शोध

शोधत होतास जिवाच्या आकांतानी मला, तेव्हा होते मी तुझ्याच पाठीशी उभी
काल आजची गोष्ट नाही, मी आहे अनादि, अविचल, अन कालातीत।
पहाते आहे तुझी धडपड माझ्यापर्यंत पोहोचण्याची, निरंतन आणि निष्प्रेम
तुला पार करावी लागतील युगे आणि शिकावे लागतील करुणा आणि त्यागाचे धडे।
जमलंच करायला हे सगळं, तर दिसेन मी तुझी वाट पहात तुझ्याच पाठीशी उभी
पण वळून मात्र पहावं लागेल, जाणिवेचा हात धरून आणि प्रेमानी डोळे भरून।

field_vote: 
0
No votes yet