ सरकार प्रत्येक गिर्यारोहकाकडून अकरा हजार डॉ घेते, त्यांनी
एवढी परमिट्स(४००) कशी /का दिली? इतके लोक पहाटे दोन ते सकाळी सातपर्यंत जाऊ शकत नाहीत हे माहीत नाही?

अबापट Wed, 05/06/2019 - 06:51

In reply to by चिंतातुर जंतू

हे मस्त आहे, पण इथे नक्की कुणी काय करायचं ? (याबद्दल काही मार्गदर्शन ?)
मला वाटतं, की आपल्या इथे अजून हे होण्यास बराच वेळ आहे. डावे/लिबटार्ड हे आबालवृद्धाना जेन्यूइनली खल, वाईट वाटतात.
आणि उजवे 'तसे' नाहीत असे वाटते. उजव्यांपेक्षा डावे कमी वाईट किंवा दोघांमध्ये काहीही फरक नाही अशी जाण येण्यास अजून बराच वेळ आहे.

चिमणराव Tue, 11/06/2019 - 20:36

In reply to by अबापट

पूर्ण उजवे /डावे सरकार करणे निराळे, विचारसरणी ठेवणे निराळे. अति आदर्श स्थिती व्यवहारात अशक्य.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 18/06/2019 - 22:46

दिल्ली मेट्रोत स्त्रियांना फुकट प्रवास करू देण्याबद्दल लोकमाध्यमांवर थोडी चर्चा वाचली. त्या संदर्भात एक 'विद्रट' दुवा वाचनात आला -
Actually Free Rides For Delhi Women Is A GREAT Idea. Data Backs It

'Why Loiter' नावाचं एक फेसबुक पान आहे; बायकांनी अपरात्री, भलत्या ठिकाणी उपस्थिती वाढवल्याशिवाय आम्हाला सुरक्षित वाटणार नाही, हे पानाच्या नावामागचं कारण.

सामो Tue, 18/06/2019 - 23:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या विचारात प्रचंड तथ्य आहे. रात्री अपरात्री आजूबाजूला एखादी बाई दिसली तरी धीर येतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 19/06/2019 - 04:34

In reply to by सामो

सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत बस, ट्रेन, ऑफिसात शेजारी कोणी बसणार असेलच तर ती बाईच असावी, अशी अनुभवांती इच्छा असते.

सामो Fri, 28/06/2019 - 18:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हं इथे खेटाखेटी होत नसल्याने मला फरक पडत नाही बाई की बुवा. पण जे कोणी असेल त्यांनी डिओड/पर्फ्युम वापरलेला व किमान आंघोळ तरी करुन असावे अशी इच्छा असते.

नगरीनिरंजन Wed, 19/06/2019 - 11:03

https://thewire.in/macro/india-gdp-growth-arvind-subramanian

https://theprint.in/economy/rbi-to-the-rescue-modi-govt-eyes-banks-rs-9-6-trillion-surplus-to-beat-economy-blues/250245/

सुब्रमण्यन यांनी सुपारी घेतली की इतके दिवस मोदी सरकार खोटं बोलत होतं जीडीपी ग्रोथबद्दल?

सुधीर Sat, 22/06/2019 - 08:29

दोन वेळा प्रकाशित झाल्याने प्रतिसाद काढून टाकण्यात आला.

चिंतातुर जंतू Wed, 26/06/2019 - 13:45

२०२३ पर्यंत सगळ्या तीनचाकी विजेवर चालायला हव्यात आणि २०२५पर्यंत १५०सीसीच्या किंवा कमी क्षमतेच्या दुचाकीही, असं नीती आयोग सांगतोय.
India wants to speed up its transition to electric vehicles – so fast that chaos is inevitable

अभ्या.. Wed, 26/06/2019 - 23:04

In reply to by चिंतातुर जंतू

दिलेल्या लिंकच्या पेजवर गेलो अन टाटाने नॅनो बंद करायला नको होती असे उगीच वाटले. इलेक्ट्रिक कार म्हनून बॅटरी मोटर बसवून खपवता आली असती. इलेक्ट्रिक कारला योग्य असे डिझाईन होते.

नितिन थत्ते Thu, 27/06/2019 - 09:07

In reply to by चिंतातुर जंतू

गब्बर सिंग हवे होते इथे.....

प्ल्यानिंग कमिशन बंद केल्याबद्दल खूप आनंदात होते. का तर म्हणे सेंट्रल प्लॅनिंग नसायला पाहिजे. कोणी काय करावं ते सेंट्रली ठरवू नये.

चिंतातुर जंतू Thu, 27/06/2019 - 19:33

अमेरिकन राजकीय पक्षांच्या धोरणांमधून एकेक गोष्टीचं विश्लेषण करत करत काढलेले निष्कर्ष :
What Happened to America’s Political Center of Gravity?

अंततः निष्कर्ष फार आश्चर्यकारक नाहीत, पण असं विश्लेषण रोचक आहे. भारतीय पक्षांच्या बाबतीत कुणी तरी हे करायला हवं.

नितिन थत्ते Fri, 28/06/2019 - 10:49

In reply to by चिंतातुर जंतू

काँग्रेसला ढेरेशास्त्री आणि गब्बरसिंग डावे समजतात. पण डावे मात्र त्यांना भांडवलदारांचा पक्ष समजतात.

चिंतातुर जंतू Fri, 28/06/2019 - 16:58

In reply to by नितिन थत्ते

काँग्रेसला ढेरेशास्त्री आणि गब्बरसिंग डावे समजतात. पण डावे मात्र त्यांना भांडवलदारांचा पक्ष समजतात.

ज्या न्यायानं काँग्रेस डावी ठरेल त्या न्यायानं भाजपही ठरावी.

अनुप ढेरे Mon, 01/07/2019 - 10:31

In reply to by नितिन थत्ते

नेहरु, ईंदिरा होतेच डावे. लेफ्ट ऑफ सेंतर नक्की होते. डावे मात्र त्यांना भांडवलदारांचा पक्ष समजणारच. कारण् कम्युनिस्त पार्ट्यांनाही (भाकपा/माकपा) बुर्झ्वा समजणारे लोकही जनेयुत आहेत असं वाचलेलं.

राईट ऑफ सेंटर म्हणता येतील अशी दोन सरकारं होती. राव आणि वाजपेयी. भारताच्या गेली दोन दशकं झालेली आर्थिक प्रगती या दोघांमुळे आहे. पण हे दोघेही पुन्हा निवडुन येऊ शकले नाहीत हे सुचक आणि सॅड आहे. मोदीही लेफ्ट ऑफ सेंटर ( पण कॉण्ग्ग्रेसपेक्ष कमी ) आहेत.

अबापट Mon, 01/07/2019 - 16:44

In reply to by अनुप ढेरे

बाबौ , ढेरे मोदींना ' डावे' म्हणत आहेत . कुठे फेडाल हे ?
तुमच्या अमित मालवीय , शेफाली ताई किंवा अर्णबला हे कळलं तर काय होईल तुमचं.
ढेरे जपून...

चिमणराव Fri, 28/06/2019 - 14:08

समितीवर नेमणूक याकडे सर्व रिटायर व्हायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या कुटुबाचं लक्ष/लक्ष्य असतं असं म्हटलं तर?
मग आणखी काही वर्षं मज्जा.

सामो Fri, 28/06/2019 - 18:28

गे पेन्ग्विन्स

https://www.cnn.com/2019/06/27/europe/london-zoo-pride-gay-penguins-trn…
रोचक बातमी आहे. लंडनच्या प्राणीसंग्रहालयात रॉनी आणि रेगी नावाचे २ गे पेन्ग्विन्स आहेत, ज्यांनी एक वाळीत टाकलेलं, अंड दत्तक घेउन, त्या पिल्लाचा सांभाळही केला म्हणे एकत्र. आणि मग पिल्लू मोठे वगैरे झाले. अजुनही हे दोघे त्यांच्या घरट्यात एकमेकांना बिलगुन वगैरे बसतात, म्हणजे एका सामान्य जोडीसम प्रेम व्यक्त करतात.

चिमणराव Fri, 28/06/2019 - 20:03

बर्फ पडतांनाच अंडी उबवण्याचा काळ असतो. अंडं पायांतच वर पिसांंत धरतात आलटून पालटून. ते हँडोवर करताना थोडावेळ बर्फावर राहिल्यास अंडं मरतं. मग ते दोघे असह्य होऊन दुसर्याचं अंडं पळवतात. त्या भांडणात तेही अंडं खाली राहतं. ती तासाभराची फिल्म आहे कुठे Nat Geo किंवा कुठे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/07/2019 - 20:15

In reply to by चिंतातुर जंतू

अमेरिकेतल्या गोळीबारांना तुम्ही कट्टर उजव्यांचा दहशतवाद समजत नाही का? पल्स नाईटक्लब, भारतीय माणसाला इराणी समजून गोळी घालून मारणं वगैरे दहशतवाद समजला जात नाही का?

मारवा Sun, 21/07/2019 - 08:43

In reply to by गवि

१- मॅनकाइंड ला दुसरा शब्द उपलब्ध आहे. पण अखिल मानवजाती ला संबोधण्यासाठी मॅनकाइंड च वापरला जातो व खाली ऑक्सफर्ड मध्ये पण असे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे अखिल मानवजात म्हणायचे असेल तर वुमनकाइंड असा शब्द वापरत नाही व त्या अर्थात ह्युमन स्पेसीज असा अर्थ पण दिलेला नाही.

mankind n. 1 human species. 2 male people.

womankind n. (also womenkind) women in general.


मॅन अवर हा एक शब्द पण विचारात घ्यावा
काम फक्त पुरुष च करतो करु शकतो वगैरे असे काही असावे

मारवा Sun, 21/07/2019 - 09:04

In reply to by गवि

Homo sapiens (Latin: "wise person") is the binomial nomenclature (also known as the scientific name) for the only extant human species. Modern humans are the subspecies Homo sapiens sapiens, which differentiates them from what has been argued to be their direct ancestor, Homo sapiens idaltu.
Anatomically modern humans evolved from archaic humans in the Middle Paleolithic, about 200,000 years ago. The emergence of anatomically modern human marks the dawn of the subspecies Homo sapiens sapiens, i.e. the subspecies of Homo sapiens that includes all modern humans.
So, the scientific name or the binomial nomenclature is Homo sapiens, however the full name is Homo sapiens sapiens.

sapienskind or hosapienskind हे शब्द mankind या शब्दाचा पर्याय म्हणून कसे वाटतात ? जमेल का ? म्हणजे थोडं उच्चारायला अजुन सोपं फोनेटीकली स्वीट सिंपल कसं करता येइल हे ही बघितल पाहीजे.

आपण सध्याचे मानव संदर्भात ही एक कोरा वर चांगली माहीती मिळाली.1

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 20/07/2019 - 17:20

In reply to by सामो

मनुष्यानं काही करण्याला manually हा शब्द वापरणं मी टाळते. त्या जागी by hand म्हणते. यंत्राला काम करायला सांगणं सगळ्यात सोयीचं.

'न'वी बाजू Sat, 20/07/2019 - 18:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मनुष्यानं काही करण्याला

मेंटेनन्सुष्यानं.

manually हा शब्द वापरणं मी टाळते. त्या जागी by hand म्हणते.

गंमत म्हणजे, manuallyचा शब्दशः अर्थ by hand असाच आहे. त्याचा 'मनुष्या'शी काहीही संबंध नाही.

(लॅटिनमध्ये manus म्हणजे हात. manualची व्युत्पत्ती manusपासून आहे; manपासून नव्हे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 20/07/2019 - 20:55

In reply to by 'न'वी बाजू

मी ज्या जगात वावरते तिथे "data are ..." म्हटलं की लोक माझं इंग्लिश सुधारायला जातात. तिथे कुठे लोकांना आणखी त्रास द्यायचा!

चिमणराव Sun, 21/07/2019 - 12:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इंग्लिश ( किंवा दुसरी कोणती भाषा) सुधारायला जातात कारण तुम्ही ९८% बरोबर असता. ३०-४०% वाल्यांना नाही करत. ५-१०% तोडकी मोडकी भाषा बोलली की कौतुक होते.

उदा crowd IS angry,mad वगैरे.
People WANT to visit this place.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/07/2019 - 19:18

In reply to by चिमणराव

मूळ शब्द आहे, डेटम. एकवचनी. त्याचं अनेकवचन डेटा. म्हणजे इंग्लिशच्या नियमांनुसार 'डेटा आर ...' म्हणलं पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या इंग्लिश मातृभाषिकांना हे माहीत असतंच असं नाही. माझी मातृभाषा इंग्लिश नाही, हे त्यांना माहीत असतं. मग ते मी चुकीचं बोलत आहे असं समजून सुधारायला जातात. मात्र इंग्लिश भाषेची गंमत ह्या सुधारायला जाणाऱ्यांना माहीत नसतं.

त्यात हे 'सुधारक' लोक गोरे पुरुष असले की त्याला आणखी गमतीशीर रंग येतात... त्यामुळे ह्या लोकांसमोर बोलताना कधीही, चुकूनही सामान्य व्यक्ती म्हणजे पुरुष असू शकते, असं म्हणण्याची सोय मला उरत नाही. टिकून राहायचं असेल तर खवचटपणाशिवाय पर्याय राहत नाही.

'न'वी बाजू Sun, 21/07/2019 - 19:41

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'डेटा' एकवचनी काय, मीसुद्धा अनेकदा वापरतो. त्यामागचे तथ्य माहीत असूनसुद्धा. (आणि इंग्रजी माझी मातृभाषा नसूनसुद्धा.) माझे होते, तेथे गोऱ्यांची काय कथा?

तेव्हा सोडून द्या; त्यांना क्षमा करा. कां की, ते काय करतात, ते त्यांचे त्यांनाच कळत नाही.

आमेन.

(अतिअवांतर: 'संकष्टी पावावे' म्हणणारे अनेक मराठीजन मला ठाऊक आहेत. चालायचेच.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/07/2019 - 20:07

In reply to by 'न'वी बाजू

पापिलवार पद्धत म्हणून 'डेटा इज' असं माझ्याही तोंडी कधीमधी येतं. तसं म्हणण्याबद्दल आक्षेप नाहीच; पण 'डेटा आर ...' हे सुधारणं गमतीशीर होतं. त्यातही इतर विषयांतून पीएचड्या वगैरे करून आलेले विद्रट लोक 'डेटा आर...' सुधरायला जात नाहीत, असं माझं सांगोवांगी निरीक्षण.

फडके कोशानुसार 'म्हणणे' हा मूळ धातू, त्याची रूपं 'म्हण*' होतात. म्हणलं हे प्रमाणरूप, म्हटलं ही बोलीभाषा म्हणता येईल.

चिमणराव Sun, 21/07/2019 - 21:19

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

People WANT to visit this place. - यात काय चूक आहे?

'परंतू' यात चूक नाही राहिलं.
ठराविक गटनावे ठराविक पद्धतीनेच चालतात त्यात्या भाषेत.
1)The Data in the card is corrupted.
2) Data in all the three cards ARE corrupted.
हे दोन्ही बरोबर आहे . विचारून पाहा.

नितिन थत्ते Mon, 22/07/2019 - 11:34

In reply to by चिमणराव

एकुणात मॅन्युअल या शब्दातला मॅन पुरुष नाही (पक्षी- ते पुरुषप्रधान संस्कृतीतून आलेलं नाही) या मुद्द्याला यशस्वी बगल मिळाली आहे.

मिहिर Sat, 20/07/2019 - 21:32

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

womanच्या जागी womyn किंवा womxn हे शब्द वापरतेस का?

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 20/07/2019 - 22:11

In reply to by मिहिर

सर्वसामान्य व्यक्ती ही स्त्रीच असते आणि पुरुष असणं क्वीअरपणा, अशी वाक्यरचना असते. बुटकेपणा, पिळदार स्नायू नसणं, पुरुषांना आवडतं तसं दिसण्यासाठी कष्ट घेणं पकाऊ, इत्यादी.

गवि Mon, 22/07/2019 - 20:16

In reply to by मिहिर

womanच्या जागी womyn किंवा womxn हे शब्द वापरतेस का?

त्यापेक्षा फक्त wo ठेवलं तर? घाण पुरतीच उपटून निपटून काढावी ना.

गवि Tue, 23/07/2019 - 08:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हो ना. पण त्यांना वहाणेखाली ठेवावं. आपल्या समस्त ज्ञातीच्या नावात कशाला गुंफायचं?

Wo च बरं पडेल. विचार व्हावा.

'न'वी बाजू Tue, 23/07/2019 - 15:28

In reply to by गवि

सुरुवात हळूहळूच करायला पाहिजे ना? ते काय ते, बेबी ष्टेप्स बेबी गर्ल ष्टेप्स की काय ते म्हणतात ते.

Woने अशा तऱ्हेने चंचुप्रवेश केल्यावर मग हळूहळू पतीचे उच्चाटन करायला हरकत नसावी.

(हं, आजमितीस जर अशा नावांचा पिच्चर कोणी काढला, तर मग निषेधाचा विचार करता येईल.)

..........

patni, wo aur nothing

patni आणि wo एकत्र आल्यावर मग त्यातून nothingच पैदा होणार. एवढ्या शिंपल facts of life तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला...

सामो Tue, 23/07/2019 - 17:32

In reply to by 'न'वी बाजू

मागे एक 'Pati Patni aur Wo' की कायशाशा नावाचा पिच्चर आला होता. त्याचा काही...

wo की woe?

तिरशिंगराव Wed, 24/07/2019 - 19:22

In reply to by सामो

Patni, Woh and Woo ठेवावे. पतीला हद्दपारच करावे. इंग्रजीत लिहितानाही मॅन शब्दातला M कॅपिटल काढण्यास बंदी करावी.

मारवा Sat, 20/07/2019 - 22:03

प्रियंका गांधी यांनी ज्या
सभ्यतेने
संयमाने
सुजाणपणाने
संवेदनशीलतेने

सोनभद्र प्रकरणात योगी सरकारच्या विरोधात जी भुमिका घेतली ती अत्यंत

स्तुत्य्
अनुकरणीय
अशी आहे
याच रीतीने जर प्रियंका गांधी काम करत राहील्या तर त्यांच्यात भारतीय राजकारणाला एक नविन दिशा देण्याची क्षमता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/07/2019 - 20:17

पारंपरिक सर्वेक्षणांचं भारतीय निवडणुकांसंदर्भात काय होईल - ह्याबद्दल 'लोकरंग'मध्ये आलेला माझा लेख. (दुवा)

ह्या लेखातले काही मुद्दे सुचवण्याबद्दल नंदनचे आभार.

चिमणराव Sun, 21/07/2019 - 22:01

लेख वाचला.
१)गुगलची पोहोच किती यांवर सर्व ट्रेन्डसचा डोलारा उभा आहे.
२) गुगलला कुणी विचारलेच नाही तर ते आरशांत दिसणार नाही.
३) भटकंती दरम्यान एक आर्मि अधिकारी भेटला वाराणसीचा. सध्या पुण्यात पोस्टिंग आहे. " बालाकोट प्रकरण मोदीने बरोबर पोहोचवले. देशाचे संरक्षण हा मुद्दा फार पटला सामान्यांना. "
४) थोडक्यात एखादा मुद्दा आणि सर्वेक्षण यामध्ये तफावत पडू शकते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 21/07/2019 - 22:56

In reply to by चिमणराव

'लोकरंग'मधल्याच ह्या दुसऱ्या लेखातून गूगलमधून किती माहिती मिळू शकते आणि ती किती विश्वासार्ह आहे, ह्याचे शब्दशः आकडे मिळतील.

सुनील Mon, 22/07/2019 - 11:35

In reply to by चिमणराव

१)गुगलची पोहोच किती यांवर सर्व ट्रेन्डसचा डोलारा उभा आहे.

तूर्तास मुक्काम पॅरीस येथे एका Airbnb अपार्टमेन्ट्मध्ये. कालचीच गोष्ट. दुसऱ्या दिवशीच्या न्याहरीसाठी अंडी-दूध फारशी नाहीत हे दिवसभराच्या भटकंतीत लक्षात आले नाही. संध्याकाळी पाहिले तर इमारतीखालील किराणा दुकान बंद होते (रविवारी बरीच दुकाने बंद असतात). गूगल मॅपवर शोध घेतला असता, सर्वात जवळचे, उघडे असणारे किराणा दुकान दीड मैलावर असल्याचे कळले. जायची तयारी केली तो दारातच अपार्टमेंटचा मालक भेटला. त्याने आतील गल्लीतून गेल्यास दहा मिनिटात एक तूर्की किराणा दुकान असल्याचे शुभ्-वर्तमान दिले. जे गूगलबाबाला ठाउक़ नव्हते!

चिमणराव Mon, 22/07/2019 - 07:44

ज्यांना काहीच माहीत नाही त्यांना थोडाफार अंदाज नक्कीच मिळेल.
----
एखाद्या समारंभास किती पाहुणे येतील हे समजण्यासाठी काही शोध असतात का?

चिमणराव Mon, 22/07/2019 - 19:06

तुमच्या man चा मुद्दा वर काढायला परत वाव आहे. शिगरेटी फक्त पुरुषांंनीच ओढायच्या असा भारतियांनी नियम/समज करून घेतल्याने ट्विटरवर प्रियांका ट्रोलवर.
((कोळणीच्या विड्या माफ. कोयताच बसेल डोक्यात.))